मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोडबोले सध्या सकाळ च्या रविवार च्या सप्तरंग मधे पण एक सदर लिहित आहेत. फार छान माहिती असते त्यामधे.

arc

तुम्ही कुबेर पण वाचुन पहा. छान आहेत पुस्तके.

गोनीदांच्या कादंबर्‍या आणि प्रवासवर्णनेही उच्च आहेत.
खे. म्ह. आ.ल. यू. मी पण आणलंय. अजून वाचलं नाही. कळ वाचताना जागोजागी डोकं चांगलंच ढवळून निघतं. 'दोन्ही' वाचायला सुरुवात केलंय. त्यातही सुरुवातीवरून शैली वेगळी असावी असे वाटतेय.

नी, मनोहरांची शैली 'उत्सुकतेने मी झोपलो' मधेही 'कळ' पेक्षा वेगळीच होती.

हे पुस्तक मी वाचलेलं नाही. पण ज्यांना विशेषेकरून कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137...
आर्त संगीत ऐकल्याचा अनुभव देणाऱ्या कथा
‘द एलिफंट व्हॅनिशेस’ : हारूकी मुराकामी
परिचय करून दिलाय सचिन कुंडलकर यांनी

मेमरीज ऑफ गेयाशा arthur golden.

विदारक अनुभव..लहान मुलीचे विश्व ते ग्येशा होईपर्यंत चे अनुभव ह्या पुस्तकात दिले आहे नृत्य,कला, आणि साके ओतेपर्यंत ... किमोनो हे सगळं फक्त पुरुषांसाठी करायचं यक, यक .. Sad त्यात त्यांचा तो मेक अप केश भूषा .. ओह माय.. आणि तेव्हाची जपानमधल्या बायकांची काय अवस्था असेल.. कल्पना सुद्धा करवत नाही..

गोडबोलेंचं बोर्डरूम मस्त पुस्तक! ज्यांना मेनेजमेंटमधे काही चांगलं करायचंय त्यांनी तर जरूर वाचावं!
किमयागार सुद्धा मिळतंय आता. लोकसत्तेतल्याच लेखांचं संकलन आहे ते.
गोडबोले आणि त्यांची बहीण सुलभा पिशवीकर यांचं अजून एक सदर येइ लो.स. मधे. शास्त्रीय संगीताबद्दल होतं. नाव विसरले त्याचं. तेही सुंदर होतं.

लोकप्रभेतही काही वेळा लिहिलंय त्यांनी. कुठल्या सदरासाठी ते आठवत नाहिये आता.

सध्या किरण बेदी वाचतेय मी. मराठीत वाचलंय "इट्स ऑलवेज पॉसिबल", आता मूळ इंग्रजी.
तिहार जेलचा कायापालट कसा केला त्यांनी ते वाचतेय.

रच्याकने, शाळेत असताना भगत सिंगांवरचं "इन्किलाब" वाचलं होतं, अप्रतिम पुस्तक!
अजून काही..

योगी अरविंद. लेखक कोण लक्षात नाही.
दिग्विजय- मुक्ता केणेकर (विषय-स्वामी विवेकानंद)
साद देती हिमशिखरे (अनुवादित)-मूळ- Towards The Silver crests of Himalayas- G K Pradhan
जीवनदाता (अनुवादित)

आठवेल तशी लिहिन अजून. गेल्या ३-४ वर्षांत नवीन कही नाही वाचलंय! Sad

वरच्या यादीत साद देती हिमशिखरे नाव वाचून माझ्याबाबतचा हा किस्सा आठवला.
हे पुस्तक कशाबद्दल आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण शीर्षक वाचून मला हे एव्हरेस्ट मोहीमेवर गेलेल्या लोकांची डायरी (ट्रॅव्हलॉग) असेल असे वाटले आणि म्हणून ते वाचायला आणले (माझा वेडेपणा) :हाहा:. रारंगढांगसारखेच काहीतरी वाचायला मिळणार असे गृहीत धरून मी हे वाचायला घेतल्यावर माझा एकदम पोपट झाला. इतका मोठा पोपट कधीही झाला नव्हता.

