मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप | 19 November, 2011 - 00:39

तू म्हणतीयेस ते पुस्तक खरोखरीच्या चॉकलेटसवरच आणि कोको इंडस्ट्रीवर आहे. लहान मुलांच्या शोषणाबद्दल नाही. त्या अ‍ॅमेझोनच्याच लिंकमधे पुस्तकाचे वर्णन आहे.
"A shocking exposé of the little-known corruption and exploitation found at the heart of the multibillion-dollar cocoa industry—blood diamond for chocolate."

पूर्ण माहिती करून घ्यायच्या आधीच चुका काढायची केवढी ती घाई!
>>>

नीधप
१) चुका काढणार कशा पुस्तक वाचलेच नाही, म्हणुन शोधत होते.
२) http://www.amazon.com/Bitter-Chocolate-Worlds-Seductive-Sweet/dp/B003GAN1VQ
या वर दिलेल्या लिन्कवर पुस्तकाच्या वर्णनात तु पहिले वाक्यच लिहिलेस पुढचे वाचलेस का?.

A shocking exposé of the little-known corruption and exploitation found at the heart of the multibillion-dollar cocoa industry—blood diamond for chocolate.

"It's the measure of a vast gulf between the children who eat chocolate on their way to school in North America and those [in Africa] who must, from childhood, work to survive...between the hand that picks the bean and the hand that unwraps the candy bar."—from the introduction to Bitter Chocolate

Whether part of a child's Halloween haul or the contents of a heart-shaped box, chocolate is synonymous with pleasure. But behind the sweet image is a dark history of exploitation.

असो नामसाधर्म्यामुळे कळले नाही. दोन्ही पुस्तकांचा विषय देखिल चाइल्ड एक्स्प्लॉयटेशनच आहे.
चांगले पुस्तक कळवल्याबद्दल आभारीच आहे फक्त हे ओरिजिनल पुस्तक असते तर लायब्ररीत मिळते का बघितले असते म्हणुन विचारले. पुस्तक कळवल्याबद्दल धन्यवाद.

मी ज्याबद्दल म्हणतेय त्या पुस्तकाची अ‍ॅमेझॉनवरचीच ही लिंक
http://www.amazon.com/Bitter-Chocolate-Child-Sexual-Abuse/dp/0140298975/...
बिटर चॉकलेट असं अ‍ॅमेझॉनवर सर्च केलं ना की तिसरं लिस्टींग येतं या पुस्तकाचं.

>> थॅन्क्स पण लायब्ररीत आणि बुक गंगावर इबुक मध्ये नाही अजुन. इबुक मध्ये बरेचदा स्वस्त मिळतात.

धन्स रुनि

मिलिंद बोकील यांची शाळा वाचली. पुस्तक वाचायला सुरवात केली की हातातून खाली ठेववतच नाही. आता 'शाळा' चित्रपट रिलीज होण्याची वाट बघतोय
'शाळा' ट्रेलरः
Pulpit rock

'शाळा' चित्रपट २०१० पासून प्रदर्शनासाठी सज्ज आहे पण अजून का प्रदर्शित झाला नाही हे कोडेच आहे. Sad

श्याम मनोहर यांच 'आणि उत्सुकतेने मी झोपले' हे वाचले. तीन कथानकांमध्ये हे पुस्तक समोर येते. पहिल्या दोन वाचताना झेपतच नव्हते. शेवटपर्यंत वाचून झाल्यावरच पुस्तकाचा आशय जरा कळाला. Sad कुणी मला आधिक विस्ताराने सांगाल का, माझ्या विपू मध्ये?

सध्या 'रागदरबारी' वाचत आहे, अचाट आहे. आगाऊ यांनी या पुस्तकावर लिहिलयचं.

