मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीना कर्णिकांनी केलेला 'बिटर चॉकलेट' या पुस्तकाचा अनुवाद वाचतेय. मूळ लेखिका पिंकी विराणी. लहान मुलांच्या शोषणाबद्दल हे पुस्तक आहे. अक्षरशः वाचवत नाहीये. आकडेवारी आणि केसेस दोन्ही भयंकर आहेत.
वास्तव असलं तरी पुस्तकाचा उद्देश काय नक्की हे मात्र मला कळत नाहीये.
पालकांनी सजग रहावे, मूल काय सांगायचा प्रयत्न करतंय ते नीट ऐकावे, मुलावर विश्वास ठेवावा आणि मूल सगळ्या गोष्टी विश्वासाने आपल्याला सांगेल हे बघावे इथपर्यंत ठिके.
हे पुस्तक अनेक टेन्शनमूर्ती आयांना पॅरॅनॉइड करेल आणि अति काळजी व संरक्षण यामुळे पालक व मूल यातला सुसंवाद, घरातले स्वास्थ्य आणि मुलाची निकोप वाढ हे सगळंच हरवून बसेल की काय अशी शंका येतेय.
पालकांनी आणि मुलांनी सजग रहायचंय की घाबरून जगायचंय?
एखाद्या जोडप्याने हे पुस्तक वाचून मूल नकोच असा निर्णय घेतला तरी आश्चर्य वाटायला नको.

पण वास्तवाकडे डोळेझाक पण करून चालणार नाहीये हे ही तितकंच खरं आहे.

निलिमा

पिन्की विराणी चे पुस्तक वेगळे आहे
लिन्क

recommendbooks.blogspot.com/2010/05/bitter-chocolate-by-pinki-virani.html

निलिमा, पिंकी विराणीचे पुस्तक हे पूर्णपणे भारतीय अनुभवांवर आधारीत आहे. लहान मुलांच्या विविध प्रकारे केल्या जाणार्‍या शोषणासंदर्भाने आहे. चॉकलेटस बद्दल नाहीये.
http://www.mouthshut.com/product-reviews/Bitter-Chocolate-Pinki-Virani-r...
हे बघ.

तू म्हणतीयेस ते पुस्तक खरोखरीच्या चॉकलेटसवरच आणि कोको इंडस्ट्रीवर आहे. लहान मुलांच्या शोषणाबद्दल नाही. त्या अ‍ॅमेझोनच्याच लिंकमधे पुस्तकाचे वर्णन आहे.
"A shocking exposé of the little-known corruption and exploitation found at the heart of the multibillion-dollar cocoa industry—blood diamond for chocolate."

पूर्ण माहिती करून घ्यायच्या आधीच चुका काढायची केवढी ती घाई! Lol

मी ज्याबद्दल म्हणतेय त्या पुस्तकाची अ‍ॅमेझॉनवरचीच ही लिंक
http://www.amazon.com/Bitter-Chocolate-Child-Sexual-Abuse/dp/0140298975/...
बिटर चॉकलेट असं अ‍ॅमेझॉनवर सर्च केलं ना की तिसरं लिस्टींग येतं या पुस्तकाचं.

मी आज सलील कुलकर्णींचे 'लपविलेल्या कांचा' वाचले.सलील नुसता उत्तम गायकच नाही तर संवेदनशील लेखकही आहे. स्फुटवजा लेखन असूनही हृदयास स्पर्श करून जाते.

नुकतेच डायमंड या पुण्याच्या प्रकाशकाचे "स्टीव्ह जॉब्झ"=वॉल्टर आयझॅक्सन/ चे मूळ इंग्रजीतून मराठीत भाषांतर झालेले "स्टीव्ह जॉब्झ" अधिकृत चरित्र्-अनुवाद/ डॉ.विलास साळुंके -वाचले.खूप वेगळी शैली असून जॉब्झ च्या जीवनाचा व कार्याचा तसेच व्यक्ति म्हणून उहापोह केलेला आहे.वाचनीय!! अजून कोणी वाचले असल्यास अभिप्राय द्यावा.