स्पिकिंग ऑफ पोपट.. रारंग ढांग हे मी नेहमी रारंग ढंग वाचायचे किवा ऐकायचे .. त्यामुळे काही तरी नाटक सिनेमा असलं किवा काही तरी दुसरं असेल ह्या आशेने हातात घेतलं तेव्हा कळलं कि ते ढांग आहे !
आणि आत तर भलतंच काही तरी Happy

रूनी Lol

मी ते मूळ इंग्रजीही वाचलं. गंमत म्हणजे, मराठी मधल्या जरा अवघड जाणार्‍या तत्त्वज्ञाशी संबंधित शब्दांना असलेले इंग्रजी शब्द जास्त लव्कर समजले होते! Happy

अजून एक खूप छान पुस्तक-
कादंबरीमय शिवकाल- गोनीदां. त्यांच्या ५ कादंबर्‍यांचं एकत्र पुस्तक आहे. चांगलं जाडजूड आहे. सगळ्या कादंबर्‍या शिवकालावर आहेत. प्रस्तावनेत सविस्तर आहे सगळं. सुरेख पुस्तक!!!

गिरिश कुबेर यांचं हा तेल नावाचा ईतिहास आहे वाचुन झालं, पुस्तक छान आहे. पण मला मग या पेक्षा एका तेलियाने जास्त छान वाटलं. ते वाचताना जास्त मजा येते.

ग्रंथालयात दोन आठवडे क्रमांक लावल्यावर आज कुठे गोडबोलेंचं किमयागार मिळालं
आता चार पाच दिवस तरी तेच Happy

'तिची कथा' - निवडः मंगला आठलेकर
राजहंस प्रकाशन.
शतकातील स्त्रियांनीच लिहीलेल्या स्त्रीवादी कथांचे संकलन. बरे आहे तसे.
कमल देसाईंची 'रंग", विजया राजाध्यक्षांची ' जानकी देसाईचे प्रश्न',गौरीदेंची 'आता कुठं जाशील टोळंभट्टा', 'निवडुंग' ही कथा- एवढ्या ठिक वाटल्या.
ठायी ठायी मुद्रणदोष. Sad

शरद वर्देंचं 'फिरंगढंग' वाचलं. मस्त पुस्तक आहे. वर्देंना भेटलेल्या परदेशी अवलियांचे धमाल व्यक्तीचित्रण आहे. त्यांची लिखाणाची खुसखुशीत, नर्मविनोदी शैली पण आवडली. खूप दिवसांनी असं मस्त दिलखुलास शैलीतलं व्यक्तीचित्रण वाचायला मिळालं.

श्री. जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' हे पुस्तक वाचतेय. श्री. कुंटे यानी पायी केलेल्या ३ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमा करताना आलेले विलक्षण अनुभव लिहीलेले आहेत. सर्व वाचता वाचता मनात शब्द ऊमटतात, 'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' आणि आपल्याही नकळत आपण त्या अदृश्य शक्तीसमोर नतमस्तक होतो. श्री. कुंटे यानाही माझा मनापासून नमस्कार. 'नर्मदे हर'.

Hot, Flat and Crowded by Thomas Friedman

सध्या वाचते आहे.. अमेरिकेची आत्ता ची आर्थिक, सामाजिक परिस्तिथी ह्यावर कडकडून टीका केली आहे..त्यांनी कुठे आणि किती चुका केल्या, पेट्रो पोलिटिक्स काय आणि कसे अरब राज्य कंट्रोल करतात.. अमेरिकन वार आणि पेट्री पोलिटिक्स वर साधार माहिती मिळते नक्की वाचावे असे पुस्तक..
गुडी गुडी कथा, रडकथा कादंबर्या, अत्मचरित्र वाचून कंटाळा आला म्हणून चेंज म्हणून हे पुस्तक हातात घेतले ... मला तरी खूप आवडले..

