मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅलेक्स हेलीचं एक आर्टिकल >> वाङ्मयचौर्याचे आरोप होते ना त्याच्यावर?>>
हो रैना. आणि वाङ्मयचौर्यापेक्षाही (ती किरकोळ केस होती) सुद्धा हे मौखिक परंपरेचे दावेसुद्धा विश्वासार्ह नाहीत. ते नंतरच्या आणि समकालीन संशोधकांनी सप्रमाण दाखवून दिलंय. पण हे माहित असूनही त्या आर्टिकलवाचनातला थरार कमी झाला नाही Happy

सुद्धा हे मौखिक परंपरेचे दावेसुद्धा विश्वासार्ह नाहीत >> हो, हेही वाचले होते.
पण मग त्याच्या क्रियेटिव्हीटीला मार्क का देऊ नयेत आणि फक्त कादंबरी या प्रकारात ते टाकावे असा एक लेख वाचला होता. मराठीत होता तो..
मला पटले नव्हते. सहज आठवले.

>>चार लोकांनी एखाद्या पुस्तकातली दोनचार सौंदर्यस्थाने उत्कटतेने मराठीत शेअर केली तर विचारांना चालना मिळते. निदान पुनर्विचार होतो. >> हो, ह्याबद्दल दुमत नाहीच. फक्त सांगायच्या पद्धतीबद्दल आणि ऐकले नाही तर आग पाखडायच्या प्रवृत्तीबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

जौद्या Happy

या भासमान दुनियेतही चार लोकांनी एखाद्या पुस्तकातली दोनचार सौंदर्यस्थाने उत्कटतेने मराठीत शेअर केली तर विचारांना चालना मिळते. निदान पुनर्विचार होतो.>> हे कुणीच नाकारत नाही. ज्यांना जसा वेळ होतो, मिळतो, ज्यावर लिहावसं वाटतं ते लिहितातच की. पण म्हणून हा काही फर्माईशी प्रोग्रॅम नाहीय्ये. की प्रत्येक वेळी कुठलंही पुस्तक छान आहे म्हणून कुणी ४ ओळी लिहिल्या की त्यांना लिहा असा हेका धरायला. आणि नाही लिहिलं किंवा याला नकारात्मक उत्तर दिलं की आळशी, कंपूबाज, पुण्यामुंबईवाले अशी विशेषणं लावायला जाणं हे फारच अति होतं.

जर एखाद्याला इतकीच एखादं पुस्तक समजवून घ्यायची ओढ असेल तर तो वाचक फक्त माबोवर कधीच अवलंबून रहाणार नाही हे अगदी ढळढळीत सत्य आहे. तो नेटवरच्या इतर माहितीकडे वळतोच. आणि पुस्तकं वाचताना भाषेचा अडसर होत नाही हेच मला म्हणायचे होते पण <<मला तर अरुंधती रॉय ह्यांचे पुस्तक पेलवले नाही इतकी त्यांची शैली आणि शब्दसंपदा किचकट वाटली>> या वाक्याचं उत्तर म्हणून डिक्शनरी घेऊन बसायचा उपाय सुचवला. त्यात अपमानास्पद काही नाही. मी अजूनही काही पुस्तकं वाचताना आसपास डिक्शनरी ठेवून बसते. आणि अगदी स्पष्टच बोलायचं तर बुद्धीचा हेवा वाटणं वगैरे अत्यंत बालिश प्रतिक्रिया आहेत. पुस्तक समजणं/ भावणं ही अत्यंत व्यक्तीसापेक्ष बाब आहे. असो.

