Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अस अगदी म्हणजे अगदी अगदी
मला अस अगदी म्हणजे अगदी अगदी प्रांजळपणे वाटतं की तुम्हा जितक्यांना काक्फा कळला तो कसा? कुठे? कितपत? असं अगदी झाडून सगळं लिहालं की मग माझ्यासारख्यांना त्या त्या लेखाचा उपयोग होईल.
वरदे, लिहि ना इतके इथे जळवतेस तर!
ब्लॅण्डिन्ग सिरीज मधले एखादेच
ब्लॅण्डिन्ग सिरीज मधले एखादेच वाचले असावे (बहुधा Gallahad at Blandings). मी वाचलेली बहुतेक सगळी जीव्ह्ज आणि वूस्टर वाली
गरुडछाप गरुडछाप>>> बघायला पाहिजे मग. 'वरात' नीट ऐकलेली/पाहिलेली नाही.
कशाबद्दल लिहू? काफ्काबद्दल मी
कशाबद्दल लिहू? काफ्काबद्दल मी लिहिणे शक्य नाही. मला त्याचं पुस्तक वाचून माझं स्वतःचं अस्तित्व किति नगण्य आहे हे इतकं जाणवलं की आठवडाभर मी डिप्रेस्ड आणि झोम्बीसारखी वावरत होते. परत कधी हात लावायची हिम्मतच झाली नाही. क्षुद्र तर क्षुद्र, मी मला प्यारी आहे राव!
ते काय आहे ना प्रत्येकाचा स्वभावधर्म असतो. मला वेटिंग फॉर गोदो फार आवडलं पण त्यापेक्षा ही पुलंनी त्याचं केलेलं विडंबन गोदेची वाट हे फार्फार जास्त आवडलं. किंवा लॉरेन्स डरेलच्या अलेक्झान्ड्रिया क्वार्टेट पेक्षा जेराल्ड डरेलचं कुठलंही पुस्तक हातात धरणं मी पसंत करेन. जीवनाची काही गंभीर सत्यं माझ्यासाठी नाहीत हेच खरं!:फिदी:
पुलंच्या प्रेरणेविषयी लिहायचं तर - अर्ल ऑफ ब्लँडिंग्ज चा जो धाकटा मुलगा फ्रेडी (गुड फॉर नथिंग) हा त्याच्या अमेरिकन सासर्याच्या कंपनीत अखेर काम करायला लागतो. ती कंपनी डॉगफूड विकत असते. आणि मग एकदा त्याच्या आतेबहिणीला तो खूप दिवसांनी भेटतो तर तो सारखा काहीही विषय असला तरी त्या डॉगफूडचीच तोंडी जाहिरात करत असतो. तिचं म्हणणं काय आहे याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून! आणि वरातीत सुरुवातीला रमाकांत देशपांडे नाही का तपकिरीचे फिरते विक्रेते म्हणून येतात आणि काहीही विषय असला तरी 'गरुडछाप तपकिरी'चीच जाहिरात करत रहातात... मुळात त्या संवादांच्या स्ट्रक्चरमधे इतकं साम्य आहे की कितव्यांदातरी फ्रेडीचे संवाद वाचताना एकदम लख्ख जाणवलं की अरेच्च्या हे अगदी वरातीशी जुळतंय. आणि पुलं नी हे पुस्तक वाचलेलं नसणं कसं शक्य आहे??
वरदा, क्षुद्र वगैरे नव्हते
वरदा, क्षुद्र वगैरे नव्हते म्हणायचे तुला
इतकं जाणवलं की आठवडाभर मी डिप्रेस्ड आणि झोम्बीसारखी वावरत >> नेमक ह्याचबद्दल लिही ना की तुला अस का वाटतं.
आणि पुलं नी हे पुस्तक वाचलेलं
आणि पुलं नी हे पुस्तक वाचलेलं नसणं कसं शक्य आहे??<<<< पुल स्वत: वूडहाऊसचे मोठे फॅन होते. तेव्हा त्यानी ते वाचलेलं आणि त्याना तिथून सुचलेलं असण्याची शक्यता आहे.
मी वूडहाऊसची दोन तीन पुस्तके वाचली पण समहाऊ मला त्या वातावरणाशी समरस होता येत नाही.
