मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचलं तेव्हा पहिल्यांदाच पुस्तकावर पैसे(+वेळ?) फुकट गेले असे वाटले. तरीही अजून संग्रहात आहे.
रोहिंग्टन मिस्त्रीचे सच अ लाँग जर्नी हे घेतलेले आहे. त्याचा नंबर लागलेला नाही. वरदा तुम्ही त्याच पुस्तकाबद्दल बोलत नसाल ना? फाइन बॅलन्स आणि फॅमिली मॅटर्स ही त्यांची आणखी दोन नॉव्हेल्स.

वरदा,
तू म्हणतेस तो कथासंग्रह म्हणजे 'टेल्स फ्रॉम फिरोजशा बाग'. मला फारसा आवडला नव्हता. त्यातल्या 'पेइंग गेस्ट्स' आणि 'स्विमिंग लेसन्स' या कथा मस्त आहेत. 'फाइन बॅलन्स' आणि 'फॅमिली मॅटर्स' ही पुस्तकंही मला आवडली होती.

काफ्का समजावून सांगा, अरुंधती रॉय समजत नाही ती सांगा असं प्रत्येकवेळा म्हणून काहीही उपयोग नाही.>> +१ आणि आपल्याला आवडलं नाही/कळलं नाही (पटत नाही-इती सुरेश थोपटे!!!); दुसर्‍याला आवड्लं/कळलं तर एवढं काय बिघड्लं?
फॅमिली मॅटर्स अर्धवट वाचलेय, पेशन्स राहिला नाही!

हायला, शैलजा मी कालच संपवलं, दुसर्‍यांदा!! कथानकापेक्षा लेखकाचे चिंतन जास्त भावते आणि आजच्या काळातही चपखल बसते.
अशा कादंबर्‍यांवर सिरिअल्स का काढत नाहीत? प्रत्येक पात्र इतकं डीटेलमध्ये उभं केलं आहे की वेगळ्या स्क्रिप्ट्ची गरजच नाही.

सच अ लाँग जर्नी, नेमसेक, नायपॉलचे 'हाऊस फॉर मिस्टर बिस्वास', 'द म्युझिक रुम' एवढे मला आवडतात

>>अशा कादंबर्‍यांवर सिरिअल्स का काढत नाहीत? >> आगावा, शब्द मागे घे! Proud पुस्तकातल्या शब्दांची ताकद सीरियल्स/ सिनेमा ह्यांत उतरायला तितक्याच ताकदीने सगळे काही सादर व्हायला हवे. नपेक्षा शाळा आणि Vinci Code ची गत.

हिरोकी मुरकामी चे "what i talk about when i talk about running" जरूर वाचावे. तुम्हाला पळण्याची आवड असेल तर नक्कीच. अगदी सोप्या भाषेत लिहिलं आहे, आणी वाचायला फार वेळ पण लागणार नाही. मुरकामी नामवंत जपानी लेखक आहेत, पण त्यांच्या कादंबर्या सगळ्यांना आवडण्या सारख्या नाहीत. हे पुस्तक मात्र खूप वेगळं आहे - थोडं आत्मचरित्र थोडं diary सारखं. ऑलिम्पिक स्पर्धा बघून प्रेरित झाला असाल तर आणखी आवडण्याची शक्यता आहे Happy

आगावा, शब्द मागे घे! फिदीफिदी पुस्तकातल्या शब्दांची ताकद सीरियल्स/ सिनेमा ह्यांत उतरायला तितक्याच ताकदीने सगळे काही सादर व्हायला ह >> +१. सिंहासन असे पकडणे निव्वळ अशक्य वाटते.

हे थोपटे कोण आहेत? >>> कु. अभया बोचके यांचे मित्र!!!
अरेच्या, सिंहासन जशी लिहीली आहे तशीच्या तशी, काही डोकं न चालवता चित्रित केली तरी सॉलिड आहे, प्रत्येक पात्र, प्रसंग, वातावरण कसल्या डिटेलमधे आहे. असं डीटेलिंग विन्ची कोड/शाळा यात नाही.