या विषयावर हेमाशेपो

बी ची मागणी तशी चुकीची नाही. फक्त त्याची पद्धत चुकीची असेल. बर्‍याचदा दुसर्‍यांच्या रसग्रहणातून त्या कलाकृतीकडे कसे बघावे हे कळल्याने त्यात गोडी निर्माण होऊ शकते . मला स्वत्;ला ग्रेसच्या कविता म्हनजे ठार कळायच्या नाहीत (अजूनही नाहीत).का एक भम्पक कवी आहे असे वाटायचे. (अजूनही ग्रेस हे कवीच नाहीत आणि जी ए जे लिहितात त्या कथाच नाहीत आणि लागू करतात तो अभिनयच नव्हे असे मानणारी मान्यवर मंडळी आहेत.). पण त्र्यं वि सरदेशमुख व वीणा आलासे यांची समीक्षा वाचून मला ग्रेस पुषकळसे अ‍ॅप्रोचेबल झाले. डॉ अनिल अवचट यांचा 'चित्रकार' हा लेख खरोखर वाचण्यासारखा आहे. एका भणंग वस्तीत राहणार्‍या अत्यन्त सामन्य पण मुळात चित्रांची 'दृष्टी' असलेल्या एका इसमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरची चित्रे कशी 'पहावीत' ही दीक्षा अवचटांना दिली आणि त्यामुळे अवचटही चित्रकार म्हणून अधिक प्रगल्भ कसे झाळे हे त्यातून कळते. त्यामुळे बी ची मागणी अप्र्स्तुत नाही. तुम्हाला नसेल लिहायचे तर तुमच्या अडचणी संगा. त्याला ' अन्नुलेखाने' :)मारल्यामुळे तो वैतागलेला आहे और वैतागता क्या न करता? तेव्हा न रागावता 'विच्छा त्याची पुरी करा' Proud

बाळू जोशी, माझा अनुल्लेख वगैरे नाही झाला आणि मी वैतागलो वगैरे काही नाही. हे सर्व जण माझे मित्रच आहेत. फक्त माझी कळकळ कुणाहीपर्यंत पोचत नाही त्याची खंत वाटते. आणि ह्यातून आपल्याला काय अनमोल मिळू शकेल ह्याची ह्यांना जाण नाही. खूपच फेफिकिर वाटतात मला इथले वाचक. खरच तो निसर्गप्रेमींचा अख्खा समूह फारच गोड आहे. त्यांच्याकडून ज्ञानोपासना कशी करावी हे शिकायला हवे.

लोकांचं मत विचारात घ्यावं, पटतं आहे का बघावं, नाही पटलं तर सोडून द्यावं. कला, साहित्य यातली आवडनिवड फार सापेक्ष असते. टॉलस्टॉयनं शेक्सपिअरला यथेच्छ शिव्या घातल्या होत्या, नायपॉलना विचारलं, "तुमचे आवडते लेखक कोण?" ते म्हणाले, "त्यापेक्षा माझे नावडते लेखक सांगणं सोपं आहे. जेन ऑस्टीन...". आणि मागच्याच आठवड्यात पॉल कोएल्लोनं विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्‍या जेम्स जॉइसच्या युलिसिस 'तद्दन टुकार आहे' असे उद्गार काढले.

http://www.guardian.co.uk/books/2012/aug/06/paulo-coelho-james-joyce-uly...

आता यातलं कोण खरं आणि कोण खोटं? प्रत्येकानं आपापली उत्तर शोधावीत आणि ती जुळतीलच अशी अपेक्षा करू नये.

काफ्काबद्दल फारच उत्सुकता दिसली म्हणून रिक्षा. Happy
http://rbk137.blogspot.in/2012/07/blog-post.html

इथे तुमची नकारात्मक (आळशी) उत्तरे वाचून >>> Uhoh
मला जे हवय ते समोरच्याने नाही केल की त्यांच्यावर नकारात्मक लेबलं लावण हे तु सिरियसली करतोयस???
निदान खुप पुस्तकं , वाचनाची आवड असलेल्या माणसाने तरी अशी जनराइजल्ड लेबलं लाउ नयेत अस मला वाटत.
आणि पुणे मुंबई वर तुझा आकस आहेच हे तु आधीही एका वादविवादात दाखवल आहेस..
असोच....

