क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्माईल, प्लीज. स्मिथ गेला ! जॉनसन सुद्धां त्याला जॉईन झाला !
'फास्ट स्पीन' ही जडेजाच्या ह्या पीचवरील यशाची गुरूकिल्ली असं तज्ञांचं मत .

अश्विन - कायं झालंय आज? खूप धावा देतोय. माझ्या मते ओझाजी आणि जडेजालाच पुढच्या १५ ओव्हर्स द्याव्यात. त्यात सर्व संपेलच अशी आशा करावी. गो फॉर किल ! अश्विन नको आता.

बाकी कोणी नाही पण सिडलची लगेच पडायला हवी. Happy

स्पीनरनी दांड्या उडवल्याचं दुर्मिळ दृश्य या सामन्यात अगदीच साधारण होत चाललंय !!! आज अश्विनला 'लेंथ व लाईन 'चा प्रॉब्लेमच झालाय !! Sad

ही खेळपट्टी चेंडूवरच नाही तर खेळाडूंवरही भानामति करत्येय का ? नाही तर, या परिस्थितीत, असल्या विकेटवर मुरली विजय आधीच ठरवून स्पीनच्या विरुद्ध बाजूला रिव्हर्स स्वीप करण्याचा वेडेपणा कसा करूं शकतो !!!!

मुरली विजय याने कमालीचा फाजील आत्मविश्वास दाखवला मात्र परमपूज्य पुजारा आपला क्लास दाखवत आहे.

चहापानाला भारत सुस्थितीत.

सामना आजच आटोपतोय हा अंदाज खरा ठरतोय.

४-० च्या दिशेने घोडदौड.

आता पण म्हणणार का की धोनीला विनिंग शॉट मारायचा होता म्हणून त्याने तेंडल्या आणि रहाणेला आउट केले?

रहाणे स्वताच्या पायावर धोंडा मारुन घेतोय Sad

झाली पूर्ण एकदाची धोनीची धवलधुणी! परत प्रतिस्पर्ध्यांच्या शेपटाच्या वळवळीची रड आहेच! असो. निदान दाफ्रिकेच्या दौर्‍याआधी मनोबल निश्चितच वाढलंय, हेही नसे थोडके.

मधोनी आणि संघाचे अभिनंदन!

-गा.पै.

नाही. रहाणेला अजून संधी आहे. डोन्ट वरी. ९ महिन्यांनी अफ्रिकेला जाणार तो पर्यंत कदाचित तेंडुलकर निवृत्त होईल. ( काय सांगावे आजही सांगेन. )

अभिनंदन सर्वांचे.

तो ज्या पध्दतीने पॅव्हेलियन मधून हात हलवत होता, ते बघून एकदा नक्की मनात येउन गेल की आज घोषणा करणार बहुतेक!

भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन Happy

अभिनंदन धोनी आणि कंपनी Happy

माझ्या मते पुजारा सामनावीर
मालिकावीरसाठी मुरली विजय, पुजारा, अश्विन आणि जडेजा मध्ये जबरदस्त चुरस आहे Happy

>>
bumrang | 19 March, 2013 - 13:06
....
आणि धोनी श्रेयासाठी हपापलेला असतो वगैरे म्हणजे अगदीच अति होतेय.... उलट जिंकलेला करंडक संघातल्या इतर सहकार्‍यांकडे सोपवून गायब होणारा कर्णधार आहे तो....
>>

बघा आज पण धोनीने करंडक आधी सचिनला देउ केला आणि मग मुरली विजयच्या हातात तो देउन फोटोसाठी एकदम कोपर्‍यात जाऊन उभा राहिला Happy

धोनीने शेवटचा विजयी फटका मारून सामना जिंकला असे किती सामन्यात झाले आहे? विशेषतः तो जर बाद झाला नसेल नि खेळत असेल तर?
सहज गंमत म्हणून विचारले.
बीसीसी आय च्या संघाचे अभिनंदन.

भाउ, एक व्यंगचित्र होऊन जाउ द्या!

गा मा साहेब Proud

झक्की - तुमचा मुद्दा पटला ब्वॉ! धोनी मुळी येतोच चार पाच विकेट्स गेल्यावर, मग तोच उरणार की विजयी फटका मारायला!

