क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिकडे आशिया चषक बाफवर युरी व इतरांनी वासिम जाफर आणि आकाश चोप्रा बद्दल लिहीलेले आहे. त्याबद्दल लिहीणे या बाफवर योग्य असल्याने येथे लिहीतोय.

वासिम जाफर हा गुणी नक्कीच, थोडा कमनशिबीही. पण त्याची बाहेर जाण्याची कारणे बघितलीत तर आश्चर्य वाटेल: Happy

जाफर साधारण २००७ च्या आसपास संघात बर्‍यापैकी स्थिर होता. सेहवाग तेव्हा फॉर्म गेल्याने बाहेर होता. जाफर ने इंग्लंड मधे सातत्य दाखवले व नंतर नोव्हे. मधे पाक विरूद्ध भारतात द्विशतक मारल्याने पुढच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघात पक्का होता. आधी आफ्रिकेत शतक मारल्याने तो ऑस्ट्रेलियात खेळेल असा विश्वास वाटायलाही सबळ कारण होते.

पण भारतातल्या त्याच पाक मालिकेत युवराज सिंग जबरद्स्त खेळत होता. मीडिया, पब्लिक व निवडसमिती सर्वांनाच असे वाटू लागले की युवराज संघात असायलाच हवा. पण टेस्ट टीम मधे सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली व युवराज हे धरले तर सलामीला एकच बॅट्समन्ची जागा शिल्लक राह्ते. मग आपले "अभिनव प्रयोग" चालू झाले. मेलबोर्नला जाफर बरोबर नेहमीचा "नारायण" द्रविड सलामीला आला. तेथे व सिडनीला जाफर दुर्दैवाने अपयशी ठरला. पण त्याचबरोबर युवराजही अपयशी ठरला. त्यामुळे तिसर्‍या टेस्टमधे पर्थला जाफर टिकला. पण तोपर्यंत सेहवाग परत आलेला होता (तो निर्णय योग्यच होता. ती एक वेगळीच स्टोरी आहे). या तीन टेस्ट मधे जाफर ने फार काही केले नाही. मात्र सेहवाग पर्थला "इम्पॅक्ट" दाखवून गेला.

त्यामुळे कुंबळेवर प्रेशर आले. चौथ्या टेस्टसाठी पाच बोलर्स खेळ्वायचे ठरल्यावर पहिला बाहेर गेला तो जाफर. कारण "हंगामी अष्टपैलू" इरफान पठाण सलामीला पाठवला गेला. हे सगळे कुंबळे कप्तान असताना - म्हणजे यात काही "क्रिकेटबाह्य" कारण असण्याची शक्यता जवळजवळ नसताना झाले.

नंतरच्या श्रीलंका सिरीजमधे सेहवाग-गंभीरची जोडी जमली ती पुढे २-३ वर्षे अभेद्य राहिली आणि यशस्वीही झाली. त्यामुळे जाफर बाहेरच राहिला.

आता मात्र गंभीर व सेहवाग दोघेही ड्ळमळीत असल्याने जाफरला थोडा चान्स आहे.

जाफर असेल गुणवान पण खेळताना तो कधीच फार कम्फर्टेबल वाटला नाही... मला तरी कायम तो अडखळत खेळतानाचाच आठवतोय!

फारएण्ड आठवले आता.

त्या वेळी कुणीतरी कमेण्ट पण केली होती. कि कुणाला वगळावे हा प्रश्न निवड समितीसमोर असणे हे चांगला संघ असल्याचे लक्षण आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसोबत तुलनाही झाली होती. रोटेशन बद्दल बोललेही गेले होते. मधल्या काळात कुंबळे कप्तान होता हे विसरलोच होतो.

दिल्ली कोटा असल्याने मुंबईचा जाफर बाहेर गेला असण्याचीही शक्यता वाटते.

महाशतक झालं आणि कोनीच फिरकल नाहिये????
------ द अफ्रिके विरुद्ध शतकांचे अर्धशतक पुर्ण केले.... भारत सामना हरला.
बांग्लादेशाच्या विरुद्ध शतकांचे शतक पुर्ण केले.... भारत सामना हरला.