तुम्ही बहुतांश पुणेकर आणि मुंबईकर गैरसमज करुन घेण्यात आणि कुणाचा एखाद्या गोष्टीमागचा उद्देश समजून न घेण्यासाठी इतके प्रसिद्ध आहात की कळत नाही काय विशेषण लावावे Sad समोरच्या व्यक्तिला इतकेही कमी लेखू नये! एकतर स्वतःलाही ते पुस्तक कळलेले नाही. मी काही तिला माझ्यासाठी सोप्या भाषेत अनुवाद कर असे म्हंटलेले नाही. पुस्तकाचे परिक्षण कर असे लिहिले आहे. त्यातून कदाचित ते पुस्तक परत वाचताना सोपे जाईल. ते सहजपणे कळेल. ह्याचा अर्थ असा होत नाही की अडसर भाषेची आहे. मागे काक्फाचा घोष लावणार्‍या सगळ्यांना मी हीच विनंती केली होती की इथे काफ्काच्या साहित्याबद्दल लिहा. पण एकाला ते जमले नाही. ह्यातून काय सिद्ध होत की तुम्ही लोक उगाच इथे आम्ही हे वाचल.. आम्ही ते वाचल म्हणून मिरवता. इथे एकमेकांची स्तुती करणारा एक फार मोठा वर्ग निर्माण झाला आहे. इतक्या सहजपणे तुम्ही इतकी स्तुती करता हे खूपच चुकीचे आहे. अशानी खरा लेखक वा वाचक निपजला जाणार नाही.

तुम्ही बहुतांश पुणेकर आणि मुंबईकर गैरसमज करुन घेण्यात आणि कुणाचा एखाद्या गोष्टीमागचा उद्देश समजून न घेण्यासाठी इतके प्रसिद्ध आहात की कळत नाही काय विशेषण लावावे >> This is totally uncalled for बी. माझ्या आठवणीनुसार तुला मदत करणारे ह्या दोन शहरांमधले बरेच जण आहेत ना ?

व्हाइट टायगर पुस्तक नवर्‍याला भेट म्हणून मिळाले. तो बिनचित्रांची पुस्तके वाचत नाही Wink त्यामुळे मला वाचायला लागले. वाया जायला नको ना. Happy तर ते वाचले. एकदम त्या लेखकाला जाऊन गदागदा हलवावेसे वाटले वैतागाने. किती जाणीवपूर्वक बक्षिसासाठी लिहिले आहे असे वाटले. मोजून मापून भाषा, उपमा, परिस्थितीचित्रे. पुस्तक न आवडलेले इतर लोक पाहून (पुन्हा) आनंद झाला. आवडले हे पुस्तक असे सांगणारा कोणी मनुष्य अजून भेटलेला नाही.

>>समोरच्या व्यक्तिला इतकेही कमी लेखू नये!
बी, मला वाटते काही पुस्तके ही स्वतःच स्वतःचा शोध घेण्याची असतात. ती वाचून कोणाला काय वाटेल तर कोणाला काय. जसे वर गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज कोणाला आवडले तर कोणाला नाही. पुस्तके म्हणजे कोडी नसतात, म्हणजे नसावीत. तसेच आपल्यासारखे मत असलेली इतर माणसे दिसली तर बरे वाटते. उदा. हॅरी पॉटरच्या पुस्तकांच्या चाहत्यांचे थवे. काफ्काचे चाहते त्यामानाने थोडेच असतील Happy त्यामुळे कोणी दोन एकमेकांना भेटले तर आणखी जास्त बरे वाटत असणार.
समजा कोणी असे लिहिले की मला असे असे वाटले म्हणून मजा आली. तरी आपल्याला ते पुस्तक वाचून तसेच वाटेल असे नाही. आणि म्हणजे मजा येणारच नाही असेही नाही.

वरदा, आगाऊ, मृदुला +१

बी, 'परिक्षण' ही फार पुढची गोष्ट झाली, माझी तेवढी पात्रता नाही. 'परिचय' / 'रसग्रहण'... लिहिलं जाऊ शकतं एकवेळ, पण त्यासाठी पुस्तक अजून किमान एकदा तरी वाचावं लागेल. काही टिपणं, नोंदी काढाव्या लागतील, जे (पुस्तक इंग्रजी असल्यामुळे) एका आठवड्यात निदान मला तरी शक्य नाही.
पण त्याही आधी, प्रत्येक पुस्तक प्रत्येकाला आवडलंच पाहिजे, असं काही नाहीये ना. ही आवड-निवड व्यक्तिसापेक्ष असते, कायमच.
इथे याच धाग्यावर काही महिन्यांपूर्वी मी 'बाकी शून्य' विशेष आवडलं नाही अशा अर्थाची एक पोस्ट टाकली होती. त्यावर परागने एक लिंक सुचवली होती, ज्यात टण्याने त्या पुस्तकाबद्दल अगदी भारावून जाऊन लिहिलं होतं. तो लेख वाचल्यावर हे सहज लक्षात येत होतं, की टण्याला ते पुस्तक प्रचंड आवडलं होतं. सो बी इट. तो लेख वाचल्यावर त्या दृष्टीने मी ते पुस्तक पुन्हा चाळलं, नाही असं नाही; पण तरीही माझं अंतिम मत काही बदललं नाही. (संदर्भासाठी पहा, माझी आणि परागची विपू :फिदी:)