The Sound and the Fury - William Faulker
बराच वेळ नक्की काय गुर्‍हाळ लावलं आहे हे कळलेच नाही, (एकुण ४० पाने रेटावी लागली) नंतर नंतर उलगडले तेंव्हा मजा आली. दुसरे युलिसीस! आता हाऊ टू रिड साउंड अ‍ॅन्ड द फ्युरी असे गाईड आणून परत एकदा वाचावे म्हणतो. ( पूर्ण कळेल तरी! )

The Sun Also Rises - Hemingway - मस्ट रिड! एक्स पॅटचे (त्यातल्या त्यात लेखकु एक्स पॅटचे जगणे), त्याचे अव्यक्त प्रेम, त्याचे मित्र, पॅरिस ते स्पेन ट्रिप, अमेरिकन माणसांचे वागने, मध्येच वल्ड वॉरच्या कथा असा सगळा मेळ. कथानक खिळवून वगैरे ठेवत नाही, पण माणसाच्या स्वभावाचे पदर प्रत्येक कॅरेक्टर उलगडवून दाखवते. हेमिंग्वे बद्दल काही लिहिने म्हणजे सचिन तेंडूलकर बद्दल अतुल वासनने बोलणे. एकुणात वाचावेच असे.

१. पुलंच्या समग्र साहित्यावर लिहिलेलं समीक्षण.
लेखन- मंगला गोडबोले, स. ह. देशपांडे.
पुस्तकाचं नाव- अमृतसिद्धी (खंड १ व २)

२. बापलेकी- वलयांकित पुरुष आणि त्यांच्या लेकी.
संकलन- विद्या बाळ (बहुतेक)

उदा. विजय तेंडुलकर-प्रिया तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक-मोनिका गजेंद्रकडकर (बहुतेक), ना.सी.फडके आणि त्यांची मुलगी..
मुलीने वडिलांबद्दल लिहिलेलं मनोगत. त्यांचं वलयांकित असणं आणि घरात "वडील" म्हणून असणं..

यात मी "बहुतेक" असं लिहिलंय २ ठिकाणी, कारण ते वाचून ५ वर्षं झाली, आता नक्की आठवत नाहिये Sad

३. डॉ. कणेकरांचा मुलगा.
शिरीष कणेकर. एरव्ही मला त्यांचं लिखाण म्हणजे उगाच काहीही लिहिलंय असं (अजूनही) वाटतं बरेचदा, पण हे पुस्तक बर्‍यापैकी अपवाद. नक्की वाचा.

वलयांकित व्यक्तींच्या सौभाग्यवतींनी लिहिलेलं वाचायचं असेल तर..
१. नाथ हा माझा (कांचन घाणेकर. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची पत्नी.)
२. नाच ग घुमा (माधवी देसाई. रणजीत देसाई यांची पत्नी)

नाथ हा माझा हे अतिशय टुकार पुस्तक आहे असे माझे मत आहे. (प्रज्ञा तुला दुखवायचे वगैरे नाही, फक्त मत मांडतोय.)

इतक्यात वाचलेले पुस्तक

* घरभिंती
* नांगरणी - आनंद यादव .. झोंबी आणि हि दोन्ही हि पुस्तक छान आहेत.

* विम्चुर्नीचे धडे - गौरी देशपांडे ला मी फार दिवस टळल.. तरी म्हटलं वाचूनच काढावं एकदा. हे पुस्तक छान आहे .. शेवटचे २ चाप्टर खूपच छान आहेत..

* 'दुस्तर हा घाट ' आणि थांग -- गौरी देशपांडे. .. हाहाह इथे आधी चर्चा झाली होती.. तरी घेतलं वाचायला.. मग वाटलं का घेतलं वाचायला..

* युगांत - इरावती कर्वे.. इतक्यात वाचलेले बेष्ट पुस्तक.. अतिशय लोजिकल अनालीसीस..