सांघिक खेळ आहे आणि देशाने (टिमने) जिंकायला हवे... जर टिम हरत असेल तर कुठेतरी चुकत आहे.
हे दोन्ही सामने जिंकले असते तर अर्थात खेळीचे महत्व अजुन वाढले असते. वैयक्तिक महाशतका बद्दल सचिनचे अभिनंदन :स्मित:... आणि भारत हरल्याबद्दल Sad

मला तरी कायम तो अडखळत खेळतानाचाच आठवतोय! >>> नाही रे. काही इनिंग्स अफलातून आहेत त्याचा. मलाही तो आवडयचा. पण तसे अनेक आवडणारे पुढे खेळलेच नाही. काही तर खेळले पण आता कोणाला आठवत नाहीत उदा शिवसुंदर दास.

तसे बघितले तर मुनाफ पटेल हा भारतातील द्रुतगती गोलंदाज होता पण त्याने गती बदलली अन त्याचे वाटोळे होते आहे. (तरी मला तो आवडतो. कारण त्याला सिक्स मारला काय अन त्याच्या बोलिंगवर बोल्ड झाले काय, तो सारखेच हसतो. Happy )

जाफर असेल गुणवान पण खेळताना तो कधीच फार कम्फर्टेबल वाटला नाही... मला तरी कायम तो अडखळत खेळतानाचाच आठवतोय! >> तो सुरूवातीला अडखळत खेळतो असे मलाही वाटलेले. पण एकदा जम बसला कि He used to be trea to watch, especially for on drives.

उदा शिवसुंदर दास>> तो नि चोप्रा आपण निव्वळ वाया घालवले रे. दोघेहसरसरळ बॅत ने खेळू शकायचे, दोघांनाही त्यांछे off stump कुठे आहेत ते कळायचे. फक्त त्यांचे strike rates high नाहित ह्या ओरडीमूळे लवकरच बाहेर हाकलले गेले. cricinfo वर येणारे चोप्राचे लेख वाचले आहेस का ? त्याची खेळाची समज काय उच्च आहे ते दिसते. राजस्थानच्या संघाने मागच्या वर्षी रणजी जिंकण्यामागे चोप्रा हे एक मह्त्वाचे कारण होते.

पण त्याने गती बदलली अन त्याचे वाटोळे होते आहे. >> तो injured झाल्यानंतर कुठल्या तरी academyमधे गेला नि त्याने action बदलली नि पुढे त्याचा प्रभाकर (cutter टाकणारा गोलंदाज) झाला असे वाचलेले. मोहालीला त्याने कुठल्या तरी warm up match मधे england च्या खुर्दा केलेला pace नि swing च्या जोरावर (त्याच series मधे जिथे वानखेडेवर आपण हरलेलो)

वासिम जाफर परत भारतीय संघात येणं कठीण आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्येही त्याच्या बॅटीतून धावा निघत नाही आहेत. मुंबईच्या रणजी संघाचे कर्णधारपद सोडावे लागले आहे. रणजी ट्रॉफीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे

त्याचा पुतण्या अरमान जाफरने गेल्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये ४९८ धावांची विक्रमी खेळी केली.

काल विंडीजने ऑसीजला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. २००६ नंतर प्रथमच विंडीज ऑसीजविरूद्ध जिंकले.

<< हा सचिनचा नवीन हेअरडू >> अरेच्चा, मला वाटलं होतं, महाशतक होईपर्यंत केंस कापणार नाही अशी प्रतिज्ञा केलीय त्याने !! Wink

तो बहुतेक झहीर खान आणि मलिंगाच्या हेअरडूची कॉपी करतोय. कुठला का हेअरडू असेना किंवा एकदम तुळतुळीत केली तरी हरकत नाही, भरपूर धावा कर आणि भारत जिंकू देत हीच अपेक्षा आहे.

