Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व. पुं. चं 'इन्टीमेट' वाचलं.
व. पुं. चं 'इन्टीमेट' वाचलं. प्रचंड सुंदर पुस्तक आहे. मस्ट वाच.
कोसला कुणी वाचले आहे का? कसे
कोसला कुणी वाचले आहे का? कसे वाटले?
(या विषयावरची चर्चा आधी झालेली असल्यास कृपया लिंक द्या)
इंग्रजी पुस्तकांची चर्चा करून
इंग्रजी पुस्तकांची चर्चा करून आमास्नी कॉम्प्लेक्स देऊ नये , कपृया....
कोसला आणि इतरही नेमाड्यांच्या
कोसला आणि इतरही नेमाड्यांच्या पुस्तकावर इथे अन जुन्या मायबोलीत बरीच चर्चा झाली आहे. टण्याने २०१० च्या दिवाळी अंकात एक लेख लिहिला आहे.
१९९८-१९९९ साली माझी अन जगनबुवांची जोरदार चर्चा झालेली , ती बहुतेक वाहून गेली असणार
मेधा , काय योगायोग ! आजच
मेधा , काय योगायोग ! आजच जगनबुवांनी टाकलेल्या ग्रेसच्या पोष्टी वाचल्या. काय बाळबोध लिहिले होते लोकानी तिथे ग्रेसवर !
कोसलाचा पहिला ६० % टक्के भाग
कोसलाचा पहिला ६० % टक्के भाग दर्जेदार आहे नन्तर फारच भरकटले आहे. त्यापेक्षा हिन्दू आवडले.
आजच मिलिंद बोकीलांची "शाळा"
आजच मिलिंद बोकीलांची "शाळा" कादंबरी वाचली. अतिशय आवडली. संपूर्ण कादंबरीत कोठेही अतिशयोक्ती नाही. संवाद देखील अगदी नैसर्गिक व सहज वाटतात. शेवट मात्र चटका लावून जातो.
काल मॅजेस्टिकमध्ये
काल मॅजेस्टिकमध्ये नारळीकरांचे आत्मचरित्र आलेले पाहिले नवीन. माझी ऑलरेडी खूप खरेदी झाली होती त्यामुळे मनावर दगड ठेवून गप्प बसले.
'चार नगरातील माझे वास्तव्य' असे नाव आहे. किंमत पाचशे रुपये. (या तपशीलांत चूक असू शकते. फार घाईत होते.)
बाजो,
तुमची माझी दोस्ती त्या कोसल्यावरुन तुटणारे एकदा.
कालच मायकेल क्रायटनचं
कालच मायकेल क्रायटनचं 'मायक्रो' आणलयं आणि स्टीफन हॉकिंग्जचं 'द ग्रॅन्ड डिझाईन'. वाचून कधी होतील ते सांगणं कठीण.
शिवा ट्रायोलॉजी विकत घ्यायची आहे. कोणी वाचलेय का?
"उत्सुकतेने---" चे लेखक कोण ?
"उत्सुकतेने---" चे लेखक कोण ? एक आपली उत्सुकता

"इंग्रजी पुस्तकांची चर्चा करून आमास्नी कॉम्प्लेक्स देऊ नये , कपृया".... बाजो
काल मी मॅजेस्टिकमधून तीन पुस्तक विकत घेतली."सिनामाचे दिवस -पुन्हा" -विजय पाडळकर, भारतीय अनुबोधपट - पुरुष बावकर , आणि धडाडीचे उद्योजक " -सुबतो बागची-अनुवाद चित्र वाळिंबे
आणि सध्या " इंग्रीड बेर्गमन" वर मधुकर तोरडमल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन चालू आहे
उत्सुकतेने---" चे लेखक कोण ?
उत्सुकतेने---" चे लेखक कोण ? >>>>> श्याम मनोहर.
त्यांचा बिन मौजेच्या गोष्टी हा कथासंग्रह वाचला.
वर्णनशैली अफाट आहे : 'सायकलचे पॅडल मारल्यासारखा तो चालत होता' हे एक आता आठवतेय.
'सणासुदिनाला' असा शब्द वापरलाय त्यांनी.
मी कोसला खूप उशीरा वाचलं
मी कोसला खूप उशीरा वाचलं आयुष्यात आणि खरं सांगू का मला त्याचं सगळं महत्व मान्य असूनही नाही आवडलं.
शिवा ट्रायोलॉजी विकत घ्यायची
शिवा ट्रायोलॉजी विकत घ्यायची आहे. कोणी वाचलेय का?>>>
मी मेलुहा वाचलं. छान आहे. मला तरी आवडलं बाकि दोन बघते आता कधी वाचायला जमतात ती.
