राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> बायदिवे, महाराष्ट्राची चन्द्ररास काये?

धनू

>>> श्रीरामचंद्र : पुष्य नक्षत्र, कर्क रास
>>> हे वाचून जाम गंमत वाटली. सतिशचा जन्मदेखील रामनवमीचा आहे. शिवाय त्याची पण कर्क रास पुष्य नक्षत्र. हळवा आणि क्षमाशील वगैरे मात्र अजिबात नाहीये तो.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या वेळी ५ ग्रह उच्चीचे होते. त्यांचा एकत्रित परीणाम त्यांच्या जीवनावर दिसून येतो.

कृपया पत्रिकेसाठी विचारु नये,क्षमस्व.:स्मित:

मेष रास आणी वृश्चिक रास प्रीती म्हणता येणार नाही पण षडाष्टक. दोन्ही राशीन्चा एकच मालक मन्गळ ग्रह. पण मेष सडेतोड स्वभाव तर वृश्चिक आतल्या स्वभावाची. मेष उतावळी तर वृ वाट पहाणारी. मेष मनात काही न ठेवणारी तर वृ आतल्या मनाचा थान्गपत्ता न लागु देणारी.

सध्या वृ ला साडेसातीचा २ भाग चालू ( दुसरे अडिचके चालू) हळू हळू परिस्थितीत फरक पडत जाईल. सधय गुरु अनुकूल आहे, फायदा उठवा. सन्धी सारखी मिळत नसते.

आमच्याकडे मी मकर आणि नवरोबा कन्या. माझी रास अतिशय "गरीब' (स्वभावाने !) ह्यावर त्याचा विश्वास बसणे कठिण च आहे.
आता ह्यात कन्या राशीचा प्रभाव की स्वानुभवाचा?

मकर रास पझेसिव्ह आणि डॉमिनेटिंग असते.कन्या रास बरीचशी घोळघालू असते.पण कन्या रास मायेला खूप छान असते.

मकर रास डॉमिनेटिंग नसते..........उल्ट खूप कष्टाळू असते.....सिंह , मेष, वॄश्चिक,धनू, या राशी वर्चस्व गाजवणार्या असतात...

मकर रास डॉमिनेटिंग नसते..........उल्ट खूप कष्टाळू असते.....>> सहमत! मकर राशीचे लोक कर्मांवर फार विश्वास ठेवतात आणि एक दिवस नक्की यश मिळेल या आशेने मेहनतीत सातत्य ठेवतात. शॉर्ट कट वर विश्वास ठेवत नाहीत!

माहेरी सासरी मिळून अर्ध्याअधिक राशींचे नमुने आहेत!
दीर मेष! राशीस्वामी मंगळ ग्रह, अग्नी तत्व, पुरूष रास. ही रास अतिशय तापट, फटकळ, स्पष्टवक्ती, अविचाराने घाईघाईने निर्णय घेणारी, जे होईल ते बघू असा विचार करून आज आणि आत्ता मध्ये जगणारी, खूप व्यवहारी पण तितकीच धडाडीची अति उत्साही, मदत करणारी, कुटूंबावर खूप प्रेम करणारी, काळजी घेणारी रास! थोडक्यात मागचा पुढचा विचार न करता मेंढयासारखी धडक देणारी बेधडक लढवय्यी रास!

वडील सिंह - राशीस्वामी सूर्य ग्रह, अग्नी तत्व, पुरूष रास. ही रास घरातील कर्त्या पुरूषाची! घराची सगळी जबाबदारी अबोलपणे स्वतःच्या खांद्यावर घेणारी, स्वाभीमानी रास! स्पष्टवक्ती, टापटिपपणा, आटोपशीरपणा, चोख व्यवहार, प्रामाणिक, मितभाषी, मुद्देसूद बोलणं! गुंतवणूकीची विशेष आवड!