थोडेफार विनोद समजलेच नाहीत असे पण होतं. पुन्हा एकदा वाचायला हवं.
मला वाटतं आयुस्यामधे जी पुस्तकं विशीच्या आसपास आवडत नाहीत किंवा समजत नाहीत ती परत दहाबारा वर्षानी वाचून बघायला हवीत. कदाचित वाढत्या वयाच्या अनुभवाने ती पुस्तकं अजून नीट समजतील
सध्या 'अच्युत गोडबोले' आणि
सध्या 'अच्युत गोडबोले' आणि 'सुलभा पिशाविकर' यांचं 'नादवेध' वाचत आहे.

रागदारी संगीतावरचं अप्रतिम पुस्तक...
ज्या प्रमाणे प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, तसाच प्रत्येक रागाचा सुद्दा एक स्वभाव असतो, विशेष म्हणजे शास्त्रीय संगीतावर हे पुस्तक लिहिलेले असुनही सहज सोप्या भाषेत हे पुस्तक आहे. वाचायला मजा येते. रागदारी शिकणारयांनी तर वाचावंच पण संगीत रसिकां नी सुद्धा वाचावं असं पुस्तक.
आपल्यापैकी कुणी वाचलंय का?
नाही गं पूर्वी. वाचलं नाहीये
नाही गं पूर्वी. वाचलं नाहीये पुस्तक. मला स्वतःला गाण्यातलं शून्य किंवा मायनस कळतं. आणि समहाउ अच्युत गोडबोलेंची एकही ओळ वाचावीशी वाटत नाही. हे अत्यंत पूर्वग्रहदूषित वाक्य आहे. पण असं आहे खरं!
मला संगीतावर कृ. द. दीक्षितांची पुस्तकं आवडलीत आणि पुलंनी शास्त्रीय संगीतावर केलेलं लिखाण. टेक्निकल माहिती डोक्यावरून जाते.
ए अरे, वाचायचा का काफ्का
ए अरे,

वाचायचा का काफ्का एकत्रं ? आख्खा काफ्का नाही. मी एवढी डिप्रेस व्हायला कमिट करणार नाहीये.
मार्च महिन्यात सगळ्यांनी मेटॅमॉर्फोसिस वाचायची आणि इथे लिहायची का? छोटी आहे.
(मला आवरा.साहित्यसेवा करण्यासाठी कंपनीने कामाला लावलेले नाही.)
आगावा- वुडहाऊस बद्दल अगदी अगदी. मला पण क्लिक झालेला नाही तो अजिबात.
पूर्वी
हो नादवेध चांगलय.
पुलंनी नक्कीच वाचलेले असणार
पुलंनी नक्कीच वाचलेले असणार आणि शक्यता आहे की त्यावरूनच तो भाग त्यांच्या डोक्यात आला असेल.
आता मला लक्षात आले की माझा एक पुलं (किंवा काहीच) नीट न वाचलेला व वुडहाउस अजिबात न वाचलेला मित्र उगाच 'ते सगळे वुडहाउस वरून "ढापतात"' असे का सांगत फिरायचा ते. त्याने स्वतः एवढे वाचलेले असणे शक्यच नव्हते. त्याने ते नक्कीच कोणाकडून तरी ऐकले आणि स्वतःचे मत म्हणून खपवले असण्याची शक्यता जास्त.
वुडहाउसची ओळखच आम्हाला पुलंच्या त्याच्याबद्दलच्या एका लेखामुळे झाली. त्यांच्या काही नाटकांत्/लेखात असे एखाद दोन संदर्भ आले असणारच. या मित्राच्या ओळखीत कोणीतरी असे एक दोन उल्लेख त्याच्यासमोर केले असणार, आणि याचा लखू रिसबूड झाला
मी नाही तुमच्या काफ्का
मी नाही तुमच्या काफ्का क्लबात.
आप्पुन विनोदी लेखन, मर्डर मिस्टरीज ऐसे टपराड क्लबकेच मेम्बर है!
