राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही प्रमाणात ठोकताळे बरोबर ठरतात. मी साधारणतः एखाद्या व्यक्तीचा परिचय झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची रास विचारतो. ती बहुदा बरोबर निघते (चंद्ररास.)

कधी कधी दोन भिन्न राशींचे स्वभाव एकत्र दिसतात. त्यालाही काही कारणे असतात, असे मला सांगितले होते. इथेही मी ओळख असलेल्या मायबोलीकरांच्या राशीचे अनुमान करु शकतो (पण जाहीर करणार नाही !!)

माझी रास सिंह !! (आता मी खमका आहे का ? )

<<काही प्रमाणात ठोकताळे बरोबर ठरतात. मी साधारणतः एखाद्या व्यक्तीचा परिचय झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची रास विचारतो. ती बहुदा बरोबर निघते (चंद्ररास<<<
अगदी बरोब्बर!माझाही हा अनुभव आहे.
मी पण कर्क! Happy

वृषभ राशीच्या कलासक्त, मिथुन राशीच्या बोलघेवड्या, फटकळ आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती ओळखण्यास कष्ट पडत नाहीत. Proud

तुळ, कुंभ, धनु, मीन राशींच्या व्यक्ती ओळखायला कठीण जाते.

लहान असताना पाहिलास 'राशीभविष्य' कि नुकताच पाहिलाय? चंद्र,चांदण्या,राशी काय खरं नाही तुझं निंबे.

चंद्ररास >> येस्स. मलाही चंद्ररासच (जन्मतिथीप्रमाणे येणारी [मूनसाईन]) अपेक्षित आहे. इंग्रजी तारखांप्रमाणे येते ती सूर्यरास (सनसाईन) ना!

प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का? >>>
१. लग्न राशी वरुन म्हणजे पत्रिकेतील पहिल्या स्थानात जी रास असेल त्या वरुन संबंधीत व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले जाते.
२. चंद्र राशी वरुन कर्म संबंधीत भाकीत केले जाते.

यावर लिंब्या अधिक प्रकाश टाकेल.

मला चंद्रराशींची काही माहिती नाही पण जन्मतारखेवरुन ठरणार्‍या इंग्रजी राशींची स्वभाववैशिष्ठ्ये माहिती आहेत, त्यातही बरीच मजा आहे.
मुद्दा एवढाच की हे सर्व मजा म्हणूनच घ्यावे आणि तिथेच थांबावे!

१. लग्न राशी वरुन म्हणजे पत्रिकेतील पहिल्या स्थानात जी रास असेल त्या वरुन संबंधीत व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले जाते.
२. चंद्र राशी वरुन कर्म संबंधीत भाकीत केले जाते.>>>>> बरोबर मी पण असाच काहीसे ऐकले आहे की जन्म रास आणि लग्न रस यावरून माणसाचा स्वभाव ठरतो.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे , फक्त राशींच्यावर स्वभाव अवलंबून नसावा. चंद्ररास + नक्षत्र हे काँबिनेशन अजून थोडा जास्त प्रकाश पाडत असावं स्वभावावर. फारच थोडी माहिती आहे मला याबद्दल, पण इंटरेस्ट खूप आहे.

येस्स. आगाऊ. मलाही इथे शास्त्रोक्त चर्चा वगैरे अपेक्षित नाहीये. म्हणून तर हा बाफ विरंगुळा मध्ये काढला आहे. पेपर मध्ये आलेलं राशीभविष्य हा टिपी म्हणून वाचण्याचा विषय आहे माझ्यासाठी तरी. पण ओळखी झाल्यानंतर त्या व्यक्तीची आपण प्रेडिक्ट केलेली रास करेक्ट होती का हे जाणून घ्यायला मजा येते.

मी सिंह: हो थोडी खमकी आहे. आणि एक बघीतले आहे की आपोआप लीडरशीप चालुन येते. प्रयास करावे लागत नाहीत. एकदा ठरवलं की ती गोष्ट केलीच जाते. खुप जीद्दी स्वभाव. एखादी गोष्ट इंटेन्सली हवी झाली की ती मिळतेच. फार प्रयास करावे लागत नाहीत. ह्या राशीचा चांगलाच अनुभव आहे. मी, नवरा, मुलगी, माझे काका, माझी मावशी, तीची मुलगी, माझी खुप जवळची मैत्रीण सगळे सिंह आहोत. त्या मुळे ह्या राशीचे गुण्/दोष चांगलेच अनुभवायला मिळाले.

कर्क : माझी आई आणि सासु... दोघीही मुर्तीमंत आया. अगदी आदर्श. मी आणि नवरा भाग्यवान. माझी मुलगी अजुन भाग्यवान कारण कर्क आजी म्हणजे लोण्याहुनही मऊ.

कन्या: माझे सासरे. पुर्ण विक्षिप्त. चींतातुर जंतु. सदा काळजीत. पोट दुखलं तर लगेच "अल्सर नसेल ना" पोट सुटलं तर " जलोदर तर नसेल" ह्या शंका. कधीच कोणाचं कौतुक नाही. खंत नाही की खेद नाही.

कुंभः कमरेचे सोडुन देणारे. संत व्यक्ती. खुप हुषार. पण थोडे पुढेपुढे करण्यात कमी पडणारे. माझे वडिल.

मेष: एकांगी. एकदम धडाकेबाज. करुन टाकायचं विचार करायचा नाही. आधी क्रुती मग इतर विचार. माझी खुप जवळची मैत्रिण आणि एक चांगला मित्र.

चंद्ररास + नक्षत्र हे काँबिनेशन अजून थोडा जास्त प्रकाश पाडत असावं स्वभावावर. >> अनुमोदन.

श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") >>> राशीचक्र

जन्मतारखेवरुन ठरणार्‍या इंग्रजी राशींची स्वभाववैशिष्ठ्ये माहिती आहेत, त्यातही बरीच मजा आहे. >>> आगाऊ... नव ग्रहांना बारा राशीत गुंफून त्या विधात्याने खूपच धमाल केली आहे.

ह्या राशीचा चांगलाच अनुभव आहे. मी, नवरा, मुलगी, माझे काका, माझी मावशी, तीची मुलगी, माझी खुप जवळची मैत्रीण सगळे सिंह आहोत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

तुमचं घर म्हणजे "गीरचं अभयारण्य" आहे म्हणायचं... सिंहांचा कळप Light 1

कन्या: माझे सासरे. पुर्ण विक्षिप्त. चींतातुर जंतु. सदा काळजीत. पोट दुखलं तर लगेच "अल्सर नसेल ना" पोट सुटलं तर " जलोदर तर नसेल" ह्या शंका. कधीच कोणाचं कौतुक नाही. खंत नाही की खेद नाही.

>>>
अगदी अगदी. माझ्याकडे माझ्या साबा, साबु, दिवंगत आजेसासरे. Happy अगदी असाच स्वभाव.

पण ओळखी झाल्यानंतर त्या व्यक्तीची आपण प्रेडिक्ट केलेली रास करेक्ट होती का हे जाणून घ्यायला मजा येते. +१

बर्‍याचदा ती बरोबर निघते... Happy

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत >>>>>> मी नाही असा

Pages