राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सगळ्या गुणांमुळेच सहसा मेषेचे लोक मोठी उद्दिष्ट गाठू शकतात.>>>>>> गुड पॉजिटीव्ह थिंकिंग आहे तुमचं. काश असे अजून म्हणणारे भेटले असते. मेष म्हटलं की बर्‍याच जणांची रिअ‍ॅक्शन अरे बापरे तापट, भांडणारे असणार अशीच मिळते.

"मेष म्हटलं की बर्‍याच जणांची रिअ‍ॅक्शन अरे बापरे तापट, भांडणारे असणार अशीच मिळते." - अहो हा सगळा टाईमपास चा प्रकार आहे. जगातले ७ बिलीयन (७०० कोटी) लोकं १२ (किंवा ३६ - नक्षत्र वगैरे धरून) भागात ढोबळपणानं विभागणं खूप भाबडेपणाचं आहे. आपण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो तसं निसर्गाचं प्रत्येक क्रिएशन, युनिक असतं. असं जन्मतःच सगळा रोडमॅप ठरवून सगळे आले असते, तर मानवी कर्तृत्वाला काही अर्थच उरला नसता. एक गमतीचा भाग म्हणून बघायचं आणी सोडून द्यायचं. नाहीतर ह्या विषयावर एक मस्त स्टँड-अप कॉमेडी उभी करायची आणी गावोगाव, तेच तेच विनोद सांगत शोज चं 'चक्र' फिरवत पैसा कमवायचा.

एक गमतीचा भाग म्हणून बघायचं आणी सोडून द्यायचं. नाहीतर ह्या विषयावर एक मस्त स्टँड-अप कॉमेडी उभी करायची आणी गावोगाव, तेच तेच विनोद सांगत शोज चं 'चक्र' फिरवत पैसा कमवायचा.>>>>>>>>>>>> Lol हे बेस्ट आहे! Happy

माझ्या जवळच्या ३ व्यक्ती मीन आहेत (आय मीन रास) Proud त्यांना बघून ठरवलेली मतं
गडबडगोंधळ घालतात, पटकन निर्णय न घेता येणे, हातघाईवर येणे, बर्‍याचदा पॅनिक होतात. मनी माईंडेड असतात. स्वभावाने भोळ्या भाबड्या, दुसर्‍यांसाठी खूप काही करतात. विनोद करायला खूप आवडते.

माझी नेमकी रास कोणती ह्याबद्दल थोडसं कन्फूजन होत..म्हणून गुगल केलं तर हे मिळालं...

https://www.thoughtco.com/the-scorpio-sagittarius-cusp-4115435

आणि अजूनच कन्फूज झालो..

बहुतांशी माझ्यात धनूचे गुण आहेत...पण काहीअंशी विंचूचे देखिल गुण आहेत..पण मी डूख धरून नाही बसतं...कर्मावर जास्त विश्वास आहे
मी माफ करून टाकतो..प्रत्येकाला.... तो आणि त्याच कर्म...

??????????

जामोप्या - तुम्ही अनुराधाचे ना (आताच वाचलं)?
अनु+राधा = राधेस अनुसरणारी. अतिशय समर्पण भाव असतो. डिव्होशनल. तसेच जगन्मित्र असतात.
__________________
मी-आर्या- तुम्ही पुष्यवाल्या का? मी पुष्यवाली , माझी लेकही पुष्य. आमच्या दोघिंचे लग्न = मिथुन Happy
________________________________________________________________________________________________
माबोकरांच्या राशीचे एक्सेल शीटच करते या वीकेन्डला Happy
______________________
देवकी, अमा, मधुरा, श्रद्धा, मन्या, अजय चव्हाण, मानव, ऋन्मेष, सीमंतिनी, सिद्धी, दोन्ही स्वाती, वर्षा, हीरा- पटापट आपापल्या चंद्रराशी कळवा Happy
____________
>>>>>>>>> राशी बघताना कोणती बघायची? चंद्र की लग्न?>>>> @ देवकी चंद्र गं. आपण इन्स्टिक्टिव्हली अगदी उस्फूर्त असे चंद्रराशीनुसार वागतो. ते मनावरचे संस्कार असतात. लग्न म्हणजे आऊटवर्ड प्रोजेक्शन. तसे तुम्ही भासवता.
पण चंद्र म्हणजे तुम्ही तसे "असता"
____________________________
>>>>>>>>> सोप्पय, सूडि वृश्चिकेने कर्केला "फुसकुलीसदृष" पीन मारली असेल, अन अशी पिन बिनडोकासारखी मारुन घेणे हेच तर कर्केचे "हळवेपण" ना! Wink>>>>>>>>> हाहाहा!!! मीनवालल्या सासवा फार पीनमारु असतात. आणि कर्क सूना पिन मारुन घेउन लगेच उचकणार्‍या. नवरा आपला कात्रीत सदैव. पण तो तूळ असला की डोक्यावर बर्फ ठेवल्यागत शांत Lol Lol Lol ................. आमच्या घरात हाच नाट्यप्रयोग!!
______________________________
@मामी - सौररास मेष का मग तडफदार असणार तू. त्यात धनु चंद्र म्हणजे फायरच फायर कारण दोन्ही अग्नीतत्वाच्या राशी. उत्साह, तडफ, सकारात्मकता यात तू अग्रेसर असणार.
_________________________________
मेष (चंद्र) हे रागीट असतात हा गैरसमज आहे. हे लोक लढवय्ये असतात वॉरियर्स. त्यांना अन्याय सहन होत नाही.

