मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर-याच दिवसानि ग.ल. ठोकळ यांच्या क्था वाचल्या पुर्वि चा काळ च उभा ठाकला.हे फार जुने लेखक म्हणजे
पु.भा. भावे, माडगुळकर यान्च्या बरोबर चे त्याचि पुस्तके हल्लि मिळत सुध्दा नाहित.

चिनुक्स,
<<आत्मचरित्र' असंच आहे. उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केला आहे.>> मग "माझे नाव भैरप्पा" कोणाचे आत्मचरित्र आहे? की ते अनुवादाचे नाव आहे?

माझे नाव भैरप्पा हे अनुवादाच नाव आहे पुस्तक लै भारि.. बाकि भैरप्पा लम्बि रेस का घोडा आहे.
त्यांच वंश वेल अप्रतिम. एकदम म्रुत्युंजय चि आठवण होते.

अश्वीन संघीचे ' Chanakya's Chant' वाचले. ऑल्टरनेट चाप्टर्स विष्णुगुप्ताचे आहेत, तर बाकी आजचे. फास्ट पेस्ड आणि बरेच काही सांगणारे. छान आहे (पण उत्कृष्ठ म्हणणार नाही). UTV ने इत्क्यातच त्याचे सिनेमा हक्क खरेदी केले आहेत.

ह्या चांगल्या कांदबरया कुठे नेट वर आहेत का ? माहिती असल्यास सांगावे.. वाचण्याचि प्रंचड आवड आहे..

ह्या चांगल्या कांदबरया कुठे नेट वर आहेत का
>>
अशा कादम्बर्‍या कुठे नेटवर असतात काय? त्या पुस्तकाच्या दुकानात मिळतात...

बाळू जोशी. त्या दुकानात तर मिळतात... हो Happy पण आमच्या सार खे देशा पासुन दुर राहाणारे जे त्या पासुन वंचीत आहेत पण वाचनाची खुप जास्त आवड असण्यार्या ना काही पर्याय आहेत ... का तेच विचारण्याचा एक प्रयत्न होता...

रश्मि बन्सल चे " स्टे हन्ग्रि स्टे फुलिश" हे आईआईएम अहमदाबाद च्या विद्यार्थ्यांनी ज्या वेगळ्या वाटा चोखाळल्या त्या वरील छान पुस्तक आहे. उद्योजक कसा घडतो, त्या वेडा सम्बन्धी हे पुस्तक चांगली माहिती देते. गूगल वर आहे हे.

तहमीना दुर्रानी चे "ब्लासफेमी" परत वाचले. अंगावर परत काटा आला. गुगालुन पहा. अतिशय जीवघेणे पुस्तक. खरी गोष्ट आहे, त्या मुळे विश्वास ठेवावाच लागतो. पाकिस्तानात ह्या पुस्तकाने हलकल्लोळ झाला होता.

>>> तहमीना दुर्रानी चे "ब्लासफेमी" परत वाचले. अंगावर परत काटा आला. गुगालुन पहा. अतिशय जीवघेणे पुस्तक. खरी गोष्ट आहे, त्या मुळे विश्वास ठेवावाच लागतो. पाकिस्तानात ह्या पुस्तकाने हलकल्लोळ झाला होता.

हे पुस्तक २-३ वर्षांपूर्वीच वाचलं होतं. वाचून वाईट वाटलं आणि चीडही आली. गेल्या काही वर्षांत इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सोमालिया, बांगलादेश इ. देशातील महिलांनी शब्दबद्ध केलेल्या कहाण्या वाचल्या. वाचून तिथल्या राज्यव्यवस्थेची, मागासलेल्या कट्टर विचारसरणीची व तिथल्या जनतेची अतिशय चीड येते व या महिलांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याबद्दल खूप वाईटही वाटतं.

धन्यवाद.. नीधप....मोहन कि मीरा

ब्लासफेमी मी पण वाचले आहे.. खरच खुप च वाईट वाटत ... रडु येत....

