मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

jahirat.jpg

शमा
गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्स
अपर्णा वेलणकरांनी अनुवाद करतांना खूप बदलले आहे,विपर्यास केला आहे,डिस्टॉर्ट केले आहे

नुकतीच वाचलेली दोन पुस्तके:

Descent into Chaos: The world's most unstable region and the threat to global security - अहमद रशीदः

मध्य आशिया (म्हणजे उझबेक, ताजिक, तुर्कमेन, किरघिझीस्तान), अफगाणिस्तान व पाकिस्तान तालिबानबद्दल थोड्या उत्सुकतेने वाचणार्‍यांना अहमद रशिद हे नाव अपरिचीत नसावे. ह्या भागातील राजकारणावर त्यांच्यापेक्षा अधिक माहिती असणारा क्वचितच सध्या कोणी आहे. तालिबान, जिहाद ह्या त्यांच्या दोन प्रमुख पुस्तकांनंतर त्यांनी डिसेंट इनटू केऑस हे पुस्तक लिहिले. अफगाणिस्तानात अमेरिकेचा लष्करी प्रवेशापासूनच्या घडामोडींनी सुरू होऊन बेनझिर भुत्तोंच्या हत्येपर्यंतचा प्रवास ह्यात मांडला आहे. जसे जसे आपण पुस्तक पुढे सरकते तसे अफगाणिस्तान व पाकिस्तानातील फटा (FATA - Federally Administered Tribal Areas) प्रांतांमधली सीमारेषा धुसर होत जाते व हे पुस्तक संपूर्ण अफगाण + फटा + पाकिस्तानचे उत्तर-पश्चिम राज्य (NWFP - north west frontier province ज्याची पेशावर राजधानी आहे. हे पाकिस्तानचे एक राज्य आहे तर फटा हा पाकिस्तानने सांभाळलेला असला तरी सार्वभौम प्रांत आहे) ह्यांचा पट आपल्यासमोर मांडते.
युद्धाच्या सुरुवातीला असलेला अफगाणी जनतेचा पाठिंबा, बुश प्रशासनाची छुपी इच्छा असलेला इराक हल्ला, संस्कृतीच्या झगड्यांच्या काचेतून जगाकडे बघणारे अमेरिकेचे नव-सनातनी (neoconservative) चेनी, रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ ह्यांचे परराष्ट्रकारण (बाकी देशांची परराष्ट्रनिती असते कारण एकतर ते फारसं काही करत नाहीत, फक्त कागदावर असते त्यामुळे थोडेफार नितीमय असते. अमेरीका प्रत्यक्ष हस्तक्षेप करते व निती हा शब्द तिच्या परराष्ट्रखात्यात हद्दपार आहे), पाकिस्तानी लष्कराने खाल्लेली मलई वगैरे अत्यंत विस्ताराने येते. अत्यंत माहितीपूर्ण असे हे पुस्तक आहे.
मला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटले ती अहमद रशिद ह्यांनी निर्भिडपणे केलेली टिका - तालिबान + अमेरिका + पाकिस्तानी लष्कर. अहमद रशिद ह्यांना जीवे मरण्याची भिती असून देखील त्यांनी आपल्या देशावर वस्तुनिष्ठ टिका केलेली आहे. ह्याउलट भारतात लष्करावर व गुप्तहेर संस्थांवर टिका करणे हे जवळपास नाहीच. (आज १३-ऑगस्ट इंडियन एक्प्रेसमध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारचा लेख वाचनात आला. शेखर गुप्तांनी ६५च्या युद्धातल्या भारताच्या हवाई दलाच्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी केलेली आहे.) लोकशाहीची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या देशात काश्मिर/उत्तरपुर्व ह्या खदखदत्या समस्या समोर असताना व शेजारच्या पाकिस्तानाचा धडा असताना असे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे गरजेचे आहे असे अजूनच वाटू लागते.
पुस्तकातील मतांवर दुमत असू शकते, करझाईंना थोडे अधिक सफेद केल्याचे जाणवते पण काही अपवाद वगळता रशिद खूप अलिप्तपणे लिहीतात. पण त्यांची कळकळ पदोपदी जाणवते. राष्ट्र उभारणीचा शून्य प्रयत्न करीत अमेरिकेने आजचा अफगाणिस्तान नव्वदीतल्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक धोकादायक व पुढच्या लष्करी हस्तक्षेपात अधिक बिकट बनवलेला आहे. त्याचबरोबरीने पाकिस्तानचा अफगाणिस्तान करून अजून परिस्थिती नाजूक केलेली आहे.
भारतीय उपखंडात राहणार्‍या आपल्या सर्वांच्या खाली जो ज्वालामुखी खदखदतोय त्याची संहारकता काय आहे व तो काय गिळणार आहे ह्याची अनामिक भिती पुस्तक हातातून ठेवताना वाटून गेली.