>>> माझ्या जवळच्या ३ व्यक्ती मीन आहेत (आय मीन रास) Proud त्यांना बघून ठरवलेली मतं -
गडबडगोंधळ घालतात, पटकन निर्णय न घेता येणे, हातघाईवर येणे, बर्‍याचदा पॅनिक होतात. मनी माईंडेड असतात. स्वभावाने भोळ्या भाबड्या, दुसर्‍यांसाठी खूप काही करतात. विनोद करायला खूप आवडते. >>>

+ १

बाय द वे, नवरा किंचीत उशीरा जन्मला आणि सूर्य प्रथम घरात पडायचा तो शिंचा १२ व्यात पडला Sad त्रास होतो त्याला (मला न सांगता कळतो) असो.
तर आता काय म्हणावे गायत्री मंत्र?
ऐकतो तो देव प्रेमल चा पण मी कानी कपाळी ओरडुन सांगते अरे रोज नियमित ऐक तर माझं ऐकत नाही.
लिंबू सर प्लीज उपाय सांगा. कोणता मंत्र म्हणायचा?

@पुरोगामी
>>>>>विनोद करायला खूप आवडते. >>>>>> हा मीनेचा नाही तर टिपीकल मिथुन गुण आहे. जोकर असतात मिथुन लोक (चांगल्या अर्थाने) एक मिथुन मैत्रिण असली की समजावे ४ मैत्रिणी मिळाल्यात तुम्हाला Happy हसवते, रडवते, हळवी होते सगळे मूडस लीलया अंगभूत असतात. आणि शिरेस होत नाहीत. मस्त लाईट हार्टेड रास आहे.

धन्स श्रद्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे आजवर ३चांगल्या मैत्रिणी मिथुनेच्या आहेत. तीघीही विनोदी, लाईट हार्टेड. मी जितकी रडी-कुढी आहे ना तितकी मला सूर्यप्रकाशी लोकांची गरज पडते. या मैत्रिणी चांगल्या पूरक ठरल्यात Happy
___________________________
आवड असल्यास सॅम जेप्पी चे विश्लेषण ऐक. फार व्यासंगी आणि अर्थात माझा आवडता ज्योतिषी!!
https://www.youtube.com/watch?v=QsUh_vGpVA0

धन्यवाद अजय. शरद उपाध्येंची रास.
आवड असल्यास सॅम जेप्पी चे विश्लेषण ऐका. फार व्यासंगी आणि अर्थात माझा आवडता ज्योतिषी!!
https://www.youtube.com/watch?v=WI0obAKkboQ&list=PLTKVoCUFL2PRxUvJEClmMK...
.
https://www.youtube.com/watch?v=Pe2sK60kUkU

आर्द्रा नक्षत्राची देवता, 'रुद्र' आहे एवढेच ठाउक आहे. माझ्या मुलीचे लग्न नक्षत्र आहे ते. तिचे डोळे रागामध्ये, खूप पियर्सिंग होउ शकतात हा माझा अनुभव आहे. बाकी रौद्ररुप एकदा धारण केलेलं होतं तदुपरान्त कधीच नाही.

देवकी, अमा, मधुरा, श्रद्धा, मन्या, अजय चव्हाण, मानव, ऋन्मेष, सीमंतिनी, सिद्धी, दोन्ही स्वाती, वर्षा, हीरा- पटापट आपापल्या चंद्रराशी कळवा >>>>>>>>>> मला माझी एकचं रास माहिती आहे. सिंह! आता ती चंद्र आहे की सुर्य माहिती नाही. Happy

तिचे डोळे रागामध्ये, खूप पियर्सिंग होउ शकतात हा माझा अनुभव आहे>>>

बापरे... पण माझे डोळे अत्यंत आकर्षक आहेत (असे मला ओळखणारे almost सर्वजण म्हणतात. ) आकर्षक म्हणजे नजर बांधून घेणारे. मैत्रिणी तर जंतर मंतर आंखे म्हणायच्या ( स्व स्तुती नाही ही)

धन्यवाद मधुरा. मला सिंहेमधीलही विशेषतः 'मघा' नक्षत्राचे लोक चक्क बरेच, खूप आवडतात असे लक्षात आलेले आहे Happy का विचार्शील तर माझे २ मॅनेजर्स (रादर लीडर्स ऑफ अवर ऑर्ग) आहेत कसले डिग्निफाईड (दिसायला नव्हे , वागायला म्हणतेय.) असतात.

Pages