Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किशोर शांताबाई काळे यांचे
किशोर शांताबाई काळे यांचे कोल्हाट्याचे पोर वाचले >> हे पुस्तक वाचून मी बराच काळ दिड्मुढ अवस्थेत की काय तसा झालो होतो. त्याआधी उपरा वगैरे वाचले होते पण तरीही हे एक वेगळंच पुस्तक आहे. मधु कांबीकरांचीही थोडी कथा ह्यात आहे.
'कोणत्याही जीवनसत्याच्या आत्ममग्न गाभ्यापर्यन्त पोचण्याचा तो एक खग्रास मार्ग आहे >>
टोणग्याही बोजड भाषा वापरण्यात प्रविण झाला आहे.
साहित्याचे अर्थविश्व, सध्या प्रकाशनोत्सुक महान ग्रंथ >> आगाऊ संसारात रमलेला दिसतोय म्हणून जळीस्थळी इएमआय दिसतोय.
सध्या "Power of Now" by
सध्या "Power of Now" by Ekhart Tolle वाचायला घेतलेय खूप छान आहे मिळाले तर जरूर वाचा. माझा हा आवडता लेखक आहे पुर्वी मी त्याचे "New earth purpose of life" वाचले होते प्रचंड आवडले मला ते.
हो..पॉवर ऑफ नाऊ मी वाचलय
हो..पॉवर ऑफ नाऊ मी वाचलय पूर्वी. मलाही खूप आवडलेलं पुस्तक आहे हे
फिरविले अनंते- फिरोझ रानडे
फिरविले अनंते- फिरोझ रानडे मॅजेस्टिक प्रकाशन
श्री रानडे हे जुन्या पिढीतील पी.ड्ब्ल्यु.डीत कमानकलाकार ( आर्किटेक्ट साठी त्यांचाच मराठी प्रतिशब्द). शासकीयसेवेनिमीत्ताने त्याकाळी शिलॉंग,अफगाणिस्तान, दिल्ली, कोलकाता, मुंबई, ओमान,इंग्लंडात वगैरे राहिलेले. त्यांच्या भ्रमंतीचे/शासकीय सेवेतील अनुभवांचे हे आत्मचरित्रात्मक वर्णन. बरेचसे विस्कळीत आणि काही मजकूर विसंगत वाटतो (संपादकांनी जोरदार कात्री न लावल्यामुळे), तरीही (लेखनातील)प्रामाणिकपणा या एका(च) निकषावर वाचायला हरकत नसावी. मुंबई शहरातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे (ग्रंथाली प्रकाशन) यावरील त्यांचे पुस्तक आहे, ते पहायला पाहिजे.
<<मुंबई शहरातील सर्व धर्मीय
<<मुंबई शहरातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे (ग्रंथाली प्रकाशन) यावरील त्यांचे पुस्तक आहे, ते पहायला पाहिजे.>>
या पुस्तकाचं नाव 'मुंबईचा महिमा'. यांत मुंबईतील प्रार्थनास्थळांचा इतिहास व छायाचित्रे आहेत. मस्त आहे. मात्र छपाई निकृष्ट.
इरावती कर्वे ह्यांनी लिहीलेलं
इरावती कर्वे ह्यांनी लिहीलेलं "युगांत" वाचलं. इरावती बाई स्वतः मानववंशशास्त्राच्या अभ्यासक असल्याने हे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण असणार ह्यात शंका नव्हती. महाभारतातील कृष्णासकट सगळ्या पात्रांना कुठल्याही प्रकारचे देवत्त्व न देता मानवीपातळी वर केलेले हे विवेचन खूप आवडले. महाभारताच्या विविध आवृत्त्यांबद्दलची माहिती समजली. एखाद्या शोधनिबंधासारखी भाषा असूनही पुस्तक अतिशय खिळवून ठेवते. महाभारत आणि रामयण ह्यांची तुलना, सीता आणि द्रौपदी ह्यांच्या कहाण्यांमधली साम्यस्थळे तसेच फरक, कुठल्याही प्रकारचे चमत्कार वगैरे न दाखवता "करावे तसे भरावे" ह्या तत्त्वावर आधारलेले सर्वच पात्रांच्या आयुष्यातले प्रसंगांचे विवेचन वाचायला मस्त वाटले. पुस्तकातली प्रकरणे जरी पात्रांच्या अनुषंगाने असली तरी त्यातला घटनांचा क्रम व्यवस्थित उलगडत जातो आणि शेवटी पूर्ण कथा तयार होते. भिष्म, द्रौपदी, गांधारी, कुंती, कृष्ण आणि वसुदेव ही प्रकरणे तसेच शेवटचं युंगात हे प्रकरण (ज्यात "युगांत" ह्या शब्दाच्या व्याख्येपासून महाभारताच्या संदर्भात झालेला युगांत ह्याचं चित्रण आहे) खूप आवडलं.
ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी मस्ट रिड.
मि शाळेत असताना आम्हाला एक
मि शाळेत असताना आम्हाला एक कविता होती. हो तोन्डि परिक्शेला. ती अशी -
"ग्रिश्मातल्या सकाळी आले भरुन मेघ , अन विस्कतून गेले सारे प्रभात रन्ग"..............
कोणी मला पूर्ण कविता देवू शकेल का ?? आणि कवयित्री कोण आहेत ? पद्मा गोळे का ??
पराग थॅन्क्स युगांत वाचायलाच
पराग थॅन्क्स
युगांत वाचायलाच पाहिजे.
गौरिच अजुन एक छान पुस्तक ते
गौरिच अजुन एक छान पुस्तक ते म्हन्जे गोफ / तिहेरि गोफ ...
ह्यवर पिम्पलपान नवचि मालिकहि पहिलि आहे मी ...
.
.
परवाच 'तुंरुंगातील सावल्या'
परवाच 'तुंरुंगातील सावल्या' नावाचे रुझबेह भरुचा यांच्या पुस्तकाचा लीना सोहोनी यांनी केलेला अनुवाद वाचला.हे पुस्तक तुरुंगात रहाणार्या स्त्रिया आणि त्यांच्या बरोबर तेथेच रहाणारी काही केसेस मध्ये तिथेच जन्मलेली मुले यांच्या समस्या यावर आहे..
भारतात कायद्या नुसार ५ वर्षाखालील मुले आपल्या आई किंवा वडिलां बरोबर तुरुंगात राहु शकतात..तेव्हा तिथे त्या मुलांसाठी असणार्या सोयी , ५ वर्षा नंतर त्या मुलांना जर कोणी नसेल तर त्यांची सोय सरकार निवासी शाळेत किंवा अनाथाश्रमात करते,तिथे मुलांना ठेवल्या वर येणार्या अडचणी यांचा उहापोह केला आहे..
पुस्तकाचा विषय नक्किच अस्वस्थ करणारा आहे..म्हणजे असे काही असते हेच आपल्याला माहित नसते..आणि त्यांचे जीवन , त्यांचे भयावह बालपण आणि त्याचा त्यांच्यावर होणारा कदाचित कायमस्वरुपी परिणाम हे सगळे हलवुन सोडते..
काहि ठिकाणी मात्र बहुधा अनुवाद नीट जमला नाहिये..म्हणजे काहि विनोद बळेच घुसविल्यासारखे वाटतात..
आणि हे पुस्तक किरण बेदींच्या मदतिने लिहिलेय सो बर्याच ठिकाणी त्यांच्या फाउंडेशन ची जाहिरात केल्यासारखे वाटते..
पण तरिहि एक वेगळा आणि आपण ज्या पासुन पुर्ण अनभिज्ञ आहोत असा एक वेगळाच विषय मात्र हाताळलाय..
इथे कुणी विलक्षण नावाच पुस्तक
इथे कुणी विलक्षण नावाच पुस्तक वचल आहे का ?
लेखक : रत्नाकर मतकरी.
चिं.वि जोशींनी एका बाईच्या
चिं.वि जोशींनी एका बाईच्या आयुष्यावर कादंबरी लिहिलेली. ब्राम्हण विधवा जी पुढे स्वतःची खाणावळ काढते. (नेहमीसारखेच नाव विसरले). त्यानी नेहमी विनोदीच लेखन केलेय, ही कादंबरीही विनोदाच्या वळणानेच लिहिलीय, पण त्यात तेव्हाच्या ब्राम्हण बायकांवर आणि विषेशतः विधवांवर जे भयानक अत्याचार केले जात त्याची कहाणी वाचुन अंगावर काटा येतो अक्षरक्षः.. बायका काय काय सहन करायच्या आणि केवळ पोटी मुल आहे, आपल्यामागे त्याचे हाल नको म्हणुन हे सगळे सहन करत दिवस ढकलायच्या.. बापरे...
ह्या पुस्तकाचे नाव माहित आहे का कोणाला??
मिस्टरीमध्ये अॅगथा ख्रिस्तीचे द मिस्टेरिअस मी. क्विन माझे अतिशय आवडते आहे. इथे वाचलेय कोणी?