From Fatwa to Jihad: The Rushdie Affair and Its Legacy - केनन मलिकः
अयातुल्ला खोमेनीच्या सलमान रश्दींना मारण्याच्या फतव्याच्या घटनेपासून आज आलेल्या विविध धर्माच्या रुढी-परंपरांना/संवेदनशीलतांना धक्का लागू नये म्हणुन घेतलेल्या स्व-सेन्सॉरशिपपर्यंतचा प्रवास ह्या पुस्तकात मांडण्याचा केनन मलिकनी प्रयत्न केला आहे. पुस्तकाचा आवाका मुख्यत्वेकरून ब्रिटन असून ब्रिटनने (मध्यवर्ती सरकार तसेच विविध म्युनिसिपाल्ट्यांनी) अंगीकारलेली बहुसांस्कृतीक निती (multicultural policy) ह्यावर ते सडकून व पुराव्याने टिका करतात. पण पुढे पुढे त्यांचा युक्तिवाद निसरड्या वाटेवरून गेला आहे. बहुसांस्कृतीक निती ही समाजास तडे जाण्यास कारणीभूत होती हे निर्विवाद आहे आणि युरोपातल्या अनेक देशांनी हे आता उघडपणे मान्य करण्यास सुरुवात केली आहे. पण मलिकांचा युक्तिवाद असा आहे की दुभंगलेला समाज, धर्माधिष्ठीत ओळख-निष्ठा इत्यादींचे मूलभूत कारण हे प्रशासनाने अवलंबलेली ही निती आहे. ह्या त्यांच्या निश्कर्षाला पाठिंबा देण्यासाठी ते हंटिग्टन प्रभृतींच्या संस्कृतींच्या झगड्याच्या सिद्धांताला (clash of civilizations) खोटे पाडायला बघतात. आणि त्यासाठी मग सामान्य मुस्लिम वा शीख वा अजून एखाद्या धर्माचा मनुष्य कसा फक्त वैयक्तिक आयुष्यात धार्मिक असतो पण सामाजिक आयुष्यात सेक्युलर असतो वगैरे उदाहरणे येऊ लागतात, पण ती बालिश व उथळ वाटतात.
Clash of civilizations चा बुश प्रशासनातल्या neo-conservative गटाने हवा तसा वापर केल्याने तो सिद्धांत डागाळलेला आहे. तसेच हा सिद्धांत मनुष्यसमाजाला पुन्हा मध्ययुगात घेउन जातो. पण जागतीक संबंधांवरचा हा सिद्धांत जगाची दिशा ठरवणारा आहे की ज्या दिशेने जग चालले आहे ती केवळ दर्शविणार/उकलून सांगणारा आहे? माझ्या मते हा सिद्धांत जे होते आहे ते केवळ उकलून सांगतो. त्यास नाकारणे म्हणजे शहामृगाप्रमाणे वाळूत मान खूपसून बसण्यासारखे आहे.

धन्यवाद टण्या. पहिले पुस्तक वाचेन.
(अ‍ॅमेझॉनवर एकच स्टार दिलेले या पुस्तकाचे रिव्ह्यू वाच. Happy )

Descent into Chaos प्रकाशित झाल्यावर लगेच कुपर्टिनो लायब्ररीत मिळाले होते त्यामुळे तेव्हाच वाचायला मिळाले होते. पाकमधला कोणी इतकी थेट टीका करू शकतो याचे आश्चर्य वाटले होते. अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.

