मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनंत चतुर्दशीमुळे जोडून आलेल्या सुट्टीचा फायदा घेतला. परत एकदा रारंग ढांगतून चक्कर मारली.

रारंग ढांग जबर्दस्त पुस्तक आहे. मला विशेषकरुन विश्वनाथच्या वडिलांनी त्याला लिहिलेली पत्र फार आवडतात. Happy

का हो बाजो? (हा खडूस प्रश्न नाही खरच विचारतेय) मी त्यांचे बाकी काही वाचले नाही पण हे पुस्तकतरी interesting वाटतेय.

जाऊ द्या नताशा, प्रदीप दलवींचे हे पुस्तक ज्यामुळे निर्माण झाले ते मूळ लेखनच दुर्दैवी आहे.त्यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही . पुन्हा तेच विषय या बीबीवरही सुरू व्हायचे. काही मंडळी पोजिशन घेऊनच बसलेली असतात त्यासाठी....

बाळू जोशी, मधे एका दिवाळी अंकात वाचले होते. सुमेध यांचे खरे आडनाव रिसबूड आहे. आत्ता सगळे डिटेल्स आठवत नाहीत पण त्या लेखात त्यांनी लिहीले होते की ते काही काळ ज्या ग्रुहस्थांकडे रहण्यासाठी होते त्यांचा वडे बनवण्याचा व्यवसाय होता. त्यांना सुमेध मदत करीत होते. पुढे त्याच ठिकाणी त्यांच्या लेखनाला उत्तेजन मिळाले वगैरे अशा प्रकारचे काही संदर्भ आहेत. त्यातूनच घडलेल्या काही घटनांमुळे त्यांनी आपले नाव सुमेध वडावाला (रिसबूड) असे लावण्यास सुरवात केली.
मलाही नेहमी उत्सुकता वाटायची ह्या नावाविषयी. अचानक हाती आलेल्या लेखामुळे त्याचे कारण कळले.

मी नुकतच 'लाइफ ऑफ पाय' वाचायला सुरुवात केली आहे पण म्हणावं तितकं ग्रिपिंग वाटत नाहीये. कोणी वाचलं आहे का? नेटाने पुढे वाचत राहू का?

वरदा माझं पण तेच होतय. 3 toed sloth बद्दल पान्भर वर्णन वाचून मी दडपले. मला तावच्या ताव भरून प्राणी, पक्षी, निसर्गाची वर्णनं झेपत नाहीत Uhoh

मला तावच्या ताव भरून प्राणी, पक्षी, निसर्गाची वर्णनं झेपत नाहीत>> मला झेपतात, पण ती जेराल्ड डरेलच्या पुस्तकातली Wink
सर्व वयोगटातल्यांनी आवर्जून वाचावा असा लेखक.

माझंही वरदासारखेच झाले शूम्पी.. आता काय आवडले नाही हे पण आठवत नाहीये इतके विस्मरणात गेले आहे ते पुस्तक! Happy

खेकसत म्हणणे आय लव यू वाचतोय ...वाचतोय म्हण्यापेक्षा ढकलतोय्.ग्रिप गेत नाही. नेमाडपंथियांनी मळवलेया वाटेवरूनच प्रवास आहे. अधून मधून एखाददुसरे चमकदार वाक्य. आणि बरीचशी निरर्थक वर्णने. ही इष्टाईलही आता लई जुनी झाली...

साजिर्‍याकडून समजावून घेतले पाहिजे. त्याला अशी पुस्तके लई आवडतात आणि कळतातही. (म्हणे !). पण त्यो अता मॉनीटर झाला तो कसला बोलायला. एखादा तु क टाकेल (फार तर) Proud

झेन गार्डन फारच पूर्वी वाचलेले तेव्हा प्रचंड आवडले होते. (पण त्या काळात मायबोलीवर लोकं झेनगार्डनला नावं ठेवायचे Sad ) आता एक्कही कथा आठवत नाहीये. परत वाचले पाहीजे.