सिंह लोकांकडे नेतृत्व आपसूक येते. बर्‍याच क्षेत्रातली त्यांना (जुजबी) माहिती असते त्यामुळे ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतात. प्रेम केले तर मनापासून आणि दुस्वास केला तर तोही मनापासून. एखाद्याला आपले मानले तर, त्याच्यासाठी रक्ताचे पाणी करतील. पण मेहनतीत कमी पडतात (अंगात आळस असतो.)>>>>> +१११

सासरे आणि बहीण तूळ - राशीस्वामी शुक्र ग्रह, वायु तत्व, पुरूष रास. बॅलन्स्ड न्यायप्रिय रास! घरात एकतरी तुळेची व्यक्ती हवी! घर शांत व बॅलन्स्ड राहतं! अतिशय हुशार, अभ्यासू, बर्‍याच गोष्टींची माहीती घेणारे त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात गेल्यास यश मिळवणारे! शक्यतो शिक्षकी पेशातील तूळ व्यक्ती उत्तम शिक्षक/शिक्षिका होतात. बोलकी, स्पष्टवक्ती, सौंदर्यदृष्टी असलेली! खवय्ये! खाण्याची, खिलवण्याची, फिरण्याची, सुगंधाची, नीटनेटकेपणाची खूप आवड! कलासक्त. कितीही आवडती व्यक्ती असेल तरी चूक ते चूक व बरोबर ते बरोबर म्हणणारे!

नवरा वृश्चिक : राशीस्वामी मंगळ ग्रह, जल तत्व, स्त्री रास. परफेक्शनिस्ट! हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करणारे! संकल्प तडीस नेणारे! सेल्फमेड! अति पझेसिव त्यामुळे संशयी, भित्रा स्वभाव! बातम्यांमध्ये वाईट दाखवलं तर ते आपल्या सोबतही घडेल की काय याने पछाडलेले! मनाचा थांगपत्ता लागू न देणारे, लहरी. बोलण्यात वागण्यात कायम विसंगती. त्यामुळे यांच्याबद्दल गैरसमज खूप असतात. तिखट जिव्हारी लागणारं बोलणारे! व्यवहारी! तरी हळवे. अटेन्शनसाठी, प्रेमासाठी कायम आसुसलेले. लॅव्हीश लाईफची मनापासून आवड असलेले व ते स्वबळावर कमावणारे! लॉजिक चांगलं असतं आणि इन्ट्युशन्सही! मेषेच्या विरूद्ध - खूप विचार करून निर्णय घेणारे! यशही जपून साजरं करणारे! डिवचलं की जास्त चांगलं काम करतात Happy

सासू धनु : राशीस्वामी गुरू ग्रह, अग्नी तत्व, पुरूष रास हातात सतत ताणलेला बाण, कधी कोणाचे शिरकाण होईल सांगता येणार नाही. (गुण पाहीले तर लक्षात येईल बर्‍याच सासवांची रास धनु असावी) Proud स्वच्छ्तेचे भोक्ते! साडीची असो किंवा संसाराची घडी चापूनचोपून बसवणारे! हौशी, हुशार, स्वष्ट वाणी, कलासक्त, उंची कपड्यांची, दागिन्यांची आवड. अतिशय हट्टी व आपलं तेच खरं करण्याचा स्वभाव (मूळ नक्षत्र असेल तर अजूनच त्रासदायक!)

मुलगा कुंभ : राशीस्वामी शनी ग्रह, वायू तत्व, पुरूष रास. शनी तत्वाखाली असली तरी भाग्यवान रास. विचारी! स्वतःतच गर्क असणारे! शांतताप्रिय, विरक्त! खाण्यापिण्याबाबत उदासिन. मितभाषी. हुशार. सर्जनशील. अकाली प्रौढ असल्यासारखे वागणारे! उच्च कोटीची एकाग्रता, स्मरणशक्ती, चौकसता, बुद्धीमान. बुद्धीवादी व विज्ञानवादी असतात. यांची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती व धारणाशक्ती इतर राशींच्या तुलनेत उच्च असते. परफेक्शनिस्ट, दूरदर्शी, वक्तशीर, शिस्तप्रिय, दीर्घोद्योगी, समंजस. वाद आवडत नसल्याने आपण भलं आपलं काम भलं या कोषात जगणारे. तात्विक वाद मात्र आवडतात आणि आपल्या मतावर ठाम असतात. Happy त्यामुळे यांचे विनोदही इंटेलेक्च्युअल असतात. पाचकळपणा, अपशब्द, धांदरटपणा, अव्यवस्थितपणा शक्यतो सहन करत नाहीत. स्पष्टवक्ते असतात, आपली मते शांतपणे, ठाम सूरात मांडतात. मोठ्याने बोलणं, विनाकारण वाद घालणं यांपेक्षा तिथून निघून जाणे व शांत ठिकाणी बसणे पसंत करतात. सौंदर्यापेक्षा बुद्धीमत्तेला जास्त महत्व देतात. स्वतःच्या शरीराला, व्यक्तीमत्वाला, चारीत्र्याला डाग लागणार नाही याची कसोशीने काळजी घेतात. स्वच्छ्ताप्रिय, सत्यताप्रिय, न्यायप्रिय असतात!