एकदिवसीय सामन्यात सध्या एकूण २० षटकांचा पॉवर प्ले असतो. २००७ पर्यंत तो बहुतेक १५ षटकांचा होता. २००३ मध्ये पॉवरप्ले किती षटकांचा होता ते आठवत नाही.

ही पॉवरप्ले षटकांची संकल्पना नक्की कधी सुरू झाली असावी? १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत पॉवरप्ले नव्हता (बहुतेक).

याबद्दल कोणाला नक्की माहिती आहे का?

मास्तुरे ही काही माहीती

Fielding restrictions and powerplays
A limited number of fielders are allowed in outfield during powerplays.

The bowling side is subjected to fielding restrictions during an ODI, in order to prevent teams from setting wholly defensive fields. Fielding restrictions dictate the maximum number of fieldsmen allowed to be outside the thirty-yard circle.

Under current ODI rules, there are three levels of fielding restrictions:

In the first ten overs of an innings (the mandatory powerplay or Powerplay 1), the fielding team may have at most two fieldsmen outside the thirty-yard circle. Additionally, at least two fieldsmen must be in close catching positions, such as slip, gully or short point.
In two five-over blocks, known as the batting powerplay and bowling powerplay, the fielding team may have at most three fieldsmen outside the thirty-yard circle, but there is no requirement for close catching fieldsmen. The batsmen and the bowling captain have discretion on when the batting and bowling powerplays are taken respectively. These powerplays must be completed between the 16th and 40th overs of an uninterrupted innings, and neither team can choose not to take its powerplay.
For the remainder of the innings, the fielding team may have at most five fieldsmen outside the thirty-yard circle.

Where a match is shortened by rain, the duration of the powerplays is adjusted to equal 40% of the team's overs wherever possible.

Fielding restrictions were first introduced in 1992, with only two fieldsmen allowed outside the circle in the first fifteen overs, then five fieldsmen allowed outside the circle for the remaining overs. This was shortened to ten overs in 2005, and the two five-over powerplays were introduced, although the bowling team had discretion over the timing for both. In 2008, the batting team was given discretion for the timing of one of the two powerplays. Finally, in 2011, the teams were restricted to completing the discretionary powerplays between the 16th and 40th overs; previously, the powerplays could take place at any time between the 11th and 50th overs[1]

http://en.wikipedia.org/wiki/Powerplay_%28cricket%29

विंडीजने ऑसीजविरूद्ध लागोपाठ ३ एकदिवसीय सामन्यात अपराजित राहून इतिहास घडविला आहे. या ३ पैकी २ सामने विंडीजने जिंकले व १ बरोबरीत सुटला. यापूर्वी विंडीजने २००६ मध्ये ऑसीजविरूद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता. पोलार्ड खूपच भरात आहे. काल त्याने ७० चेंडूत १०२ धावा केल्या (८ षटकार, ५ चौकार). आधीच्या २ सामन्यातही त्याने ४७ व ३६ अशी चांगली कामगिरी केली होती. मालिकेत विंडीज २-१ ने पुढे आहे. शेवटचा सामना जिंकला तर विंडीजला अनेक वर्षांनी मालिका जिंकता येईल.

इंग्लंड, द.आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया हे चारही देश अलीकडे फक्त स्वदेशातलेच सामने जिंकत आले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसचे मुख संपादक शेखर गुप्ता यांचा लेख

कसोटी सामन्यांतील धोनीच्या कप्तानीतील त्रुटी

बरोबर १ वर्षापूर्वी याच दिवशी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकड्यांना हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आज ती आठवण आली. त्या सामन्याच्या वेळचे प्रतिसाद वाचून बघा. एकदम नॉस्टॅल्जिक व्हाल.

रच्याकने, नेहरू त्या दिवसापासून आजतगायत बेपत्ता आहे.

आज २ एप्रिल २०१२. बरोबर १ वर्षांपूर्वी भारत विश्वविजेता झाला होता.

पण त्या दिवसापासून भारताची बरीचशी घसरण झाली आहे.

