
-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)
ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .
कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.
कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.
हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!
थँक्यु वर्षु
थँक्यु वर्षु
हे आमचे लहानपणीचे कॅरामल
हे आमचे लहानपणीचे कॅरामल कस्टर्ड पूडिंगआहे. म्हणजे लहानपणी मातोश्री वरचेवर बनवायच्या. मग मोठेपणी त्यातल्या कॅलरीज लक्षात आल्यावर बंद झालेय. उन्हाळ्याच्या सुट्टीतली आठवण आहे हा पदार्थ.
पण खरेच खूप सोपे आणि यम्मी लागते. आई कुकरातून काढताना जो वास यायचा मस्त, दूधात जायफळ-केसर किंचित टाकले की आणखी छान.
उन्हाळ्याच्या सुट्टीत तर दर एक दिवसाआड दुपारचा होणारा प्रकार. का तर दुपारी उन्हात 'असामी
हुदडायला बाहेर जावू नये उन्हात म्हणून. आई गजर करायची की, आज मी हे कस्टर्ड करणार आहे , तर घरात रहा नाहीतर मिळणार नाही. आणि घरात आधीच १०-१२ कारटी असत उन्हाळ्याच्या सुट्टी घालवायला आलेली मावस-मामे भावडं. मग आम्ही ओट्याला तोंड लावून आई जपून काढत असतानाचा प्रकार पहायचो.
करायला पाहिजे कधीतरी....
रूनी पॉटर्..धन्स गं.. मला
रूनी पॉटर्..धन्स गं.. मला वाटलं मी अजून स्पष्टं लिहायला हवं होतं..

स्पॅनिश फ्लान.. अगदी अगदी..
मनीमाऊ.. करून पाहा आता.. अजून काही प्रश्न पडले असल्यास बिंधास्त विचार
झंपी.. जायफळ ,केशर्,वेलची टाकली कि भारतीय चव येईल छानपैकी स्पॅनिश फ्लान ला नै??
आणी कॅलरीज बद्दल माहित नाही.. डिपेंड्स तू किती पीसेस चापणारेस
@शुगो.. ओवन मधे केलं नाही
@शुगो.. ओवन मधे केलं नाही कधी..काही कल्पना नाय!!!
वेलची कुठे टाकायची म्हटले मी?
वेलची कुठे टाकायची म्हटले मी? फक्त चिमटीभर जायफळ व केशर.
हो ना.. तू वेलची म्हटलं
हो ना.. तू वेलची म्हटलं नव्हतंसच.. अजून कुणीतरी टाकणार होतं,तू नै कै ..
मस्त जमलय>>>. (मी
मस्त जमलय>>>. (मी अंड्याशिवायच करणार !!)>>> दिनेशदा अंड्याशिवायकेल्यावर नक्की लिहा
यम्मी!!! सह्हीच दिसतय. मी ही
यम्मी!!! सह्हीच दिसतय.
मी ही असंच करते. पण ब्रेड नाही घालत. कसलं भारी लागतं. माझं ऑलटाईम फेवरीट डेझर्ट.
मामे.. ब्रेड नाही घातलंस तर
मामे.. ब्रेड नाही घातलंस तर सेट होतं का घट्टसं ???
अगदी घट्ट नाही होत पण
अगदी घट्ट नाही होत पण गुलगुलीत राहतं. हाटेलातनं मिळणार्या पुडिंगमध्येही ब्रेड नसतो.
रच्याकने : ह्या मनिमाऊचं कसं व्हायचं देव जाणे.
मनीमाऊ ने तर बिरबला ची खिचडी
मनीमाऊ ने तर बिरबला ची खिचडी च घेतली असती करायला
घे बर्का!!!!
मनी.
माऊ
माऊ
मनीमाऊ , `ढ' पणाच्या बाबतीत
मनीमाऊ , `ढ' पणाच्या बाबतीत मी तुझ्याच वर्गात बर का !
.
.
रावी.. अगा टिंब टिंब का
रावी.. अगा टिंब टिंब का देतेयेस????
मनीमाऊ आज सुट्टीवर दिस्तीये...
सॉलिड ... अंड्या शिवाय रेसेपी
सॉलिड ... अंड्या शिवाय रेसेपी शोधत होते...मिळाली!!!!!!!!!. नक्कि करणार...... कसलं टेम्प्टींग दिसतय....... आजच करते. कॅलरींच्या नानाची टांग....... तोंपासु...... ( तोंडाला सुटलेले पाणी दिसतय की काय!! माझी सेक्रेटरी संशयाने बघते आहे. ती क्रिश्चन आहे. आजच तिने दिलेले मार्झीपॅन खाल्ले)
शंका.... दोन ब्रेड घातले की चांगलं होतं ना? आमच्या कडे थलथलीत कोणी खाणार नाही.
वर्षु ताई वरील फोटो १ कप दुधाच्या प्रमाणाचाच आहे का? ५ माणसांन्ना पुरायला २ कपाचं बरोबर होईल ना?
उद्याच करते.
उद्याच करते.
कोणी Shin Chan बघतं का?
कोणी Shin Chan बघतं का? त्यामधली कॅरेक्टर्स रडताना डोळ्यातनं अश्रु नाहीत तर धबधबे वहातात. तेवढीच रडते आहे मी.