"ही वाट एकटीची".. खुप छान आहे. तसेच "अपूर्ण मी तुझ्यावीणा" अप्रतिम आहे. खुपच छान लिहिले आहे. "सुमिता" हे पुस्तक पण चांगल आहे. तिच्यावर खुप वाईट अत्याच्यार केल्यात. काय काय खुप स्पष्ट शब्दात लिहिले आहे. ते मात्र आवडले नाही. तसेच इंग्लिश पुस्तकांम्ध्ये " I Too Had Love Story" खुपच छान आहे. आणि आता "I Too Had Love Story" च्या पुढचा भाग "Can Love Happened Twice ?" हे वाचत आहे.

Bagz, साधारण १५ वर्षांपुर्वी GEB वर २ talks दिली होती IUCAA ला असतांना.
आणखीही काही लोक आहेत इथे ते आवडणारे (उदा. अरभाट)

नुकतीच मला एक छानशी भेट मिळाली, डॉ. ज्योत्स्ना पडळकर लिखित दोन पुस्तके :
१. नवी बाळगुटी - पालकांसाठी! (वय वर्षे १० पर्यंतच्या मुलांच्या आई-बाबांसाठी)
२. आईचं दूध बाळासाठी. (स्तनपानाबाबत)

दोन्ही पुस्तके विकत घेऊन संग्रही ठेवण्यासारखी आहेत, किंवा डोजेला उत्तम भेट! खास करून नवीन पालकांसाठी, जमल्यास नक्की वाचा. थोड्या मोठ्या पालकांनी वाचले तरी छानच! बर्‍याच लहान-सहान गोष्टी आधीच माहिती असतात, पण कधी त्याची कारणं माहिती नसतात, कधी पूर्णपणे नव्याने माहिती पडतात, तर कधी जुन्यांची उजळणी होते. पालक म्हणून नक्की माहित असाव्यात अशा गोष्टींची एकंदर माहिती खूप चांगली आणि सोप्या भाषेत दिलेली आहे.

'उत्सुकतेने...' बद्दल पहिली गोष्ट म्हणजे ते पुस्तक एका झटक्यात अ‍ॅब्सॉर्ब करण्याचे नाहीच आहे, लेट इट सिंक इन स्लोली.
मला जेवढे उमजले ते असे आहे - सामान्य माणूस जगताना आपले अस्तित्व, आपल्या कृती मागच्या प्रेरणा, आज आपण जसे आयुष्य जगतो आहोत ते तसे का आहे याबाबत फार विचार करीत नाही. बर्‍याच गोष्टी आहे तशा मान्य करीत, झापडबंद आयुष्य जगतो. विशेषतः कुटुंबव्यवस्थेच्या चौकटीत असा विचारच होत नाही किंबहुना तो करण्याची गरजच काय असाही प्रश्न विचारला जातो. शाम मनोहरांचा दुसरा आवडता मुद्दा (जो 'कळ' मधे जास्त प्रभावी आहे) म्हणजे सर्वच क्षेत्रात असलेली 'मिडिऑकर' प्रवृत्ती. कशाचाच खोलवर जाउन, झोकून देउन विचार न करता; काहीतरी वरवरचे, उथळ जगणे आणि त्याच लायकीचे काम करणे, प्रस्थापित धारणा कसल्याही विश्लेषणाशिवाय चटकन मान्य करणे इ.वर ते सणसणीत टीका करतात.
या दोन्ही सूत्रांना केंद्रस्थानी ठेवत आणि या परिस्थितीत एखादी व्यक्ती असा वेगळा विचार करु लागला तर काय होईल याचा धांडोळा घेत 'उत्सुकतेने...' मधल्या तीनही कथा पुढे जातात. '
मोठा विचार करायला हवा' म्हणणारा शास्त्रज्ञ टिनएजर, त्याच्या आजूबाजूचे कुटूंबिय आणि 'सो कॉल्ड' सायंटीस्ट. संसारात रमायचा प्रयत्न करत असतानाही 'प्रेग्नंट बाईचा अ‍ॅक्सिडेंट सिनेमात कसा चित्रीत करायचा' या प्रश्नाने भंडावलेली बाई. आयुष्यात करण्यासारखे काहीही उरलेले नाही अशा अवस्थेत स्वतःकडेच अलिप्ततेने आणि उत्सुकतेने पाहणारे आजोबा. या तीघांनाही काही एक प्रश्न पडले आहेत. ते त्यांची उत्तरे खोलात शिरुन शोधायचा प्रयत्न करताहेत. पण समाज आणि कुटूंब या दोन्ही व्यवस्था अशा शोधावर कसा प्रभाव टाकतात याचे हे विश्लेषण आहे.