फारेण्डा, पुलंनी फार क्वचित प्रेरणा घेतलीये वुडहाउसकडून. ढापलं तर कधीच नाही. लोकांना बोलायला काय जातंय? वुडहाउसची आणखी एक गोष्ट वि.वि. बोकिलांनी त्यांच्या वसंत या बालनायकाच्या गोष्टीत अगदी उत्तम अॅडॅप्टेशन करून घेतली आहे (वसंताच्या गोष्टी हा माझा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय!).
रैना, हो चालेल. स्काईप वर
रैना, हो चालेल. स्काईप वर वाचन करुयात का?
आप्पुन विनोदी लेखन, मर्डर
आप्पुन विनोदी लेखन, मर्डर मिस्टरीज ऐसे टपराड क्लबकेच मेम्बर है!>>> अप्पन भी.
रैना, कल्पना चांगली आहे. पण लायब्ररीत पुस्तक आहे का बघायला हवे.
@ वरदा/मेधा - थँक्स, क्रॉनिकल
@ वरदा/मेधा - थँक्स, क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड आणि लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा ही दोन्ही वाचण्याच्या यादीत आहेत. ही वाचून झाली की जमल्यास एकंदरीत मॅजिकल रिअलिझमवरच खरडण्याचा विचार आहे (हजारों ख्वाहिशें ऐसी.... :))
@ स्वाती - उर्सुला? हो, 'वन हंड्रेड...' मधले असे प्रसंग डोक्यात रुतून बसतात खरे; आणि कदाचित जुनी संस्कृती + तिसरे जग ह्यांच्या मिलाफामुळे असेल - पण एखाद्या अस्सल भारतीय कादंबरीतही अशीच भावना उमटली असती असं वाटून जातं. (देशीवाद, एनीवन? :)). एकंदरीत त्या गावातले रहिवासी ज्या सहजतेने जादुई गोष्टी स्वीकारतात, पण विकासाच्या नावाखाली घडणारे बदल त्यांच्या अंगवळणी पडत नाहीत - या आणि अशासारख्या काही बाबी आपल्याकडल्याच, परिचित वाटतात. संपूर्ण कादंबरीतच 'चक्रनेमिक्रमेण'ची थीम, मेल्कियादेसने संस्कृतमध्ये लिहून ठेवलेला ग्रंथ हेही तसे ओळखीचेच.
@ रैना - हो, काफ्काच्या जवळजवळ समग्र लेखनाचं पुस्तक आहे. पण त्यातल्या इतर वाचण्याआधी ट्रायल आणि मेटामॉर्फॉसिस वाचून काढल्या. कुठे तरी वाचलं की, मेटामॉर्फॉसिस वाचूनच मार्खेझला जाणीव झाली की आपली आजी जशा जादूच्या गोष्टी अगदी सहज सुरात, रोजच्या व्यवहारात घडतात अशा भावाने सांगायाची; तशाच शैलीत लिहिणंही शक्य आहे. त्यानंतर उत्सुकतेने पहिलं पुस्तक बाजूला ठेवून 'वन हंड्रेड...' सुरू केलं.
@आगाऊ - अगदी, अगदी. तुमच्या दोन्ही प्रतिक्रियांना पूर्ण अनुमोदन! पहिल्या महायुद्धानंतरच्या 'लॉस्ट जनरेशन'वर आणि नेमाड्यांच्या शब्दांत सांगायचं तर एकंदरीतच परात्मतेच्या भावनेवर अनेकांनी लिहिलं; पण महायुद्धाच्या सुरूवातीलाच इतक्या प्रभावीपणे हे लिहिणारा काफ्का मानें पहिलाच. मार्खेझ, मॅट्रिक्स ते अगदी मुराकामीपर्यंत त्याच्या लेखनाचे पडसाद जाणवत राहतात. अगदी काही कवितांतही (दुवा)
@ बी - अनुवादाबद्दल आगाऊंशी सहमत आहे. काम्युची फ्रेंच, काफ्काची जर्मन आणि मार्खेझची स्पॅनिश यांच्यातून कितीही उत्तम अनुवाद असला, तरी अनेक संदर्भ निसटत राहतात. L’Étranger हे शीर्षक असो किंवा Maman हा पहिल्याच वाक्यातला शब्द असो, त्याच्या इंग्रजी अनुवादात काही उणीव राहूनच जाते. (दुवा) तसंच महत्त्वाच्या शब्दाचा परिणाम अधिक व्हावा म्हणून तो वाक्याच्या शेवटी यावा अशी रचना करण्याची जो सोय जर्मनमध्ये आहे, ती इंग्रजीत नाही. मराठी, कोकणी, पोर्तुगीज, इंग्रजी, हिंदी ह्या भाषा उत्तम अवगत असणारे आणि त्यात कविता लिहिणारे बोरकरही 'ती ती कविता मला त्या त्या भाषेतच सुचते' असं म्हणून जातात, त्याची या संदर्भात आठवण झाली.
