राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कष्टाळू! खांद्यावर घराची जबाबदारी पेलण्याची धमक! अतिशय लाघवी, मृदू, सहसा न चिडणार्‍या पण चिडल्यास शांत बसून राग कमी होण्याची वाट बघणार्‍या, प्रामाणिक, विश्वासू,दीर्घोद्योगी,सोशिक, बर्‍याचदा अबोल, हळव्या, आवडत्या व्यक्तीलाही मनातले भाव सहज सांगू न शकणार्‍या,आनंदी ,फिरण्याची आवड असणार्‍या, सुगंधाची व संगीताची (नोटःही मुलींची नावे नव्हेत :P) विशेष आवड असणार्‍या,वळणदार अक्षर असणार्‍या,मित्रां(मैत्रीणींमधेही!) मध्ये लोकप्रिय,
वृषभ रास व खास करुन रोहीणी नक्षत्राच्या व्यक्ति या बरेचदा एकतर "एकला चलोरे" वा "आत्मभानात" मश्गुल अशा असू शकतात. ठराविक चौकटी बाहेरच्या बाबीन्ची दखल घेणे/आत्मसात करणे यान्ना जमतेच असे नाही. किम्बहुना, अशा बाह्य बाबीन्ची वास्तपुस्त राहुदेच, त्यान्चे अस्तित्वही यान्चे गावी नसते.
पण एकन्दरीत पहाता, या व्यक्ती इतरान्करता तशा "निरुपद्रवीच" असतात असे माझे मत. Happy
>>> मी पण वृषभ रास-रोहिणी नक्षत्र Happy अगदी तंतोतंत Happy

नवीन Submitted by सायुरी on 28 November, 2017 - 19:56
कष्टाळू! खांद्यावर घराची जबाबदारी पेलण्याची धमक! अतिशय लाघवी, मृदू, सहसा न चिडणार्या पण चिडल्यास शांत बसून राग कमी होण्याची वाट बघणार्या, प्रामाणिक, विश्वासू,दीर्घोद्योगी,सोशिक, बर्याचदा अबोल, हळव्या, आवडत्या व्यक्तीलाही मनातले भाव सहज सांगू न शकणार्या,आनंदी ,फिरण्याची आवड असणार्या, सुगंधाची व संगीताची (नोटःही मुलींची नावे नव्हेत :P) विशेष आवड असणार्या,वळणदार अक्षर असणार्या,मित्रां(मैत्रीणींमधेही!) मध्ये लोकप्रिय,
वृषभ रास व खास करुन रोहीणी नक्षत्राच्या व्यक्ति या बरेचदा एकतर "एकला चलोरे" वा "आत्मभानात" मश्गुल अशा असू शकतात. ठराविक चौकटी बाहेरच्या बाबीन्ची दखल घेणे/आत्मसात करणे यान्ना जमतेच असे नाही. किम्बहुना, अशा बाह्य बाबीन्ची वास्तपुस्त राहुदेच, त्यान्चे अस्तित्वही यान्चे गावी नसते.
पण एकन्दरीत पहाता, या व्यक्ती इतरान्करता तशा "निरुपद्रवीच" असतात असे माझे मत. Happy >>> मी पण वृषभ रास-रोहिणी नक्षत्र अगदी तंतोतंत>>>>
कमाल आहे!

काँबीनेशनच सांगतेय किती चंचल रास आहे ती Wink अतिशय बोलघेवडी, बोलण्यात चतुर, इंटेलेक्च्युअल, दुसर्‍यावर प्रेम करतोय असे दाखवले तरी स्वतःवरच खूप प्रेम असणारी रास. रसिक, फिरण्याची फोटोग्राफीची प्रचंड आवड असलेली, हास्यविनोद करणारी (कधी कधी अती स्पष्टवक्तेपणामुळे यांनी दुसर्‍यावर केलेले विनोद जिव्हारी लागू शकतात), खेळकर स्वभावाची, पण तितकंच लवकर कुठल्याही गोष्टीला कंटाळणारी, सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असणारी, एक उत्कृष्ट साथीदार, जमेल तितकी मदत करणारी, नास्तिक, कलासक्त, उत्तम स्मरणशक्ती असणारी, अभ्यासू, ओव्हर कॉन्फीडंट, स्पष्ट मतं असणारी रास. तरी कधी कधी अंतर्मुख होणारी, स्वतःची दु:खं कधीच दुसर्‍याकडे मनमोकळी न करणारी, संवेदनाशील रास! मार्केटिंग वाले या राशीचे असतील तर समोरच्याला गुंडाळलंच समजा Proud>> Blush
माझी चंद्ररास मिथुन आणि लग्नरास वृश्चिक Happy

माझी रास वृश्चिक - मुद्दामून खुसपट काढणे, वैयक्तिक कमेंट्स करणे, सपषट आणि रोखठोक बोलण, समोरचा वागण्या बोलण्यात चुकला की माझे चेहर्‍याचे हावभाव भराभर बदलतात. मी समोरच्या व्यक्तीला माझा दोष नसताना मला बोलणे, दोष देण्याच्या ५-६ संधी देते. मग जेव्हा ती व्यक्ती चुकलीरेचुकली की त्याने आयुष्य भर केलेल्या चुकांचा इतिहास मी सगळया समोर मांडते. कोण कधी केव्हा काय बोलले ते डोकयात फिक्स असते. पण घरात सगळ्यात जास्त हळवी मी आहे. मुलांच्या बाबतीत मात्र प्रचंड सेनसेटीवह आहे. नवरयाला भक्कम आधार देते.