नन्दिनि मन्द्र पण चान्गल आहे
.र्तुशार्थ साधक हे पण एका अमेरिकन ज्यु चे अध्यत्मिक यात्रे चे रंजक चित्रण आहे.

नुकतेच डॅन ब्रावून यांचे 'डिसेप्शन पॉईंट' वाचुन पुर्ण केले. एकदा वाचायला सुरवात केली की हातातून खाली ठेववतच नाही...
अत्यंत अभ्यासु आणि मेहनती लेखकाची निर्मिती असलेले हे पुस्तक वाचताना डोळे पुस्तकामधे नुसते खिळून राहतात
drumming.gif

समस्त प्राणिमित्रांसाठी: James Herriot हे एक इंग्रजी पशुवैद्य होते. यॉर्कशायर प्रांतात त्यांनी अनेक वर्ष practice केली. त्यांनी अतिशय सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. उदा.

1. All creatures great and small
2. All things bright and beautiful
3. Every living thing
4. The lord God made them all.

त्यांची साधीसरळ भाषा, आणि थोड्या विनोदी शैलीत पण अतिशय प्रांजळपणे लिहिलेले अनुभव फारच सुंदर आहेत.

कुणी John Boyne चे The boy in stripped pyjamas हे पुस्तक वाचले आहे का? मी आठ,दहा दिवसापूर्वी झी स्टुडीओवर डोळ्यातल्या पाण्याला थोपवत हा चित्रपट पाहीला.नाझींनी ज्यूंवर केलेल्या अत्याचारांची कहाणी आहे.दोन आठ वर्षांची मुले एक जर्मन एक ज्यू ह्यांच्या मैत्रीची कहाणी आहे.जर्मन बाहेर आणी ज्यू फेन्सच्या आत कैदेत.शेवट तर अगदी कारुणीक आहे.पण अगदी वेगळा्आ सिनेमा यू ट्यूबवर आहे.पण आता पुस्तक वाचायचे आहे.

व्यंकटेश माडगूळकरांचे 'सत्तांतर' वाचले. यास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय असे कलाले होते. वानरांच्या जीवनशैलीला केंद्रित ठेवून ही कादंबरी लिहिलीय. एका टोळीचे एका नराकडून दुसर्‍या नराकडे होणारे सत्तांतर, टोळीतील वानरांच्या स्वभावावरुनच त्यांची असणारी नावे, त्यांचे स्वभाव हे जबरदस्त चित्रित केलेय. काही प्रसंग तर आपण जणू जंगलातच आहोत असे वाटायला लावतात.

माडगूळकरांचे बनगरवाडी नंतर हे दुसरे पुस्तक वाचले. त्यांची निरिक्षणशक्ती अचाट आहे, प्राण्यांचे स्वभाव-वैशिष्ट्य लेखनात उतरवणे मस्तच आहे. या पुस्तकाचा शेवट पण सही आहे, ओपन एंडेड म्हणतो ना तशी. छोटीशीच आहे १००-१२५ पानांची पण आवर्जून वाचावी अशी आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच भारतात आढळणार्‍या वानरांच्या जातीबद्द्ल आणि त्यांवर झालेल्या संशोधनाबद्दल चांगली माहिती आहे.

आगाऊ,अनुमोदन. सुन्न करून जातं हे पुस्तक. सिनेमामधे तर क्लायमॅक्स अशा अनपेक्षित वेळी येतो की त्यानंतर अक्षरश: शहारून उठतो.