'हायवे ऑन माय प्लेट' हे
'हायवे ऑन माय प्लेट' हे पुस्तक काही विशेष नाही. त्यापेक्षा प्रोग्रामच जास्त भारी आहे. पुस्तक म्हणजे हॉटेल/ढाबा यांची नावे आणि तिथली एखादी स्पेशालिटी यांची यादी आहे. रॉकी/मयुरचे पंचेस नाहीयेत. पण नवीन ठिकाणं कळाली आणि कधी त्या हायवेंवरुन गेलोच तर त्या त्या ठिकाणी भेट देता येईल.
'मॅजिकल रिअॅलिझम' शैलीतली
'मॅजिकल रिअॅलिझम' शैलीतली दोन पुस्तकं अलीकडे वाचण्याचा योग आला. काफ्काचं 'मेटामॉर्फॉसिस' अतिशय आवडलं. त्यानंतर वाचलेलं मार्खेझचं 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' मात्र काहीसं अपेक्षाभंग करणारं. या पुस्तकाबद्दल इतरांचं मत जाणून घ्यायला आवडेल.
मला काफ्का फार डिप्रेसिंग
मला काफ्का फार डिप्रेसिंग झालेला. महान आहे, पण मला न झेपणारा.
तसाच काम्यू. मला अजिबातच झेपला नाही. त्याची स्ट्रेंजर वाचायला घेतली आणि २-३ पानांनंतर जाम भंजाळले. सोडून दिली. कदाचित ते कळण्याएवढी अक्कल तेव्हा उगवली नसेल (आत्ताही उगवली आहे असं वाटत नाही..)
मार्खेझ (नक्की उच्चार काय आहे?) माझा आवडता. मला त्याचं सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड.
त्याचं आणखी एक रिपोर्टाज प्रकाराचं पुस्तक आहे. कोलंबियातल्या एका अपहरण प्रकरणावरचं. ते पण खूप आवडलेलं मला.
मार्खेझ (नक्की उच्चार काय
मार्खेझ (नक्की उच्चार काय आहे?) माझा आवडता. मला त्याचं सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड. >>
दे ट्टाळी !
माझं आवडतं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा, पण इतर सगळीच आवडतात. त्याची पुस्तकं मुळातून वाचण्याकरता / वाचण्याएवढं स्पॅनिश शिकायचंय कधी तरी
काफ्काचं 'मेटामॉर्फॉसिस'
काफ्काचं 'मेटामॉर्फॉसिस' अतिशय आवडलं. >> एका वाक्यात गुंडाळणे - नो फेअर. सविस्तर परिक्षण येऊ द्या लवकर .
स्ट्रेन्जर आवडलं होतं.
स्ट्रेन्जर आवडलं होतं. मेटामॉर्फोसिस आणि वन हन्ड्रेड.. दोन्ही अर्धवट वाचून पडून आहेत. पुस्तकांचा दोष नाही, माझ्या हजार दरडींवर एका वेळी पाय ठेवण्याच्या सवयीचा आहे.
'वन हन्ड्रेड..'मधल्या कळपाच्या म्होरक्याची (नावं विसरले, सॉरी!) स्थलांतरासाठी उत्सुक बायको 'या मातीत आपलं कोणी अजून पुरलेलं नाही, तेव्हा हा काही आपला गाव नव्हे' असं त्याला सांगते ते वाचून अक्षरश: शहारले होते. या न्यायाने कुठली गावं मला माझी म्हणता येतील? माणसंच का, माझं असं कुठे कुठे काय काय पुरलं गेलं आहे? आपल्या संस्कृतीत आपण नाळ पुरण्याचा उल्लेख ऋणानुबंधांच्या निर्देशासाठी करतो. हे त्या वर्तुळाचं दुसरं टोक म्हणायचं का?
धडाडीचे उद्योजक " -सुबतो
धडाडीचे उद्योजक " -सुबतो बागची-अनुवाद चित्र वाळिंबे>>> ही तर माबोकर चिवा!
कोसला वाचली! फार झेपली नाही!
शाळा ऑलटाईम फेवरिट!
काफ्का सॉलिड आहे. पण
काफ्का सॉलिड आहे. पण laboriously वाचावा लागतो मला तरी. मेटॅमॉर्फोसिस युगप्रवर्तक मानल्या जाते.
पण ती एकटीच कशी वाचलीस नंदन? तिच्या सोबत दुसर्या कथा असतील ना?
मिलिंद बोकीलांची शाळा,
मिलिंद बोकीलांची शाळा, समुद्र, एकम, रण दुर्ग वाचलं..
बिंब प्रतिबिंब, चंद्रकांत खोतांच... स्वामी विवेकानंदांवर आधारीत आहे...
काल सलील कुलकर्णीचं लपवलेल्या काचा वाचलं...
याशिवाय नार्निया वाचन चालु आहे
मेटामॉर्फॉसिस पहिल्यांदा
मेटामॉर्फॉसिस पहिल्यांदा वाचली तेंव्हा एका झपाट्यात संपवली. पण मग लक्षात आलं की हे काय खरं नाही. मग दुसर्यांदा आरामात चवीचवीने वाचली तेंव्हा जास्तच आवडली.