बी, माणसाचा जो काही आंतरीक
बी,
माणसाचा जो काही आंतरीक पॅटर्न असतो, मनोवृत्ती असते त्याप्रमाणे त्याची काफ्का वा इतर कुठल्याही मूलभूत प्रश्नांना हात घालणार्या लेखकाच्या लेखनावर प्रतिक्रिया येते.
मला विचारशील तर आयुष्य अॅब्सर्ड आहे आणि माझे या पसार्यातील स्थान नगण्य आहे ही जाणिव माझ्या मनात मुळातच प्रचंड स्पष्ट आहे. आता असे का आहे ते माहिती नाही. कधी वाटते की ते इनबॉर्न आहे किंवा लहानपणीच झालेला काही संस्कार.
आता होते असे की जेंव्हा माझ्यासारख्या मनोवृत्तीचा माणूस काफ्का वाचतो तेंव्हा त्याला तो अंतर्बाह्य पटतोच, त्याला इलाजच नाही.
समहाउ अच्युत गोडबोलेंची एकही
समहाउ अच्युत गोडबोलेंची एकही ओळ वाचावीशी वाटत नाही.>>>१०० पूर्वग्रहदूषीत अनुमोदने!!!!
नंदन आणि आगाऊ, तुम्ही दोघांनी
नंदन आणि आगाऊ, तुम्ही दोघांनी खूपचं छान लिहिलं वर. नंदन, दुवे छान आहेत. वाचतो आहे.. विकि पण उघडले आहे काक्फाबद्दलचे. तिथेच तसेच म्हंटले आहे जे तू अनुवाद, शब्द, जर्मन भाषेबद्दल म्हणालास.
आणखी दोन माझे आवडते लेखक १.
आणखी दोन माझे आवडते लेखक
१. वि.वि. बोकिल - अत्यंत मध्यममार्गी कथा लिहिणारे. फार काही महान नाही, पण खूप स्वच्छ आणि बारकावे टिपणारी नजर होती त्यांच्याकडे असं मला वाटतं. पण त्यांचा वसंत हा बालनायक फार मस्त आहे. लहानपणी आणि आत्ताही मला तो तेवढाच भावतो.
२. जॉर्ज मिकेश (Mikes) - मूळचा हंगेरियन पण नंतर ब्रिटन मधे स्थायिक झालेला. मुख्यतः प्रवास/देशवर्णनं लिहिलित त्याने. अत्यंत सुंदर विनोदी शैलीत. हाउ टू बी अॅन एलियन हे त्याचं ब्रिटनवरचं पुस्तक सर्वात गाजलं. एकदा जरूर वाचावीत अशी पुस्तकं
नंदिनी, <<जी पुस्तकं विशीच्या आसपास आवडत नाहीत किंवा समजत नाहीत ती परत दहाबारा वर्षानी वाचून बघायला हवीत. कदाचित वाढत्या वयाच्या अनुभवाने ती पुस्तकं अजून नीट समजतील>> + १०००
सध्या वाचतोय " द फाउंटनहेड
सध्या वाचतोय " द फाउंटनहेड "
मस्त आहे ...मस्त ग्रिप घेतय हे पुस्तक ....
कोसला अर्ध्यातच सोडलं ...नाही सहन झालं ...आता झोप येत नसली की काढुन बसतो ....
आणखी एक लेखक आवडलेला तेव्हा.