"सर्व प्रश्न अनिवार्य" वाचले. निशाणी डावा अंगठाचेच लेखक. पहिल्या वाचनात अर्धेच कळाले. कारण यात दोन स्वतंत्र टोन असलेले धागे आहेत - एक म्हणजे दोन मास्तरांची शिक्षणातील भ्रष्टाचाराबद्दल चर्चा आणि दुसरा म्हणजे त्या दोघांपैकी एकाचे वाचकांना उद्देशून असलेले स्वगत. हा दुसरा धागा समजायला वेळ लागतो - काही ठिकाणी तर मी स्किप करून पुढे गेलो, कदाचित त्यामुळेच कळाले नाही. त्या मास्तरांची जी कथा आहे ती मात्र धमाल आहे, बरेच विनोदी किस्से आहेत, नक्कीच भरपूर हसवतील. पण हे किस्से एक टोन सेट करतात आणि ते स्वगत वेगळ्याच लेव्हल ला असल्याने गडबड होते.

पुस्तकाचा केवळ तेवढाच उद्देश नसला, तरी बर्‍याच ठिकाणी ते किस्से खूप हसवतात हे नक्की Happy

फार एन्ड अगदी बरोबर. डावा अंगठा पेक्षा सिरिअस विषय असताना फॉर्म मध्ये बदल केल्याने प्रकरणाआड त्याला मोनोलॉगचे स्वरूप आले आहे.इतरत्रही दोन शिक्षकांच्या माध्यमातून नाटकातल्या सूत्रधाराने गोष्ट पुढे न्यावी तसे वाटत राहते. बाकी कॉपी संस्कृती कादम्बरी असल्याने सगळ्याच शिक्षण आणि मूल्यमापन पद्धतीविषयी --विशेश्तः ग्रामीण भागातील --गंभीर प्रश्न उपस्थित करून पुस्तक अस्वस्थ करतेच करते. फॉर्म अनकम्फर्टेबल आहे मीही स्किप करूनच वाचले. मधली प्रकरणे वैचारिक निबंधासारखी वाटतात...

चेतन भगत चे 2 स्टेट्स वाचले नुकतेच.......खूप छान आहे. ऑटो मध्ये हे पुस्तक वाचत असताना एका १८-१९ वर्षाच्या मुलाने मला विचारले,'' यु जस्ट स्टार्टेड रिडीन्ग धिस बुक?'' ''यॅह'' ईती मी.
'' आय हॅव्ह रेड इट थ्राईस'' असे बोलुन तो उतरून गेला. आणी मग मनात म्हणाले त्याला बोलायला हव होत आपण की आता चौथ्यान्दा वाचायला सुरूवात कर म्हणून........ आपण मागे पडायला नको....... म्हणून पुन्हा डोस्क बूकात घातलन.

मी लहानपणी माझ्या मित्राकडून "मुलखावेगळा ईसाप" हे पुस्तक बर्याचदा आणून वाचत असे. त्यावेळी लेखकाचे नाव इत्यदी बघण्याची अक्कल नव्हती. नंतर मी ते बरच शोधलं पण सापडले नाही. त्यात ईसापाने एका बादशहाकडे असताना आपल्या हुशारीने घडवलेले बरेचसे किस्से होते. साधारण बिरबला सारखे. मला प्रचंड आवडायचे ते. बर्यापॅकी मोठे पण होते. त्याचे मुखप्रुष्ट, रंग सगळं लक्शात आहे लेखकाचं नाव सोडुन. ईथे कोणाला महिती असेल का?

अरूण शौरीचे मिशनरीज इन इंडिया वाचतेय.
त्याआधी भारतीय लोककथाचे एक इंग्रजी पुस्तक वाचले. अफाट आणि भन्नाट लोककथा आहेत यामधे. तीन चार वेळेला तरी वाचले असेल मी हे पुस्तक.

