मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या Eat, Pray, Love by Elizabeth Gilbert वाचते आहे .. अगदी सगळ्या गोष्टी आवडन्या सारख्या नाहिये कारण तिने घेतलेले निर्णय (घटस्फोट, जग फिरणे) मी केले नाही पण काही लहान सहान गोष्टी मी हि केल्यात. .. माझा आणि लेखिकेचा पिंड (अति सेन्सिटिव्ह, अति विचारी त्यामुळे येणारा वेन्धले पणा, घरात लहान असल्याचा परिणाम व.व. ) बर्यापैकी जुळतो त्यमुळे अगदी तिने म्हटल्याप्रमाणे वाटतं काही बाबतीत.. I can Understand, I have been there.. Happy कधी तरीउर्मिला देशपांडे ला वाचतोय का असं हि वाटतं.. एकदा वाचण्या सारखं नक्कीच आहे..

Eat, Pray, Love by Elizabeth Gilbert - मी २ वर्षांपूर्वी वाचलं होतं आणि मला ते फारसं नाही आवडलं.
तक्रारींचा पाढा वाचून जरासा कंटाळाच आला होता. मुळात १ वर्ष दुसर्याच्या पैशावर निरनिराळे देश अनुभवत त्यातून बेस्ट सेलर बुक खेरिज हाती काहिच लागत नाही Sad
गौरी देशपांडेशी तुलन हे मात्र जरा जास्तच होतय गं.
एकाच पुस्तकाबद्दलची अगदीच विरुद्ध मते ! असुदे, to each its own.

तक्रारी पुढे जावून ज्यांना काही दिसत नाही त्यांना आवडणार नाही.. शक्य आहे.. कारण ह्या जगात फक्त पिक्चर परफेक्ट बायका चित्रित केलेल्या लोकांना आवडतात .. एक तर आई, आजी सारख्या ज्या अन्न पूर्णाच असतात नाही तर एकदम इंदिरा गांधी सारख्या.. बाकी ज्या चुकत माकत शिकतात त्यांना सगळेच असेच म्हणतात जो पर्यंत प्रतेय्क गोष्टीची सुरुवात स्वतःपासून होते आणि स्वतः पर्यंत संपते हे कळायला काही लोकांना खूप वेळ लागतो.. त्यासाठी कारण हि तशीच असतात.. कारण असे लोक कोणाच्या तरी इन्फ़्लुएन्स खाली वाढलेले असतात, मग मोठे झाल्यावर काही तरी दोष आहे आपल्यात तेव्हा स्वतः ला सुधरवून बघू या म्हणत चुका करतात तर काही ..नाही मी अशीच आहे हे प्रुव्ह करण्यात चुका करतात.. .. जावू दे..
I can only say one thing.. You can not understand because you have not been there

तक्रारी पुढे जावून ज्यांना काही दिसत नाही त्यांना आवडणार नाही.. शक्य आहे.. कारण ह्या जगात फक्त पिक्चर परफेक्ट बायका चित्रित केलेल्या लोकांना आवडतात .. एक तर आई, आजी सारख्या ज्या अन्न पूर्णाच असतात नाही तर एकदम इंदिरा गांधी सारख्या.. बाकी ज्या चुकत माकत शिकतात त्यांना सगळेच असेच म्हणतात जो पर्यंत प्रतेय्क गोष्टीची सुरुवात स्वतःपासून होते आणि स्वतः पर्यंत संपते हे कळायला काही लोकांना खूप वेळ लागतो.>>> हे थोडं धाडसी विधान वाटत नाही का? मी हे पुस्तक वाचलं नाही, पण उर्मिला देशपांडेचं 'Pack of Lies' वाचलं आहे. मला अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नाही. एकीकडे 'Not a true story' म्हणायचं आणि एकीकडे जे घडलं तेच आणि तसंच लिहीयचं. निदान स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःच्या चुका का मान्य केल्या नाहीत? बरचसं पुस्तक परिस्थितीला, आईला, बापाला indirectly दोष देण्यात खर्ची पडलं आहे. नायिका तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वतःच्या चुकांमधून खरंच काही शिकत नाही. परत परत त्याच त्याच चुका करत रहाते. घडलेली प्रकरणं आणि घडलेल्या घटना 'बोल्ड' पणे कारण नसताना लिहील्या आहेत. इथे प्रश्न acceptance चा नसावा बहुदा, पण मुलामा दिलेल्या (चुकीच्या) गोष्टींचा असावा.
उर्मिला देशपांडेचं नाव वाचलं आणि रहावलं नाही.