नी, मी वाचलंय बिटर चॉ़कलेट. माझंही बरंचसं तुझ्यासारखंच मत झालं. माझ्या मते अगदी गंभीर वास्तव, हादरवून टाकणारी आकडेवारी हे सगळं असलं तरी ते फार भडकपणे मांडलंय. अगदी स्पष्टच बोलायचं तर ते वाचताना मला क्षणभर वाटून गेलं की एखादी पिडोफाईल व्यक्ती सुद्धा अगदी हे पुस्तक 'एन्जॉय' करेल. सर्रकन काटा आलेला असं वाटल्यावर. पण तशाच 'सनसनाटी/ प्रक्षोभक' शैलीत लिहिलंय ते. मराठी अनुवाद कसा आहे ते माहित नाहीये. Sad

अनुवाद म्हणून चांगलाय गं. पिडोफाइल एन्जॉय करेल अश्याइतकं भडक नाही वाटलं पण तो अंदाज तरी कसा येणार म्हणा..
सावध रहाणं आणि पॅरॅनॉइड होऊन रोगट जगणं यात फरक आहे हे लिहिणारी विसरलीये. अर्थात तिने(पिंकी विराणी) खूप वाईट भोगलंय लहानपणापासून त्यामुळे असेल कदाचित.

बिटर चॉकलेट मी काही वर्षांपूर्वी वाचलं होतं आणि झोप उडाली होती कित्येक दिवस. हे असं जग खूप अनोळखी होतं. पुस्तक वाचल्यावर पॅरेनॉइड नाही झाले मात्र जास्त सावध झाले हे नक्की. मुलींनाही बर्‍याच सावधपणाच्या गोष्टी त्यानंतर समजावता आल्या होत्या.

पिकी विराणीने अरुणा शानभागवर लिहिलेलं पुस्तकही अत्यंत अस्वस्थ करुन सोडतं.

किनुआ अकेबे (Chinua Achebe) या नायजेरिअन लेखकाचे 'थिंग्ज फॉल अपार्ट' हे जबरदस्त पुस्तक नुकतेच वाचले. अफ्रिकन साहित्यात या पुस्तकाचे वरचे स्थान आहे. एका खेडेगावातील जमात, त्यांचे नियम, रितीरिवाज,धर्म या सगळ्याची माहिती कथानायकाच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू उलगडते. त्यांच्या जीवनाच्य लयीसारखीच पुस्तकाची लयही शांत, संथ. आणि मग अचानक ब्रिटीश मिशनर्‍यांच्या आगमनानंतर होणारी अपरिहार्य उलथापालथ , थिंग्ज फॉल अपार्ट!
कुठलीही एक बाजू न घेता, अलिप्तपणे; देवसंकल्पना, धर्म, संस्कृती, समाजनियम, श्रद्धा, न्याय-अन्याय, पाप-पुण्य हे सगळेच किती प्रचंड 'रिलेटीव्ह' आहे हे स्पष्टपणे दर्शवणारी कादंबरी

अर्रे, आगाऊ, माझं एकदम आवडतं पुस्तक. माझ्या टॉप टेन मधलं. इतकं संयत भाषेत लिहिलंय - ते सगळ्या जमातीचंच विश्व कोसळणं मनात खोल उतरत जातं.

नाही.

'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे' वाचले.
दुर्गाबाईंचे स्पष्ट आणि स्वच्छ विचार वाचून क्वचित हेवा वाटला. कधी एकांगीही वाटले. सगळ्यांनाच स्वतःला आलेल्या अनुभवांवरून आणि आपल्याला पटलेल्या तत्त्वज्ञानावर कसे काय जोखता येइल?
प्रतिभाताईंनी अशा वेळी दुसरी बाजू चर्चेत आणायचा चांगला प्रयत्न केला आहे.

