मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतेच स्टीव्ह मार्टिनी यांच जयवंत चुनेकर यानीं मराठीत भाषांतर केलेल 'द सिमीऑन चेंबर' वाचले. फ्रान्सिस ड्रेक या १५व्या शतकातील सागरी लुटारूने लिहलेल्या चर्मपत्रांबद्दल आणि त्याद्वारे दडवलेल्या खजिन्याच्या शोधाबद्दल हि कथा आहे. पुस्तकाच्या सुरवातीला कथा निट आहे पण उत्तरार्ध भाषांतरीत करताना ट्रान्सलेटरने आळशीपणा केल्याचे जाणवलं.

विश्वास पाटलांचे 'नॉट गॉन विथ द विंड" हे पुस्तक वाचले. कादंबरी किंवा नाटकांवरुन निर्माण झालेल्या चित्रपटांविषयी लिहिताना मुळ नाटक्/कादंबरी आणि लेखक यांचीही माहिती या पुस्तकात येते. मला तरी आवडले पुस्तक.

पुस्तक प्रदर्शनः इन्स्टीट्युशन ऑफ इन्जिनियर्स, इंजिनियरींग कॉलेज ग्राउंडशेजारी, शिवाजीनगर, पुणे.
भरपुर इंग्रजी पुस्तकं आहेत. रु.५० ते रु.१०० पर्यंत खच पडलाय पुस्तकांचा. पी जी वुडहाऊस,पॉलो कोएल्हो... इ.ची पुस्तके तसेच लहान मुलांसाठी, डिक्शनरीज इ. आहेत.
मी कालच जाउन आले. एडमंड हिलरी चं View from the Summit (अनुवादीत) 'शिखरावरुन... ' आणलय.:)

प्रदर्शन २८ ऑक्टो. पर्यंतच आहे.

आर्या सहीच...मी पण जातो उद्या...पण कदाचित नाही मिळाले हे पुस्तक तर मला देशील का वाचायला....(परत करणार याची शंभर टक्के हमी)

आत्ता एस हुसैन झैदीचे ब्लॅक फ्रायडे वाचले...(ज्याच्यावर याच नावाचा चित्रपट आला)..चित्रपट पाहिल्यामुळे पुस्तक वाचताना त्याची जास्त अनुभुती घेता आली...अतिशय अप्रतिम आणि मस्ट रीड पुस्तक....

त्याआधी व्लादिस्लाव स्पीलमनचे पियानीस्ट, सुनाद रघुरामनचे विरप्पन अनटोल्ड स्टोरी आणि मायकेल क्रायटनचे मायक्रो वाचले...
मायक्रोकडून खूप अपेक्षा होती आणि माझ्या दोन आवडत्या लेखकांनी मिळून लिहीलेले हे एकमेव पुस्तक...पण अगदी सपशेल निराशा...

<<मी पण जातो उद्या...पण कदाचित नाही मिळाले हे पुस्तक तर मला देशील का वाचायला....(परत करणार याची शंभर टक्के हमी)<<
येस्स्.. नक्की देइन रे चँपा! Happy

मी नुकतेच खानोलकरांचे 'रात्र काळी घागर काळी' वाचले. कोकणाची पार्श्वभूमीवर घडणार्‍या एका स्त्रीची कथा, जुने-गूढ वाटावे असे कोकण, स्वभाव वैविध्य असणारी माणसे, एकाच व्यक्तीची विविध रुपे यांचा समावेश असलेली ही कादंबरी मला तरी कोड्यात टाकतीय. अनेक प्रसंगात लिखाण जबरदस्त वाटले, निर्जिव पात्रांना सजीवत्व देऊन त्यांच्यातील संवाद मस्त वाटले. नात्यांची गुंतागुंत पण अफाट. थोडसं गुंगवून टाकून विचार करायला लावणारी.

>>विश्वास पाटलांचे 'नॉट गॉन विथ द विंड" हे पुस्तक वाचले. कादंबरी किंवा नाटकांवरुन निर्माण झालेल्या चित्रपटांविषयी लिहिताना मुळ नाटक्/कादंबरी आणि लेखक यांचीही माहिती या पुस्तकात येते. मला तरी आवडले पुस्तक.<<
मलाही आवडले हे पुस्तक. Happy

तसेच सध्या मिलेनिअम सिरिज मधील 'गर्ल व्हू किकड् हॉर्नेस्ट्स नेस्ट' वाचतोय. पहिले दोन भाग व तिन्ही चित्रपट पाहून झालेत, पुस्तकाचा परिघ अर्थातच फार मोठा आहे आणि मस्त मजा येतेय वाचताना. Happy

'वेदातील विज्ञान' कसे आहे? मला कुठे मिळत नाहिये.