'चित्रकार' हा लेख अनिल अवचटांच्या 'छंदाविषयी' ह्या पुस्तकात आहे.

ह्या पुस्तकाबद्दल अजून थोडी माहिती:
chhandavishayi1.jpg

आपल्या मुलाकडे बोट दाखऊन एक शिक्षक असलेला माणूस म्हणाला ,”हा चित्र चांगलं काढतो म्हणून चित्रकलेच्या क्लासला घालावं म्हणतो;पण पुढे त्याचा काय फायदा ?”
शिक्षक असलेल्या माणसाने असं विचारावर काय उत्तर देणार ?

एखादा छंद माणसाला नक्की काय देतो ? हा खरंच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं नेमकं उत्तर नाही देता येणार;पण एका माणसाला दहा-बारा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील तर………

तर माझ्या शिक्षक मित्राला मी अनिल अवचट यांचं ‘छंदाविषयी’ हे पुस्तक वाचायला देईल.

चित्रकला,स्वयंपाक,ओरिगामी,फोटोग्राफी,लाकडतील शिल्पं,बासरी,वाचन आणि अजुन कितीतरी छंदांविषयी माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय आणि छन्दिष्टानसठी अनुकरणीय आहे. “एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो,तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो.आपली बोटे हळूहळू वळू लागतात,डोकं त्या दिशेने चालून पकड घेऊ लागते आणि आपल्याही हातातून किंवा गळ्यातून ती नवी गोष्ट उमटू लागते.मग त्याचे वेड लागते. तीच गोष्ट अनेकदा करू लागतो.नंतर ती दुसर्‍याला देऊ लागतो.प्रत्येक पायरीचा आनंद वेगवेगळा असतो.” अशा शब्दांत प्रस्तावनेतच आपली भूमिका लेखक स्पष्ट करतात.

चित्रकलेचं वेड अवचटना लहानपणापासूनच असल्याचं स्पष्ट होतं. त्यांचा चित्रकलेवरचा लेख म्हणजे मनोहर नावाच्या चित्रकार मित्राची गोष्ट आहे. आपल्या ओघवत्या शैलीत लेखक चित्रकलेचा विकास कसा कसा होत गेला, मनोहारकडून चित्र ‘बघायला’ कसं शिकले हे सांगतात. लहानपणी पाटीवर काढत असलेल्या शिवाजी पासून ओइल पेनटिंग्ज आणि हल्ली छोट्या कार्डावर काळ्या पेनने काढलेली चित्र हा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

या लेखात त्यांनी कॉलेजात असताना पुतळा बनवल्याची गोष्ट सांगतात आणि लाकडातून शिल्प बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली हे कळते. स्वयंपाक करायला लेखक गारजेपुरता शिकले तरी नंतर त्या प्रांतात ते कसे शिरत गेले;कोणा कोणा कडून काय काय शिकत गेले हे इतक्या सुरेखपणे सांगतात की असं वाटावं -अवचट भाजी चिरता चिरता काही टिप्स देताहेत आणि आपण समोर बसून ऐकतोय. स्वयंपाक ही सुद्धा एक कला आहे आणि पुरूष मंडळीही त्यात कसे पारंगत होत जातात हे जरूर वाचायला हवं.
एका मित्राच्या जपानी पेनफ्रेंड्ने कागदाचा पक्षी पाठवला आणि एका नव्या कागदी जगाची ओळख झालीं हे अजबच वाटतं. अतिशय चिकटीने पाठपुरावा करत त्यांनी ही कला आत्मसात केली आहे.प्रवासात,एखाद्या कार्यक्रमात,अगदी सिनेमा बघतांनाही ते ओरिगामी करतात-अशी ही चौकोनी कागद घेऊन करता येण्यासारखी कला. याचप्रमाणे लेखक आपल्या फोलोग्राफी,बासरी,वाचन या छांदांची गोष्ट सांगतात. लेखक असूनही आपलं वाचन कसं मर्यादित होतं हेही ते सहजपणे सांगून टाकतात.