श्याम मनोहरांचे 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' वाचले. आवडले.
'उत्सुकतेने मी झोपलो' वाचायला घेतलेय तर उत्सुकता हरवली आणि झोप येऊ लागली. एक ब्रेक घेऊन वाचायला हवेय.

नीधप, वरदा

मी बिटर चॉकलेट वाचलं. अंगावर काटा आला. माझी मुलगी अत्ताच १० वर्षांची झाली. काळजी वाटतच होती. ती वाढली.

तुम्ही म्हणता ते पटलं. काही काही प्रसंग फार भडक झाले आहेत. आर्थात हे सगळं फार उध्वस्त करणारं आहे. पण ह्या पुस्तकावर चर्चा झाली हे चांगलं झालं. नाही तर हे वाचलच गेलं नसतं. किती जपायला लागतं ना मुलांन्ना!!!

ह्या पुस्तकाची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद!!!!

श्याम मनोहर हळूहळू ग्रो होत जातात. उत्सुकतेने नंतर आवडते, पण त्यांचे कळ मला जड गेले. त्यांचे खेकसत म्हणने तसेच हे पुरषोत्तमराव हे ईश्वरराव दोन्हीही मस्तच आहेत.

उत्सुकतेने मी झोपलो भारी पुस्तक आहे.. हळू हळू जास्त आवडत जातं.. शैली मस्त.. आणि विचार तर काही विचारायलाच नको.. Happy

भैरप्पांचं काठ नाही वाचलं. पण आवरण वाचलय.. शैलीबद्दल प्रश्नच नाही. सिद्धहस्त लेखक आहेत. त्यामुळे हे पुस्तकही छानच असेल असं वाटतय. री॑ह्यु चांगले आहेत माझ्या माहितीतले.. Happy

हो भैरप्पांचे 'आवरण' पुस्तक मस्त आहे .. .. "काठ" चा विषय काय आहे?
आणि 'पर्व' पण भारी आहे .. .. २ दा वाचाले

परत एकदा कितव्यांदा तरी जेराल्ड डरेलचं Menagerie Manor वाचतेय. माझा अत्यंत आवडता लेखक. त्याची सगळीच पुस्तकं मस्त आहेत. अगदी हलक्याफुलक्या खेळकर भाषेत लिहिलेली. पण त्यामधून जो एक सतत त्याचा प्राण्यांबद्दलचा जिव्हाळा, त्यांच्या कॉन्झर्वेशन बद्दलची काळजी, एकूणच प्राणिजगत आणि निगडित इश्यूजबद्दलचं चिंतन, त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, त्याची पॅशन, आणि या सगळ्यसगळ्यावर असणारं त्याचं सहृदय व्यक्तिमत्व त्याच्या लिखाणात सतत डोकवत असतं ते मला फार्फार आवडतं. Happy
पण या सगळ्यातही बेष्ट पुस्तकाचा मान जातो त्याच्या पहिल्या पुस्तकाला My Family and Other Animals.. त्याचं लहानपण कॉर्फू नामक एका ग्रीक बेटावर गेलं. तिथले सोनेरी, मुक्त दिवस, त्याचे २ दादा, १ ताई आणि आई असं एक प्रेमळ पण थोडंसं हटके कुटुंब आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि छोट्या जेरीचे असंख्य प्राणी-पक्षी या सगळ्यांनी उडवलेली धम्माल!! कितिदाही पारायणं केली तरी मला प्रत्येक वेळी तेवढाच आनंद देऊन जाणारं पुस्तक आहे हे.

@ प्रितीभूषण, www.bookganga.comव्रर प्रयत्न करुन पहा. माझा अनुभव खूप छान आहे. पुस्तके भारतातच डिलीवर व्हायची असतील तर डिलीवरीचे पैसे नाहीत.

अमी

Pages