मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, अगदी मनातले बोललीस. हा अस्साच अनुभव मी योग्यकर्त्याला घेतला आहे. तिथे विया विया नावाचे एक अप्रतिम रेस्टॉरंट आहे. तिथे जेवढी खायची प्यायची मौज मेजवानी आहे तेवढीच वाचनाची मौज मेजवानी आहे. आपण सहसा फार विविध प्रकारची मासिके वाचत नाहीत. पुस्तके तरी वाचून होतात. पण प्रत्येक देशात शहरात मासिक काढले जातात. मला विया विया मधे मी न ऐकलेली मासिके वाचायला मिळालीत. काही काही लेख तर संग्रही करुन ठेवावेत इतके उच्च दर्जाचे होते. अकोल्याला चिव चिव बाजार आहे. तो बाजार खास जुन्या मासिकांसाठी प्रसिद्ध आहे. दरवेळी मी अकोल्याला गेलो की तिथे माझे रोज जाणे असते.

टारफुला वाचले.
जबरीच आहे... Happy

साजिर्‍याने त्याचं रसग्रहण केलय तो लेख खालील लिन्क वर.

http://www.maayboli.com/node/34331

गावच्या नवीन पाटलाच राज्य हळुहळु सुरळीत होउ लागत तेव्हा लेखकानी त्यांच्या खास शैलीत लिहिलय.
ते वर्णन आहे ऋतुमागे ऋतु कसे बदलत जातात त्याच आणि त्यावेळी गावच काय काम सुरु आहे ह्याचं.
हे वर्णन २-३ पान आहे आणि ते अस्सल आहे एकदमच...

पुस्तकात वर्णन केलेल आळते, रामलिंग आणि आजुबाजुचे डोंगर पहायला मिळाले आहेत एकदा.
त्यामुळे गावच वर्णन रिलेट करु शकलो. स्वांतत्र्य पुर्व काळ असल्याने गावात चाललेल्या घडामोडी तत्कालीन समाजाची मनोवस्था दाखवतात..
पुंडाइ, दांडगाइ, चार भाउ हाये आम्ही, किती खुन पाडणार अशा प्रश्नातुन समोर येणारी दबंग प्रव्रुत्ती, इर्ष्या ह्या सार्‍याच अस्सल वर्णन. जबरदस्त पुस्तक आहे.

साजिर्‍याचा तो लेख वाचुनच वाचायचच हे ठरवल होत.
आता वाचायला वेळ मिळाला..

लॉस्ट इन ट्रान्सलेशन- निकोल मोनेझची ही कादंबरी वाचली. पेकिंग मॅन उत्खननाच्या पार्श्वभूमीवर सॉर्ट ऑफ प्रेमकहाणी.
पदोपदी आपल्याकडील diaspora लेखकांची आठवण येते. चिनी संस्क्रुती थोडी exotic पद्धतीने सादर केली आहे. संवादांचे वळण खास चिनी इंग्रजी..एकदा वाचायला हरकत नाही. पात्रे टिपिकल आहेत थोडी तरी विषयाचे नाविन्य होते म्हणुन गंमत वाटली.
लेखिकेचा अनुभव श्रीमंत असणार एकुणात, तिने बरीच वर्षे चिनमध्ये व्यवसाय केला.

अनुवादित इंग्रजी. Bitter is the boundless sea.. अशासारखे संवाद येत राहतात. चिनी मला येत नाही, पण अन्वयाने अर्थ समजत जातो. अशावेळेस आपल्या पर्यंत पोचतात ते फक्त शब्दांचे तरंग.
उदा- अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास वाचत असताना, पात्रांच्या संवादावर हिंदी/ भारतीय भाषेचा प्रभाव ठायी ठायी जाणवतो. मनात मुळ भाषेतील शब्दांची झांझ वाजायला लागते, डोळ्यासमोर हातात अनुवादित इंग्रजी.. भाषेचा पोत हाती लागतो, साडीच्या पदरासारखा. ही झांज त्या संस्कृतीशी असणार्‍या परिचयामुळे वाजते. शब्द बापुडे केवळ वारा

असो, तर हे चिनी बिटरनेस प्रकरणाच्या अर्थाचे रंग शोधत होते तो हे हाती लागले. त्यातले इतरही साताठ लेख वाचले, बर्‍यापैकी आवडले.
http://www.echinacities.com/expat-corner/can-the-chinese-still-eat-bitte...