लास्ट अँड बेस्ट मीन Wink राशीस्वामी गुरू ग्रह, जल तत्व, स्त्री रास. मी, आई आणि भाऊ! घोळ घालणारी कन्फुज्ड धांदरट विसराळू राशी. त्यामुळे काहींना बावळटपणा तर काहींना आगाऊपणा वाटू शकतो. कधी ओव्हरकॉन्फीडंट तर कधी भित्री. चुकीचे ऐकण्यात, गैरसमज करून घेण्यात कोणीच हात धरू शकत नाही Proud त्यामुळे विचारलं एक उत्तर भलतंच ही गोची नेहमीच! भरीसभर म्हणून धांदरटपणा, विसराळूपणा आणि कन्फ्युजन पाचवीला पुजलेलं. पण यातूनही स्वता:वराती जोक करून घेऊन हसत राहणारी, हसवत राहणारी आनंदी समाधानी वृत्ती! भित्री म्हणून उगाच वाद नको यासाठी भांडणांपासून थोडं अंतर ठेऊन राहणारी, जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी, छान राहायची आवड. कलासक्त! एकतरी कला गुण असतोच! गाण्याची (किमान गाणी ऐकण्याची आवड), धर्मभोळी, आस्तीक, पापभिरू, आशावादी, जगण्यावर भरभरून प्रेम करणारी, जगण्याचा भरभरून उपभोग घेणारी! सोशल, स्वप्नाळू, दुसर्‍याला समजून घेणारी, फुकटचे सल्ले देणारी (प्रसंगी स्वत:च्या डोक्याला भुंगा लावून घेऊन), मदततत्पर, हळवी, कंफर्ट झोन मधून शक्यतो बाहेर न पडणारी त्यामुळे चिकाटी कमी असलेली आरंभशूर!

चार तत्वांमध्ये विभागले गेल्यामुळे कुठल्याही राशीत त्या तत्वांच्या आधिन असलेल्या इतर दोन राशींमधील काही समान गूण येतात. हेच ग्रहस्वामी एक असलेल्या राशींबाबत. - एक निरीक्षण. राशीस्वामी, तत्व आणि स्त्री/पुरूष राशी हे कॉम्बीनेशन लक्षात घेतले तर राशीवरून स्वभाव ओळखायला अवघड नाहीये Happy

मिथून राशीचे मित्र आहेत म्हणून जास्त खोलात शिरले नाही Happy जस्ट जोकींग!

राशीस्वामी बुध ग्रह, वायू तत्व, पुरूष रास. काँबीनेशनच सांगतेय किती चंचल रास आहे ती Wink अतिशय बोलघेवडी, बोलण्यात चतुर, इंटेलेक्च्युअल, दुसर्‍यावर प्रेम करतोय असे दाखवले तरी स्वतःवरच खूप प्रेम असणारी रास. रसिक, फिरण्याची फोटोग्राफीची प्रचंड आवड असलेली, हास्यविनोद करणारी (कधी कधी अती स्पष्टवक्तेपणामुळे यांनी दुसर्‍यावर केलेले विनोद जिव्हारी लागू शकतात), खेळकर स्वभावाची, पण तितकंच लवकर कुठल्याही गोष्टीला कंटाळणारी, सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असणारी, एक उत्कृष्ट साथीदार, जमेल तितकी मदत करणारी, नास्तिक, कलासक्त, उत्तम स्मरणशक्ती असणारी, अभ्यासू, ओव्हर कॉन्फीडंट, स्पष्ट मतं असणारी रास. तरी कधी कधी अंतर्मुख होणारी, स्वतःची दु:खं कधीच दुसर्‍याकडे मनमोकळी न करणारी, संवेदनाशील रास! मार्केटिंग वाले या राशीचे असतील तर समोरच्याला गुंडाळलंच समजा Proud

