- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
वाचू आनंदे
सदस्य प्रवेश |
पुस्तक शोधामी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते. |
|
The Deserter असणार. अनुवाद विजय देवधर.
असामी, खुप खुप धन्यवाद. गुगल केल्यावर ही माहीती मिळाली -
Based on English true story 'I Deserted Romel' by German soldier Gunther Bahnhaman who fled away from German Army and crossed 3000 miles through African continent when British and German armies, both running after to kill him.
होय. हे डेझर्टरच.. गुंथर बान्हमानचे.. त्याच्या शेवटी , गुंथर इंग्रजांची टॉमी गन बघुन खुश होतो.. रोमेल आणि मॉंटेग्युमेरीच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे ह्या पुस्तकाला...
येस, अतिशय मस्त पुस्तक हे! अनुवाद सुन्दर जमलाय! मी वाचलय हे पुस्तक!

...;
आपला, लिम्बुटिम्बु
गुंथर इंग्रजांची टॉमी गन बघुन खुश होतो >>> गन बघुन की भाषा ऐकुन ? तो झोपेत असताना त्याच्या कानावर इंग्रजांचे बोलणे पडते असा शेवट आहे ना ? ह्म्म्म्म्...आणुन वाचले पाहिजे परत एकदा
शेवट बहुतेक असा आहे.. तो झोपलेला असतो आणि दोन इंग्रज सैनिक त्याला बंदुकीने ढोसतात.. आणि पहिली गोष्ट त्याच्या डोक्यात येते ती म्हणजे टॉमी गन.. मला पण नक्की आठवत नाहिये.. १०-१२ वर्ष झाली वाचुन.. शाळेत असताना वाचले होते..
मी मागवले आहे भारतातुन्...वाचुन झाले की सांगते नक्की शेवट
इथेच वाचून मी आणले आहे ग्रंथालयातून. सध्या वाचत आहे. झाले की शेवट सांगेन.. पकड घेतली आहे पुस्तकाने. धन्स सिंडरेला

------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
शेवट बहुतेक असा आहे.. तो झोपलेला असतो आणि दोन इंग्रज सैनिक त्याला बंदुकीने ढोसतात.>> हो हाच शेवट आहे.
हो, शेवट हाच आहे पण प्रश्न असा आहे, आधी त्याला इंग्रजी कानावर पडते कि आधी टॉमी गन दिसते ?
.
पुनम, झाले की नाही पुर्ण ?
आधी त्याला इंग्रजी कानावर पडते कि आधी टॉमी गन दिसते ?>>काय फरक पडतो त्याने ग ?
फरक नाही पडत. फक्त शेवट नक्की काय झाला अस प्रांजळ वाद सुरु आहे इथे
डेझर्टर सारखेच Papillon पण सुन्दर पुस्तक आहे. ते कुणी वाचले आहे का?
Papillon पण सुन्दर पुस्तक आहे. ते कुणी वाचले आहे का >>>> लई वेळा. आधी मराठी अनुवाद वाचला नंतर मुळ पुस्तक वाचले. दोन्ही आवडले.
बरं, त्याला टॉमी गननी ढोसून उठवतात, त्यामुळे आधी टॉमीगन दिसते, मग एक 'अगम्य' भाषा कानावर येते- इंग्रजी
पुढे आठ वर्ष तो युद्धकैदी म्हणून ब्रिटिश तुरुंगात राहिला, इंग्रजी शिकला आणि हे पुस्तक इंग्रजीतूनच लिहिले अशी त.टी आहे..
------------------------------

झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
विदुषक आणि सेरिपी एस्किलार एली ह्या कथा कुठल्या कथासंग्रहात आहेत?
जी. ऐ. कुलकर्णींची विदुषक म्हणतो आहेस का बेडेकर? ती काजळमाया मधे पान क्रमांक २४२ वर आहे. सर्वात शेवटची कथा. दुसर्या कथेचे नाव मी कधीच ऐकले नाही. नावावरून ईंग्रजी कथा वाटते आहे.
सेरिपी एस्किलार (इस्किलार) एली हे शब्द "इस्किलार" ह्या कथेमधे येतात जी "रमलखुणा" ह्या संग्रहामधे आहे.
बी, असामी.. दोघांनाही धन्यवाद..
लई वेळा. आधी मराठी अनुवाद वाचला नंतर मुळ पुस्तक वाचले. दोन्ही आवडले. >>> मला तर मराठी अनुवादच अधिक आवडला.....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
"मुक्ता मामी" ही कथा कुठल्या पुस्तकात आहे ? त्याच पुस्तकात एक गुढकथा पण आहे ज्यात खलनायकाचा भयंकर दरीत कोसळुन अपघाती मृत्यु होतो.
पॅपिलॉनचा पुढचा भाग म्हणजे बँको.. हे अगदीच सुमार पुस्तक आहे..
ही दोन्ही मूळात फ्रेंच मधे लिहिली गेलीत असं आठवतंय. बरोबर का? सिनेमामुळे पॅपिलॉन जास्त लोकप्रिय झालं.
'पॅपिलॉन'चा इंग्रजी तसंच मराठी अनुवाद कोणी केला आहे? समजले तर ग्रंथालयात विचारता येईल..
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
पूनम,
'पॅपिलॉन'चा इंग्रजी अनुवाद Patrick O'Brian ह्यांनी केला आहे.
'पॅपिलॉन'चा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर ह्यांनी केला आहे.
बर एक सांग, तू अक्षरांच्या डोक्यावर अर्धा चंद्र कसा काढतेस?
धन्स बी.
अर्धचंद्र E वापरून द्यायचा pEpilOn= पॅपिलॉन
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
प्यापिलोन आणि त्या पुढचं ब्यांको, दोन्ही छान आहेत. त्या वरचा चित्रपट तेवढा आवडला नाही.
मायबोलीच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे अधिकाधिक मराठी मंडळींना मराठीत बोलत करणं. चला, कामाला लागुया!
कुणी सांगेल का जी. ऐ. कुलकर्णी यांची 'काना' की 'कान्हा' ही कथा त्यांच्या कुठल्या पुस्तकात आहे? धन्यवाद.
अरे किती वेगवेगळ्या बीबीवर हा प्रश्ण पोस्टला आहेस!!! आता जीए स्वर्गातून खाली उतरुन तुला तो कथासंग्रहच देतील..
अरे टण्या, खूप तातडीने ती माहिती हवी आहे म्हणून विचारलं आहे. इथे सिंगापूरमधे गणेशोत्सवात आम्ही वाचनाचा एक कार्यक्रम करतो आहे. एकाला जी. ऐ. कुलकर्णी यांची हीच कथा वाचायची आहे. मग ते पुस्तकं मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. पण त्याला त्या पुस्तकाच नाव आठवतं नाही. मी जी. ऐ. फार वाचले नाही. चार बीबींवर एकच प्रश्न लिहून देखील ही माहिती मिळू शकेल की नाही असे तुझ्या उत्तरावरून आता वाटते आहे
माझ्या कडच्या पुस्तकांमधे नाहीये ही गोष्ट - निळा सावळा, सांजशकुन, ओंजळधारा, हिरवे रावे, रक्तचंदन ही पुस्तकं पाहिली मी आताच.
माफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा.
इ-सकाळमधे पुस्तक परीक्षण यायचे. आता येत नाही का ?
बरेच दिवस अरुणा ढेरेंचं 'मैत्रेयी' शोधतेय.. विकत घ्यायचय. कुठेही सापडत नाहीये. मुंबई आणि पुणे दोन्हीकडे पाहिलं. जवळ जवळ चार महिने झाले. परवा मॅजेस्टिक वाल्यांनी सांगितल की पुस्तक out of print आहे.
कुणी मदत करु शकेल का?
--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault...
--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault...
ज्ञानेश्वरीचा (भावार्थदिपीका) उत्तम इंग्रजी अनुवाद कुणाला माहिती आहे का? माझ्या ओळखीचा एक गृहस्थ नुकताच पुल्लेला गोपीचंदला भेटला तेव्हा गोपीचंदने त्याला सांगितले की तो सध्या ज्ञानेश्वरीचा एक अनुवाद वाचतो आहे पण तो इतकासा चांगला नाही (word by word translation).. त्याला अधिक चांगला अनुवाद पाहिजे..