* क्लोरोफोर्म - अरुण लिमये मस्त पुस्तक.. टेबला च्या त्या बाजूने एक डॉक्टर ने लिहिलेलं वाचायला छान वाटतं आपल्या इथल्या रुग्णांची आणि नातेवैकांची कथा मस्त लिहिली आहे..

* लमाण - डॉक्टर श्रीराम लागू
* कोंडमारा - अनिल अवचट
* लेगोसचे दिवस - शोभा बोंद्रे
* एक होता कार्व्हर - विना गवाणकर.

हो हो केदार 'नाथ हा माझा' हे मी वाचलेल्या आत्मचरित्रांच्यातलं टुकारेस्ट आणि चीपेस्ट पुस्तक आहे.

आहे कार्पोरेट् तरी ... - संजय जोशी : मुळीच आवडलं नाही. सुरुवात मुखपृष्ठापासून, तो फुलांचा टाय, खिशात लाल गुलाबाचं फूल (!)असा कुणीसा गृहस्थ दाखवलाय तो कार्पोरेटशी संबंध न वाटता पार्टी- लग्नातला वगैरे अवतार वाटतो. "आयडिया मधे मोठ्या पदावर असताना ४२ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय" या विषयाचा जीव फार तर एक ललित लेख इतकाच आहे. त्याचे इतके लांब पुस्तक लिहिणे तेही प्रत्येक पाना पानात स्वतःचे कौतुक! पुस्तकात प्रत्येक प्रकरण 'हे इतकं सगळं असून पण मी राजिनामा द्यायला निघालो'. 'हे अन ते मिळवून पण मी राजिनामा द्यायचा निर्णय घेतला' या अन अशा लाइनींनी समाप्त होते. अगदी पार "मुलीच्या लग्नात मी लहान मुलासारखा रडलो, कुठली गोष्ट हातची राखून करायचा माझा स्वभावच नाही" , " पंचतारांकित कार्पोरेट लाइफ जरी सोडले असले तरी रोजच्या आयुष्यात पंचतारांकित राहणीमान तसेच ठेवले, अमुक ठिकाणी फिरून आलो, तमुक क्रुज वर जाऊन आलो " हे वाचून हसूच आले खर तर. बर मग? मुद्दा काय? असे म्हणावे वाटले.
असो. एकूणात बोरिंग पुस्तक.

सध्या रविवार सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत राजन खान हे तरुणाई वर छान लेखमालीका लिहित आहेत. फार वेगळा आणि दुर्लक्षिलेला विषय्. वयस्करांनी म्हणजे पालकानी जरूर वाचण्यासारखी मालिका आहे ही. तरूणाना आपण वेडे,इमॅच्यअर्ड समजतो किवा ग्रुहित धरतो हे किती चुकीचे आहे हे त्यात लिहिले आहे.

अच्युत गोडबोल्यांच्या पुस्तकाचा एवढा उदो-उदो बघून आश्चर्य वाटलं. मी त्यांचं बोर्डरूम विकत घेऊन वाचलं. मला तरी त्यातले बरेचसे लेख wikepedia वरच्या माहितीचा अनुवाद वाटले. ज्या लोकांना wikepedia माहित नाही त्यांना हे पुस्तक वाचनीय वाटू शकतं.

हो, अच्युत गोडबोल्यांची बरीचशी पुस्तकं इंग्रजी पुस्तकांवरून थेट घेतलेली आहेत.

आर्थर क्लर्क यांच्या ओडिसी सिरीजमधली दोन पुस्तके वाचून झाली.( त्यानन्तर स्टानले कुब्रिकचा सिनेमाही पाहीला.)

अचंबित व्हायला होतं. १९६८ मह्ये लिहिलेल्या कादम्बरीतल्या बर्याचश्या कल्पना आज साकार स्वरुपात आहेत.

आता पुढच्या दोन ओडिसी वाचायच्या आहेत.

Pages