नवरा वृषभ राशीचा व रोहिणी नक्षत्राचा- खुप संयमी, कधीच न चिडणारा, चुकल्यास समजून घेणारा. मितभाषी, पण सोशल मीडियावर काहीही न शेअर करणारा.

मोठा मुलगा कन्या रास वय ७ वर्ष- अतिशय कटकटया, आपण चुकुन काही कबुल केले तर पाणी सुद्धा पिऊ न देता दुकानात पिटाळणारा. पण मनाने हळवा, हुशार आणि रोखठोक बोलणारा आहे

लहान मुलगा मिथुन रास वय ६ महिने - घरातल शेंडेफळ फक्त गोड हसतो, शांत झोप न घेणारा

सासु कर्क राशीची - सतत मुड बदलतात, घटकयात चांगली तर क्षणात कपाळभर आठया.
स्वयंपाकघरातुन बाहेर काढणे अवघड, स्वयंपाकघरात त्यांचेच राज्य, अजिबात जास्त येउ देत नाही.

@च्रप्स नाही पटतकाही गोष्टी.सुनेने कुठलाही सल्ला दिला तर तो अपमान वाटतो आणि तेच दुसर्‍या ने सांगितले तर पटतं. सतत भांड्याची आदळ आपट हे तर वैशिष्ट्यं

म्हणजे रास सासु.
सून रास आसपास नसली की कर्क राशीत प्रवेश.

सुनेने कुठलाही सल्ला दिला तर तो अपमान वाटतो आणि तेच दुसर्‍या ने सांगितले तर पटतं. सतत भांड्याची आदळ आपट हे तर वैशिष्ट्यं>>>>> Proud आमच्याकडे शाब्दिक आपटाआपट असते. Biggrin

माझा अमुक अमुक वर्षे संसार झाला, तर ही काल १०-१२ वर्षापूर्वी आलेली शहाणी मला काय शिकवणार असाही अ‍ॅटीट्युड असतो.

चंद्र राशीचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या कुठल्या पैलू वर होतो? आणि लग्न राशीचा परिणाम त्या व्यक्तीच्या कुठल्या पैलू वर होतो? म्हणजे उदा. स्वभाव, वागण्याची-बोलण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत, इत्यादी.....

मिथुन - बडबडे, बुद्धिमान, पण अतिशय उपरोधिक/धारदार्/वर्मी लागेल असे बोलण्यात पटाईत>>>मी ह्याच्या उलट आहे

limbutimbu यांनी जे लिहिले आहे त्याच्याशी पूर्णपणे सहमत.

मी पण मिथुन राशीची .

एकदा ठरवलं कि ठरवलं ....लक्षात ठेवून ठरवून काम पूर्ण करते आणि ते सुद्धा जिद्दीला पेटून ....

Proud हो सोनाली, अगं लग्नाला कितीका वर्षे उलटेना, कुठल्याही सासुला तिची सून कानामागुन आली नी तिखट झाली असे वाटते.

आणी मुलाचे लग्न काल-परवाच तर झाले अशी आपली समजूत काढुन त्या सासवा स्वतःला अजून यौवनात मी असे समजत असतील. Proud

@namarta, नवरा वृषभ राशीचा व रोहिणी नक्षत्राचा- खुप संयमी, कधीच न चिडणारा, चुकल्यास समजून घेणारा. मितभाषी, पण सोशल मीडियावर काहीही न शेअर करणारा.>>> माझा नवरा पण वृषभ राशीचा अगदी असेच गुण आहेत,
माझी सिंह रास आहे

मेष राशीची काही गुणवैशिष्टे नाहीत का.>>>> असतात ना! एक घाव दोन तुकडे, सडेतोड बोलणं, फारसं इमोशनल नसणं, स्टबर्न (मराठी शब्द??)
मेषेच चांगले गुण अजूनपर्यंत मला तरी कोणी सांगितले नाहीयेत. मी मेषच आहे.

"एक घाव दोन तुकडे, सडेतोड बोलणं, फारसं इमोशनल नसणं, स्टबर्न - मेषेच चांगले गुण अजूनपर्यंत मला तरी कोणी सांगितले नाहीयेत. मी मेषच आहे." - हे सगळे मेषेचे सद्गुणच आहेत की (अजिबात उपरोध नाही). ह्या सगळ्या गुणांमुळेच सहसा मेषेचे लोक मोठी उद्दिष्ट गाठू शकतात.

माझी आते बहीण मिथुन राशीची आहे आणि तिचे मिस्टर कन्या राशीचे ..
२० वर्ष झाली लग्नाला ...ती काहीही नवीन करायचं म्हणाली कि तिच्या मिस्टरांच पहिल नाही नाही असत ...हजार शंका ...सुरवातच हे काम नाही होणार हे अशी असते ..
शेवटी होत ती म्हणते तेच...म्हणजे ती पुढाकार घेऊन सगळं करते आणि श्रेय घ्यायला मात्र मिस्टर ...
दरवेळेला मनस्ताप आहे तिला...

Pages