निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, माझ्यातर्फेही उशिराने तुला वादिहाशु Happy Sad (उशिराबद्दल)

नागाच्या फण्यांप्रमाणे केसर असलेली फुलं कसली असतात. आमच्या ऑफिसात ते वृक्ष फुललेत.

काड्या डाल डाल के ही सुंदर डालं (घरटं) बनता हय ना? इसिलिये काड्या काड्या डाल रहे हय | दाल एकदम गोरी हय | बिलकूल काली नही हय |
|| इति डालपुराण ||

साधना, जिप्सि - माधव आणि दिनेशदांच्या रुपात प्रत्यक्ष नारदमुनी अवतरले आहेत निसर्गात. Lol

जिप्स्या तु आता नारदमुनिंना प्रसन्न करण्यासाठी तुझ्या जलखुणा असलेली गुलाबे माधव आणि दिनेशदांना दे. म्हणजे ते तुझ्या बाजुने बोलतील.

बादवे मी माझ्या घरासमोर जो मुरुम आहे तिथे भाजी लावलेय तिथे हे शिराळे आले आहे. मुरुमामुळे वाढ व्यवस्थित झालेली नाही.

नागाच्या फण्यांप्रमाणे केसर असलेली फुलं कसली असतात.

काय पण क्लु देतात लोक्स......... जगातली अर्धी फुले यात बसतील बहुतेक..

जागु अगं कांचन तर आपल्याकडे मार्च-एप्रिल-मे मध्ये फुलतो. आता नमुतलीसगळी झाडे नुसती पाने घेऊन उभी आहेत. फुले आली शेंगा लागल्या आणि आता नुसती पाने उरलीत...

आता उरणमध्ये फुलत असेलही.. काही सांगता येत नहई. तिकडे बिबटे काय येतात, काल म्हणे एकाच दिवशी दोन अजगर मिळाले.... जिथे जागुमै राहते तिथे निसर्ग बहरलेलाच असतो वाटते कायम...

शिराळे छान दिसतेय.

जिप्स्या. काड्या जमवुन घरटे बांधायला घे.. जिप्सिपणा खुप झाला Happy

डालपुराण >>>>>:हहगलो:

माधव आणि दिनेशदांच्या रुपात प्रत्यक्ष नारदमुनी अवतरले आहेत निसर्गात>>>:फिदी:

जगातली अर्धी फुले यात बसतील बहुतेक..
>>> Sad अजून एक क्ल्यू. याची फुले पसरट बुटकी मोठ्या गुलबट पांढर्‍या पाकळ्यांची आहेत Uhoh

जिप्स्या. काड्या जमवुन घरटे बांधायला घे >> ये बडे पते की बात हय Happy इतक्या सगळ्या लाल गुलाबामधून एक तरी सत्कम्री लाव रे जिप्स्या.
जागू तुझ्या हल्लीच्या पा़.कृ.वर बंदी घालण्याकरता अ‍ॅडमीनना विनंती करायचा विचार करतोय. आधी माशांच्या पा़.कृ. टाकायचीस तेंव्हा अगदी निर्विकारपणे वाचता यायच्या. पण आता तुझ्या वेज रेसीपी बघितल्यावर मात्र पोटात कावळ्यांची घरटी वाढायला लागली आहेत. त्यातल्याच काड्या टाकल्या इथे Happy

निसर्गप्रेमी मंडळी,
नमस्कार !
Happy
दिनेशदा,साधना,जिप्सी,जागु,माधव सगळ्यांना मनापासुन धन्यवाद !
तुमच्या सारखे निसर्ग प्रेमी मला भेटले,इतकी माहिती मिळाली हे मी माझ भाग्य समजतो.
Happy

दिनेशदा,
फोटो खुप आवडले
जिप्सी,
गुलाबा छान आहे (तुम्ही मला अधिक चांगल फुल पाठवलं, त्यात माझा काही दोष आहे का ?
:हाहा:)

या पानावर नाही आलो तर खुप मिसल्यासारख वाटतं, माझ हे माबोवरच सगळ्यात आवडतं पान आहे, इथेच जास्त भेटी/वेळ दिला आहे
लहानपणी (३री-४थीत असताना) सुट्टीत मी बहुतेक वेळा आजोळी घरासमोर (मोठ्या) अंगणात झाडे लावणं, लहान सर्‍या करुन ऊस लावणे, ज्वारी लावणे,मिरचीचं रोप लावणे,काडेपेटीपासुन ट्रैक्टर करुन खत घालणे असेच खेळ करायचो,पावसाळयात तर सगळं छान उगऊन आलेल असायचं...
पण त्यावेळी अनेकांकडुन मोठ्ठ होऊन हे असलं काही (दुय्यम) काम करु नकोस,असच बिंबवल गेलं.पण ते किती चुकीच आहे हे आता कळतयं.

