राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोरदार टीपी ... पण लिखाणातून दिसणारी रास आणी स्वभाव रास (चंद्र,लग्न वा सूर्य) ह्यांचा कितपत मेळ असतो? लिंब्या, मास्तुरे एनी कमेण्ट्स?

>>>> पण लिखाणातून दिसणारी रास आणी स्वभाव रास (चंद्र,लग्न वा सूर्य) ह्यांचा कितपत मेळ असतो? <<<<<
ह्यांचा मेळ असू शकतो/असतोच. फक्त तो "चेहर्‍यावरील हावभाव" वा "हातवारे" इत्यादिक कृतीन्मधुन जितक्या ठळकपणे दिसुन येईल, तितक्या ठळकपणे दिसणार नाही.
शिवाय, लिखाणात, विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवरुन, तसेच, व्यक्त होणार्‍या विचारान्वरुनही स्वभावाचा, पक्षी राशीचा अंदाज बांधता येईल. मात्र, पुन्हा तेच, की जशी माणसे एरवीही वावरताना घरादारात वेगवेगळे "वागण्याचे" घट्ट मुखवटे घालुन वावरतात, तसेच लिखाणातही बंव्हशी होतेच होते, अन त्यातुनच, एखाद दुसर्‍या चूकार सुटलेल्या वाक्यशब्दरचनेतुन मूळ स्वभाव कळू शकतो. पण यावर अभ्यास तितकाच हवा, समजण्यास पराकोटिची संवेदनशीलता हवी. अन रास जरी कळायला अवघड असली, तरी "ग्रहांचा" परीणाम मात्र नक्की कळतोच.

जसे की, बुध वा नेपच्युन च्या प्रभावाखालील व्यक्ति "ड्युप्लिकेट आयडी" हाताळू शकते. Wink रवि प्रभावाखालिल सिंह वाले त्या भानगडीत कधीच पडणार नाहीत. काही प्रमाणात मंगळाचे मेष देखिल पडणार नाही. मात्र मंगळाचीच वृश्चिक रास ते निश्चित पणे करु शकेल. पण बुधाने हाताळलेली ड्युप्लिकेट आयडी, अन वृश्चिकेच्या मंगळाने हाताळलेली ड्युप्लिकेट आयडी यान्च्या मूळ उद्दीष्टातच जमिन अस्मानाचा फरक असेल.
चंद्र प्रभावातील लोक, "हे पण बरोबर, ते पण बरोबर" अशा वारा येईल तिकडे पाठ फिरविण्याच्या तयारीत दिसतील. तर गुरू प्रभावातील लोक सदैव काहीना काही उपयुक्त मजकुर लिहीतील. कोणच्याही विचारधारेचा असो, पण आदर्शवादाचा पुरस्कार करतील (नास्तिक असले तरीही, नास्तिकतेतील आदर्शान्चा अत्याग्रह धरतील, नास्तिकता कुण्डलितील बिघडलेल्या कूयोगातील गुरू मुळेच उद्भवते). शनि प्रभावाखालिल व्यक्ति निरस/किचकट विषय हाताळेल, भावनिक विषय हाताळलेच तर त्यात निरुत्साह जाणवेल. मात्र दीर्घकालिक चिकाटीपूर्ण संशोधनासारख्या वा क्लिष्ट बाबीन्चे लिखाण या व्यक्ति सहजी करु शकतात.

कवित्व येण्यास सर्वच ग्रहान्चे पाठबळ आवश्यक असते, मात्र काव्य सुचणे या क्रियेला चंद्र/बुध/शुक्र हे शीघ्रगती व "नेपच्युन" हा दीर्घगती, हे ग्रह साह्य करतात. पण काव्याचा विषय काय असेल, हे पुन्हा अन्य कोणत्या ग्रहाचा बलिष्ठ योग वरील ग्रहांबरोबर आहे, त्यावरुन ठरेल, मंगळाचा प्रभाव असलेली व्यक्ति वीरश्रीयुक्त, त्वेषाची/द्वेषाची आक्रमक काव्ये रचील, तर शुक्रप्रधान व्यक्ति रसिकतेने लिन्गसापेक्षता जोजवित अनेक विषयावर काव्ये रचेल. बुध याबाबतित नंपुसक आहे, तो केवळ "शब्द" पुरवितो. कल्पनावैविध्य हे चंद्र-शुक्राकडूनच येईल. जर गुरू प्रबळ असेल, तर मात्र धार्मिक रचना होतील.
शनि सहसा या भानगडीत पडत नाही, पण पडलाच तर दीर्घकाव्ये होतील, शनीला तिरळे/चारोळ्या अमान्य. रविप्रधान व्य्क्तीची काव्ये "मीपणा"भोवती फिरतील वा कसल्यानाकसल्या अस्मितेचा अभिनिवेशीत पुकारा ठळकपणे करतील

