राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आणि नवर्‍याची तूळ रास. टीव्ही वर एकदा तूळ राशी चं कौतुक ऐकलं तेव्हा नवरा म्हणाला `मी नियम आणि तू अपवाद आहेस ' !

रावी>> Proud
नवीन वाचक >> धनू राशीचे हट्टी असतात पण हट्टाची तीव्रता व्यक्ती परत्वे बदलू शकते. धनू पुरूष अतिशय आकर्षक असतात. बोलण्यात चतूर आणि व्यक्तीमत्व आकर्षक! स्त्रिया चटपटीत, हौशी, संसाराची मनापासून आवड असते. माहीतीतल्या स्त्रियांमध्ये रांगोळी काढण्याची विशेष आवड पाहीलेय :). सत्यवादी, अभ्यासाची आवड असलेल्या, स्पष्टवक्त्या, आत आणि बाहेरून सच्च्या पण कधी कधी अती स्पष्टतेमुळे समोरचा दुखावला जाऊ शकतो.
मकर राशीची एक मावसबहीण व मैत्रीण आहे. लिहीते लवकरच त्यांच्याविषयी!

ड्रिमगर्ल छान वर्णन केलेय एकदम Happy मी कर्क रास व लग्न रास तुळ ...घरी सगळे रडकिच म्हणतात मला ... कश्यानेहि डोळ्यात पाणी येते ..

मकर रास स्वभाव एका मावसबहीणीची व मैत्रीणीची! राशीस्वामी शनी ग्रह, पृथ्वी तत्व, स्त्री रास. श्नीच्या अंमलाखालील रास त्यामुळे यांची प्रगती हळू हळू होते. इतर सर्व राशींच्या तुलनेत या राशीला नशीबाची साथ कमी मिळते. जेवढे कष्ट त्यामानाने यश यथातथाच. पण म्हणून ही रास कष्ट करणे सोडत नाही. अतिशय महत्वाकांक्षी, जिद्दी रास आहे, समजूतदार.

कधी कधी कष्ट घेऊनही यश न मिळाल्याने हताश झाल्यासारखे वाटतात त्यामुळे सतत रडणारी, पेसिमिस्ट रास आहे असा यांच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता असते पण यांच्यासारखी आशावादी व कर्मावर विश्वास ठेऊन ध्येयपूर्तीसाठी सातत्याने काम करत राहणारी रास नाही. देवावर श्रद्धा असते पण अंधश्रद्धाळू नसतात. व्यवहारी त्यामुळे शक्यतो कोणाकडून काही घेणार नाही कोणाला काही देणार नाही. स्वभाव जुळवून घेणारा असतो.
मकर, कुंभ व सिंह चिडल्या तरी इतर राशींसारखं मोठ्या आवाजात बोलणं, मागचे विषय उकरून पाल्हाळ लावणं, टोचून बोलणं, आदळ आपट करणं या गोष्टी करण्यापेक्षा शांत बसणं किंवा तिथून निघून जाणं पसंत करतात.

मकर वाल्यांना श्वसनविषयी तक्रारी किंवा आजार असण्याची शक्यता असू शकते. शनी ची रास असली तरी कुंभेसारखी फक्त आणि फक्त ज्ञानाचा व विज्ञानाचा विचार करणारी विरक्त अलिप्ततेकडे झुकणारी रास नाही. सटल आणि सोबर अभिरूची असते. खाण्याची आवड असते. डिझायनिंग (इंटेरिअर, फॅशन, गार्डनिंग) यांची आवड असू शकते.

dreamgirl, छान लिहिल ..... मी मेश बरोबर स्वभाव .वय व्हअडल्या वर अता बदलला आहे. नवरा वृश्चिक राशीच्या सेम स्वभाव.दोघान मधे fighting sprit जबर्जस्त.

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत >>>>>> मी नाही असा>>>>>

तो मी नव्हेच का ????

मोठ्या आवाजात बोलणं, मागचे विषय उकरून पाल्हाळ लावणं, टोचून बोलणं, >>>>>>>वृश्चिक लोक यात एकदम तरबेज असतात......... कित्येक वर्शापासून तुम्ही केलेल्या अगदी फाल्तू चुकापण हे ल्क्षात ठेवतात......आणि हल्ला करतेवेळी सगळ्या तोंडावर मारतात...एकसाथ