तेव्हा, छोड दो! Happy

(समस्त जगाला आवडलेलं 'द अल्केमिस्ट' मला विशेष आवडलं नव्हतं - हे या निमित्ताने आठवलं.)

आगाऊ, तू सिंहासन सिनेमा विसरतोयस का? मुंबई दिनांक आणि सिंहासन एकत्र करून केलेला? माझ्या सार्वकालिक आवडत्या सिनेमांपैकी एक. सगळीच्या सगळी स्टारकास्ट आहे श्रेयनामावलीत. अरुण सरनाईकने तर सगळ्या बड्या बड्या अभिनेत्यांना मागे टाकलंय. अर्थात त्यात निळू फुलेचं कॅरेक्टर एकदम फसलंय आणि सिंहासन पुस्तकातले अनेक तपशील नाहीत. पण ती काही प्रमाणात दृश्यमाध्यमाची मर्यादाही आहे. वाचताना जितक्या जश्या गोष्टी भावतात त्या दृश्यात कशा दाखवता येणार? पण त्या सिनेमापेक्षा परत एकदा सिंहासन सरस बनवता येईल असं मला वाटत नाही...
आज उद्यामधे सीडी कुठे ठेवलीये ती शोधून परत एकदा पहाणार Happy

ललिता, एकदम पटेश!
पण तू कशाला आम्हाला अनुमोदन देतेयस? तू आपाप्ल्यात स्तुती करणार्‍या पुण्यामुंबईच्या ग्रुपमधे आहेस का? Wink
रच्याकने, आगाऊ पुणेकरही नाही की मुंबईकरही.... Uhoh

<<ह्यातून काय सिद्ध होत की तुम्ही लोक उगाच इथे आम्ही हे वाचल.. आम्ही ते वाचल म्हणून मिरवता>> हे तुला आत्ता कळलं बी? विद्वत्ता मिरवण्यासाठीच तर आम्ही या अशा बीबींवर येतो (निदान मी तरी).. Proud

वरदा, सिंहासन सिनेमाबद्दल +१. खरंच काल विचार करत होते आगाऊच्या सिरियल बनवायला हवी ह्यावर आणि बनलीच तर त्यात कोण कोण काम करणारे पहायला आवडतील ह्यावर आणि खूप कमी जणांना हे शिवधनुष्य पेलेल असं वाटलं. उलटपक्षी, कदाचित अशी संधी मिळाली तर कदाचित त्याचं सोनंही करतील कलाकार मंडळी.

तरीही, नकोच सीरीयल Proud

सध्या अ‍ॅलेक्स हेली चं रुट्स वाचतेय. शाळा-कॉलेजात असताना मराठी अनुवाद खूप वेळा वाचला होता. त्या काळातलं माझं आवडतं पुस्तक होतं ते. त्या वेळी अनुवाद जितका भावला होता तितकं मुळ पुस्तक भावत नाहीये. कदाचीत वयाचा परिणाम असेल.

कदाचीत वयाचा परिणाम असेल.
>>
हो ना. हेलीचं वय बरंच असतं आता जर तो जिवन्त असता.