>>> मिथुन आणि सो. मेष ह्या बद्दल कोणी सान्गेल का?
फक्त साडेसोळा गुणान्नी, लिम्ब्या मिथुन अन लिम्बी मेष! Proud आता काय सान्गू, कप्पाळ्ळ??? Wink

मस्त मजेदार माहिती मिळत आहे..

वृषभचं कोणाबरोबर अजिबात पटत नाही ते पण सांगा ना कोणीतरी...

उपाध्ये गुर्जी म्हणतात की माझ्या राशीची माणसं मुडी असतात.
बायको पण हेच बोल्ते. कार्यक्रम पाहुन म्हणत असेल का??? Happy

मुडी तर सगळेच असतात ना....

लिंबूभाउ >> मस्त Happy ....

सगळे जणं नवरा-बायको बद्दल विचारतायत . . . मला वडिल मेष + मुलगा मीन .... या बद्दल कोणि सांगेल का??

>>>> मला वडिल मेष + मुलगा मीन <<<<
जर राशीपरत्वे, सर्व योग बलिष्ठपणे कार्यरत असतील तर,
मेषेचे वडिल, त्यांची हुकुमशाही-मुकादमी कार्यपद्धती व अपेक्षा, यास मीनेचा किरकिर्‍या स्वभावाचा घोळकरी मुलगा उतरु शकणार नाही. वडील मुलांस घोड्यावर (निरनिराळ्या क्षेत्रात) बसव बसव बसवू पहातील, अन मीनेचा तुलनेत घाबरट मुलगा पाय मागे ओढत असेल. अर्थात, सुसंवाद असेल, तर कॉन्फिडन्स द्यायला मेषेचा बाप असणे हे भाग्याचे लक्षण होय, त्याचा योग्य उपयोग मीनेचा मुलगा करु शकेल, पण मग त्याला दुसरी-तिसरी संधी देण्याचा संयमही मेषेच्या बापाने बाळगायला हवा.
प्रथम प्रयत्नात मुलगा अपेशी ठरला तर त्याला शब्दाने वा कृतीने "नाऊमेद" न करण्याचे बंधन मेषेच्या बापाने स्वतःवर घालुन घेतले, तर मीनेचा मुलगा, जरुर पुढल्या प्रयत्नात बापाचेच पाठिम्ब्याने/आधारावर यशस्वी होऊ शकेल. "सुसंवाद" आत्यंतिक महत्वाचा. त्याबाबतीत किरकिरी मीन अन तापट मेष यांनी नीट "संयम" साधला तर हे कॉम्बिनेशन सोन्याहूनही पिवळे होऊ शकते. Happy असो.

तसा काही हा वाईट योग नाहीये, आमच्यात, बाप नसला तरी आई मेषेची अन पोरगी मीनेची अस कॉम्बिनेशन आहेच! बघतोच आहे रोजचे तमाशे! Wink

>>>>> उपाध्ये गुर्जी म्हणतात की माझ्या राशीची माणसं मुडी असतात. <<<<
हो का? उपाध्ये गुरुजीन्ची रास कोणती? Proud

झकोबा, रास सान्ग ना Happy
चारुदत्त, धन्स काय? फिडब्याक दे मात्र, पटतय की नाही त्याचा Happy

अगं दक्षिणा >> एकदम layman भाषेत
बालकाच्या जन्म वेळेस चंद्र ज्या राशित असतो ति त्याची चंद्ररास , सुर्य ज्या राशित असतो ति त्याची सुर्यरास आणि पूर्व दिशेने जि उगवती रास असते ती लग्नरास . .