‘इतर छंद’ या शेवटच्या लेखात दोरिचे खेळ,जादू,बाजा असे एक एक छंद सांगत जातात आणि हा म्हणजे एकदम खल्लास माणूस आहे याची खात्रीच पटते. आपल्या छांदांविषयी सांगत असतांना लेखक आजूबाजूच्या लोकांच्या कॉमेन्टसचा उल्लेख करत जातात आणि ते वाचतांना मजा येते-विशेषता: मुक्ता आणि यशोदा लक्षात राहतात त्या यामुळेच.या आपल्या मुलींनाच त्यांनी पुस्तक अर्पण केलंय;तसेच पुस्तकाचा चौकोनी आकार आणि मुखप्रुष्ठ्ही लक्षात राहतं.आतील काही पानांवर छापलेली चित्र ,ओरिगमीचे फोटो,लाकडतील शिल्पांचे फोटो अशांमुळे पुस्तक आपोआपच संग्रही (आणि थोडे महागही!) झाले आहे.

अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेले हे लेख वाचणार्‍या प्रत्येकाला नक्कीच काहीतरी छंद जोपासायला लावतील यात शंका नाही.

साभार -- छंदाविषयी : रामेश्वर महाले
संकेतस्थळ -- http://anilawachat.wordpress.com/2008/02/

छ्या काय हे पुण्या-मुंबईचे लोक Wink
राजकाशनाला अनुमोदन, मी वरती हेच म्हणत होतो.
@ राजकाशना- रिक्षासाठी लईच धन्यवाद.
माझे ही- जौद्या Proud

'सुनीताबाई' वाचले. सुनीताबाईंचें स्वतःचे लेखन, त्यांच्याबद्दलचा प्रकाशित मजकूर, पु.ल.-सुनीताबाई यांचे आप्तेष्ट-स्नेही यांच्या आठवणी - या सग़ळ्यांचा आधार घेत मंगला गोडबोले यांनी सुनीताबाईंचं व्यक्तित्व आणि चरित्र रेखाटले आहे. 'हा स्मृतिग्रंथ, गौरवग्रंथ किंवा भाबड्या भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही......सुनीताबाईंनीच निर्माण केलेल्या परिपूर्णतेच्या आदर्शाच्या कठोर मापदंडात बसेल असं सोपं नसलेलं हे काम."- लेखिकेचं मनोगत.

असं जगणं, असं लिहिणं, असं वागणं या तीन भागांत सुनीताबाईंचं चित्र आपल्यासमोर येतं. सुनीताबाई स्वतः आपल्याला लेखिका समजत नसल्यासारखाच दुसरा भाग तुलनेत थोडका आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला टाकलेल्या दोन दोन रिकाम्या चौकटी पुस्तक पुन्हा चाळताना कळ उमटवून गेल्या. पुस्तकाच्या वाचनात थक्क होण्याची एकेक पायरी चढत गेलो ('आहे मनोहर तरी' आधी वाचलेले असूनही.) कलाक्षेत्रात जगणारी, स्वतः कलावंत असलेली, कवितांवर प्रेम करणारी व्यक्ती पराकोटीची तर्कशुद्ध वागते. स्वीकारलेली तत्त्वे आणि नियम यांना स्वतःपेक्षाही वरचे स्थान देते. हेच गुण टोकाचे झाल्यावर दोषस्वरूप भासू लागतात याचे पदर मंगला गोडबोलेंनी अलगद उलगडले आहेत. पुलंच्या लेखनामागे सुनीताबाई उभा होत्याच; पण त्यांच्या हस्तलिखितांची, मिळालेल्या पुरस्कारांची व्यवस्था लावण्यातली धडपड, नियोजन हे भारतीय संदर्भात विरळा.
त्यांनी लावलेल्या चाळण्यांतून गळून जी मोजकी माणसे त्यांच्या जवळ पोचली, त्यांच्याबद्दल आस्था बाळगणारं, टोकाची काळजी घेणारं रूपही दिसतं. पुस्तकात समाविष्ट झालेल्या छायाचित्रांतील सुनीताबाईंचे रूप पूर्णत: अनलंकृत आहे, त्यांच्या व्यक्तित्वासारखेच.
अरुणा ढेरे यांचा लेख एक वेगळाच पोत घेऊन येतो.

