क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतासाठी आनंदाची बातमी! दुसर्‍या कसोटीत किवीजनी जबरदस्त झुंज देऊन ऑसीजवर केवळ ७ धावांनी विजय मिळविला व मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

विजय झोल (जालना - महाराष्ट्र, वय १७) ह्याने महा विरुद्ध आसाम सामन्यात ४५१ नाबादची खेळी केली आहे. त्याने युवीचा जुना ३५८ धावांचा विक्रम तोडला. ह्या सामन्यांमधून अनेक फलंदाज व गोलंदाज भारताला मिळाले आहेत. विजयला शुभेच्छा!

केदार, विजय झोलने युवीचा विक्रम तोडला हे खरंय. सोबत त्याने भाऊसाहेब निंबाळकरांचाही ४४३ धावांचा विक्रम मोडीत काढलाय. चू.भू.द्या.घ्या.!
आ.न.,
-गा.पै.

HARBHAJAN che grah firle aahet...team madhun gela..kamgiri kharab zali..ranaji madhe hi wickets nahi...

aata bicharyachi BAG suddha chorila geli..:) gaadi chi kaach fodun chorali.....areeee...kaay divas aahe aahe bicharyavaar..

दादा उतारवयात फॉर्मात आलाय. आज बडोद्याविरूद्धच्या रणजी करंडकाच्या सामन्यात त्याने गोलंदाजीत पहिल्या डावात १.२-०-१-३ अशी कामगिरी केली तर फलंदाजीत १२० चेंडूत ६० धावा करून जखमी झाल्यामुळे निवृत्त झाला. यावर्षीच्या रणजी सामन्यात दादाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर इंग्लडच्या दौर्‍याप्रमाणे ५-६ प्रमुख खेळाडू जखमी झाले तर दादाला पाठवायला हरकत नाही. Biggrin

हो पाठवा पाठवा.... तो, वसिम जाफर, अंकित बावणे, विजय झोल सगळ्या रणजीस्टार्सना पाठवून द्या... आणि धोनी, सेहवाग, द्रवीड, तेंडूलकर वगैरेना रिटायर करुन टाका Proud

<< धोनी, सेहवाग, द्रवीड, तेंडूलकर वगैरेना रिटायर करुन टाका >> खरंच, क्रिकेटच्या नावाने बोटं मोडणार्‍यांना मिळूंदे एकदांच समाधान !! Wink

श्रीलंका-आफ्रिकेमधला दुसरा कसोटी सामना पण रंगात आलाय. पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी व एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागल्यावर व आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटीत जबरी मार खाल्ल्यावर श्रीलंकेला दुसर्‍या कसोटीत सूर गवसलाय.

आफ्रिकेविरूद्ध पहिल्या डावात १७० धावांची आघाडी मिळाल्यावर तिसर्‍या दिवशी शेवटच्या सत्रात श्रीलंकेला तब्बल ४१५ धावांची आघाडी मिळाली आहे आणि अजून त्यांचे ४ फलंदाज बाद व्हायचे आहेत. तिसरा संपूर्ण दिवस खेळून श्रीलंकेला आपली आघाडी ५०० च्या पुढे नेता येईल व नंतर आफ्रिकेला उरलेल्या २ दिवसात गुंडाळून सामना जिंकण्याची श्रीलंकेला सुवर्णसंधी आहे.

भारत ऑस्ट्रेलिया दौर्‍यासंबंधी असलेल्या बीबी वर जे वाचले त्याला उत्तर इथे देतो आहे, कारण मुद्दा त्या विषयाला धरून नाही, पण क्रिकेटबद्दलच आहे.
वर लोक IPL ला शिव्या घालत आहेत नि तुम्ही तेच करायचे म्हणता ?
लोक घालेनात का शिव्या, तरी पैसे देऊन बघायला येतातच ना? सामने होतातच ना? जर परदेशी लोक नाहीत म्हणून कमी लोक येतात असे झाले तर फार तर आय पी एल मधले विजेते व उपविजेते यांचे दोन सामने, फक्त परदेशी खेळाडू मिळून केलेल्या संघाबरोबर करावेत.
उपरोधिकपणे वरची पोस्ट लिहीली असेल;
नाही हो, काहीतरी नवीन विचार काढत बसायचे, कुठला तरी जमला तर बरे, नाहीतर वाईट काय?
आता सगळेच विचार सर्वाङ्गीण, साधकबाधक अभ्यास करून मांडलेले नाहीत. पण विचारात थोडा जरी अर्थ वाटला, तर तशी चर्चा होईलच, मला नाहीतरी काही उद्योग नाहीच आहे, नि टाळके अजून संपूर्णपणे कामातून गेले नाही, तोपर्यंत मजा!