दक्षे नीट लक्ष दे बघ,
१. जन्मवेळेस, पूर्व क्षितीजावर जी रास उदित असेल, ती लग्न रास. कुण्डली पुस्तकामधे सामान्यतः प्रथम स्थानी ही रास मान्डुन "लग्न कुन्डली" मान्डलेली असते. प्रथमस्थानात जो आकडा असतो तो राशीनिदर्शक असतो (स्थाननिदर्शक नव्हे)
२. जन्मवेळेस ज्या राशीत चंद्र असतो ती चंद्र रास. लग्न कुंडलीमधे बघुन हे समजते. शिवाय, कुन्डली पुस्तकात स्वतंत्रपणे "राशीकुन्डली" अथवा "चंद्रकुन्डली" दिलेली असते.
३. जन्मवेळेस ज्या राशीत सूर्य असतो, ती रवि रास. हिन्दु पद्धतीमधे याची स्वतंत्र कुन्डली मान्डत नाहीत.
मात्र, वर्तमानपत्रात जन्मतारखेनुसार जेव्हा भविष्य सान्गितलेले असते ते याच "रवि राशीवरुन" पण त्यात पुन्हा एक भेद येतोच, ते म्हणजे हिन्दु निरयन पद्धतीमधे जन्मवेळेस रवि ज्या राशीत दर्शविलेला असतो, त्याप्रमाणे पाश्चात्य सायन पद्धतीमधे त्याच राशित तो नसतो. (काहीतरी जास्तितजास्त साडेतेविस की काही अंशान्चा फरक पडतो. सायन-निरयन मधिल भेद म्हणजे उत्तरधृव व पृथ्विचा मध्य कल्पिले असता जो फरक पडेल तो - जाणकारच यावर योग्य भाष्य करु शकतील) निव्वळ रविराशीचा विचार केला अस्ता, भविष्यकथनात सायन-निरयनचा फरक जाणवेल इतपत पडतो. उदाहरणार्थ, हिन्दु पद्धतीप्रमाणे माझी रविरास तूळ येते, तर पाश्चात्य पद्द्धतीप्रमाणे वृश्चिक येते. पण वृश्चिकेच्या रविचा एकही गुण माझ्यात दृगोच्चर होत नाही, त्याचवेळेस, तुळेतील नीचेच्या रविचे परिणाम मात्र सुस्पःष्टपणे दिसतात. असो. या घोळात तू जास्त पडू नकोसच.

लिंबूभऊ >> हो तंतोतंत नाहि पण खूपसे पटले Happy . .
माझी काहि मतं -
१) मेषेची बेधडक वॄत्ती मीनेच्या पचनी पडत नाही.
२) ' फक्त माझा पहिला नंबर' पर्यंत ठिक आहे पण 'दुसर्या नंबर वर आलेला कसा मूर्ख आहे आणि २रा नंबर त्याला द्यायचा म्हणून दिला आहे' हे मेषेचे धोरण मीनेला मान्य नसावे.
३) "दुसर्याला मते असू शकतात आणि ती आपल्या मतांपेक्शा वेगळी असू शकतात आणि बरोबर पण ठरू शकतात" हे मेषेला मान्य नसावे . . .
Happy Lol Proud

दक्षे, मी पण आतापर्यंत या बाफातून एवढंच शिकले की कुंडलीत चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्ररास, तारखेप्रमाणे येणारी ती सौररास आणि कुंडलीत पहिल्या स्थानात / लग्नस्थानी असते ती लग्न रास Proud

चंद्ररास - मीन
लग्नरास - तूळ
सौररास - कन्या

वर कुणीतरी म्हटलेलं वाचलं की मीनेचं आणि कन्येचं पटत नाही. मग या दोन राशी माझ्याच चंद्र आणि सौर राशी बनून बसल्यात. मग माझं माझ्याशीच पटत नाही काय? Proud

>>>> लिंबूभऊ >> हो तंतोतंत नाहि पण खूपसे पटले <<<<
तुमच्यात बाप कोणे नि पोरगा कोणे??? Wink त्यावर ठरेल, पटायचे की नै ते! Proud
असो. तुझ्यामते जे आहे ते, माझ्यामते
१) बरोबर आहे
२) तितकेसे बरोबर नाही.
३) हे देखिल तितकेसे बरोबर नाही.