"प्यार मेरे सेहत के लिये अच्छा नही म्हणणारा" ये जवानी है दिवानी चा बन्नी मला या राशीचा वाटतो. Happy

ड्रीमगर्ल, छानच सांगितल मिथुनेचे.
माझीच मिथुन रास मिथुन लग्न असल्याने जरा कुतुहलाने विचारले होते. वरील बाबी चपखल बसताहेत.

>>>> स्वतःची दु:खं कधीच दुसर्‍याकडे मनमोकळी न करणारी, संवेदनाशील रास! <<<<
दु:खे मग ती मानसिक असोत की शारिरिक, सहसा त्यांचे जराही प्रदर्शन होऊ न देणारी रास, स्वत:च्या दु:खाची इतरांमधे बोलुन/सांगुन इतरान्नाही दु:खी करीत सहानुभूती गोळा करण्याकरता वाटणी न करणारी रास - अन जर इतरांना बोललेच, तर अशा पद्धतीने सांगतील की त्यामुळेही वातावरण हलकेफुलके होईल - आत्यंतिक दु:खाची/संकटाची कसलीही धक्कादायक गोष्टही अशी काही विनोद/उपहास/टीका यांची पेरणी करीत फाटे फोडत सांगतील की मूळ धक्का जाणवूच नये. - अर्थात याकरता इतर ग्रहांची जोडही हवी असते हे सांगणे नलगे.
दु:ख या ऐवजी स्वतःतील कच्चा - कमसर दुवा कधीही उघड न करणारे म्हणूनही ओळखता येतील.

वृषभ रास एका मैत्रीणीची व मामेभावाची रास : राशीस्वामी शुक्र ग्रह, पृथ्वी तत्व, पुरूष रास. बैल त्यामुळे कष्टाळू! खांद्यावर घराची जबाबदारी पेलण्याची धमक! अतिशय लाघवी, मृदू, सहसा न चिडणार्‍या पण चिडल्यास शांत बसून राग कमी होण्याची वाट बघणार्‍या, प्रामाणिक, विश्वासू,दीर्घोद्योगी,सोशिक, बर्‍याचदा अबोल, हळव्या, आवडत्या व्यक्तीलाही मनातले भाव सहज सांगू न शकणार्‍या,आनंदी,रसिक,खवय्या,फिरण्याची आवड असणार्‍या, सुगंधाची व संगीताची (नोटःही मुलींची नावे नव्हेत :P) विशेष आवड असणार्‍या,वळणदार अक्षर असणार्‍या,मित्रां(मैत्रीणींमधेही!) मध्ये लोकप्रिय, आदर्श व आकर्षक व्यक्तीमत्व असल्याने या राशीच्या स्त्री किंवा पुरूषांकडे विरूद्ध लिंगी पटकन आकर्षित होतात Wink

लिंबुदा >> परफेक्ट!!
दु:खे मग ती मानसिक असोत की शारिरिक, सहसा त्यांचे जराही प्रदर्शन होऊ न देणारी रास, स्वत:च्या दु:खाची इतरांमधे बोलुन/सांगुन इतरान्नाही दु:खी करीत सहानुभूती गोळा करण्याकरता वाटणी न करणारी रास >> +१

आत्यंतिक दु:खाची/संकटाची कसलीही धक्कादायक गोष्टही अशी काही विनोद/उपहास/टीका यांची पेरणी करीत फाटे फोडत सांगतील की मूळ धक्का जाणवूच नये. >> +११११

हाडाचे मिथुन आहात हो!! Happy

शरद उपाध्ये यांना धन्यवाद. किमान महाराष्ट्रात तरी राशी आणि स्वभाव याबाबतची फार मोठी जाणिव लोकांमध्ये आली आहे हे या धाग्याला मिळालेल्या प्रतिसादावरुन समजले.