मी वाचल आहे भरत हे पुस्तक पण मला ते तितक आवडल नाही. माझ्यामते सुनिताबाईंवर वेगळी अशी पुस्तके लिहिण्याची मुळीच गरज नाही कारण त्यांचे स्वतःचे लिखाण त्या कशा आहेत हे दाखवून देत असतं. हीच तर्‍हा गौरीची आहे. त्यामुळे ह्या दोन्ही लेखिकेंवर लिहिली गेलेली पुस्तके उगीच वाटली.

मला सुनीताबाई वाचायचे आहे.

गौरी गेल्यावर "गौरी मनातली" कढले होते. ते कोठे मिळेल? का ती limited edition होती?

बी माहितीबद्दल धन्यवाद..
स्वातंत्र्यदिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! Happy

आज मायबोलीवर डॉ. सुखात्मे यांच्या घरावर नीलफलक लावल्याच्या बातमीने त्यांच्या आईच्या आत्मचरित्राची आठवण आली.

गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे.
अत्यंत सरळ साध्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. एका सामान्य ओढगस्तीच्या मध्यमवर्गीय कुटुम्बाविषयी. खूप जुनं असल्याने तत्कालीन समाजदर्शन घडतं. स्वतःच्या आयुष्याचा प्रामाणिक आढावा आहे. Happy

वरदा:
स्वतःच्या आयुष्याचा प्रामाणिक आढावा आहे. >> ++१
त्यांचा म्हणजे सत्यभामाबाई सुखात्मे चा पणतू (?) गौरव) इथेच असतो, त्यांच्याच कडून हे पुस्तक मिळाले. मला मजा वाटली त्या पुस्तकाचा उल्लेख इथे बघून.

काही दिवसांपूर्वी बी. आर. देवधरांचे 'थोर संगीतकार' वाचले. अप्रतिम. संगीतातले खूप शिकायला मिळाले.

इग्नेशिअस, तुम्ही पण मुराकामी वाचता का? मला पण वाचायला फार मजा येते आहे. तुम्ही आणखी कोणती पुस्तके वाचली आहेत.? इतके एफर्टलेस पण परिणामकारक लिहीता यायला पाहिजे.

गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज रिलीज झाले तेव्हा ते एक मोठा इव्हेंट होता. अ‍ॅड एजन्सीतील माझ्या कलीगने व मी अगदी शेअर करून वाक्यावाक्याला रिअ‍ॅक्ट होत वाचले होते. समाजमान्य चौकटीत न फिट होऊ शकलेल्या व्यक्तिरेखांची आयुष्ये चितारली आहेत. अरुंधती उत्तम भाषेचा वापर करून तुम्हाला मोहवून टाकते. तिचे विचार पटत नसले तरीही आपण वाचतो तरी निदान. हे तिच्या पुढील लेखनावरून समजले. अम्मू सिंगल पेरेन्ट त्यात डिवोर्सी, वेलुथा दलित. एस्था राहेल जुळी मुले बिना बापाच्या आधाराची. असा सगळा केविलवाणा संसार आहे. त्यातही ते सर्व जगाच्या कृरतेला सामोरे जातात. कधी कधी आनंदाचे चार क्षण त्यांच्या जीवनातही येतात.
शेवटी सर्व चित्र काळे, रक्त रंजित आणि दु:खद होते. राहेल मोठी झाल्यावर निरपेक्ष पणे सर्व आपल्यासमोर मांडते. अम्मूच्या वडिलांचे लग्नाच्या चौकटीतले क्रूर वागणे, इतर वर्णने समजायला थोडा लाइफ एक्स्पिरीअन्स पण लागेल कदाचित. पण इंग्रजी भाषा भारतीय वळणाने फार सुरेख वापरली गेली आहे. तिचे काही शब्दप्रयोग तर इतके चपखल आणि चित्रदर्शी आहेत की क्या बात है. दक्षिणेत राहिल्यावर ही सर्व पात्रे अगदी जिवंत होउन कधी कधी समोर येतात. टूरिस्ट ट्रॅप केरळ राज्यातील खरे जीवन कसे आहे ते तिने समर्थ पणे दाखविले आहे. मला तर वाट्ते मराठी अनुवाद वगैरे वाचायच्या भानगडीत आजिबात पडू नये. वेस्ट आहे तो प्रयत्न. मूळ इंग्रजीतूनच वाचा. काही संदर्भ नाही समजले तर मला विपू करा. मी नक्की मदत करेन. माझ्याकडे आहे ते पुस्तक. एक चांगला अनुभव वादात पडून हरवू देवू नका. Happy