काफ्काबद्दल आणि ही कादंबरी ज्या काळात आली तो काळ याबद्दल जरा माहिती असणे गरजेचे आहे असे वाटते. अर्थात नव्या जगातील सामान्य माणसाचा 'इनसिग्निफिक्न्स' ही थीम ज्या भेदकपणे काफ्का मांडतो ते अफाट आहे. मला तर 'मॅट्रिक्स' सारख्या चित्रपटाची मुळेही याच कादंबरीत दिसतात.
<<अर्थात नव्या जगातील सामान्य
<<अर्थात नव्या जगातील सामान्य माणसाचा 'इनसिग्निफिक्न्स' ही थीम ज्या भेदकपणे काफ्का मांडतो ते अफाट आहे. मला तर 'मॅट्रिक्स' सारख्या चित्रपटाची मुळेही याच कादंबरीत दिसतात. >> हजार मोदक. मला पहिल्यांदा मॅट्रिक्सची थीम ऐकताना kafkaesque आहे असं वाटलं होतं पण इतरांनी माझ्या या कल्पनेला उडवून लावलेलं.
sorry for writing in English
sorry for writing in English guys
I tried a lot to read Kafka but all of his translated books was damn heavy for me to grasph and I could not find those translations moving/catchy etc etc. My university had amazing collections of Kakfa. So, every week I used to take around 12 books at one time (as master student can borrow 32 books at one time). I tried to read all of his books but sorry to say none of his book I could read more than 10 to 20 pages. I felt pretty bad and I am going to feel so throughout my lifetime as I know this author has been appreciated by world-wide readers.
So, do you guys know best translation of his book? I can try on that book. thanks.
I agree with Medha. Those whoever has finished Kafka's metamorphosis please .. please.. please write parikshan! Afterall reading is not just your own enjoyment but you should share what you liked and what not with other readers. Medha please pen down your experience.
बी, अनुवाद वाचायचा नसेल तर
बी, अनुवाद वाचायचा नसेल तर जर्मन शिकावे लागेल. 'बेस्ट' अनुवाद कसा ठरवायचा? कारण मी एकच वाचलाय.
आणि नसेल भावला तर वाईट वाटायची गरज काय? प्रत्येक 'क्लासिक' आपल्यालाही आवडायलाच पायजे असे नाही, मला अजूनही वुडहाऊस क्लिक झालेला नाही....नाईलाज आहे!
मामी, शिवा ट्रायलॉजीच्या
मामी, शिवा ट्रायलॉजीच्या गोष्टी बर्या आहेत असे ऐकले, पण पुस्तक (पहिले) चाळले तेंव्हा भाषा इतकी रद्दड वाटली की पुस्तक घ्यायची हिम्मत नाही झाली. हॅरी पॉटरच्या विरुद्ध टोक.
मला अजूनही वुडहाऊस क्लिक
मला अजूनही वुडहाऊस क्लिक झालेला नाही....नाईलाज आहे!>>> आहे कोणतरी माझ्यासोबत.
आगाऊची पोस्ट वाचून मेटामॉर्फॉसिस पुन्हा एकदा वाचावं का असा विचार करतेय. कारण पहिल्यान्दा वाचली तेव्हा समजली नव्हती. आता गूगल विकी वापरून संदर्भ शोधत का होइना वाचता येइल..
सध्या भैरप्पाची द विटनेस ही अनुवादित कादंबरी वाचतेय. कानडीतून इंग्रजीमधून केलेला अनुवाद बेक्कार आहे. मराठीमधे अनुवाद असेल तर तोच वाचेन.
वुडहाउसची ब्लँडिंग्ज कॅसलची
वुडहाउसची ब्लँडिंग्ज कॅसलची सीरिज म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. किति वेळा पारायणं केलीत आणि किती वेळा खदखदून हसलेय त्याला गणतीच नाही
रच्याकने, या सीरिजमधे मला वार्यावरची वरात मधल्या 'गरुडछाप गरुडछाप' या तोंडी जाहिरातीचा उगम सापडलेला. अॅम वेरी मच शुअर की पुलंना तिथूनच सुचलेलं असणार..
सध्या 'अच्युत गोडबोले' आणि
सध्या 'अच्युत गोडबोले' आणि 'सुलभा पिशाविकर' यांचं 'नादवेध' वाचत आहे.
रागदारी संगीतावरचं अप्रतिम पुस्तक...
ज्या प्रमाणे प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, तसाच प्रत्येक रागाचा सुद्दा एक स्वभाव असतो, विशेष म्हणजे शास्त्रीय संगीतावर हे पुस्तक लिहिलेले असुनही सहज सोप्या भाषेत हे पुस्तक आहे. वाचायला मजा येते. रागदारी शिकणारयांनी तर वाचावंच पण संगीत रसिकां नी सुद्धा वाचावं असं पुस्तक.
आपल्यापैकी कुणी वाचलंय का?
Pages