भारतीय संघाचं अभिनंदन !
<< एक व्यंगचित्र होऊन जाउ द्या! >> झक्कीजी , खास तुमच्या फर्माईशीमुळे प्रयत्न केलाय -
frame.JPG

<< ते बघून एकदा नक्की मनात येउन गेल की आज घोषणा करणार बहुतेक! >> द्रविड व लक्ष्मणच्या अनुपस्थितीत द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर सचिनशिवाय जाणं शहाणपणाचं आहे का, हाही विचार बीसीसीआय व निवड समितीला भेडसावत असणारच व तशी त्यांची अनौपचारिकपणे सचिनशी चर्चा होतही असावी, असं मला वाटतं. सचिन त्या दौर्‍यापूर्वींच एकतर्फी निवृत्ति जाहीर करेल ही शक्यता म्हणून कमीच. [तशी त्याने ती करावी कीं नाही, हा अर्थातच चर्चेसाठी स्वतंत्र विषयच आहे !]

>>द्रविड व लक्ष्मणच्या अनुपस्थितीत द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर सचिनशिवाय जाणं शहाणपणाचं आहे का,
सचिन वादातीत महान खेळाडू आहे पण भाऊ, कधी ना कधी तरी ते करावेच लागणार ना!
आणि सचिन पडला की आजकाल भारतीय संघाचा अगदी काही सायकल स्टँड वगैरे होत नाही....
आत्ताच्या सिरीजमध्ये त्याची सरासरी अवघी ३२ आहे आणि चारही मॅचेस खेळलेल्या फलंदाजात सरासरीनुसार तो सर्वात तळाशी आहे Sad
अर्थात उपखंडाच्या बाहेर हे चित्र उलटे असू शकते... पण आता नव्या खेळाडूंवरही थोडा भरवसा दाखवावा लागेल.... सुरुवातीला पडतील-झडतील्-चुकतील्.....पण त्यातुन शिकतीलच की!
आणि तसेशी द्रविड्-लक्ष्मण्-सचिन असुनही इंग्लंड्-ऑस्ट्रेलियात काय झाले होते भारताचे.... त्यापेक्षा वाईट तर काही होणार नाही ना!

bumrang,

>> सचिन वादातीत महान खेळाडू आहे पण भाऊ, कधी ना कधी तरी ते करावेच लागणार ना!

अगदीअगदी! त्याच्या १९८ कसोटी झाल्याच आहेत, तेव्हढ्या २ होऊ द्या. मग करा खुशाल त्याला निवृत्त. फक्त कसोटीतून निवृत्तीची घोषणा त्याच्याकडूनच व्हावी एव्हढी माफक अपेक्षा ठेवतोय. एकदिनी सामन्यांतून घेतलेली निवृत्ती त्याने नव्हे तर बक्कीने घोषित केली होती.

आ.न.,
-गा.पै.

झक्की, तुम्ही BCCI चा उच्चार बक्की असा करा! ऐकायला बरं वाटतं! ... Lol
काय कोणाला एकेक सुचेल सांगता येत नाही राव..

चला जिंकलो एकदाचे.. आता पुढचे २ महिने खेळा आपापसात.. विदाउट टेंशन... Wink

गा.पै.जी व बुमरँगजी, सचिन आत्तांच निवृत्ति जाहीर न करण्याची शक्यता कां आहे, एवढ्यावरच मला काय वाटतं तें मीं सांगितलं; त्याने तसं व्हावं कीं नाही यावर मीं मत नाही मांडलेलं. पण विषय आलाच आहे तर माझं पूर्वी इथं मांडलेलंच मत आहे कीं हा निर्णय सर्वस्वीं सचिनचाच असावा व त्याच्या बर्‍या-वाईट परिणामाना त्यानेच सामोरी जावं. I believe we owe at least this much to this great master of the game ! स्वतःचं व राष्ट्रीय संघाचं हित लक्षांत घेऊन तो योग्य तोच निर्णय घेईल एवढ्या विश्वासास तो नक्कीच पात्र आहे. अर्थात, जर बीसीसीआय व निवडसमिती याना त्याचा पुढील सहभाग संघाला लाभदायक होईल असं वाटत नसेल, तर ते निश्चितपणे त्याला तसं सुचवतील व त्याची दखल न घेण्याइतपत सचिन अपरिपक्व आहे असं म्हणणं हास्यास्पद होईल.