प्रित, चिल Happy मी म्हणाले तसं to each its own. कोणाला पुस्तक न आवडणं इतकं पर्सनली घ्यायला नको. तू म्हणतेस तसं I have not been there(travelling, writing a book or divorce).
तुला आवडलं ना, मग झालं तर!
पण त्या पुस्तकातला, take home message तुझ्या द्रुष्टीने काय होता ते जाणून घ्यायला खरच आवडेल.

तू म्हणतेस तसं I have not been there(travelling, writing a book or divorce)>>
ते असं नाहीये .. रादर अस आहे>> failure, depression, and recovery to a normal life controlling yourself.. (not blaming anybody, not crying like baby, not assuming u r a baby .. move on to a 'your own life' not living in a life projected to u as being u r stupid n worthless)

तुला आवडलं नाही ते मी पर्सनली घेत नाहीये..मला का आवडलं ते मी कळकळीने सांगतेय.. Happy म्हणजे परत अशा लेखिकेच पुस्तक वाचताना कदाचित तू नवीन दृष्टीने वाचशील.. मी हे का सांगतेय... हे नक्की नाही सांगता येणार नाही.. पण खरच माझ्या साठी to take home message .. is there are people like this who need help very badly . who should meet people who can tell them "move on.. dont think about past.. look ahead.. . who can drag them out of this misery.. with just a push (again they might need a push or they need a kick or more than that)" or abondon them completely to realize this harder way..ON THEIR OWN

मी उर्मिला देशपांडे बद्दल लिहिलंय कारण सूर जुळतो.. सुरुवात तशीच आहे
धाडसी विधान >> अंजली.. तू म्हणतेस ते बरोबर "असेल"

आहे कार्पोरेट तरी .. मलाही बोअर वाटले.. कार्पोरेटमध्ये काम करुन ढीगभर पैसा मिळाला, एवढंच पानापानात लिहिले आहे. हा माणूस नेमकं काय काम करत होता, हे कुठेही बोटभरही वाचायला मिळाले नाही.

आहे कार्पोरेट तरी .. >>> कुणाचं आहे? आहे मनोहर तरी.. सारखं शीर्षक दिल.

आणि पोरींनो, हे टेक होम मेसेज काय असतं?

सध्या वाचतेय अधाशासारखी, जी मिळतील ती पुस्तकं....
शोभा डे चं स्पीडपोस्ट वाचलं... अपर्णा ने अनुवाद छान केलाय!
चिकन सूप फॉर पेरेंट्स सोल वाचलं, खूप आवडलं...
जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल अनुवाद - बाबा भांड
हे ही पुस्तक छान आहे.

व. पुंची इन्टिमेट आणि रंग मनाचे वाचली... काही कथा खूप आवडल्या...

प्रित, त्या पुस्तकाने तुझ्या मनात घर केलय ते नीटच समजलं. Happy you have made a personal connection with Ms. Gilbert on some level. पण तरिही ते माझ्यासाठी नव्हतं गं. PEACE!

take home msg : म्हणजे (माझ्यासाठी) एखाद्या पुस्तकातून आपल्याला वैयक्तीकरित्या काय मिळालं

अंजली.. तू म्हणतेस ते बरोबर "असेल" कारण लिहिताना मी अर्धवट लिहिलंय.. हे कळायला काही लोकांना खूप वेळ लागतो.. तर काही लोकांना ते कधीच कळत नाही..>>>> तुम्ही "अर्धवट" लिहीलय हे मला कसं कळणार? त्या खूप "वेळाने" कळणार्‍या "काही" लोकांबद्दल मला माहित नाही. तुम्ही उर्मिला देशपांडेचा उल्लेख केलात, आणि मी त्यांनी लिहीलेलं पुस्तक वाचलेलं होतं म्हणून त्या पुस्तकाबद्दल मला काय वाटलं ते लिहीलं.
प्रत्येकजण पुस्तकाशी स्वतःला आलेल्या अनुभवांमुळे रीलेट होतात असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही त्या पुस्तकाला तुम्हाला आलेल्या अनुभवांमुळे रीलेट झाला असाल, हा वैयक्तिक भाग झाला आणि मी यावर काही बोलू शकत नाही. पण प्रत्येक वेळेस / प्रत्येक व्यक्तीबाबत हे खरं असतंच असं नाही. प्रत्येकाचं अनुभव विश्व निराळं असतं म्हणूनच असं विधान करणं धाडसी आहे असं मी म्हटलं. असो. हे माझे या विषयावर शेवटचे पोस्ट.

आणि पोरींनो, हे टेक होम मेसेज काय असतं?