अल्पना, मी अनुवाद कधीच वाचला नव्हता. पण मोठेपणी जेव्हा हातात धरली तेव्हा तितकीशी भावली नाही. जेम्स मिशनर च्या कादंबर्‍यांपेक्षा थोड्या वरच्या पातळीवरची इतकंच मला वाटलेलं.
पण अ‍ॅलेक्स हेलीचं एक आर्टिकल एका अभ्यासाच्या पुस्तकात वाचलं होतं. मौखिक परंपरेचा अभ्यास करताना. त्यात त्याने या पुस्तकलेखनाच्या वेळी तो शोध घेत घेत कसा आफ्रिकेत त्याच्या मूळ जमातीपर्यंत पोचला. आणि मग त्यांच्या मौखिक परंपरेनुसार अमूकतमूक पिढ्या आधी एका कुटुंबातला एक मुलगा कसा नाहीसा झाला होता (त्याला गुलाम म्हणून पकडून नेलं होतं) आणि मग त्या इतिहासाचा हेलीच्या कौटुम्बिक मौखिक परंपरेशी कशी सांगड बसली आणि शेवटी त्याला त्याची रूट्स कशी सापडली हे त्याने थोडं सैद्धांतिक विश्लेषणात्मक लिहिलेलं. रूट्समधे पण हा भाग असेल कदाचित (मी पूर्ण पुस्तक वाचलं नाहीये). पण तिथे ते वाचताना अक्षरशः थरारून गेलेले Happy

आहे हा भाग शेवटी. अनुवादामध्ये वाचल्याचं आठवतंय. इंग्रजी पुस्तक शेवटपर्यंत वाचलं जाईलच याची खात्री नाही. मला स्वतःलाच आश्चर्य वाटतय की हे पुस्तक कधीकाळी मला इतकं आवडलं होतं.

सर्वांना -- मी कित्येक पुस्तके, कित्येक चित्रपटे, कित्येक कविता हे रसग्रहण वा त्या त्या कलाकृतीचे पुस्तक परिक्षण वाचून आणखी चांगले समजू शकलो. कित्येक न वाचू शकलेली पुस्तके मला ह्यातून कळली. तेंव्हा माझ्या नजरेनी पुस्तक परिक्षण खूप परिणामकारक साहित्य प्रकार आहे. इथे तुमची नकारात्मक (आळशी) उत्तरे वाचून मला वाटत मायबोलिवर फक्त निसर्गेप्रेमी तेवढे खरे आहेत बाकी सर्व तद्दन खोटे!

'परिचय' / 'रसग्रहण'... लिहिलं जाऊ शकतं एकवेळ, पण त्यासाठी पुस्तक अजून किमान एकदा तरी वाचावं लागेल. काही टिपणं, नोंदी काढाव्या लागतील >> +१
हेच एकमेव कारण आहे बी.

तरीही कोणा (मर्मज्ञ) व्यक्तीने (कुठल्याही) पुस्तकाचे रसग्रहण करावे आणि कोणी कोणाला तरी तसा आग्रह करावा ही बीची मागणी मला तरी चुकीची वाटत नाही. आणि असा आग्रह इथे या धाग्यावर करायचा नाही तर कुठे?

ह्याचा अर्थ असा होत नाही की अडसर भाषेचा आहे. >> +१ बी. तरीही तुझी सांगायची पद्धत चुकते आहे असे वाटले.

अ‍ॅलेक्स हेलीचं एक आर्टिकल >> वाङ्मयचौर्याचे आरोप होते ना त्याच्यावर?

खरंय अल्पना. पूर्वी फार प्रभावी वाटले होते रुट्स. आता नाही.

इथे तुमची नकारात्मक (आळशी) उत्तरे वाचून मला वाटत मायबोलिवर फक्त निसर्गेप्रेमी तेवढे खरे आहेत बाकी सर्व तद्दन खोटे!>>>

बी तर लेबलांवर लेबलं लावत सुटलाय.
असो!

रैना, आग्रह धरणे ठीके गं, पण आपले कोणी ऐकले नाही म्हणून लगेच तद्दन खोटे वगैरे विशेषणे लावणेही चुकीचे नाही का? Happy

अरे बी पुन्हा तेच. ललितावर जबरदस्ती का बी? तिच्याही इच्छेचा आदर व्हायलाच हवा. उलट तिने व्यवस्थित ऑलरेडी लिहीले आहे.

तेही चुकीचेच आहे शैलजा.
पण जा इंटरनेटवर वाटेल ते मिळते ते वाचा, हेही तितकेसे बरोबर नाहीच. हे आहेच की या भासमान दुनियेतही चार लोकांनी एखाद्या पुस्तकातली दोनचार सौंदर्यस्थाने उत्कटतेने मराठीत शेअर केली तर विचारांना चालना मिळते. निदान पुनर्विचार होतो.

जौ द्या.

Pages