साधना, भारताबाहेर ऋतू असे काही नसतातच. लाँग रेन, शॉर्ट रेन, लिटील ड्राय सिझन... असे ऋतू !!
सध्या आमच्याकडे भरपूर थंडी (१० ते १२ अंश से.) भरपूर पाऊस, अधून मधून उन आणि सकाळी धुकं..
असं हवामान आहे. कधी कुठले झाड बहरेल ते सांगता येत नाही.

अनिल, जगभराचे शेतकरी असेच असतात. मिलिंद बोकिलांचे, समुद्रापारचे समाज कधी मिळाले तर अवश्य वाच.

जागू, शिराळ्याचा उपयोग ऋषिपंचमीच्या भाजीत करणार ना ?

आणि मामी कुठे गेली ती ? तिला म्हणे जिप्स्या साधा, सरळ मुलगा वाटला होता !!!

शिराळा म्हणजेच "दोडका" ना?

तिला म्हणे जिप्स्या साधा, सरळ मुलगा वाटला होता !!!>>>>>>आहेच्च मुळ्ळी मी, साधा सरळ मुलगा Wink

जिप्सि उरण गटग वरुन परतताना बहुतेक तु दिनेशदांना आईस्क्रिम द्यायच विसरलास. मला तर साफ डावलुनच खाल्लत. पण मी राग काढतेय का बघ तुझ्यावर ? Lol (विसरले नाही अजुन)

दिनेशदा हो आठवतात तेवढी नावे सांगते ऋषिपंचमीच्या भाजीत घाल्यण्याच्या भाज्यांची. तशी २१ स्वकष्टाने लावलेल्या भाज्या टाकण्याची प्रथा आहे. -
१) भेंडा २) शिराळे ३) घोसाळ (दोडका) ४) माठ ५) कवळा ६) सातपुती ७) काकडी ८) सुरणाचे देठ ९) भाजा (माठाचे जाडे देठ) १०) मिरची ११) शेवग्याचा पाला १२) अळू (टेरी) १३) तांबडा भोपळा एवढी आत्ता आठवताहेत.
मी त्यात मकाही घालते. मस्त लागतो ह्या भाजीतला मका.

अनिल धन्यवाद कसले त्यात तुम्हीही शेअर करताच की.

माधव जागू तुझ्या हल्लीच्या पा़.कृ.वर बंदी घालण्याकरता अ‍ॅडमीनना विनंती करायचा विचार करतोय.
Lol असे केलेत तर तुम्हाला मेलच करत जाईन सगळ्या रेसिपीज.

आईसक्रीम दिलं हो त्याने मला. पण कोनात नाही दिलं, ते मामीला दिलं, आणि वर जादा रिकामा कोन पण तिलाच दिला !!

आमच्याकडे पडवळ, भुईमूगाच्या शेंगा, श्रावणघेवड्याच्या शेंगा, अरवी, कोवळा नारळ पण घालतात.

<<<स्वतःच्या स्वार्थासाठी शक्य तितका नीचपणा करणारा माणसाव्यतिरीक्त दुसरा प्राणी क्वचितच सापडेल. आणि नीचपणा करताना माणसाने स्वतःच्या स्त्रीलाही सोडले नाहीय. तिथेही त्याला हवा तोच जीव तिने जन्माला घालावा यासाठी तो तिच्या जीवाशीही खेळतो. धन्य ह्या माणुस नावाच्या भयानक प्राण्याची. जंगलात राहणे जास्त सुरक्षित वाटते मला कधीकधी.>>>साधने अगदी खरं आहे ग. फार फार राग येतो अशा माणसांचा.
तुला वाटेल जवळ जवळ महिन्याने प्रतिसाद देतेय. पण कामात होते. आज इथल सगळ वाचायच ठरवलय. Happy

जागू, माश्यांच्या प्रकारात वाघळ राहिला ना ? तूम्ही खात नाही का तो ?
त्या माशाला इथे उडणारा मासा म्हणतात (फ्लाइंग फिश).
खरे तर तो पाण्याबाहेर उडत नाही, पण आणखी एक प्रकारचे मासे चक्क पाण्याबाहेर (२ मीटर्सपर्यंत) उडतात . (त्याचा उल्लेख मी केला होता इथेच.)

दिनेशदा पडवळ आणि नारळ आम्ही पण घालतो. चिंचही घालतो. आता संख्या १६ झाली. अरवी म्हणजे काय ?

वाघळ कशाला म्हणतात हे माहीत नाही मला. आणि माझे मासे संपले असा गैरसमज कोणी करुन घेउ नका Lol श्रावणात काही जणांना बघणे नकोसे होते म्हणून मी थांबले आहे. श्रावण संपला की चालू करते परते मासे.