>>> पण लिखाणातून दिसणारी रास आणी स्वभाव रास (चंद्र,लग्न वा सूर्य) ह्यांचा कितपत मेळ असतो? लिंब्या, मास्तुरे एनी कमेण्ट्स?

लेखनातून दिसणारी रास व मूळ चंद्र रास यांच्यात निश्चितच संगती असते.

>>> हो का? उपाध्ये गुरुजीन्ची रास कोणती?

उपाध्ये गुरूजी बहुतेक धनू राशीचे आहेत.

>>> वर कुणीतरी म्हटलेलं वाचलं की मीनेचं आणि कन्येचं पटत नाही. मग या दोन राशी माझ्याच चंद्र आणि सौर राशी बनून बसल्यात. मग माझं माझ्याशीच पटत नाही काय?

कन्येचा राशीस्वामी बुध आहे. मीन ही बुधाची अत्यंत नावडती रास आहे. पत्रिकेत मीनेचा बुध नीचीचा मानला जातो. चंद्र रास व सौर रास यांचा तसा प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे मीन चंद्र रास व कन्या सौर रास यांचा एकमेकांशी तसा प्रत्यक्ष संबंध नाही. तुमच्या मीन राशीमुळेच तुमचा स्वभाव धार्मिक अध्यात्मिक झालेला आहे. "उपासना" धाग्यावर नियमित लिहिणार्‍या बहुतेकांची रास मीन्/कर्क असणार.

लिंब्या... सापडली मला माझी रास.. माझी मेष,आणी सौ ची मकर.. आमचे इतकी वर्षे जमले याला कारणीभुत माझ्या मते मेषेची जबरदस्त सहनशीलता Wink
१.तिचे देवाधर्माशिवाय पान हालत नाही.. मला ते पान चालत नाही.. Happy
२. तिला वरणभात तर मला अभक्ष भक्षण प्रिय...
३. तिला नातेवाईक फार प्रिय आणी मला नकोसे..
४. ति रोज फोन वर तास दोन तास बोलते मी माबोवर.. Happy

लिंबूभऊ >> मि मीन. Lol
माझी मते मझ्या खूप जवळून संपर्कात आलेल्या ६ मेष आणि २ मीन व्यक्तींवरून तयार झली आहेत Happy ....
त्यामुळे मग मि त्याला "माझ्यापुरते" असा tag लावतो Happy Lol

त्यामुळे मीन चंद्र रास व कन्या सौर रास यांचा एकमेकांशी तसा प्रत्यक्ष संबंध नाही. >>> Happy

रामभौ, तुझे चारी आकडे वाचले, अरे पण एकेकट्या राशी-ग्रहान्चा अन "माणूसघाणे" पणाचा का।ईच सम्बन्ध नाहीये हो! Wink तुझ्यासारखी वैशिष्ट्ये बघायला प्रत्यक्ष कुन्डलीतील बाराही स्थाने अन नऊ अन तीन बाराही ग्रह बघायला लागतील! काय? Proud

बरं लिंब्या माझी रास सांग कि..
इतर ठिकाणीच जास्त लक्ष दिसतय एकंदरीत तुझं.. :p
माहिती चांगली दिसत्ये पण तुला, एकदा बसायला हवं..

लिंबूकाका, हा भागा म्हणजे तुमचं सल्लाकेंद्र झालाय. एक बदल म्हणून आता माझी चांद्र रास ओळखून दाखवाच पाहू! Happy दिनेशदांनी सौर अचूकपणे ओळखली.
आ.न.,
-गा.पै.

गामाभौ, तुमची सौर रास मीन! हम्म!
म्हणजे १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान जन्म
अर्थात आता नुसती वेळ कळली, तर लग्नरास नक्की सान्गता येईल.
अन तिथी कळली तर चन्द्ररासही सान्गता येईल! Proud पण असो.
मला तुमची चन्द्ररास कुम्भ असावी असे वाटते. (फार क्वचित मेष - व्ययात रविला टाकुन)

Pages