अहो मामी - इग्नेशिअस कोण ?

मुरकामी चे "आफ्टर डार्क" वाचायला सुरुवात केली होती पण संपवले नाही. सहजपणे लिहित असले तरी त्यांच्या कादंबरर्‍यांचे विषय सर्वांना आवडतीलच असे नाही. त्यांचे आत्मचरित्र मात्र मला खूप आवडले. कदाचित मलाही पळायची आवङ असल्यामुळे असेल कदाचित.

ह्याच वर्षी सिद्धार्थ मुखर्जी यांचे "एम्परर ऑफ ऑल मॅलडीज" वाचले. कर्करोगाचा इतिहास व तसेच विज्ञानाने केलेली प्रगतीच नाही तर ह्या रोगावर मात करण्याचा अमेरिकेच्या चळवळीची आणी लेखकाच्या स्वतहच्या अनुभवांचे वर्णन आहे. थोडे तांत्रिकी वाटू शकेल पण जरूर वाचा ...

बी, चित्रकार च्या माहितीबद्दल धन्यवाद.
सद्ध्याच्या एक आठवड्याच्या सुट्टीत स्वांतसुखाय पुस्तकं वाचायला मिळाली. काही परत वाचली. खूप मस्त वाटलं. पैकी सिंहासनबद्दल वर लिहिलंच आहे.

१. तत्वमसि - मूळ पुस्तक ध्रुव भट्ट - अनुवाद अंजली नरवणे
२. अशी धरतीची माया - मूळ पुस्तक शिवराम कारंत - अनुवाद रं. शा. लोकापूर
३. पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार
४. बंध - अनुबंध - कमल पाध्ये
५. विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा - मे. पुं रेगे

सद्ध्या अगस्तीचे अंगण हे पुस्तक वाचते आहे. प्रभाकर पाध्यांचे निवडक, संपादित लेख.

काल संध्याकाळी अचानक एका घरगुतीपेक्षा थोड्या चांगल्या रेस्तराँ मध्ये लई भारी आणि कचरापट्टी पुस्तके ठेवलेली आढळली. खा आणि वाचा आणि जाताना परत ठेवून जा. कसली ऐsssssश.

न्युयॉर्कर मासिकाची चळत पडली होती. व्यंगचित्राने लक्ष वेधले म्हणुन उचलला तर ऑक्टोबर २००९ च्या अंकात जेम्स cameron वरचा लेख होता. अरे काय क्रेझी माणूस आहे तो... वाचत गेले, खाणे संपले तरी उठवेना.
कोणाला कुठेही रद्दीत मिळाला तर प्लीज माझ्यासाठी घेऊन ठेवा तो अंक. प्लीज.

शैलजा,
मस्तच.

वॉव, ही पुस्तकं असलेल्या रेस्तराँची कल्पना एकदम आवडली! तिथे ती पुस्तके सुरक्षित राहातायत, हेही महत्वाचे.

Pages