मी सहसा इथे ब्रँडिंग अथवा मीडीया रिलेटेड पुस्तकांबद्दल लिहत नाही. फारच बोर अस्तात असली पुस्तकं. पण सहज एक आवडलं म्हणून लिहितेय मीडीया मोनोलिथ्स हे मार्क टन्गेट या ब्रिटिश जर्नालिस्टच हे पुस्तक. जगभरामधल्या विविध माध्यमामधल्या ग्लोबल ब्रँड्सची गोष्ट सांगणारे हे पुस्तक. सीएनएन, बीबीसी, फायनान्शिअल टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, व्होग, ईकोनॉमिस्ट, प्लेबॉय, एम टीव्ही अशा वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सचा प्रवास, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटजी आणि विस्तार हे सर्व या पुस्तकात आलय. साधारण अशी पुस्तकं आकडेवारी, ग्राफ्स, चार्ट्स असं बरंच काही दाखवत कन्फ्युज करतात. हे पुस्तक एका जर्नालिस्टच्या नजरेतून असल्याने ब्रँडची "स्टोरी" आपल्याला समजते.

लेखक ब्रिटिश असल्याने अर्थात ब्रिटिश ब्रँड्सना महत्त्व जास्त आहे. पण तरी एकंदरीत जगभरातील मीडीया ब्रँडची उत्तम माहिती मिळते. पुस्तक २००६ सालाचं असल्याने ऑलरेडी आऊटडेटेड झालेलेच आहे. तरी वाचणेबल. Happy

rich dad poor dad

व्यंकटेश माडगूळकरांचे 'सत्तांतर' वाचले

>>> हे पुस्तक म्हणजे वाड.मयीनचौर्य नव्हे दरोडेखोरीचे उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक माडगुळकरांनी जसेच्या तसे ढापले आहे.तिला साहित्य अकादमीचा पुरकार मिळाल्यावर त्यावेळी या प्रकरणाने गहजब उडाला होता. चित्रे स्वतः माडगूळकरानी काढली आहेत एवढेच.या पुस्तकाने माडगूळकरांची जी प्रतिमा मलिन झाली ती झालीच. माडगूळकरांच्या जीवनावर त्यांचा पर्दाफाश करणारी एक कादम्बरी ही आनन्द यादवानी लिहिली.

माडगूळकरांच्या जीवनावर त्यांचा पर्दाफाश करणारी एक कादम्बरी ही आनन्द यादवानी लिहिली.

कलेचे कातडे

माडगूळकरांचा शाप यादवाना लागला आणि त्यांच्या तुकारामाच्या पुस्तकाचे लफडे झाले.. Proud

त्यांच्या तुकारामाच्या पुस्तकाचे लफडे झाले
>>
तो प्रकार दुर्दैवी खराच. त्यात सगळ्यात डॉ सदानन्द मोरेंची भूमिका आश्चर्यकारक आणि दुर्दैवी होती. स्वतः मोरे हे एक संशोधक आणि चिकित्सक लेखक आहेत. (तुकारामाचे वंशज आहेत हा भाग वेगळा..)मोरेंनी कुठला तरी विद्यापीठातला 'हिशोब' चुकता केला असे मला वाटते. अन्यथा ह्यापेक्षाही 'आक्षेपार्ह' लिहिणार्‍या रंगनाथ पठारेंबद्दल मोरे काही बोलल्याचे ऐकिवात नाही ....

बा.जो.
नंतरच्या आवृत्तीमधे प्रस्तावनेत माडगुळकरांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पटण्यासारखेपण आहे. [हे फक्त सत्तंतर बद्दल]

सत्तांतर हे पुस्तक एका इंग्लिश कादंबरीवर आधारीत आहे. मूळ इंग्लिश पुस्तक आहे "Langurs of Abu".

Lisa scottaline चे Moment of Truth आणि Mistaken Identity वाचले. दोन्ही पुस्तकं आवडली. ही लेखिका लेडी जॉन ग्रिशम म्हणुन नावाजलेली आहे. अर्थातच दोन्ही लीगल थ्रिलर आहेत.

James Herriot हा तुलनेने अप्रसिद्ध लेखक अगदी मस्त लिहितो. दुसरा Wodehouse च.

Pages