>>> मिथुन राशीच्या व्यक्ती चंचल असतात हे अजिबात पटलेल नाही . माझी बहिण अतिशय जिद्दी आहे . एकदा हातात काम घेतल की ते पूर्णपणे करून सोडणार .<<<<
घेतलेले काम पूर्ण करणे व काम घ्यायच्या आधी कोणते काम घ्यायचे याबद्दलच निश्चिती नसणे यातिल फरक तो चंचलपणा. मात्र एक खरे की मिथुनेला एखादी बाब 'सहजसाध्य' होत नसेल असा अंदाज त्वरित येतो, व त्यानुसार ती दुसरे पर्याय शोधू लागते व लोकांना वाटते की यांची धरसोड होत्ये. एक उदाहरण देतो, मी सध्या रेसर सायकलने येतोजातो. पन्नाशी पार केल्यावर परिस्थिती आली म्हणून जरी चालवित असलो, तरी ते देखिल हौसेने करतो, व वयाच्या विशीत जपलेले रेसर सायकल चालविण्याचे स्वप्न पन्नाशीनंतर पुरे करु पहातोय, ते निव्वळ मिथुन असल्यानेच. तुम्ही जिद्दी स्वभावाचे वर जे म्हणले आहे, ते एखादे कार्य तत्काळ पूर्ण करणे वा दीर्घकालाने लक्षात ठेवुन संधी मिळाल्यावर पूर्ण करणे, दोन्ही बाबतीत लागू पडते. मिथुन जिद्दीला कमी नसतातच. फक्त काळवेळ बघुन, अंथरुण पाहून पाय पसरणे, नाविन्याचा सोस, तथ्य समजले की मग कंटाळा, इत्यादी बाबींमुळे त्यांचे असंख्य बेत मनात शिजत असतात, त्यातिल काही मोजके बेत ते सिद्धिस नेऊ शकतात, व ते देखिल अत्यंत कमी वेळात शक्य होणार असेल तरच. मिथुन एखादि गोष्ट घडण्याकरता दीर्घकाळ "वाट" बघू शकेल, पण प्रत्यक्ष घटना घडताना मात्र ती अतिशय कमी वेळेत त्वरित घडायला हवी असते.

लिंबूटिंबू, सौ टके सच! तुमच्या शब्दाशब्दाशी हजारवेळा सहमत! मी पण मिथुन राशीची आहे. मी गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवून पूर्ण करू शकते/करते! त्यासाठी वाट पाहण्याचा पेशन्स भरपूर आहे माझ्यात! मला एखादी गोष्ट होणार की नाही याचा अंदाज फार पटकन येतो! पण गम्मत अशी की मला स्वतःला हा माझा गुण कळायला बराच वेळ लागला Happy Now I am more confident with my instincts!

मिथुन राशीवाले जिद्दी असतात यात प्रश्न नाहीच . लक्षात ठेवून काम पूर्णत्वास नेणे यात त्यांचा हातखंडा . चंचलपणा या शब्दाचा खरा अर्थ मी कर्क राशित पहिला आहे . जी कर्क राशीची उदा दिली आहे तीच मंडळी.

>>> मला एखादी गोष्ट होणार की नाही याचा अंदाज फार पटकन येतो! <<<
जिज्ञासा, अचूक शब्द. हा अंदाज इतर कुणाहीपेक्षा मिथुनराशीला लौकर येतो. त्यांची ग्रहणशक्ति (ग्रास्पिंग पॉवर ? ) अतीशय तीव्र असते. व निर्णय घेण्याकरता आवश्यक अनेक अंगेउपांगे यांचा विचार त्यांचे मनात शीघ्रगतीने होऊन मनात संभाव्य घटनेबाबतचे संभावित शक्यतांचे चित्र त्वरीत निर्माण होते. त्याकरता त्यांना "बैठका/चर्चा" बसवून घोळ घालण्याची गरज नसते.

जाई. वेळेअभावी मला बघता येत नाहीये हो Sad

rmd तू पण मिथुनच का? व्वा...

त्यांची ग्रहणशक्ति (ग्रास्पिंग पॉवर ? ) अतीशय तीव्र असते. व निर्णय घेण्याकरता आवश्यक अनेक अंगेउपांगे यांचा विचार त्यांचे मनात शीघ्रगतीने होऊन मनात संभाव्य घटनेबाबतचे संभावित शक्यतांचे चित्र त्वरीत निर्माण होते. त्याकरता त्यांना "बैठका/चर्चा" बसवून घोळ घालण्याची गरज नसते.>>>> +१०००
जिज्ञासाने बरोबर लिहिले आहे. . मिथुन राशीच्या माणसाच हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून तो चंचलपणा शब्द खटकला होता . असो .
लिंटिकाका , ह्म्म्म ! उत्तराच्या प्रतिक्षेत

>>> म्हणून तो चंचलपणा शब्द खटकला होता <<< अहो मलाही खटकतो.
कारण "निर्णय टाळणे वा निर्णयाला बगल देणे" वेगळे, अन कसलाच "निर्णय घेता न आल्याने" हे करू की ते करू असे होणे वेगळे. पहिला प्रकार मिथुनेचा असतो. ते त्वरीत निर्णयापर्यंत जाऊ पहातात, इतरांपेक्षा कित्येकपटीने जलदगतीने. पण शक्याशक्यतेचा विचार करून याक्षणी काय करणे योग्य, व कोणती गोष्ट पुढे ढकलायची हे देखिल त्वरीत ठरवतात. यास मी चंचलपणा म्हणू शकत नाही.
दुसरा प्रकार चंचलतेचा, ज्यात मनःस्थिती निव्वळ द्विधा वा त्रिधा होऊन व्यक्ति एका गोष्टीस सुरुवात करून ती अर्धवट सोडून देऊन दुसर्‍या-तिसर्‍या गोष्टी करण्याकडे वळते, वा कित्येकदा हतबु:द्ध होऊन काहीच न करता हातावर हात धरून बसते. ही चंचलता मिथुनेकडे आहे असे इतरांना भासत असले तरी प्रत्यक्षात तसे नसते, व मिथुनेने एखादे काम हाती घेणे वा न घेता पुढे ढकलणे आणि दुसरेच काही करू लागणे हे परिस्थितीनुरुप पूर्ण पण अतिशय जलद विचारांती उचललेले क्रियाशील पाऊल असते.
असो. माझे मिथुनपुराण खूप झाले.