तरी सटॅनिक व्हर्सेस वाचायचंच आहे. कुणी वाचलं असेल तर काही लिहा ना.. <<<
खूप वर्ष झाली वाचून.
कमालीचं बोर आहे. रश्दीची भाषा मला एरवी आवडते म्हणून पाऊण पुस्तक नेटाने वाचलं पण मग पुढे गाडी सरकेना. मूळ कुराण किंवा इस्लामिक मायथॉलॉजी वाचलेलं असतं तर कदाचित संदर्भ समजून मजा आली असती अशी शंका यायला वाव आहे. (महाभारत माहीतच नसलेल्याला यदाकदाचित चे विनोद कळतील का? नाही कळले तर तेच सूत्र!). सध्या इतकंच आठवतंय.

फतवा बितवा या निगेटिव्ह पब्लिसिटीने मोठं केलंय पुस्तक.

सध्या जी एं च पिंगळावेळ वाचतोय.
सलग वाचुच शकत नाही.
एक कथा वाचुन शांत बसायचं..
डोक्यात त्या कथेच चक्र सुरुच..

केल एडिट. भलतच झाल होत की Proud

Lol

तिकडे नावडीचं पुस्तक लिहिताना आठवलेल्या आवडीच्या पुस्तकांबद्दल -
रमेश मंत्रींचं जनू बांडे. भन्नाट विडंबन आहे. जेम्स बाँड सारखा भारतीय मराठी गुप्तहेर. कोडनेम ००५. सुंदरींच्या सहवासात असणारा. त्याच्या प्रमुखाचं नाव ण. आणि भारतीय राजकारणी आणी नोकरशाहीत अडकलेलं गुप्तहेरखातं. एका मंत्र्याचा गुप्तहेर होण्यास उत्सुक भाचा छबकड्या. एका उच्चपदस्थ साहेबाची मुलगी लग्नाच्या बाजारात खपवण्यासाठी केलेला घातपाती कारवाईचा कट. अक्षरशः कायवाट्टेलते आहे. आणि मस्त भट्टी जमलीये.

नुकतेच डॉ.रवि बापट यांचे पोस्टमार्टेम वाचले.वैद्यकिय क्षेत्रातील परिस्थितीवर प्रकाश टाकणारे फारच सुरेख पुस्तक!

जनू बांडे मस्त जमला होता. जेम्स बाँड मध्ये Mr.Q असतो तसा इथे श्रीयुत ण.

गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बद्दल अश्विनीमामींना अनुमोदन. मला आवडले ते पुस्तक. इतरांना आवडेलच असे नाही पण वाचलेच नाही असे होऊ नये.

वसंत लिमये यांचं "लॉक ग्रिफिन" कुणी वाचलं आहे का? बुकगंगावर ४०० रुपयांना ई-बुक आहे. घ्यावं का? पहिली काही पानं वाचली त्यावरून तरी इंटरेस्टिंग वाटली. कोणाला माहित असेल अर सांगा एवढे पैसे इन्वेस्ट करु का?

चांअगलं आहे म्हणतात. मी (अजून)वाचलं नाही. लेखकाचे पूर्ण नाव वसंत वसंत लिमये असे आहे. वडिलांचे नावही वसन्तच. Happy

जनू बांडे, छबकड्या..! सगळचं ब्येष्ट !
डिट्टो कॉपी असूनही मजा येते वाचायला.
त्यातली रेखाचित्रेही भन्नाटच आहेत Happy

अनिल अवचटांचे 'शिकवले ज्यांनी' वाचले. पूर्वप्रसिद्ध दिवाळी अंकातील लेखांचा संग्रह. म. गांधी व हेन्री थोरो यांवरचे लेख सुंदर आहेत.