>>
बी एखादे पुस्तक एकदम बकवास असेल तरी अगदीच वाइट वाटु नये म्हणुन तुम्ही त्यातुन काही शिकल्याचा आविर्भाव करतात त्याला टेक होम मेसेज म्हणतात.
तसेच तुमची सर्वांच्या समोर फट्फजिती झाली आणि ओशाळल्यासारखे वाटले तर त्याला टीचेबल मोमेंट असे म्हणतात.

केशराचा पाऊस
पक्षी जाय दिगंतरा
मारुती चितमपल्लींची पुस्तके वाचुन काढली पुन्हा एकदा.

गौरी देशपांडेंच "चंद्रिके ग सारिके ग.." वाचलेल, फारस आवडले नव्हते रादर पटले नव्हते.
मोकळेपणा आणि स्वार्थीपणा याची सीमारेशा पुसट असते गौरी देशपांडें, शोभा डे यांच्या काही नायिका मला जास्त स्वार्थी वाटत. लेखन हे लेखकांचा आरसा असतो का ? नाही माहित. त्यामुळे मुलीचे आई आणि वडिलांना दोष देणे पण चुकीचेच असेल ? नाही माहित.

वपुंचे 'इन्टिमेट' मलाही आवडले. त्यातली ती "फ्रॉम कमिशनर्स डेस्क" कथा एकदम जमली आहे! इतरही काही छान आहेत.

Hot, Flat and Crowded by Thomas Friedman>> ह्म्म हे वाचायचंय Thomas ची पुस्तकं लई ईझी वाटतात.

आत्ता open - andre agassi आणि cold steel - आर्सेलर - मित्तल ची मर्जर* (* ? की अ‍ॅक्विझिशन) स्टोरी वाचतोय Happy

अपर्णा वेलणकरांची १) ब्रेड विनर २) परवाना ३) शौझिया ही तीन्ही पुस्तकं पाठोपाठ वाचून काढली. आणून बरेच दिवस झालेत. पण वाचाविशीच वाटेनात. सुरवात केली की खूप डिप्रेशन यायला लागलं. शेवटी या आठवड्यात वाचून काढली. पण I could not stop my tears.
आणि वाटायला लागलं, बस्स एवढच करू शकतो आपण. खूप वाईट गेला आठवडा.
पण अप्रतीम आहेत भाषांतरं.

हं..........आन्द्रे अगासीचं "ओपन" काही कारणांनी अर्धवट राहिलंय. वाचायचंय.

Hot, Flat and Crowded by Thomas Friedman>> ह्म्म हे वाचायचंय Thomas ची पुस्तकं लई ईझी वाटतात. >>>>

माझ्या मते फ्रिडमन हा हाडाचा पत्रकार आहे आणि मध्यपूर्व आशियावर त्याच्याइतके अभ्यास केलेले व प्रत्यक्ष काम केलेले लोक कमीच. पण जेव्हा तो पत्रकाराचा तत्त्वचिंतक/व्यवस्थापनतज्ज्ञ/विचारवंत झाला तिथे त्याची पुस्तके गंडली.. सुरुवात World is Flat ने झाली.. अर्थात ह्या पुस्तकाने तो अधिक लोकप्रिय झाला ही बाब असेही दर्शवते की कदाचित बहुसंख्य लोकांना त्याचा हा अवतार आवडतो.. फ्रिडमनची दोन उत्कृष्ट - वाचनीय पुस्तके: From Beirut to Jerusalem आणि The Lexus and The Olive Tree..

The Lexus and The Olive Tree.. आहे माझ्याकडे.. पण अजून पूर्ण वाचू शकलो नाहीये. From Beirut to Jerusalem >> हे दहशतवादावर आहे का रे?

तत्त्वचिंतक/व्यवस्थापनतज्ज्ञ/विचारवंत झाला तिथे त्याची पुस्तके गंडली.>>>अगदी.. मी ते पुस्तक हातात घेतलेलं बाजूच्या अमेरिकन कलीग ला सांगितलं.. तो म्हणतो take it easy... त्यात revised edition तर अमेरिकन कसे जगाला वाचवू शकतात ब्ला ब्ला .. Sad ..जबरदस्त प्रोटेस्ट झाल्यावर बचावाचे धोरण घेतल्या सारखं वाटतं..
फ्रिडमनची दोन उत्कृष्ट - वाचनीय पुस्तके: From Beirut to Jerusalem >> हे नक्कीच वाचायचं आहे.. ऑफिस मधल्या एका ने आवर्जून सांगितलं आहे वाचायला..

मि वाचु आनन्देचे दोन भाग वाचतेय.माधुरी पुरंदरे नि सम्कलन केलेय.त्यातल द.मा.मिं.चा बाबांचा अभ्यास कोणी वाचलेय का? मला तर बाबानी जाम हसवले.

मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.

मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.

मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.

Pages