कन्या रास : राशीस्वामी बुध ग्रह, पृथ्वी तत्व, स्त्री रास! माझ्या स्वभावाच्या अगदी विरूध असल्याने फार उपद्रव झालेला या राशीच्या लोकांकडून Wink

जरा अबोल, घुम्या असतात पण बोलण्यापेक्षा या व्यक्ती काम करण्यावर भर देतात. हुशार, नर्म हास्यविनोद करणार्‍या, मदत करणार्‍या, व्यवहारचतुर, माणसं ओळखणार्‍या, पण भित्र्या, संशयी, घोळ घालणार्‍या असतात. प्रत्येक बाबतीचं कुतुहल, निरीक्षण शक्ती उत्तम, समाधानी, काटेकोर, संसारी, प्रिय व्यक्तींची खूप काळजी घेणार्‍या, स्मरणशक्ती अचाट असते, पण नको ते कुतुहल आणि अतीचिकीत्सक स्वभाव घोळ घालतो! Happy

कर्क रास ऑफीसमध्ये एक-दोघांची : राशीस्वामी चंद्र ग्रह (मनाचा कारक), जल तत्व, स्त्री रास त्यामुळे अतिशय हळवी रास. कर्क रास ही आईची रास म्हणतात! (त्यामुळे कर्क राशीच्या बायका पत्नीपेक्षा उत्तम आई असतात.) शांत, कोमल, मायाळू, हळवी! खवय्यी, प्रेमाने खाऊ घालणारी! स्वयंपाक घर कर्क राशीच्या बायकांच्या ताब्यात असतं आयुष्यभर! अतिशय आर्टिस्टिक, कलासक्त, शांत जुन्या क्लासिकल गाण्यांची आवड, चित्रकला, संगीत विशेष आवड, हळवे असले तरी विशिष्ट प्रसंगात जवळच्या व्यक्तींची खंबीरपणे काळजी घेणारे, रोमँटिक स्वभावाचे, व्यवहारात हुशार, स्मरणशक्ती उत्तम, माणसं ओळखणारे, समोरच्याला शब्दांत बरोब्बर पकडणारे! कर्क राशीचे पुरूष जोडीदाराच्या दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व देतात! सिंह राशीसारखी खंबीर जोडीदारीण मिळाली की आयुष्य (आणि पैशाचे व्यवहारही) बायकोवर सोपवून निर्धास्त होतात! रोमॅंटिक असल्याने फँटसीत रमणारे स्वप्नाळू लोक असतात! बर्‍याचदा लाड पुरवून घ्यायला आवडतात. आदर्श कुटुंबात कर्क राशीची आई, सिंहेचे वडील, तुळेची सून आणि वृश्चिकेचा मुलगा असावा म्हणतात! (आता यात पत्रिका जुळण्याचा संदर्भ घेतला नाहीये!)

मीपण राशीस्वभावाचा अनुभव वधूपरिक्षणात घेतला होता ( १२ नाही पण ४ वेगवेगळ्या राशीच्या मुली बघितल्या होत्या) आणि बहुतेकीचा स्वभाव पुस्तकात लिहिलेल्याप्रंमाणे होता.
पण माझ्या दोन्ही मुलांची रास वृषभ आहे पण स्वभाव १००% वेगळे आहेत.बहुतेक लग्न आणि सूर्यराशीचापण प्रभाव असेल.

ड्रीमगर्ल , तुम्ही लिहिलेली मिथुन राशीची वैशिष्ट्ये माझ्या घरातल्या एका व्यक्तीला लागू होतात मात्र सर्व नव्हे . तुम्ही लिहिलेल मिथुन राशीच्या व्यक्ती चंचल असतात हे अजिबात पटलेल नाही . माझी बहिण अतिशय जिद्दी आहे . एकदा हातात काम घेतल की ते पूर्णपणे करून सोडणार . ते ही अतिशय रेखीवपणे . चंचलता तिच्या स्वभावात नाही . फार हळवी , कलासक्त , आहे .