शूम्पी - मी लाईफ ऑफ पाय वाचल आहे. पहिल्यांदा घेतला होता तेव्हा थोडा वाचून सोडल. पण दुसर्याण्दा पुर्ण वाचल. पुस्तकातला पहिला भाग जिथे पाय च भारतातल जीवन दाखवल आहे ते कंटाळवानच वाटल मला पण एकदा का समुद्र प्रवास सुरू झाला की पुस्तक खाली ठेवन कठीन! मला वाटत प्रवास सुरू होई पर्यंत जरा धीर धरा, पुढे पुस्तक आवडेल.

कॅज्युअल व्हेकन्सी वाचायला घेतलय. पहिल्या २०-२५ पानातच कंटाळा आला. रोलिंग बाईनी "अ‍ॅडल्ट नॉव्हेल" आहे म्हणून बरेच फ-भ ची बाराखडी वापरलेली आहे.

कॅज्युअल व्हेकन्सी वाचायला घेतलय >> अरे वा नंदिनी, मिळालं पण तुला हे पुस्तक. Happy
मी म्हटलं विकत घेण्याआधी रिव्यु बघावे Happy सांगशिल वाचुन झालं की

सध्या Battle Hymn of the Tiger Mother वाचत आहे. मजेदार व नक्कीच वाचनीय. पूर्ण वाचून झाले की आणखी लिहीतो.

याच लेखिकेचे देशांच्या साम्राज्यांवर एक पुस्तक आहे. ते ही वाचायची उत्सुकता आहे. लिहीण्याची स्टाईल चांगली आहे.

फारेंड टायगर मदर बद्दल नक्की लिही. मला खूप उत्सुकता आहे.. मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं त्याबद्दल..

मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं त्याबद्दल.. >> कुठतरी ? समस्त अमेरिका खंड मधे त्याच्यावरच चर्चा नव्ह्ता का करत ? राणी पुस्तक वाचून "I wish" म्हणाली.

हो बहुधा न्यू यॉर्क टाईम्स मधे रिव्यू आला होता आणि मग बरीच चर्चा झाली होती त्यावर ते आठवते.

असामी हो.. पण समस्त अमेरिका खंड नेटवर कुठल्या वेबसाईट्/ब्लॉग तत्सम ठिकाणी चर्चा करत होता ते आठवत नव्हते. बहुतेक न्यू यॉर्क टाईम्सच..

मजेशीर आहे. त्या मुलींची काळजीच वाटली. Happy

सांगते ऐका वाचले. एकदम पॅथेटिक आहे.

वि स वाळिंब्यांचे 'हिटलर'. च. उत्कृष्ट आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त वि.ग कानिटकरांचे आहे. ना.भ.ऊ. मध्ये घटनांचा लेखा जोखा आहे म्हणजे दुसर्‍या महायुद्धाचा पट टाइमलाईनसारखा सरकत राहतो. वाळिंब्यांच्या 'हिटलर' मध्ये दुसरे महायुद्ध हिटलरला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती युद्ध फिरत राहते.वाळिंबांची भाषा ओघवती , नाट्यमय आहे आणि काहिशी नर्मविनोदी आहे.मी स्वतः हिटलर पुन्हा पुन्हा वाचतो. त्याच्या पहिल्या आवृत्तीची किम्मत ७५ रु होती आता ५०० च्या घरात असावी !

वाळिम्ब्यांचेच 'वॉर्सा ते हिरोशिमा 'हे दुसर्‍या महायुद्धाचा आढावा घेणारे छोटे पुस्तक आहे त्यात बखरीसारखा घटनांचा आढावा आहे.

वि स वाळिंब्यांचे 'हिटलर'. च. उत्कृष्ट आहे.>>> हे पुस्तक ऑनलाईन आऊट ऑफ स्टॉक आहे. थोड्या दिवसांनी किंवा मुंबईला गेल्यावर बघायला पाहीजे.
धन्यवाद.

Pages