विश्राम गुप्त्यांचं 'नारी डॉट कॉम' वाचलं. एकदा वाचून काही गोष्टी कळल्या नाहीत म्हणून दुसरयांदा वाचलं. स्त्री-चारित्र्याबद्दलच्या चिरंतन प्रश्नांना उत्तरातून नव्हे तर नव्या प्रश्नांतून भिडणारी कादंबरी असं या कादंबरीचं वर्णन करणं संयुक्तिक होईल.मलातरी मुक्ततेच्या कल्पनांना सेक्स सेंट्रीक मानून उहापोह करण्याचा आणि चारित्र्याचा प्रोटोटाईप बनवायचा हा प्रयत्न आहे, असं वाटलं.
मला बरयाच गोष्टी खटकल्या, बराच भाग गंडलेला वाटला आणि मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न असा की:

पुरुष असो वा स्त्री, चारित्र्य ही कल्पना त्यांची स्वत:ची असते की समोरच्याची म्हणजे बघ्याची/थर्ड पार्टीची?
"माझं चारित्र्य अमुकठमुक कृतीने डागाळलं हो!" असं एखाद्या व्यक्तीला बोलताना मी पाहिलेलं नाहीये आणि असं कोणीच बोलत नाही. प्रत्येकाकडे त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचं सॉलिड रिझनिंग असतं, त्याच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन त्याच्याकडे असतं त्यामुळे प्रत्येकाच्या लेखी तो/ती स्वत: चारित्र्यवान असतो/असते. त्यामुळे चारित्र्य मलिन किंवा कसंही असण्याचा दावा नेहमी कोणीतरी ’दुसराच’ करत असतो हे खरं.
मग अशा कायम ’दुसरयाला वाटत असणरया कहीतरी’ या इतक्या व्होलेटा‌इल कल्पनेला एका सुबक व्याख्येत बसवायचा प्रयत्न का चालतो? त्याची खरंच गरज आहे?

असं असलं तरी एका वेगळ्या विचाराकरता एकदा वाचावं असं पुस्तकेय.

सध्या पाडस - अनुवाद राम पटवर्धन (मार्जोरी किनन रौलिंगस) हे पुस्तक वाचतोय.
याआधी वाचलेलं पण आता नव्याने हाती आलंय.
इतकं गोड पुस्तक आहे की हातून सोडवत नाही!

मीना प्रभुंचे वाट तिबेटची नुकतेच वाचले. मस्त आहे. तिबेटचा ईतिहास आणि वर्णन ईतके छान दिलेय

वाट तिबेटची मीही वाचले. तिबेटची फारच छान माहिती आहे. पण हवाई बेट ह्या पुस्तकात उगाच घुसाड्ल्या सारखी वाटतात. चीन आणि तिबेट बद्दल वाचताना मजा येते, पण सांस्कृतिक दृष्टया काहीही जवलिक नसतांना, हवाई बेटा बद्दल उगाचच माहिती दिली आहे. वाचायला मजा येते, पण ती माहिती ह्या पुस्तकात अप्रस्तुत वाटते.

हे सोडले तर मीना प्रभुंची सगळ्याच पुस्तकांची परायणे झाली आहेत. अतिशय गुंगवून टाकणारी शैली आहे. आपले बोट धरून तिकडे फिरवून आणतात.

अतिशय गुंगवून टाकणारी शैली आहे. आपले बोट धरून तिकडे फिरवून आणतात.>>>>>> अगदी अगदी. असं वाटतं त्यांच्याबरोबरच फिरायला चाललो आहोत.

१. शोभा बोंद्रेंचे "लागोस चे दिवस" . अप्रतिम ...दूसरा शब्द नाही. एकुणच लागोस आणि तेथील एकुणच परिस्तिथि फारच छान लिहिली आहे. अफ्रीकन मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा, लागोस मधले नाटक वेडे, तिथली राजकारणी मंडळी, असा छान पसारा मांडला आहे.