शांत, कोमल, मायाळू, हळवी! खवय्यी, प्रेमाने खाऊ घालणारी! स्वयंपाक घर कर्क राशीच्या बायकांच्या ताब्यात असतं आयुष्यभर! अतिशय आर्टिस्टिक, कलासक्त, शांत जुन्या क्लासिकल गाण्यांची आवड, चित्रकला, संगीत विशेष आवड,>>>>> आई ग ! परिचयतल्या दोन व्यक्तिनी हे वाचल की त्यांना घेरी येऊन पडतील Wink Lol

या दोन्ही व्यक्तीना स्वयंपाकातला स तरी माहीत असेल का याची शंका आहे . कला संगीत या बाबतीत औरंगजेब ! अतिशय चंचल आणि धूर्त स्वभाव . आळशीपणात एक नंबर . पण बोलण्यात एक नंबर .

पण यातूनही स्वता:वराती जोक करून घेऊन हसत राहणारी, हसवत राहणारी आनंदी समाधानी वृत्ती!>> काहीही क्रॅप. उलट स्वतःचे प्रेज्युडिस लोकांवर लादून ते तसे का नाहीत म्हणून प्रेशर आणतात. पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह. कधीही विषयाला हात घालून प्रश्न सोडवणार नाही. कन्फ्रंटेशनला घाबरणार. ह्यांचे समाधान लोकांच्या वागण्यातून येते त्यामुळे कधीच आतून सुखी होत नाहीत. ना लोकाला सुखी होउ देतात.

जरा अबोल, घुम्या असतात पण बोलण्यापेक्षा या व्यक्ती काम करण्यावर भर देतात. हुशार, नर्म हास्यविनोद करणार्‍या, मदत करणार्‍या, व्यवहारचतुर, माणसं ओळखणार्‍या, पण भित्र्या, संशयी, घोळ घालणार्‍या असतात. >>
भित्र्या? संशयी? घोळ घालणार्‍या हे पण काहीही आहे.

dreamgirl , छान लिहित आहात तुम्ही .
अमा, अहो प्रत्येक माणसाला एका राशीचे पूर्ण वर्णन लागू पडेल असे नाही . बर्याच अंशी ते लग्न रास , पत्रिकेतील इतर ग्रह आणि त्यांच्या राशी ह्या नुसार बदलते . ज्या लोकांची लग्न रास आणि चंद्र रास एकाच असते अशांना ते जास्त apply होते . तरी पण पूर्णत: लागू पडेलच असे नाही.

अन्विता बरोबर! जाई, अमा, पत्रिकेतील इतर ग्रह आणि नक्षत्रांवरून सेम राशी असलेल्यांचे स्वभावही वेगळे ठरतात. चंचल म्हणजे शब्दशः धरसोड नाही पण नित्य नाविन्याची आवड त्यामुळे फार काळ एकच काम, एकच नोकरी करू शकत नाहीत, शक्यतो स्वतःचा व्यवसाय काढायचं स्वप्न असतं!

कर्क राशीच्या व्यक्ती जेवढ्या हळव्या असतात तेवढ्या खमक्याही असतात... पण मूलतःच सगळ स्त्री ची वैशिष्ट्ये असल्याने हळवेपणा, कलासक्त स्वभाव, काळजी हे आपसूक येते.

वृश्चिक राशीच्या व्यक्ती ज्येष्ठा नक्षत्राच्या(किंवा विशाखा असेल आठवत नाही नक्की) असल्या तर तापट हेकेखोर स्वभाव जास्त असून बदला घेण्याची, जेलस, स्वार्थी वृत्ती आढळते पण अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती थोड्या हट्टी असल्या तरी हळव्या व कलासक्तही असतात. तसंच!

अमा>> कन्येबद्दलची भित्री, संशयी, चिकीत्सक, घोळ घालणारी ही मते शरद उपाध्ये यांची आहेत Wink कन्याच्या काय तुम्ही? Wink आणि मीनबद्दल>>होतं असं कधी कधी, आपल्याला न आवडत्या व्यक्तीबद्दलचे आपल्याला माहीत असलेले/जाणवलेले अवगुण हायलाईट होतात... आता प्रत्येक माणसात कोणत्याही राशी नक्षत्राचा असो, गुणासोबत अवगूणही येणारच ना! Happy