'बारोमास' वाचून झालं नुकतच.
'बारोमास' वाचून झालं नुकतच. या पुस्तकाचा आधी उल्लेख आलाच आहे.
सर्व पात्रं अतिशय ताकदीने सादर केली गेलीयेत.
अतिशय प्रभावी लिखाण आहे. सदानंद देशमुखांनी विषय अत्यंत समर्पकपणे मांडलाय. मराठवड्यातील शेतकर्यांची परिस्थिती, त्यांची होणारी पिळवणूक, त्यांचा अविरत संघर्ष व यावर पांढरपेशा समाजाच्या प्रतिक्रिया दाहकपणे जाणवून येतं.
मी शेतकर्यांवर असलेले हे पहिलेच पुस्तक वाचले व अतिशय अस्वस्थ करून टाकणारा अनुभव येतोय सध्या :-(. शेतकर्याला सरकार दरबारी किंमत नाही, सामान्य माणूस शेतकर्यांच्या प्रश्नावर सहसा अलिप्त असतो. स्वतः कधीही शेती न केलेले लोक शेतकर्याला शेती शिकवतात, त्यांच्या आत्महत्येवर केवळ चर्चा करणार्या सामान्य लोकांना (ज्यात मी पण आहे
) शेतकर्यांचे असे किती प्रश्न कळले आहेत हे विचारायला हवं.
प्रत्येकाने वाचावच असं हे पुस्तक आहे.
मी बारोमास अर्धेच वाचलेय..
मी बारोमास अर्धेच वाचलेय.. नंतर नंतर मला वाचवलेच नाही..
@ ऋषिकेश जोशी - मी वाचलंय
@ ऋषिकेश जोशी - मी वाचलंय "विलक्षण" - रत्नाकर मतकरींचे. सोळा कथांचा सुंदर संग्रह! माझे आवडते लेखक आहेत ते.
अमी
सत्यजित राय यांनी लिहिलेल्या
सत्यजित राय यांनी लिहिलेल्या 'माय इयर्स विथ अपू' पुस्तकाचा विलास गिते यांनी केलेला अनुवाद 'अपूर पांचाली' नावाने नुकताच मैत्रेय प्रकाशनाने प्रसिद्ध केला. तो वाचला. अनुवाद चांगला केलाय. पुस्तकही दर्जेदार काढले आहे. विशेष म्हणजे अनुवाद इंग्रजी भाषांतरावरुन न करता मुळ बंगाली पुस्तकावरुन केलं आहे त्यामुळे बंडोपाध्याय असे भ्रष्ट उच्चारण न होता 'बंद्योपाध्याय' असं यात बरोबर उतरलय. मुळ पुस्तकात नसणारे फोटो आणि स्केचेसही खास मिळवून यात टाकले आहेत हे मराठी अनुवादित पुस्तकांच्या दृष्टीने विशेषच म्हणायला हवे.
बाकी पुस्तकातल्या मजकुराबद्दल तर बोलावे तितके कमीच. अपू चित्रत्रयीच्या निर्मितीमागची ही कथा. पाथेर पांचालीच्या प्रत्येक गाजलेल्या दृष्यामागची प्रेरणा, आलेल्या अडचणी, काढलेले मार्ग आणि त्यानंतर 'अपराजित' 'अपूर संसार' या दोन चित्रपटांची निर्मिती, कलाकारांचे अनुभव या सगळ्याबद्दल सत्यजित राय एक दिग्दर्शक या नात्याने ज्या सडेतोडपणे, आपुलकीने आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून लिहितात ते वाचणं म्हणजे एक निखळ आनंद. एक स्मृतीकथा आणि ऐतिहासिक दस्तऐवज या दोन्ही दृष्टिकोनातून माय इयर्स विथ अपूचे महत्व आहे. प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकाने असं एखादं तरी पुस्तक लिहिलं तर काय बहार होईल!
Hey mala stephenie meyer che
Hey mala stephenie meyer che TWILIGHT hya pustakache anuvadit marathi pustak have ahe..................................konala tyache lekhak athava tyasambandhi kahi mahiti ahe ka??????????please asel tar mala kalava........maza email.....vedangsathe@g,ai;l.com
शर्मिला, माझ्या बाबतीत मला
शर्मिला, माझ्या बाबतीत मला काय वाचायचं आहे / वाचायला पाहिजे हे मला तुझ्या पुस्तकांबाबतच्या लिखाणावरून लक्षात येते. धन्यवाद आणि असेच वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल लिहीत राहा.