भाऊ,
नि:संशयपणे निर्णय त्याचाच असावा.... मला फक्त इतकेच म्हणायचे होते की त्याने स्वता जर हा निर्णय घेतला तर केवळ साउथ आफ्रिकेचा दौरा आहे म्हणून बोर्ड त्याला अडवणार नाही!

आणि कुंबळे, द्रविड, लक्ष्मण निवृत्त झाले तेंव्हा जीव जसा हळहळला तसेच काहीसे सचिनच्या निवृत्तीने पण व्हावे....ती संधी सचिनने त्याच्या खेळाच्या चाहत्यांना द्यावी इतकेच!

भाउ, व्यंगचित्र झकास.
मला वाटते क्रिकेटच्या सरावाबरोबरच हे जाहिरातीत कसे बोलायचे याचाहि सराव व्हायला हवा.

यावर मंगला गोडबोले यांची एक विनोदी कथा आहे.

बुमरँगजी, कृपया गैरसमज नसावा. सचिनबद्दलच्या आदर व प्रेमामुळेच त्याच्या निवृत्तिच्या निर्णयाबद्दल बहुतेक लोक हळवे होतात याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण त्यामुळे सचिनच्या प्रगल्भतेवर व निर्णयक्षमतेवरच अविश्वास दाखवणं विसंगत नाही का होत ? << साउथ आफ्रिकेचा दौरा आहे म्हणून बोर्ड त्याला अडवणार नाही!>> असं म्हणणं म्हणजे सचिन व बोर्डात याबाबत अनौपचारिक कांही संवादच होत नाही/होऊंच शकत नाही, असं गृहीत धरण्यासारखं नाही कां होत ? ' बोर्डाची काय हिंम्मत आहे सचिनला काढायची म्हणून त्याने स्वतःच निवृत्त व्हावं', असंही बोललं जातं व तें सचिन व बोर्ड या दोघांचाही घोर अवमान करणारं आहे, असंही मला वाटतं. व्यक्तीशः, सचिनचा निस्सीम चाहता असूनही मीं देखील सचिनच्या निवृत्तिचा आतां आनंदाने स्विकार करेन, पण ती त्याने स्वतःचा निर्णय म्हणून जाहीर केली तरच !
झक्कीजी, धन्यवाद. Wink

गांगुली-राईट च्या काळात २००४ च्या सुरूवातीपर्यंत मिळवलेल्या यशातून संघाला आणखी पुढे नेण्यासाठी जरा वेगळ्या नेतृत्वाची गरज होती. चॅपेल-द्रविड ते करतील असे वाटले होते पण त्यांना ते जमले नाही. नंतर गॅरी कर्स्टन-कुंबळे व नंतर कर्स्टन-धोनी यांनी २००८ पासून ते वर्ल्ड कप जिंकेपर्यंत जे यश मिळवले ते म्हणजे 'त्यापुढची पायरी' असेच वाटत होते. मात्र वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्याच टीमला मोठा बॅड पॅच आला व धोनीची 'मॅजिकल कॅप्टनशिप' ही फेल जाऊ लागली.

यावेळचा सिरीजमधला ४-० विजय हा दणदणीत आहे. भारताने यापूर्वी कधीही एका सिरीज मधे ४ मॅचेस जिंकलेल्या नाहीत. ही टीम भारताबाहेर यशस्वी होईल का ते नंतर द आफ्रिकेत कळेलच. पण या सिरीज मधले विजय हे १९९३ सालापासून पुढची काही वर्षे अझर च्या टीमने 'घरी' मिळवलेल्या विजयांसारखेच वाटले. तेव्हा कुंबळे, राजेश चौहान व व्यंकटपथी राजू होते आता जडेजा, आश्विन व ओझा/भज्जी. त्यामुळे वीस वर्षांपूर्वीचा 'सध्या घरी जिंका, बाहेरचे नंतर बघू' फॉर्म्युला पुन्हा वापरलेला दिसतो.