आणि तसंही हा धागा आपल्या ओळखीच्या "नमुन्यां"बद्दलचा आहे, अभ्यासपूर्ण नाही... सो मला जाणवलं ते लिहीलं! सरसकटीकरण नाही केलंय! ज्या व्यक्ती जशा जाणवल्या त्यांच्याशी साधर्म्य साधणार्‍या व्यक्तींना पटलंच की! Happy

मी मीनेच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं लिहीलेय बाकीच्यांचे स्वभाव वेगळे असू शकतात! स्वतःची रास नक्षत्र असल्याने जरा हात सैल सोडून स्तुती केलेय... तरी कोणाला या राशी+ नक्षत्राच्या व्यक्ती माहीत असल्यास त्यांचे अवगुणही सांगावेत... समजून दुरूस्ती करायला बरे Wink भुंगा, सानी आहात का रे? तुम्हीपण मीन वालेच ना?

माझे अवगुण वर मेन्शन केले नाहीयेत (ते माझ्या इतर ग्रहांवरही अवलंबून असू शकतात...) ते म्हणजे आळशी स्वभाव, आरंभशूर, सहनशक्ती जास्त असल्याने सहनशक्तीच्या बाहेर गेल्यावर होणारा उद्रेक जास्त मोठा असतो त्यामुळे रागावर कंट्रोल राहत नाही. राग लवकर विसरता येत नाही, मनात गोष्टी ठेवल्या जातात.

ह्यांचे समाधान लोकांच्या वागण्यातून येते त्यामुळे कधीच आतून सुखी होत नाहीत. ना लोकाला सुखी होउ देतात. >> हे माझ्याबाबतीत अगदी चुकीचे आहे. माझा भाऊ आणि आई याच राशीच्या रेवती नक्षत्राचे आहेत, तेसुद्धा असे अजिबात नाहीत, उलट आनंदी व असेल त्यात समाधानी असेच आहेत.

<<< पत्रिकेतील इतर ग्रह आणि नक्षत्रांवरून सेम राशी असलेल्यांचे स्वभावही वेगळे ठरतात. >>> हे माहीत आहे . यामुळे बराच फरक पडतो . एकच जन्मवेळ असलेल्या दोन व्यक्तीही भिन्न असतात .

<<<<<सो मला जाणवलं ते लिहीलं! सरसकटीकरण नाही केलंय! ज्या व्यक्ती जशा जाणवल्या त्यांच्याशी साधर्म्य साधणार्‍या व्यक्तींना पटलंच की>>>>> हो , एकच बाजू समोर यायला नको म्हणून मलाही जे जाणवल तेच लिहिले . मला या राशीच्या व्यक्ती जशा भेटल्या तसेच लिहिले आहे.

ड्रीमगर्ल,

मस्त लिहिलंय तुम्ही!

आमच्या घरात मिथुन, कन्या, सिंह, मीन आहेत. त्यांना तुम्ही सांगितलेले गुण अगदी चपखल बसतायत.

जरा मकर राशीविषयी लिहाल का तुम्ही? म्हणजे संपुर्ण राशीचक्र पुर्ण होईल. Happy

धनु : राशीस्वामी गुरू ग्रह, अग्नी तत्व, पुरूष रास हातात सतत ताणलेला बाण, कधी कोणाचे शिरकाण होईल सांगता येणार नाही. स्वच्छ्तेचे भोक्ते! साडीची असो किंवा संसाराची घडी चापूनचोपून बसवणारे! हौशी, हुशार, स्वष्ट वाणी, कलासक्त, उंची कपड्यांची, दागिन्यांची आवड. अतिशय हट्टी व आपलं तेच खरं करण्याचा स्वभाव (मूळ नक्षत्र असेल तर अजूनच त्रासदायक!)>>>> Blush
मी धनु. Blush

स्वच्छ्तेचे भोक्ते! साडीची असो किंवा संसाराची घडी चापूनचोपून बसवणारे! हौशी, हुशार, स्वष्ट वाणी, कलासक्त, उंची कपड्यांची, दागिन्यांची आवड. मला सर्रास लागू पडते.

ड्रिमगर्ल मी मिथुनेची....... बाकी जवळजवळ सेम स्वभाव पण स्मरणशक्ती च्या बाबतीत एकदम उलट. लईच विसरभोळी आहे हो.

Pages