अनिल पाटील यांचे 'पाताळयात्रा' वाचले.बळीराजाच्या काळातील त्रिशुळावर आधारित कथानक आहे.पाताळ व स्वर्ग
यांच्या सध्याच्या स्थानांबद्द्ल लिहिले आहे.सत्यासत्यता पडताळण्याच्या मोहात न पडता पुस्तक वाचनीय वाटले.

लायब्ररीत बघा.

आगावा, मस्त लिहिलंयस. 'उत्सुकतेने..' वाचायचं राह्यलंय माझं. आता वाचेन.

टोकूरिका,

पुण्यात असाल आणि औंध च्या जवळपास असाल तर मी माझ्या वाचनालयामधुन घेउन देउ शकतो.

नीधप लायब्ररीत नाहीये, म्हणूनच इथे विचारतेय,
अभिजित, मी मुंबईची आहे. Sad
खुप शोधतेय ते पुस्तक.अजून हाताला लागत नाही.

दादरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नक्की आहे. तिथे एक दिवसाची ५ की १० रूपये वर्गणी भरून, दिवसभर तिथे बसून कुठलेही पुस्तक वाचता येते.
कुठल्याही मराठी पुस्तकांच्या दुकानात ते पुस्तक उपलब्ध आहे. दादरला आयडीयल येथे बघा.

इफ टुमारो कम्स- हे सिडने शेल्डन चे विजय देवधर यांनी अनुवाद केलेले ५८४ पानी पुस्तक नुकतेच पुन्हा एकदा वाचले..बुद्धीमान ,सर्वगुणसंपन्न अशी ट्रेसी व्हीटने चुकुन गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवते..कारण काही माफिया गुंडांनी तिच्या आईची कंपनी व प्रोपर्टी लुबाडली म्हणुन तिच्या आई ने आत्महत्या केली ..ट्रेसी त्या गुंडांचा सुड उगवण्याचा असफल प्रयत्न करते पण तेच गुंड तिला नाहक तुरुंगात पाठवतात..तिथे ती आपल्या सदवर्तनाने लौकर सुटते पण गुन्हेगारीच्या जगात आपसुक गोवली जाते..आणि तिच्याबरोबर आपल्यालाही विविध देशांतील चित्तथरारक घटनांचा प्रवास घडतो..प्रत्येक वेळी काही नवी खेळी खेळील्याने पुढे काय होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम रहाते..

'मयादा"- इराकची कन्या व 'ब्लास्फेमी' अशी दोन पुस्तके वाचली.
मयादा ही जीन सॅसन यांची भारती पांडे यांनी अनुवादित केलेली कादंबरी.मयादा अल अस्करी या इराकी स्त्रीच्या वादळी आयुष्याची कहाणी.
तसेच ब्लास्फेमी ही भारती पांडे यांचीच अनुवादित कादंबरी.मूळ लेखिका तेहमिना दुर्रानी.
ही कथा दक्षिण पाकिस्तानातील एका तरुण मुलीच्या आयुष्यावर आधारलेली आहे.
दोन्ही पुस्तके वाचताना 'नॉट विदाउट माय डॉटर' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली.अर्थात तिनही पुस्तकांमधील कथानक जरी वेगळे असले तरी त्यामधे असलेले तीन स्त्रियांच्या आयुषयातील लढ्याचे सुंदर चित्रण मनाला चटका लावते.