पण त्यावेळी अनेकांकडुन मोठ्ठ होऊन हे असलं काही (दुय्यम) काम करु नकोस,असच बिंबवल गेलं.पण ते किती चुकीच आहे हे आता कळतयं.

त्यांचही काही चुकतं असं नाहीय. आपल्याकडे प्रत्येक कामाची किंमत पैशात मोजायची पद्धत आहे आणि सोबत माणसाची किंमतही त्याच्या खिशातल्या पैशांवरुन.

आपल्याला एखादे काम खुप आवडते म्हणुन, आपण एखादे काम इतरांपेक्षा चांगले करु शकतो म्हणुन पुढे त्याच कामात आयुष्य काढायचे आणि त्या कामात जे काही पैसे मिळतील त्यावर उदरनिर्वाह करायचा ही विचारसरणी इथे अजिबात नाहीय.

मोठे होऊन काम करायचे ते पैसे मिळवायला हेच आपण बालपणापासुन घोकत राहतो. कधीच कुठल्याही मुलाला मोठे होऊन काम करायचे ते त्या कामात खुप आनंद मिळतो म्हणुन हा विचार करायचे स्वातंत्र्य आपण देत नाही.

ऋषीपंचमीच्या भाजीवरुन आठवले. दुरदर्शनवरचा चिमणराव ऋषीपंचमीची भाजी बाजारातुन घेऊन आल्यावर काऊची मैत्रिण गुलाब 'ऋषीपंचमीच्या उपवासाला बैलांच्या कष्टाचे काहीही चालत नाही हो....' म्हणुन त्याला टोमणे हाणते. Happy

वाघळ कशाला म्हणतात हे माहीत नाही मला
अगं तो काळा असतो ना एकदम चप्पट पसरट मासा, त्याला लांब शेपुट असते उंदरासारखी. त्याला वाघळ म्हणतात बहुतेक

अरवी_म्हणजे_अळूचे_कंद.
तूम्ही_काय्_म्हणता+त्याला_?_मुंडल_?

आणि_साधना_म्हणतेय्_तोच्_मासा_तो-स्टींग्_रे
ऑस्ट्रेलियातल्या_स्टिव्ह_चा_जीव_घेणारा_!!

जागु हा बघ तो मासा.

stingray.gif

ह्याच्यात लोक काय खातात हा प्रश्न मला पडतो. त्याचे ते पंखासारखे भाग खुपच पातळ असतात.

दिनेश, आम्ही मुंडल्या म्हणतो.. कोल्हापुर्-आंबोली-वाडीत बहुतेक हाच शब्द आहे Happy

दिनेश, आम्ही मुंडल्या म्हणतो.. कोल्हापुर्-आंबोली-वाडीत बहुतेक हाच शब्द आहे >>>>कोण आम्हाला हाक मारतय? Lol
हो. हो. आम्ही पण मुंडल्याच म्हणतो.

गोव्याला पण मुंडल्याच म्हणतात.
साधना, मला पण या माश्याबद्दल उत्सुकता आहे. लहानपणी बाजारात तो बघितलाय. मस्कतला समुद्रातही बघितलाय, पण तो खाणारा कुणी भेटला नाही अजून.

त्याच्या शेपटीचे टोक फार घातक आणि जहरी असते, म्हणून तो पकडल्याबरोबर ते कापून टाकतात, असेही ऐकले होते. याचे आणखीही काही प्रकार बघितलेत मी.

हा मासा काय ? आम्ही ह्याला पाकट म्हणतो. पण अजुन मी खाल्लेला नाही. बघु सगळे मासे संपले की ह्याचीही चव घेईन.

साधना,
तुम्ही शेतीविषयक लिहिलेलं वाचुन खुप आधार/पाठींबा मिळाल्यासारख वाटतं..
मुलगा बर्‍यापैकी शिकला कि नोकरीच केली पाहिजे असा अट्टाहास असतो किंवा शेती केली कि लोक काय म्हणतील अशी विचारसरणी अजुनही आहे,आता मुळात शेतीची अगदी मनापासुन आवड असताना बळजबरीने नोकरी करणारे किती यश मिळवतात हा प्रश्नच आहे ना !

दिनेशदा,
तुम्ही दिलेलं पुस्तक मिळालं कि वाचण्याच ठरवलं आहे.

जागु,
हम जैसे सिर्फ पढनेवालोंसे यहाँ लिखणेवाले, फोटो देणेवाले हमेशा महान होते है !

Happy

मानुषी अशीच बदके मला न्यू झीलंडच्या तळ्यातपण दिसली होती.
चितमपल्लींच्या लेखनात अशा अनेक बदकांचे वर्णन असते, त्यांनी
मराठी नावे पण दिलेली असतात. पण चित्र नसल्याने विरस होतो.

Pages