गेल्या १ वर्षात भारत एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यापैकी १७ जिंकले, ११ हरले, २ बरोबरीत सुटले व १ अनिर्णित राहिला.

गेल्या १ वर्षांत खेळलेल्या एकूण १४ कसोटींपैकी भारताने ३ जिंकले, ८ हरले व ३ अनिर्णित राहिले.

एकंदरीत विश्वचषक जिंकल्यापासून बरीचशी अधोगती झाली आहे.

विश्वचषकाच्या संघात असलेल्या सेहवाग, हरभजन, स्रिसंथ व मुनाफची खराब कामगिरीमुळे हकालपट्टी झालेली आहे. युवराज व नेहरू जखमी आहे. झहीर अधूनमधून खेळतो व बर्‍याचदा जखमी असतो. युसुफ पठाण वर्षभर बाहेर होता व तो नुकताच संघात परत आला. बाकीचे टिकून आहेत पण फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. अपवाद बर्‍याच प्रमाणात कोहलीचा. गंभीर, रैना व घोनी एकदिवसीय सामन्यात अधूनमधून खेळतात. कसोटीत जवळपास सगळेच फ्लॉप आहेत.

इंग्लंड लंकेविरुद्ध हरल्यावर आलेला बॉयकॉटचा खास शनवारपेठी खडूस लेख --
http://www.telegraph.co.uk/sport/cricket/international/england/9179339/E...

त्यातलं मला सर्वात आवडलेलं वाक्य -- My uncle Algy used to say: “Stay in, because you can’t make runs in the pavilion.”

2 एप्रिल, 2011 हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी स्वप्नपूर्तीचा ठरला. 28 वर्षे आणि सात विश्‍वकरंडक स्पर्धांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ जगज्जेता ठरला. या महत्त्वाच्या विजयाला एक वर्ष पूर्ण होत असताना "त्या' स्पर्धेतील भारताची वाटचाल कशी झाली, याचा घेतलेला हा मागोवा. या विजेतेपदातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे, याआधीच्या सर्व विश्‍वकरंडक विजेत्या संघांना नमवून करंडक उंचावणारा भारत हा एकमेव संघ आहे. यामध्ये त्यांनी वेस्ट इंडीज (पहिल्या दोन स्पर्धा), ऑस्ट्रेलिया (1987), पाकिस्तान (1992) आणि श्रीलंका (1996) यांच्यावर मात केली.