बहुचर्चित मेघना पेठेचं 'हंस
बहुचर्चित मेघना पेठेचं 'हंस अकेला' (आत्ता!) वाचलं. आवडलं. तिची भाषा अशी अंगावर येणारीच आहे असं गृहित धरूनच वाचलं तर त्रास होत नाही. त्यामुळे त्या भाषेच्याही पलिकडे जाऊन मी विषय, वर्णन पाहू, सहन करू शकले आणि मला तिने जे आणि जसं लिहिलंय ते आवडलं.
उदकाचिये आर्ति वाचलं. ह्या
उदकाचिये आर्ति वाचलं. ह्या आधी झेन गार्डन वाचलं होतं. दोन्ही पुस्तकातल्या पहिल्या कथा सोडल्यास दोन्ही आवडली. एखादा अपवाद वगळता सगळ्या कथांमधे समाजकारण करणारी माणसं आहेतच. काही काही शब्दप्रयोग पण सातत्याने येतातः इंजिनाचा दमदार आवाज. त्यात येणारे इतर पीक-पाणी-जमीन उल्लेख कायम ऐकल्याने मला ते वाचायला फार मनापासून आवडते. तरी एक दोन गोष्टी लक्षात येत नाहीत. एक तर समाजकारण आणि सुखी/यशस्वी संसार दोन्ही गोष्टी एकदम शक्य नाहीत असे कंक्लुजन बहुतेक कथांमधुन येते. जे फारसे खरे नाही. आणि दुसरे, अतिशय मोठे ध्येय वगैरे असलेली ही लोकं छोट्या-छोट्या मोहांमधे मात्र चटकन फसतात. असो, दोन्ही पुस्तकं एकदा तरी अवश्य वाचावी अशी वाटली.
सानियाच अशी वेळ वाचलं. ओक्के
सानियाच अशी वेळ वाचलं. ओक्के आहे.. कुणाला हवं असल्यास सांगा.
'तेहरानच्या तुरुगांतून'
'तेहरानच्या तुरुगांतून' वाचलं..वाचल्यावर बरेच दिवस हादरलेल्या अवस्थेत होते!
are konitar sanga plzzzz
are konitar sanga plzzzz
are konitari sanga plzzzz
are konitari sanga plzzzz
गोहन तुम्ही तुमचे म्हणणे
गोहन तुम्ही तुमचे म्हणणे पहिल्यान्दा अनुवादित करून सांगा....
tonaga तुम्हाला देवनागरीत
tonaga तुम्हाला देवनागरीत म्हणायचय ना?
सुनील गुप्ता यांचे झंडेवाला
सुनील गुप्ता यांचे झंडेवाला थॉम्सन नावाचे मस्त पुस्तक आहे. १९८० ते आजपरेन्त च्या भारतीय जाहिरात विश्वाचे प्रातिनिधिक चित्रण. त्यात खास त्याजगात होतील असे विनोद आहेत. साधी हसरी शैली आहे. व अनुभवातून होणारे शिक्षण ही आहे.
रामनगरी वाचतेय...अर्धच झालंय
रामनगरी वाचतेय...अर्धच झालंय अजुन. खुप सुंदर लिहीलय पण. त्यांच्या विवाह प्रसंगाचे वर्णन सुंदरच.
आगाऊ < दा विन्सि कोड! हे पुस्तक पंजाबीतही आहे त्याचं नाव 'विन्सि दा कोड' > हे जबरी होतं
:)) :)) :))
निवडक मुलाखती- भालचंद्र
निवडक मुलाखती- भालचंद्र नेमाडे
वेगवेगळ्या प्राध्यापक टाईप्स ने घेतलेल्या नेमाडेंच्या मुलाखती. You might hate him for his opinionated thoughts and also suspect him of creating the sensational. तरीही समजलं नाही असं होणार नाही, अगदी कोणालाही. कुठल्याही पानापासुन /प्रश्नापासुन सुरु करा (त्यांचं लेखन थोडसं तरी वाचलं असलं पाहीजे) रोचक आहे. साहित्य संमेलनं बंद करा, उपसाहित्याचे प्रकार, वास्तववादी लेखक, तत्वप्रणाली, चांगदेव, देशीवाद, इंग्रजीतुन लिहीणारी बांडगुळं, मौजेवर टीकास्त्र वगैरेंवर मस्तय.
ते सानेगुरूजी सर्वश्रेष्ठ कादंबरीकार वगैरे प्रकरण मला झेपलंच नाय. असो.
Pages