Jeffrey Archer चे Sons of Fortune वाचले, पण अपेक्षाभंग झाला.कारण Not a penny more, not a penny less वाचल्यावर त्यांच्या सगळ्या कादंबर्‍या तशाच असतील असे वाटले होते. पण ही अगदीच कंटाळवाणी निघाली. Sidney sheldon चि Nothing lasts forever मात्र छान आहे.
Michael Crichton चे State of Fear पण छान आहे. Environmental issues वर खुप छान अभ्यास करुन पुस्तक लिहिले आहे. आणि सगळे reference papers पण मोठ्या Citation Index चे आहेत. ज्याना पर्यावरणात खरेच रस आहे त्यानी जरुर वाचावी अशी कादंबरी

केदार,

सानेवाडी मधे चितळे बंधू च्या शेजारी जगताप वाचनालय आहे १०० रु प्रतिमहिना. इंग्रजी व मराठी पुस्तके अगदी भरपुर आहेत.

आणि just in time, काका हलवाई चे दुकान माहित आहे का परिहार चौका जवळ ? तिथे Just books का असे काहि तरी हाय फाय वाचनालय आहे ४०० प्रतिमहिना.... ईथे सगळ्या भाषेतील पुस्तके आहेत.

हि दोन चांगली आहेत. बाकी छोटी वाचनालये भरपुर आहेत जशी कि पोलीस लाईन, गोल्ड जिम च्या समोर वगैरे......

हॅरी पॉटर वाचुन नंतर बराच काळ पोकळी आलेली होती. मध्ये एरॅगॉन , एल्डर वाचले होते, आता ब्रिसिन्जर, आणि इनहेरिटन्स वाचुन काढले पावोलिनीची ठीक ठाक आहेत.
ड्रॅगन आणि त्यावर बसणारा रायडर याबाबतचे फिक्शन आहे. टीनएजर्स साठी छान पण मलाही आवडलीत.

मी त्याची पहिली तीन जवळपास एका बैठकीत वाचलीत. पण इन्हेरिटंस मात्र पकड घेत नाहीये.
पुस्तक येऊन तीन आठवडे झाले तरी १०० पानेच झालीत जेमतेम Sad
आता त्या गोष्टीत काही नावीन्य वाटत नाहीये , तोच आपला सुष्ट / दुष्टांचा लढा, व्हार्डन मधले आपसातले हेवेदावे . हिंदी सिनेमा वाटायला लागलाय ...

राजन खान लिखित 'रस अनौरस' वाचतोय. हातात घेतल्यावर बाजुला ठेवता येत नाही असं पुस्तक बर्‍याच दिवसांनी मिळालं.

टोकूरिका | 14 January, 2012 - 10:27 नवीन
कुणाकडे ''कोल्हाट्याचं पोर'' हे पुस्तक मिळेल का?? ई-बूक सुद्धा चालेल.

>> @टोकूरिका, ईथे प्रयत्न करून बघ - http://www.friendslibrary.in/. हा एक खूप चांगला उपक्रम आहे. [http://www.friendslibrary.in/HowItWorks.aspx]

मी सध्या नार्निया सीरीज वाचतेय्.अफलातून आहे. साधीसरळ भाषा आणि निवेदनशैली, मला तरी प्रचंड आवडले. १५च्या आतील वयोगटाला तर खूप आवडेल.

मधे एकदा फायर थीफ म्हणून पुस्तक वाचले होते. (टेरी समथिंग नाव होते. आठवत नाही) त्याची निवेदनशैली एकदम वेगळ्या स्टाईलने होती. का कुणास ठाऊक? मला ते मधेमधे कॅपिटल लेटर्समधे लिहिलेले शब्द आवडले नाहीत. पण एकंदर पुस्तक चांगलं होतं.

कुणी हायवे ऑन माय प्लेट हे "पुस्तक" वाचले आहे? शो इतकेच माहितीपूर्ण आणि रंजक असेल तर मी मागवणार आहे.

Pages