आणखी एक लेखक आवडलेला तेव्हा. इटालियन होता. Guareschi बहुदा त्याचं नाव (उच्चार? स्पेलिंग बरोबर असावं बहुदा..) त्याच्या पुस्तकात एका इटालियन गावातला एक कॅथॉलिक पाद्रीबाबा आणि तिथल कम्युनिस्ट मेयर यांची पात्रं असतात. आणि मस्त उपरोधात्मक, खिल्ली उडवत त्या पात्रांचं विश्व उभं केलंय त्याने. अशी ५-६ पुस्तकं वाचलेली आठवताहेत.
@ वरदा कृ. द. दीक्षितांची
@ वरदा
कृ. द. दीक्षितांची पुस्तकं मलापण सुचवा ना... मी रागदारी संगीत शिकत आहे.
पुलंनी शास्त्रीय संगीतावर केलेलं लिखाण मी पण वाचलंय पण आणखी नावं सुचवलीत तर स्वागतच आहे.
आणखी एक पुस्तक हातात पडलं होतं, 'नारायण धारप' यांचं 'प्राध्यापक वाईकरांची कथा'
बापरे... झोपले नाही रात्रभर...
कोणी धारपांची पुस्तकं वाचतं का?
ज्जेबात आगाऊ.
ज्जेबात आगाऊ. अनुमोदन.
अलिकडेच 'हाऊस फॉर मिस्टर बिस्वास' वाचायला घेतलेलं. त्रास झाला फार म्हणून अर्धवट सोडून दिलं. स्वतःचे एक घर असावे, कसेही असो असे वाटणारे मिस्टर बिस्वास, त्यांच्या आयुष्याची केविलवाणी धडपड. प्रत्येक इंग्रजी संवादावर हिंदीची छाया त्यामुळे आपल्याला भाषा जवळचीच वाटते. absurdly real, (not really absurd)
आगाऊने लिहीले आहे त्यावरुन सहज आठवले. शांताबाई शेळक्यांनी लताबाईंबद्दल 'वडीलधारी माणसे' मध्ये लिहीले आहे की 'लताबाईंच्या अंतर्यामी एक उदास सूर आहे. कसल्याही ऐहिक गोष्टीच्या उणिवेतून तो निर्माण झालेला नाही. खोल विचारी, संवेदनशील, कलावंत हृदयाला जाणवणार्या असीम करुणेतून त्या सुराचा उगम झालेला आहे. मानवी जीवनाच्या मूलभूत एकाकीपणातून, व्यथेतून, वेदनेतून तो सूर उमटलेला आहे. या सुराने लताबाईंना श्रेष्ठ कलावंत केले'
नंदन- तू म्हणजे तू आहेस . दुवे मस्तच.
जॉर्ज मिकेश (Mikes) - मूळचा
जॉर्ज मिकेश (Mikes) - मूळचा हंगेरियन पण नंतर ब्रिटन मधे स्थायिक झालेला. मुख्यतः प्रवास/देशवर्णनं लिहिलित त्याने. अत्यंत सुंदर विनोदी शैलीत. हाउ टू बी अॅन एलियन हे त्याचं ब्रिटनवरचं पुस्तक सर्वात गाजलं. एकदा जरूर वाचावीत अशी पुस्तकं >>
वरदा, तू माझी मेलेंमे बिछडी जुडवा बहेन तर नाहीस
अकरावीच्या धड्यात मिकेश ची एक गोष्ट होती. त्यावरून त्याच्या प्रेमात पडून स्ट्रँडवाल्या शानभाग मामांच्या खनपटीला बसून त्याची पुस्तकं वाचली होती.
वूडहाउस, डिकन्स , मॉम, मार्क ट्वेन , शॉ यांची पुस्तकं वाचताना त्यातल्या जगाबद्दल कणभरही माहिती नसताना वाचली, वीरकर डिक्शनरीचा आधार घेत घेत वाचली तर ती अजिबात पकड घेत नाहीत. चिकाटीने ती पुस्तकं वाचत राहिली, त्यातल्या जगाची इतर मार्गाने ( चित्रपट, समिक्षण, त्याला समकालीन इतर गोष्टी असे ) तर हळू हळू त्यातल्या व्यक्तींचे स्वभाव, भाषेचे वैशिष्ट्य, लोकांचे एकमेकांशी असलेले नाते हे क़ळू लागते अन पुस्तकांचे नवेच रूप समोर येते.