लिंबूदा >> _/\_
मिथुन जिद्दीला कमी नसतातच. फक्त काळवेळ बघुन, अंथरुण पाहून पाय पसरणे, नाविन्याचा सोस, तथ्य समजले की मग कंटाळा, इत्यादी बाबींमुळे त्यांचे असंख्य बेत मनात शिजत असतात, त्यातिल काही मोजके बेत ते सिद्धिस नेऊ शकतात, व ते देखिल अत्यंत कमी वेळात शक्य होणार असेल तरच. मिथुन एखादि गोष्ट घडण्याकरता दीर्घकाळ "वाट" बघू शकेल, पण प्रत्यक्ष घटना घडताना मात्र ती अतिशय कमी वेळेत त्वरित घडायला हवी असते. +११११

स्वतःलाच इतकं परफेक्ट जोखणं फार कमी जणांना शक्य होतं! शब्दा-शब्दाशी सहमत!

म्हणून तो चंचलपणा शब्द खटकला होता . असो .>> मला अपेक्षित चंचलपणा लिंबुदांनी परफेक्ट मांडलाय! फक्त ते नीट मांडता आलं नव्हतं Happy
चंचलपणा या शब्दाचा खरा अर्थ मी कर्क राशित पहिला आहे >> सहमत! थोड्याफार प्रमाणात कन्या व मीन कडेही येतो तो!

आदळ आपट करणं >> हे मेष राशीकडे आले......>> हे अग्नीतत्व/मंगळाच्या/पुरूष स्वभावाच्या राशींमध्ये जास्त आढळतं. मेष-वृश्चिक-धनु! सिंह अपवाद! हे कधीच आदळ-आपट करत नाहीत! यांचा रागही राजस पद्धतीने व्यक्त करतात!

कन्या बद्दल सान्गा>> मागील पानावर!
कृत्तिक-वृषभ आणि रोहिणी वृषभ काँबोबद्दल काय सांगता येईल?>> नक्षत्रांनुसार नाही माहीत हो! अभ्यास नाहीये! याविषयी लिंबुदा/अन्विता/नितीनचंद्र/पशुपती/मिलींद सांगू शकतील!

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत >>>>>> मी नाही असा>>>>>
तो मी नव्हेच का ???? >> कृष्णतारा Happy नांगी मारणे म्हणजे टोचून बोलणे! बर्‍याचदा समोरचा दुखावला गेल्यावर यांना उपरती होते की अरे माझा बोलण्याचा हा उद्देश नव्हताच! ओघात बोलून गेलो/गेले Happy आमच्या घरी असंख्यवेळा घडलंय हे! सूड म्हणजे शब्दश: सूड घेत नाहीत काही जण... त्यांच्या कमजोर नसेवर हल्ला झाला तर स्वतःचे बरे दिवस येईपर्यंत वाट बघून मग त्या हल्लाखोराला आठवण करून देतात ते ही सणसणीत टोमण्यात..! यासाठी ते कितीही वर्ष वाट बघू शकतात! (आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ती वाक्य आठवतातही आणि सव्याज "परतफेड" करायची संधी मिळतेही Happy )

बर्‍याचदा समोरचा दुखावला गेल्यावर यांना उपरती होते की अरे माझा बोलण्याचा हा उद्देश नव्हताच! ओघात बोलून गेलो/गेले स्मित आमच्या घरी असंख्यवेळा घडलंय हे! सूड म्हणजे शब्दश: सूड घेत नाहीत काही जण... त्यांच्या कमजोर नसेवर हल्ला झाला तर स्वतःचे बरे दिवस येईपर्यंत वाट बघून मग त्या हल्लाखोराला आठवण करून देतात ते ही सणसणीत टोमण्यात..! यासाठी ते कितीही वर्ष वाट बघू शकतात! (आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ती वाक्य आठवतातही आणि सव्याज "परतफेड" करायची संधी मिळतेही स्मित )>>>>>>>>>>> यु सेड इट. ड्रीमे. अगदी अगदी झालं. माझं मलाच Happy

मी वृश्चिक आहे आणी वर लिहीलेले आहे तस्साच आहे. उट्ट फेडायची योग्य वेळेची वाट पहाणारा.
मग सापडला की खोपच्यात घेतो..... मग तो कोणी ही असो.

Pages