<< उपरोधिकपणे वरची पोस्ट लिहीली असेल; >>'कदाचित' जोडलंय मी याच्या सुरवातीला. शिवाय, तुम्ही मांडलेला विचार माझ्याही मनात येतो, असंच म्हटलंय मीं !

श्रीलंका वि द. आफ्रिकेच्या आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबरी धमाल चालली आहे. आफ्रिकेने पहिली फलंदाजी करून ५० षटकांत ८ बाद ३०१ धावा केल्या (मलिंगाने ५ बळी घेतले). श्रीलंकेने आतापर्यंत पहिल्या ७.५ षटकांत ६ बाद १३ धावा केल्या आहेत (मॉर्नी मॉर्केल ३ बळी व सोटसोबे चे ३ बळी).

१९८३ च्या विश्वचषकात भारताला झिंबाब्वेविरूद्ध ५ बाद १७ अशा खड्ड्यातून कपिलने वर आणले होते. आज लंकेकडे कपिल नाही आणि समोर झिंबाब्वे नसून बलाढ्य आफ्रिका आहे. आज बहुतेक एकदिवसीय सामन्यातला नीचांक बघायला मिळणार.

विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारलेल्या श्रीलंकेला फारच अवकळा आली आहे.

१०.४ षटकांत ७ बाद २४.

श्रीलंकेला परत फॉर्मात यायचं असेल तर त्यांनी भारताबरोबर एखादी मालिका खेळावी. त्यांचे राखीव खेळाडूसुद्धा फॉर्मात येऊन आपला करिअर बेस्ट परफॉर्मन्स देतील.

<< श्रीलंकेला परत फॉर्मात यायचं असेल तर त्यांनी भारताबरोबर एखादी मालिका खेळावी. >> समजा, हा स्कोअर भारताचा असता तर..... ! क्रिकेटर्सचा पैसा, ग्लॅमर व गुर्मी यावरच फक्त झोड उठली असती; कोणत्याही देशाच्या संघाची इतर कारणानीही अशी हालत होऊं शकते, याचंही भान आपल्याकडे कां नाही ठेवलं जात ?

>>> कोणत्याही देशाच्या संघाची इतर कारणानीही अशी हालत होऊं शकते, याचंही भान आपल्याकडे कां नाही ठेवलं जात ?

काल श्रीलंकेने सर्वबाद ४३ धावा केल्या. २ महिन्यांपूर्वी आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४७ धावा केल्या होत्या.

काल श्रीलंकेने सर्वबाद ४३ धावा केल्या. २ महिन्यांपूर्वी आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४७ धावा केल्या होत्या.
भारताने असा विक्रम सर्वात आधी केला, मला वाटते १९५२ साली इंग्लंडमधे. ४ बाद ० अशी सुरुवात करून ३२ वर सर्व बाद. फ्रेडी ट्रूमन. "Gimme the ball, I'll get the bastards out!" असे म्हणाला याबद्दल मोठ्ठे वादळ उठले की क्रिकेट मधे अशी असभ्य भाषा! त्याच्यावर कारवाई का करू नये? वगैरे.
त्यामुळे आजकाल क्रिकेटमधे किती सभ्यता आली आहे!! Proud Proud

पण त्यानंतर भारताने दोन विश्वचषक जिंकले, आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवला. तेंव्हा एखादे वर्ष काही जिंकले नाहीत तर त्याबद्दल घाबरायचे कारण नाही.

पैसा, ग्लॅमर व गुर्मी यावरच फक्त झोड उठली असती;
कारण मत्सर. बॉलीवूडमधे, राजकारणात, काय कमी पैसा, ग्लॅमर व गुर्मी असते का? मग सगळेच सिनेमे एकदम फिल्म फेअर अवार्ड मिळण्याच्या लायकीचे होतात का? राजकारण्यांत सुद्धा निदान दोघे तिघे जण तरी भ्रष्टाचारी, काम न करणारे, असे असतातच.

५-६ महिन्यांपूर्वी आपल्या गल्लीत भारताला चारी मुंड्या चीत करणार्‍या इंग्लंडचे इंग्लंडबाहेर हाल होत आहेत. आजपासून दुबईत सुरू झालेल्या पाकड्यांविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी उपाहाराच्या आधीच इंग्लंडची २१ षटकांत ५ बाद ४६ अशी अवस्था झालेली आहे.

इंग्लंडची बाहेरच्या मैदानावर वाट लागली आहे. दुसर्‍या दिवसअखेर इंग्लंडच्या १९२ धावांना उत्तर देताना पाकड्यांनी ७ बाद २८८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात सईद अजमलने ७ बळी घेतले, पण ग्रॅमी स्वॅनला फक्त २ च बळी घेता आले आहेत. सईद अजमलची फिरकी गोलंदाजी खेळता येत नसल्याने तो "फेकतो" असे आरोप सुरू झाले आहेत.