ट्रेकची दर्‍या खोर्‍यातल्या भटकंतीची आवड असलेल्या तनाने+/मनाने भटके असलेल्यांसाठी "भुयार" हे बाळ बेंडखळे लिखीत पुस्तक म्हणजे एक पर्वणी आहे.

बाळ बेंडखळे हे जे जे स्कूलचे विद्यार्थी. ह्या पुस्तकात त्यांनी स्वत: रेखाचित्र काढली आहेत.

त्यांचा उस्ताह, त्यांचा "भुयारं" शोध हा आगळा वेगळा छंद, त्यात आलेले काही गमतीशीर काही काळजात धस्स करणारे अनुभव, त्यांना इतर समछंदिष्टांची लाभलेली साथ ह्या सगळ्याच्या नोंदी म्हणजे हे पुस्तक होय

आपल्या सारखे छंदिष्ट शोधताना ते एका गुहेत एका चिटोर्‍यावर आपला नाव पत्ता लिहून आणि बहुतेक काही नाणी का दहाची नोट असं काहीतरी ठेवतात व ती मिळणार्‍याला ह्या पत्त्यावर येऊन बक्षिस म्हणून अमूक एक रक्कम घेऊन जा असा निरोपही त्यात लिहीतात

हे सगळं असलं तरी त्या पुस्तकाला चांगला "कल्हईवाला" हवा होता असं मात्र वाटत रहातं.

लिखाणात प्रामाणिक पणा असला तरी कल्हईवाल्या कोणाचा हात त्यावरुन फिरता तर अजून छान मांडणी बद्ध असं पुस्तक वाचायला मिळालं असतं असं वाटत रहातं

तरीही ट्रेकर्ससाठी किंवा अशा काही छंदाची आवड जोपासणार्‍यांसाठी हे पुस्तक म्हणजे ट्रेकच्या वाटेतले खुणेचे दगड आहे.

कधी जमलं तर मुखप्रुष्ठ स्कॅन करुन इथे टाकेन

अवांतर: ह्या भटक्या काकांच्या घरी शिवाजी कालीन तलवार, खंजीर, वाघनख बघून आ वासल्याचं आठवतय पक्क. त्यामागच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकायला वेळ काढून या असं प्रेमळ आमंत्रणही आहेच जोडीला. बघू कधी योग येतो ते.

माधवी देसाई चें "नाच ग घुमा " छान आहे.>>> हो पण तो सारखा येणारा फ्लॅशबॅक नकोसा वाटतो. पुस्तक कस सरळ रेषेत कालानूक्रमे चालत गेला पाहिजे. तरी सुद्धा प्रत्येक वेळी दिलेला "नाच ग घुमा" चा पंच मात्र अप्रतिम आहे.

कुणी "दा व्हिन्सी कोड" (डॉन ब्राउनचा) वाचलाय का? त्या पुस्तका बद्दल बरच ऐकलै.

>>"द व्हिन्सी कोड" - सिनेमापेक्षा पुस्तक चांगले आहे.

>>"द व्हिन्सी कोड" - सिनेमापेक्षा पुस्तक चांगले आहे.>>> मलातर दोन्हीही आवडले, पुस्तकातले बारकावे चित्रपटात कधीच येवू शकणार नाहीत.

एडमंड हिलरी चं View from the Summit (अनुवादीत) 'शिखरावरुन...
कुणीही घेऊ नका...अनुवाद अतिशय वाईट पद्धतीने करण्यात आला आहे....श्रीकांत लागू ही व्यक्ती नक्कीच ट्रेकर नाही त्यामुळे बरेचशे माऊंटनिअरींगशी संबधीत तांत्रिक शब्द चुकवले आहेतच शिवाय जागोजागी मराठीचा खून पाडला आहे...
सगाईची अंगठी, बर्फुला यारखे भीषण शब्द वापरले आहेत...अजून निम्मे पुस्तकदेखील वाचून झाले नाही तरी पुढे वाचण्याची इच्छा मेली आहे...:(
मूळ पुस्तक घेण्याऐवजी अनुवादित घेण्याचा परिणाम...:(
मला लेखक महाशयांना एक खरमरीत पत्र पाठवायचे आहे...त्यांचा पत्ता मला कसा बरे मिळवता येईल...???

Song of Ice & Fire ची पाचही उपलब्ध पुस्तकं वाचुन संपवली.. प्रचंड आवडली.

जॉर्ज मार्टिनने एक वेगळे जग, त्यातल्या विविध संस्कॄती,सत्ता संघर्ष, त्यांच्या वॅल्युज, अतिशय मस्त मांडल्या आहेत. प्रचंड मोठा कॅनव्हास, खूप जास्त पात्रं (डान्स ऑफ ड्रॅगन्स मध्ये शेवटचा पात्र परिचय ७-८ पाने इतका मोठा आहे.), त्यांच्यातले संबंध, मानवी नातेसंबंध , भावना परिणामकारकपणे चित्रीत केल्यात.