भारताची स्पर्धेतील वाटचाल :
19 फेब्रुवारी : भारत विरुद्ध बांगलादेश
2007च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने भारताला पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले होते. या पराभवाची कटू आठवण विसरायला लावणारा खेळ करू, असे वीरेंद्र सेहवागने सामन्याआधीच सांगितले होते. घडलेही तसेच. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताने मायदेशात न खेळलेला हा एकमेव सामना. सामनावीर : वीरेंद्र सेहवाग
संक्षिप्त धावफलक :
भारत : (50 षटकांत) 4 बाद 370 (वीरेंद्र सेहवाग 175-140 चेंडू, 14 चौकार, 5 षटकार, विराट कोहली नाबाद 100-83 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार) विजयी विरुद्ध बांगलादेश : (50 षटकांत) 9 बाद 283 (तमिम इक्‍बाल 70, शकीब अल हसन 55, मुनाफ पटेल 4-48, झहीर खान 2-40)
---------------
27 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड
रोमांचक घटनांनी भरलेला थरारक सामना. शंभर षटके, 18 विकेट आणि 676 धावांनंतर "टाय' झालेला सामना. सचिन आणि अँड्य्रू स्ट्रॉसचे शतक, मोक्‍याच्या क्षणी तीन बळी घेत झहीरने सामन्याला दिलेली कलाटणी आणि शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावा आवश्‍यक असताना इंग्लंडच्या शहजादने मुनाफला खेचलेला षटकार, ही या सामन्याची वैशिष्ट्ये. सामनावीर : अँड्य्रू स्ट्रॉस
संक्षिप्त धावफलक :
भारत : (49.5 षटकांत) सर्वबाद 338 (सचिन तेंडुलकर 120-115 चेंडू, 10 चौकार, 5 षटकार, युवराजसिंग 58, गौतम गंभीर 51, टीम ब्रेस्नन 5-48) बरोबरी विरुद्ध इंग्लंड : (50 षटकांत) 8 बाद 338 (अँड्य्रू स्ट्रॉस 158, इयान बेल 69, झहीर खान 3-64)
--------------
6 मार्च : भारत विरुद्ध आयर्लंड
सांघिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत करून आत्मविश्‍वास उंचावलेल्या आयर्लंडविरुद्धची लढत भारतासाठी अजिबात "केक वॉक' नव्हती; पण "मालिकावीर' युवराज सिंगने गोलंदाजीत दाखविलेल्या कमालमुळे हा सामना अपेक्षेपेक्षा सोपा ठरला. या स्पर्धेत पटकाविलेल्या चार "सामनावीर' पुरस्कारांपैकी युवराजचा पहिला पुरस्कार या सामन्यात.
संक्षिप्त धावफलक :
आयर्लंड : (47.5 षटकांत) सर्वबाद 207 (विल्यम पोर्टरफिल्ड 75, नील ओब्रायन 46, युवराजसिंग 5-31, झहीर खान 3-30) पराभूत विरुद्ध भारत : (46 षटकांत) 5 बाद 210 (युवराजसिंग नाबाद 50-75 चेंडू, 3 चौकार, सचिन तेंडुलकर 38)
------------
9 मार्च : भारत विरुद्ध नेदरलॅंड्‌स
कमकुवत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अपेक्षित निकाल. युवराजची पुन्हा एकदा फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमक. सामनावीर : युवराजसिंग
संक्षिप्त धावफलक :
नेदरलॅंड्‌स : (46.4 षटकांत) सर्वबाद 189 (पीटर बॉरेन 38, झहीर खान 3-20, युवराजसिंग 2-43) पराभूत विरुद्ध भारत : (36.3 षटकांत) 5 बाद 191 (युवराजसिंग नाबाद 51-73 चेंडू, 7 चौकार, वीरेंद्र सेहवाग 39, पीटर सीलर 3-53)
--------
12 मार्च : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
या स्पर्धेतील भारताचा एकमेव पराभव. सचिन तेंडुलकरचे 99वे आंतरराष्ट्रीय शतक या सामन्यामध्ये. फलंदाजी समाधानकारक होऊनही गोलंदाजीतील अचूकतेच्या अभावामुळे भारताचा पराभव. सामनावीर : डेल स्टेन
संक्षिप्त धावफलक :
भारत : (48.4 षटकांत) सर्वबाद 296 (सचिन तेंडुलकर 111-101 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार, वीरेंद्र सेहवाग 73, डेल स्टेन 5-50) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : (49.4 षटकांत) 7 बाद 300 (जॅक कॅलिस 69, हशिम आमला 61, एबी डिव्हिलर्स 52, हरभजनसिंग 3-53, मुनाफ पटेल 2-65)
----------------
20 मार्च : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज
"सुपर एट'मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार की श्रीलंकेशी, याचा निर्णय या लढतीवर अवलंबून होता. फॉर्म गवसलेल्या युवराजचे शतक, रवी रामपॉलचे पाच बळी आणि डेव्हॉन स्मिथच्या अर्धशतकानंतर नेहमीप्रमाणे घसरलेला विंडीजचा डाव, ही या सामन्याची वैशिष्ट्ये. हा सामना जिंकून भारताने माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत पक्की केली. सामनावीर : युवराजसिंग