वर्षु, तुम्ही सगळे माझी टर उडवता.
तु आधी 'डायरेक्ट' असं लिहिलं होतंस का? का मी नीट वाचलं नव्हतं?
<<कुकर मधे ठेवून वाफवता येईलश्या जाड बुडाच्या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा>> यातलं 'डायरेक्ट' काढलं तर कन्फ्युज होणारच की भोळी माणसं
आता करतेच आणि असला भारी फोटो टाकते ना कि सगळ्या हसणार्यांचे चेहरे फोटो काढण्यासारखे होतील.
वर्षु, तु म्हणालीस कि अजुन प्रश्न विचार तर विचारुनच टाकते कि देसी फ्लेवर्स (वेलची- जायफळ) पेक्षा मला व्हॅनिला फ्लेवर आवडेल. चालन का वो तसं?
वॉव्व्व्व्व्व्व्व्...कसलं
वॉव्व्व्व्व्व्व्व्...कसलं यम्मी आणि टेम्प्टींग दिसतय...
इतक्याआआआआआआ शंका वाचल्यावर
इतक्याआआआआआआ शंका वाचल्यावर माझ्या मनात उगाचच एक कुशंका निर्माण झाली- कॅरॅमलवर अंडं-साखर मिश्रण घालून ते वाफवल्यानंतर कॅरॅमल विरघळत तर नाही ना परत?

पूनम रेसिपी मस्त आहे. करून
पूनम
रेसिपी मस्त आहे. करून बघायला हवी. (यात झन्झट कमी आहे हे विशेष)
खरच सोपी वाटतेय रेसेपी अन
खरच सोपी वाटतेय रेसेपी अन दिसतय किती सुंदर. धन्यवाद वर्षूतै.
नक्की करणार मनूसाठी 
@मोकिमी.. आधी दोन कपांचं करून
@मोकिमी.. आधी दोन कपांचं करून बघ. साखर कमीजास्त प्रमाणात आवडीनुसार घालता येईल.
मी बिन अंड्याचं कधी करून पाहिलेलं नाहीये.. पाहिजे तर एका कपाला तीन स्लाईसेस घे नाहीतर म्हंजे शुअरली घट्ट होईल छान!!!
@मनीमाऊ..छे गं सोने.. तुला कशाला हसू.. तुला पडलेले प्रश्न पाहूनच मला कि माझं लेखन अजून सपष्ट करून लिहायची प्रेरणा मिळाली. म्हणून संपादित केलं परत.. सिर्फ और सिर्फ तेरे लिये..
मलाही पुडिंग्स मधे देसी फ्लेवर आवडत नाही.. खूप चर्न केल्यामुळे अंड्याचा अजिबात वास येत नाही म्हणून वॅनिला पण ट्राय नाही केलं कधी. पण वॅनिला छान लागेलंस वाटतंय.
@जागु.. फोटू टाक हां नक्की!!!! वाट बघते..
@पौर्णिमा.. कॅरेमल पूर्णपणे थंड होऊन छान कडक सेट होऊ दे. जराही वॉर्म असलं तर तुझी कुशंका वास्तव्यात येईल
श्रद्धादिनेश्,नंदिनी धन्स!!!!
धन्स... आजच करणार.... बदाम
धन्स... आजच करणार.... बदाम भिजवलेले नसतील तर थोडे बदाम मावे च्या भांड्यात घेवुन त्यात बदाम थोडे पाणी घालुन ३ मिनिटे मावे करावे. छान सालं निघुन येतात आणी पटापट काप निघतात.
( ही आपली एक उगाचच तळ टीप)
मोकिमी छानै तळटीप..
मोकिमी
छानै तळटीप..
वर्षु, थँक्स, तु माझ्यासाठी
वर्षु, थँक्स, तु माझ्यासाठी परत एडिट केलीस रेसिपी.
बघच गं तु. मी अश्शी मस्तपैकी पुडिंग बनवेन ना. 
रेसिपी मस्त आहे. करून बघायला
रेसिपी मस्त आहे. करून बघायला हवी.
वर्षू तू कृतीत लिहीलेले पहिले
वर्षू
तू कृतीत लिहीलेले पहिले वाक्य आहे ना त्याने बरेच जण गडबडतहेत, "कुकर मधे ठेवून वाफवता येईलश्या जाड बुडाच्या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा"
बोल्ड केलेला भाग तिथे नकोय. ह्यामुळे सगळ कुकरमध्येच ठेवायच की काय असे वाटते. पाहिजे तर ते भांड कुकरमध्ये बसायला हवे हे खाली दुसर्या वाक्यात लिही.
रूनी.. धन्स गं.. बदल केलाय
रूनी.. धन्स गं.. बदल केलाय ..मलाही वाटत होतं सारखं कि काहीतरी चूक होतीये लिहिण्यात.. थांकु
मस्तच! माझी न्यु इअर स्विट
मस्तच! माझी न्यु इअर स्विट डिश ठरली.
एक शंका!
हॉटेल मध्ये जे छोट्या छोट्या भांड्यात पुडींग मिळत ते कस सेट करतात.
Pages