बी,
1.I Too Had A Dream, co-authored with Gouri Salvi, ISBN-13: 978-8174364074
2.An Unfinished Dream, ISBN-13: 978-0074622148

'The Relunctant fundamentalist' from Mohsin Hamid वाचले.
लेखनाची शैली 'व्हाइट टायगर' शी साधर्म्य सांगणारी आहे. नावावरुन काहीतरी हाय फंडु असेल असे वाटते पण तसे काही नाही Happy
९/११ चा नायकाच्या आयुष्यावर झालेला परिणाम आणि 'Where do I actually belong' ह्या प्रश्नातुन निर्माण झालेली द्विधा मनस्थिती यासाठी एकदा वाचण्यासारखे आहे.

मॅक्झिम गॉर्कीचं आई वाचलं. मस्त पुस्तक आहे. समाजवाद चळवळीची सुरुवात त्यामागची विचारसरणी हे छान समजून घेता येईल. याच विषयावरचं (समाजवाद) अनिल बर्वे यांचं डोंगर म्हातारा झालं तेही वाचलं हेही छान आहे.

नुकताच इस्मत चुगताई यांच्या उर्दू कथांचा कविता महाजन यांनी केलेला अनुवाद रजई वाचला. हे मात्र "ई ! घाण" वगैरे वाटणार्‍या लोकांनी न वाचलेलंच बरं. काही काही गोष्टी खर्‍या असल्या तरी त्या बोलण्याबद्दल एक टॅबू आपल्या समाजात आहे. ज्यांना त्या पलिकडे जाऊन वाचता येईल त्यांनीच वाचावं असं हे पुस्तक. इस्मत चुगताई साधारण आपल्या आजीच्या वेळच्या मुस्लिम बाई, त्यांनी त्या काळात जे लिहीण्याचं धाडस केलं जे आजच्या काळातही धाडसी ठरेल असं लिखाण.

रसीदी टिकट, अमृता इमरोज ही अजून दोन पुस्तकं वाचली. दोन्ही छान आहेत.

सध्या नेमसेक वाचतेय. सुरुवातीचे १९६८ चेच प्रकरण वाचून कंटाळलेय. पुस्तक वर्तमानकाळात का लिहिले आहे. उदा. तो फोन उचलून कानाला लावतो. अशिमा त्याच्याकडे बघते. इ. टाईप्स. बोर होतंय त्यामुळे वाचायला. Sad

बी,
माझंही एक स्वप्नं होतं....
वर्गीस कुरियन
अनुवाद-सुजाता देशमुख

मिलिंद बोकीलांचं झेन गार्डन वाचलं काही कथा सुरेख. जरा लांबल्यात पण फार मस्त

अधिष्ठान नावाची एक कथा आहे ती मला फार आवडली.

'झेन गार्डन'मधल्या कथा चांगल्या आहेत; पहिली 'यंत्र' कथा सोडून... ती फार म्हणजे फारच लांबवली आहे. आणि (अपेक्षेप्रमाणे,) समीक्षकांकडून त्या कथेचाच सर्वाधिक गौरव केला गेला !!

मला झेन गार्डन नाही आवडलं फारसं. बोकिलांच्या कथा समहाऊ फारशा आवडत नाहीत असं लक्षात आलंय माझ्या. शाळा आवडली आणी कातकर्‍यांवर लिहिलेलं पुस्तकही फार आवडलंय. तसंच उदकाचिया आर्ती पण

मला त्यातली सगळ्यात आवडलेली आणि लक्षात राहिलेली कथा 'यंत्र'च आहे!
बोकिलांचे 'जनांचे अनुभव पुसतां' जबरदस्त पुस्तक आहे.

Pages