निदान माझा तरी अनुभव असा आहे.
माझे एक परिचित इंग्रजीचे प्राध्यापक आहेत . ते १९४०च्या सुमारास मैसूरमधे कॉलेजात शिकत असताना पूर्ण मॅकबेथ शिकवून झाल्यावर एका विद्यार्थाने ' येन सर, लेडी मॅकबेथ हेंगसा ?' ( काय सर, लेडी मॅकबेथ बाई होती का ? ) असे अविश्वासाने विचारल्याची गोष्ट नेहमी सांगत असतात. पुस्तकातल्या कळीच्या गोष्टींचा अर्थ कळलाय की नाही हे कसे कळावे !
नंदन, दुवे मस्तच. धन्यवाद!
नंदन, दुवे मस्तच. धन्यवाद!
<<वूडहाउस, डिकन्स , मॉम,
<<वूडहाउस, डिकन्स , मॉम, मार्क ट्वेन , शॉ यांची पुस्तकं वाचताना त्यातल्या जगाबद्दल कणभरही माहिती नसताना वाचली, वीरकर डिक्शनरीचा आधार घेत घेत वाचली तर ती अजिबात पकड घेत नाहीत. चिकाटीने ती पुस्तकं वाचत राहिली, त्यातल्या जगाची इतर मार्गाने ( चित्रपट, समिक्षण, त्याला समकालीन इतर गोष्टी असे ) तर हळू हळू त्यातल्या व्यक्तींचे स्वभाव, भाषेचे वैशिष्ट्य, लोकांचे एकमेकांशी असलेले नाते हे क़ळू लागते अन पुस्तकांचे नवेच रूप समोर येते. निदान माझा तरी अनुभव असा आहे.>> अगदी अगदी. अगणित मोदक.
खूप वेळा शब्दांकडून सांस्कृतिक संदर्भांकडे असाच प्रवास होतो माझा. निदान अमराठी पुस्तकांबाबत. आणि तो फार आनंददायी आणि समृद्ध करणारा असतो.
मी कधीच वीरकर मधे अर्थ नाही पाहिला. एकतर संदर्भाने बहुतेक कळतोच, आणि पहायचाच असेल तर वेब्स्टर किंवा कॉलिन्समधेच पहायचा अशी सवय लावली होती बाबांनी. अगदीच वेळ नसेल तर मग मात्र मी 'बाबा डिक्शनरी' रीफर करायचे (आता 'नवरा डिक्शनरी' करते)
मेधा, खर्रंच जुडवा बहन आहेस माझी
डिकन्सचं मुलांसाठी सोपी भाषा
डिकन्सचं मुलांसाठी सोपी भाषा असलेलं ग्रेट एक्पेक्टेशन काकांनी घरात आणलं होतं. कुठल्या प्रकाशनाचं होतं आता आठवत नाहीये. पण तेव्हा वाचताना खूप आवडलं होतं. त्याच सुमारास त्यावर BBC नं केलेली एक ब्रिटीश मालिकाही टिव्हीवर दाखवायचे त्यामुळे समजायला सोपी गेली. Pip तेव्हा फारच आवडायचा ;). माझ्या लेकीसाठी डिकन्सची मुलांसाठी असलेल्या आवृत्त्या शोधत होते तेव्हा अॅमेझॉनवर सापडली. नंतर इथल्या आउटलेट मॉल मधे एका पुस्तकाच्या दुकानात $३ ला मिळालं होतं.
नंदन, कितिही छान अनुवाद असला
नंदन, कितिही छान अनुवाद असला तरी त्यातून बरंच काही निसटतं हे अगदी हजार हिश्शांनी मान्य आहे. पण मग प्रत्येक वेळी त्या त्या भाषा शिकणं शक्य असतंच असं नाही... त्यावेळी हे अनुवादच कामाला येतात. फक्त तो वाचताना ही मूळ पुस्तकाकडे पहायची एक मोठीशी खिडकी आहे हे लक्षात ठेवायचं, आणि जे त्या प्रक्रियेमधे हरवून जातं ते 'भाषार्पणमस्तु||' म्हणायचं याशिवाय हातात काही रहात नाही असं मला वाटतं.