२. लेखक : हर्षद सरपोतदार , पुस्तक : मंतरलेला इतिहास ... अप्रतिम...अप्रतिम....अप्रतिम.... दूसरा शब्द नाही. विस्मृतीत गेलेला इतिहास. झाशीच्या राणीचा मुलगा, मस्तानिचे वंशज , दुलीप सिंह ( कोहिनूर हिर्याचा शेवटचा मालक), ताई तेलीन, रंगों बापूजी, इतिहासातील मस्तवाल बाईका, इरसाल पुरुष, जहाम्बाज लोक, देश विकणारे लोक, शिफारस पत्र, इ. इ. इ....... माहीत नसलेला इतिहास आपल्या समोर उलगादतो. काही माहिती तर आजच्या कालाला धरून आहे. मस्तानिचे वंशज अजुनही आहेत, झाशीच्या राणीच्या मुलाचे थेट वंशज आजुनही " झंशिवाले" हे आडनाव लावून रहात आहेत. असे महत्वाचे उल्लेख आहेत. एकदा वाचायला घेतले की खाली ठेवताच नाही.

३. लेखिका : प्रोतिमा बेदी. पुस्तक : बिनधास्त ---- नाव प्रमाणे जीवन जगणारी प्रोतिमा. तीच जगणे, तिचे नृत्य, तिची जीवनाची आसक्ति, तिचा हलवा स्वभाव, चंचल मन, अनेक पुरुषांशी एकाच वेळी बांधिलकी असणारी, रुढ़ अर्थाने बदनाम तरीही अतिशय प्रतिभा असणारी, उत्कृष्ट कला सादर करणारी व्यक्ति. बेबंद आणि बेलगाम आयुष्य. आपल्या हाताने आयुष्य उधलनारी, तरीही सतत अतृप्त असणारी, नृत्यात आपला आत्मा शोधणारी, प्रेमाची भिक सतत मागणारी, एक स्त्री. एकाच व्यक्तिमत्वाची अनेक रूप. जीवन कसे नसावे ह्याचे चलते बोलते उदहारण. त्याच बरोबर ध्यास कसा असावा, कमिटमेंट म्हणजे काय, आणि ध्येय पूर्ति साठी काहीही पणाला लावणारे आयुष्य ह्याची व्याख्या. खरच फारच वेगले व्यक्तिमत्व. त्या वेळच्या मुंबई मधील elite क्लास मधले आयुष्य हयात दिसते.

लेखिका: अपर्णा वेलणकर : for here or to go अप्रतिम पुस्तक , मिळाल तर जरुर वाचा. अमेरीकेत गेलेल्यानी तर वाचण्यासारखे.

अनिल अवचट : goshta muktanganchi वाचण्यासारखे आहे.

रहस्यमय...थरारक असे काही पुस्तके आहेत का......जी खरोखरच छान असतील वाचन्या जोगी..... कोणी माहीती देयील का

रत्नाकर मतकरी यांच्या भय कथा : रंगान्धाला , खेकड़ा, बघ टोले पडतायत, मध्य रात्रीचे पडघम, गहिरे पाणी

लेखिका आठवत नाही. पाहिले नाव स्नेहल -- पुस्तक : प्लान्चेट

मला मराठी मधलीच हवीत.......... Happy
इग्रजी नकोत..... Happy घरातल्यानां वाचायला देता येनार नाहीत....... Happy

हॉट झोन मस्त पुस्तक आहे. व्हायरस ची एव्हढी माहीती छान कुठेच नाही. आमच्या विषयातलं पुस्तक वाचुन बरे वाटले.

sobat chyaa maajagaavkaraanche aatmcharitr faar chaan aahe w sfotak sudhda

जगन्नाथ कुंटे च "नर्मदे हर जबरदस्त पुस्तक.तसेच गौरि देशपांडे च विंचुर्णि चे धडे हे पनछान पुस्तक

शीना अयेंगारनी "art of choosing" हे पुस्तक लिहिले आहे...जमले तर जरूर वाचा/ऐका.. मस्त आहे.. आपण निवडतो म्हणजे काय करतो...का निवडतो.. काय काय गोष्टी विचारात घेतो.. भारत/चायना (asian) आणी अमेरीकन हे का वेगळे निवडतात.. काही प्रयोग केले होते.. त्याच्या विषयी ही लिहिलेले आहे..

Pages