तरीही धोनी व कंपनीने जोरदार विजय मिळवलेला आहे यात वादच नाही. मात्र पुढच्या सहा महिन्यांत आफ्रिकेत तीन टेस्टपर्यंत फिट राहून बोलिंग करू शकतील असे फास्ट बोलर्स उभे करणे गरजेचे आहे.

<< पुढच्या सहा महिन्यांत आफ्रिकेत तीन टेस्टपर्यंत फिट राहून बोलिंग करू शकतील असे फास्ट बोलर्स उभे करणे गरजेचे आहे.>> सहमत व त्यातल्या त्यात बाऊन्स असलेल्या आपल्या एखाद्या खेळपट्टीवर आपल्या फलंदाजाना अशा गोलंदाजांसमोर भरपूर सराव करायला लावणंही हितावह !

भाऊ, ते तर आहेच. पण वेगवान, उसळती खेळपट्टी बनवणे अंगावर शेकू शकते हे पूर्वी झहीर, इशांत, श्रीशांत, आर पी सिंग ई. लोक मधली काही वर्षे त्यांना दाखवून देत होते. त्यामुळे आपल्यापुढे सतत तशी पिचेस वाढून ठेवण्याचे प्रमाण कमी झाले होते.

खरे म्हणजे अशी बोलिंग कोणीच सतत चांगली खेळू शकत नाही. पण भारताकडे त्याचा फायदा उठवणारे लोकच नसल्याने ते जास्त होत होते.

श्रीशांत ने काढलेली ही कालिस ची विकेट पाहा. असे झाले तर आफ्रिकाही गपचूप "साध्या" विकेट्स बनवेल Happy
http://www.youtube.com/watch?v=18siiixrVD8

मला एक कळत नाही की भारतात इतक्या विविध प्रकारचे हवामान असलेले प्रदेश आहेत. क्रिकेट खेळणारे देश मोजकेच आहेत. तर मग भारतात सरावासाठी जगातील बहुतेक हवामान व खेळपट्ट्या यांची सांगड घालण्याची सुविधा का उत्पन्न केली जात नाही? की बक्कीला (BCCI) केवळ पैसे छापण्यात रस आहे?

-गा.पै.

<< श्रीशांत ने काढलेली ही कालिस ची विकेट पाहा.>> हो, हा चेंडू , हा फोटो व ही खूपच गाजलेली विकेट. पण इतरांसाठी - विशेषतः कालीससारख्यासाठी - ही अवस्था अपवादात्मक तर सरावाच्या अभावीं आपल्या फलंदाजांसाठी नेहमीची ! Wink
<< .. सुविधा का उत्पन्न केली जात नाही? >> गा.पै.जी , तुम्हाला कुठं उत्तर मिळालंच या प्रश्नाचं, तर मला जरूर सांगाच; माझे केस अकालीच पिकले होते यावर विचार करून !! Wink

उपाय एकच. Adapt. उमेश यादवला सध्या आपण विसरलो आहोत. पण तो सा अ साठी फिट असणार आहे. आणि जर त्याने त्याच्या पेस आणि विवधते मध्ये शॉर्ट बॉल वर सराव केला तर एक डेंजर बॉलर नक्कीच तयार होईल. सोबत इशांत शर्मा असेल पण भूवनेश्वर कुमारचे काही खरे दिसत नाही. (टेस्ट साठी वनडेत तो जबरी बॉलर आहे.) केवळ एका इनिंग मध्ये ( आठापैकी) त्याने नीट टाकली त्यामुळे हि इज डाऊटफुल.

वरून अ‍ॅरॉन प्रभृती लोकं कुठे गेले आहेत कुणास ठावूक. जर तो फॉर्म मध्ये आला तर त्याला संधी (स्पेशली बाउंसीवर) दिली तर मजा येईल.

प्रश्न उरतो तो अश्विन, जडेजा आणि ओझा / भज्जीचा. त्या पिचेस वर हातभर टर्न मिळणार नाही हे गृहित आहे. शिवाय बाउंस अनईव्हन नसणार. त्यामुळे आपले स्पिनर्सच तिथे चाचपडणार.

सद्य परिस्थितीवरून असे दिसते की बाहेर आपले बॅट्समन तर चालतील, पण आपण २० विकेट काढू का?

Pages