संक्षिप्त धावफलक :
भारत : (49.1 षटकांत) सर्वबाद 268 (युवराजसिंग 113-123 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, विराट कोहली 59, रवी रामपॉल 5-51) विजयी विरुद्ध वेस्ट इंडीज : (43 षटकांत) सर्वबाद 188 (डेव्हॉन स्मिथ 81-97 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, झहीर खान 3-26, आर. आश्‍विन 2-41, युवराजसिंग 2-18)
-----------
24 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उपांत्यपूर्व सामना
सलग चौथ्यांदा विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी निघालेला ऑस्ट्रेलियाचा विजयरथ भारताने थोपविला. कर्णधार रिकी पॉंटिंगच्या शतकानंतर समाधानकारक धावसंख्या उभारलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर पराभूत करत स्पर्धेबाहेर ढकलले. या विजयामुळे उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार, हेदेखील निश्‍चित झाले. सामनावीर : युवराजसिंग
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : (50 षटकांत) 6 बाद 260 (रिकी पॉंटिंग 104-118 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, ब्रॅड हॅडिन 53, आश्‍विन 2-52, झहीर खान 2-53, युवराजसिंग 2-44) पराभूत विरुद्ध भारत : (47.4 षटकांत) 5 बाद 261 (सचिन तेंडुलकर 53, गौतम गंभीर 50, युवराजसिंग नाबाद 57-65 चेंडू, 8 चौकार, सुरेश रैना नाबाद 34)
------------
30 मार्च : भारत विरुद्ध पाकिस्तान : उपांत्य सामना
इतर असंख्य भारत आणि पाकिस्तान सामन्यांप्रमाणेच झालेला थरारक सामना. त्यातच, विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दडपणाची भर. मैदानावरील क्रिकेटसह मैदानाबाहेरही दोन देशांमध्ये सुरू झालेली "क्रिकेट डिप्लोमसी' यामुळे हा सामना लक्षवेधी ठरला. सचिनला मिळालेली जीवदाने आणि अखेरीस गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तानवरील हुकूमत भारताने कायम राखली. या विजयासह विश्‍वकरंडक स्पर्धेचे लक्ष्य केवळ एका पावलावर. सामनावीर : सचिन तेंडुलकर
संक्षिप्त धावफलक :
भारत : (50 षटकांत) 9 बाद 260 (सचिन तेंडुलकर 85-115 चेंडू, 11 चौकार, वीरेंद्र सेहवाग 38, सुरेश रैना नाबाद 36, वहाब रियाझ 5-46) विजयी विरुद्ध पाकिस्तान : (49.5 षटकांत) सर्वबाद 231 (मिस्बा उल हक 56-76 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, महंमद हफीज 43, झहीर खान 2-58, आशिष नेहरा 2-33, मुनाफ पटेल 2-40, हरभजनसिंग 2-43, युवराजसिंग 2-57)
--------
2 एप्रिल : भारत विरुद्ध श्रीलंका : अंतिम सामना
गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनीच्या अफलातून खेळींमुळे भारताने 28 वर्षांनंतर विश्‍वकरंडकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात महेला जयवर्धनेने झळकावलेले शतक अखेर अपयशीच. धोनीचा "तो' षटकार आणखी काही काळ तरी भारतीय क्रिकेटमध्ये चांगलाच लक्षात राहील, यात शंका नाही. सामनावीर : महेंद्रसिंह धोनी, मालिकावीर : युवराजसिंग
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : (50 षटकांत) 6 बाद 274 (महेला जयवर्धने 103-88 चेंडू, 13 चौकार, कुमार संगकारा 48, झहीर खान 2-60, युवराजसिंग 2-49) पराभूत विरुद्ध भारत : (48.2 षटकांत) 4 बाद 277 (गौतम गंभीर 97-122 चेंडू, 9 चौकार, महेंद्रसिंह धोनी नाबाद 91-79 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार)

याच लेखातील हे वाक्य

If we can’t win in the sub-continent then England are a one-dimensional team. We are very good if pitches are true and the seamers can dominate. As soon as the pitch becomes a slow turner and demands adjustment in technique and temperament from the batsmen we make silly mistakes.

भारताच्या बाबतीत असे लिहिता येईल

If we can’t win outside India, then India are a one-dimensional team. We are very good if pitches are slow and the spinners can dominate. As soon as the pitch becomes fast and demands adjustment in technique and temperament from the batsmen we make silly mistakes.

Pages