अर्थात फार जास्त पात्रं/ उपकथानकं असल्याने दोन पुस्तके सलग वाचली नसल्यास लिंक लागायला जरा त्रास होतो आणि मध्ये मध्ये जरा रटाळ वा पाल्हाळिक वाटते.

मला पहिलं पुस्तक "गेम ऑफ थ्रॉन्स " सगळ्यात जास्त आवडले. त्यावर HBOने सीरीयलही प्रसारित केली होती. डीटेल्ससाठी हे http://en.wikipedia.org/wiki/A_Song_of_Ice_and_Fire#TV_series बघा.

चित्रा बॅनर्जी लिखीत 'पॅलेस ऑफ इल्युजन' वाचले. महाभारताची कथा द्रौपदीच्या दृष्टीकोनातून लिहिली आहे. फेमिनिस्ट महाभारतही म्हणता येईल! सहज, प्रवाही भाषा आहे आणि मुळातच महाभारताची कथाच इतकी प्रभावी आहे की ती वाचली जातेच.
वाचताना असेही वाटले की गीतेचा थोडातरी अर्थ जाणवायचा असेल तर आधी अर्जुनाच्या प्रश्नाची व्याप्ती, वेदना समजायला हवी आणि ती कळायची असेल तर महाभारताची अटळ शोकांतिका मनाला भिडायला हवी. त्यासाठी महाभारत पुनःपुन्हा वेगवेगळ्या अँगलने वाचायला पाहिजे.

कविता, छान ओळख करून दिली आहेस पुस्तकाची. Happy

आशुचँप,
अनुवादाबद्दल वाचून वाईट वाटलं. आजकाल इतकी हेळसांड का केली जाते या बाबतीत - हेच कळत नाही. Sad
प्रकाशकांना पत्र पाठवून बघा. 'अनुवादकाशी संपर्क साधायचा आहे.' इतकंच सांगून बघा. पत्ता / ई-मेल काहीतरी नक्की देतील ते.

आगावा Happy

लालशाह, 'दा विन्सी कोड' जरूर वाचा. ख्रिश्चन धर्म, युरोपची संस्कृती , चित्रांची वर्णने वाचायला आवडत असेल तर नक्की वाचा. मला आवडलेले एक पुस्तक आहे ते.

अनुवादाबद्दल वाचून वाईट वाटले.
असाच अनुभव 'माय फ्युडल लॉर्ड' च्या भाषांतराबद्दल आला होता.

बी, 'दा विन्सी कोड' इंग्रजीतूनच वाचायचे पुस्तक आहे, त्यातले शब्दप्रयोग, अफाट माहिती आणि एकंदरीतच कथा 'लॉस्ट इन ट्रान्सलेशन' होण्याची प्रचंड शक्यता आहे.

आगाऊशी, प्रचंड सहमत !
माझ्याकडे दोन्ही भाषातून आहेत. (आता अनुवादितावर पैसे खर्च केल्याचा पश्चाताप होतोय)
'एंजल्स अँड डेमन्स' च्या बाबतीतही हेच. पण 'दा विन्सी...' ची मजा 'एंजल्स...' मध्ये अजिबात येत नाही. Happy

सद्ध्या मारुती चितमपल्लींचं 'रानवाटा' वाचतोय. छोटंसंच पण खासच आहे.
कुणाकडे 'चकवाचांदणःएक वनोपनिषद' आहे का मारुतीरावांचं? सद्ध्या आउट ऑफ प्रिंट आहे. Sad

लायब्ररीत बघ मिळतय का. मी लायब्ररीतूनच आणून वाचलं होतं.. भला मोठा ठोकळा आहे..
जंगलातले अनुभव सुरेख लिहिलेत.. प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो.. मधे मधे काही ठिकाणी जरा संथ आणि रटाळ वाटतं पण..

जरा इंडीयन ऑथर सोडुन इंग्लीश ऑथर्सची पुस्तकं वाचावी म्हणुन ऑफीस लायब्ररीतुन 'दा विन्सी कोड' आणि Alistair MacLean चं 'Bear Island' आणलं.
बाप्रे...ती Bear Island ची भाषा आणि ३-४ लाईनभरुन एकेक सेंटेन्स! इतके नविन नविन शब्द, डिक्शनरीत सुद्धा कधी न वाचलेले. पहिल्या २ पानातच ढेपाळले.. आणी यामुळे दा विन्सी कोड ला हात लावाय्ची वाचायची हिम्मत नाही झाली. Sad

मला आवडल फार फार आवडल 'चकवाचांदण'. खरे तर मारुती चितमपल्लींची सगळीचं पुस्तके सरस असतात. इतक्यात त्यांच नवीन काही वाचल नाही मी.

Pages