थोडक्यात काय,

(१) "हर कुत्ता अपनी गलीमें शेर होता है" आणि

(२) ज्याची गोलंदाजी खेळता येत नाही त्याची शैली संशयास्पद आहे आणि तो "फेकतो".

भारताने हिल्फेनहॉस व सीडलच्या गोलंदाजीच्या शैलीविरूद्ध रान उठवायला हरकत नाही. पवारसाहेब आयसीसीचे अध्यक्ष असल्याने, या दोघांच्या शैलीची तपासणी करण्यासाठी आयसीसीला तातडीने एक समिती नेमता येईल. समितीचा निर्णय येईपर्यंत या दोघांना खेळण्याची बंदी घालता येईल.

आयसीसीचे अध्यक्ष
आयसीसी म्हणजे काय? आणि बीसीसी आय कोण? आणि पवारसाहेब कशाचे अध्यक्ष? का सगळ्याचेच? आणि त्यांनी काय मंत्रिपदाचा राजीनामा दिला का? आणि नसेल तर हे असले धंदे करायला त्यांना वेळ कसा मिळतो? त्यांच्या कामाची कुणि तपासणी करतात की नाही? काय काम केले गेल्या सहा महिन्यात वगैरे. नि क्रिकेटचे काम केले तर इंग्लंड व ऑस्ट्रेलियात नामुष्की झाली म्हणून त्यांचा राजीनामा कसा मागत नाहीत लगेच?

हे असले काहीतरी बावळटासारखे घोळ घालतात, मूर्खासारखे खेळाडूंना डोक्यावर घेतात. अत्यंत भिक्कार खेळले तरी त्यांना खुश्शाल पैसे देतात नि मागून रडतात - अहो क्रिकेटचे असे काय झाले?
असेच होणार. वाट्टोळे.

>> "हर कुत्ता अपनी गलीमें शेर होता है"
हे बरोबर आहे. पण तरिही भारताने टेस्ट मॅचेस मधे किती वेळा आपल्या गल्लीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिकेचा धुव्वा (म्हणजे आपला जसा तिकडे होतो आहे तसा.. 'व्हाईट वॉश' आणि त्यातल्या काही सामन्यात डावाने मार) केला आहे ते सविस्तर सांगावे. या वर्षी इंग्लंड भारतात येणारच आहे. तेव्हाही आपण त्यांचा धुव्वा उडविणार नाही हे मी आत्ताच सांगतो. Proud

मला आठवते त्याप्रमाणे इंग्लंड फक्त १९९३ मधे ३-० आणि ऑस्ट्रेलिया २०१० मधे २-०. पण सध्याबाबत मास्तुरेंशी सहमत, आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत सगळेच साधारण तसेच खेळत आहेत. भारत २०१० च्या सुरूवातीपर्यंत कसोटीत चांगला होता (आफ्रिकेत बरोबरी).

>>> >> "हर कुत्ता अपनी गलीमें शेर होता है"
>>> हे बरोबर आहे. पण तरिही भारताने टेस्ट मॅचेस मधे किती वेळा आपल्या गल्लीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिकेचा धुव्वा (म्हणजे आपला जसा तिकडे होतो आहे तसा.. 'व्हाईट वॉश' आणि त्यातल्या काही सामन्यात डावाने मार) केला आहे ते सविस्तर सांगावे. या वर्षी इंग्लंड भारतात येणारच आहे. तेव्हाही आपण त्यांचा धुव्वा उडविणार नाही हे मी आत्ताच सांगतो.

भारताने तसा "वॉश" इतरांना फार कमी वेळा दिला आहे. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँडला न्यूझीलँडच्याच भूमीवर ३-१ असे हरविले होते. नंतर १९९३ मध्ये भारतात आधी इंग्लंडला ३-० व लगेचच झिंबाब्वेला ३-० असे हरविले होते. २ वर्षांपूर्वी भारतातल्या २ कसोटींच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-० असे हरविले होते. या अपवादांव्यतिरिक्त भारताने फार मोठ्या फरकाने (अगदी भारतातसुद्धा) विजय मिळविलेला दिसत नाही.