माझ्यापुरता मी पाळत असलेला नियम - जिथे शक्य आहे तिथे भारतीय प्रादेशिक साहित्याचं वाचन इंग्लिश नाही तर हिंदी अनुवादात करायचं. बहुतेक भाषांमधील साम्यस्थळं आणि भारतीय सांस्कृतिक संदर्भांशी असलेली नाळ यामुळे ही भाषांतर थोडी जास्त जवळची वाटतात.
आणि युरोपीय भाषांचे अनुवाद इंग्लिशमधून वाचायचे. इथे फक्त भाषा जवळच्या असण्याचा प्रश्न नसतो तर इंग्लिशमधे किंवा या भाषांमधे अनुवादाचं एक शास्त्र/ एक सखोल विचारपद्धती तयार झाली आहे (जी भारतात फारशी दिसत नाही) त्यामुळेही एक स्टॅण्डर्ड राखले जाते हेमावैम.
या दुसर्या नियमाचा मोठ्ठा अपवाद माझ्यापुरता मी पाहिलाय. बंगाली अॅस्टेरिक्सच्या कॉमिक्समधे. बर्याच ठिकाणी इंग्लिशपेक्षा बंगालीत तो विनोद फार सुंदर भाषेत पकडला गेलाय असं वाटतं. इंग्लिशमधे जो नर्मविनोद वाटतो तो बंगालीत अगदी खदखदून हसवून जातो! किंवा कदाचित बंगाली माझी रोजच्या बोलण्यातली भाषा आहे म्हणून वाटत असेल असं (पण इंग्लिशही असतेच की रोजच्या व्यवहारात..) माहित नाही..
जबरदस्त चर्चा! भरपूर नवीन
जबरदस्त चर्चा!
भरपूर नवीन पुस्तकांची नावं कळाली
किती वाचावं तितकं कमीच.
'शिवा ट्रायोलॉजी" ची पुस्तके मस्त आहेत असं माझ्या मित्राने सांगितलय. बघू केव्हा वाचेन ते.
गोडबोल्यांचे लेख लोकसत्तामधे
गोडबोल्यांचे लेख लोकसत्तामधे प्रकाशित होत होते तेंव्हा वाचले होते व एकत्र करून एक पीडीएफ पण करुन ठेवली होती. पण परत सलग वाचताना ते फारच कृत्रिमरित्या भावनेने ओथंबलेले ( ओशट , तुपकट ) असे वाटतात. वेगवेगळ्या गाण्यांची माहिती मिळते ती मात्र मला आवडली होती / अजूनही आवडते .
त्यांचं बाकी लेखन फारसं वाचलं नाहीये.
@पूर्वी काही वर्षांपूर्वी
@पूर्वी
काही वर्षांपूर्वी नादवेध लोकसत्ता मधे क्रमशः प्रसिद्ध झाले होते तेव्हा वाचले होते.
शास्त्रीय संगीतावर पुस्तक नाव ------ संगीत विशारद-----लेखक-- लक्ष्मीनारायण गर्ग.
पुस्तक हिंदीत आहे.परीक्षा देत असल्यास उपयोगी आहे.
> पण एखाद्या अस्सल भारतीय
> पण एखाद्या अस्सल भारतीय कादंबरीतही अशीच भावना उमटली असती असं वाटून जातं.
रामायण? महाभारत?
हा बाफ वाहून जरी जात नसला तरी, मागचे वाचायला फार कोणाला वेळ नसणार. जरा पद्धतशीर काही करता येईल का? ओघवत्या गप्पांना गप्प न करता. एखादी यादी जिथे पुस्तकांची नावे असतील आणि पुढे +१ किंवा -१ करता येईल (म्हणजे तेथील आकडा चढत किंवा उतरत जाईल). इथे डुआयड्यांची किंवा एकाच आयडीच्या पुनर्मतांची काळजी करण्याची गरज नाही - लिहीणारे तेवढे सुज्ञ असणार. तसेच पुस्तकांच्या बाबतीत. मला अनेकदा लेखकांपेक्षा विशिष्ट पुस्तकं जास्त आवडतात. मायबोलीवर आहे अशी सोय? द्रुपल मधला डेटाबेस वापरुन करणे सहज शक्य असावे.
Pages