"प्रत्येक श्वान आपल्याच परसात व्याघ्र असतो" म्हणजे आपल्या भूमीवर बहुतेक देश इतर देशांविरूद्ध जिंकतात, पण दुसर्‍या देशाच्या भूमीवर हरतात. हे विधान बहुतेक वेळा सिद्ध झाले आहे. अर्थात काही अपवाद आहेतच. २०१०-११ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरविले, त्यापूर्वी १९८४ पासून तब्बल २००३ पर्यंत ऑस्ट्रेलिया इंग्लंडला इंग्लंडमध्ये जाऊन हरवत होता, २००७ मध्ये आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर हरविले. भारताने पाकड्यांना २००४ मध्ये, न्यूझीलँडला २००८ मध्ये व २००७ आणि २०११ मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर पराजित केले. पण असे प्रसंग दुर्मिळ आहेत. साधारणपणे क्रिकेट खेळणार्‍या पहिल्या ८-९ देशांमधल्या ८० टक्क्यांहून अधिक मालिकात यजमान संघच जिंकतो. इंग्लंडने भारताला आपल्या भूमीवर ४-० अशी मात दिल्यावर इंग्लंडच्या बाहेर लगेचच त्यांची हवा झाली आहे, यावरूनही हे सिद्ध होते.

असो. भारत इंग्लंडचा भारतात पूर्ण "वॉश" करेल का ते सांगता येत नाही. पण भारत ही मालिका नक्की जिंकणार हे सांगता येईल.

इंग्लंड डावाने हारण्याच्या मार्गावर आहेत... आणि तेही तिसर्‍या दिवशीच... नंबर एकची टेस्ट टीम झाल्यावर खेळ बिघडलाच पाहिजे असे काही आयसीसीने सांगितले आहे का??

इंग्लंड डावाने हारण्याच्या मार्गावर आहेत... आणि तेही तिसर्‍या दिवशीच... नंबर एकची टेस्ट टीम झाल्यावर खेळ बिघडलाच पाहिजे असे काही आयसीसीने सांगितले आहे का??>> नाही ICC ने फक्त हे सांगायला हवे कि दुसर्‍या देशातल्या खेळाडूंना तुमच्या देशात खेळताना home pitch advantage घेऊन हरवल्यावर chest beating नि self gloating करणे थांबवा. Happy

>> भारताने तसा "वॉश" इतरांना फार कमी वेळा दिला आहे.
एक्झॅक्टली! म्हणजेच इतर टीम आपल्या देशात येऊन हरल्या तरी थोडी फार फाईट देतात, एखादी मॅच जिंकतात, एखादी ड्रॉ करतात. म्हणजे आपण आपल्या गल्लीत सुद्धा शेर म्हणवायच्या लायकीचे नाही आहोत.. कधीच नव्हतो.

असाम्या, पाकला होम पिच अ‍ॅडव्हांटेज आहे असं छाती ठोकपणे म्हणता येणार नाही कारण ते दुबईत खेळत आहेत.

असाम्या, पाकला होम पिच अ‍ॅडव्हांटेज आहे असं छाती ठोकपणे म्हणता येणार नाही कारण ते दुबईत खेळत आहेत.>> अरे पिच sub continental आहे ना ?

पाकड्यांनी तिसर्‍याच दिवशी इंग्लंडला १० विकेट्सने हरविले (इंग्लंड १९२ व १६०, पाकडे ३३८ व नाबाद १५). इंग्लंडच्या २० बळींपैकी १६ बळी पाकच्या फिरकी गोलंदाजांनी घेतले.

>>> म्हणजेच इतर टीम आपल्या देशात येऊन हरल्या तरी थोडी फार फाईट देतात, एखादी मॅच जिंकतात, एखादी ड्रॉ करतात. म्हणजे आपण आपल्या गल्लीत सुद्धा शेर म्हणवायच्या लायकीचे नाही आहोत.. कधीच नव्हतो.

सामने निकाली होण्यासाठी खेळपट्ट्या फिरकी किंवा जलदगती गोलंदाजांना अनुकूल असाव्या लागतात. दुर्दैवाने भारतात बर्‍याचशा खेळपट्ट्या पाटा आहेत त्यामुळे सामना अनिर्णित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या गल्लीत क्वचितच दुसर्‍या देशाची धुलाई करता आली आहे. आपल्या सर्व खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल केल्या तर सर्व सामने आपण जिंकू.

<< आपल्या सर्व खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल केल्या तर सर्व सामने आपण जिंकू. >> कदाचित असंही घडूं शकतं- १] आतां आपल्याकडे इतरांपेक्षां फार भेदक फिरकी गोलंदाजही नाहीत व आपल्या फलंदाजांकडेही फिरकी खेळण्याचं पूर्वीसारखं शैलीदार तंत्रही राहिलं नाही, त्यामुळे आपण इथंही मार खाऊं व २] बाहेरच्या देशांत सडकून मार खायला आपल्या खेळाडूना ही आयतीच सबब मिळेल !!! Wink

आपल्या फलंदाजांकडेही फिरकी खेळण्याचं पूर्वीसारखं शैलीदार तंत्रही राहिलं नाही>> हे बाकी बरोबर आहे, युवराज, विराट, रोहित इत्यादी POMs सारखे क्रिजमधे राहून फिरकी खेळतात राव Sad

Pages