मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रस्कीन बाँडचं ब्लू अंम्ब्रेला वाचतेय. मस्त आहे. सिनेमा पाहील्यापासून उत्सुकता होती - मूळ पुस्तकात ही कथा कशी लिहीली असेल हे जाणून घेण्याची Happy

मलाही रस्कीन बाँडचं लेखन आवडतं. मागे मायबोलीवरच शर्मिलानं लिहीलेला र. बाँडवरचा एक छान लेख वाचला होता.

अंजली, रस्किन बॉन्डवरचा शर्मिला फडकेचा लेख गेल्या वर्षींच्या हितगुज दिवाळी अंकात होता. Happy

नारायण संताच्या लंपन बद्दल इतके ऐकले होते.. शेवटी शारदा संगीत आणि पंखा पुस्तके हातात पडली.. शारदा संगीत एका दिवसात संपवलं.. शेवटचा शारदा संगीत भाग खूपच आवडला.. पंखा मधली ..काही प्रकरण खूपच छान आहेत ..

ज्योत्स्ना कदमांचं ''सर आणि मी '' कुणी वाचलंय का? खूपच बोल्ड तरीही खूपच प्रामाणिक लिखाण आहे.
त्यांचा जीवनानुभवच खूप जगावेगळा आहे.

एलकुंचवारांचे युगान्त वाचायला घेतले. खाली ठेवावे वाटले नाही.

मला जाम आवडले. त्यातल्या पात्रांच्या कित्येक व्यक्तव्याशी सहज एकरुप होता आले. अभयचा परदेशातील गोंधळ, कुठलेही घर हे घर न वाटणारी मनस्थिती अन घराच्या ओढिने गावाकडे वापस येऊन रेंगाळने, एलकुंचवारांनी हा घोळ व्यवस्थित मांडला आहे. ते कधी परदेशात स्थायिक होते का ते माहित नाही पण जो काही विचार त्यांनी मांडला आहे तो प्रत्येक देशीच्या मनात येतोच येतो.

परागचे बेफिकीर वागणे, त्याचे बेकायदेशीर कामे करुन कुटूंब वर आणने ह्याला नकळत आपण अप्रुव्ह (हाच एक योग्य शब्द वाटला. ) करुन बसतो. नंदिनीची बाजू, त्यातून येणारे शहाणपण, वहिनींची अनेक वाक्य खास करुन दागिने बघितल्यावर देखील हाव न येता, येणारा सगळ्यंचा विचार, सुधिरचे पळपुटे विचार, अंजलीचे आधी लांब असने अन नंतर देशपांडे कुटूंबियांमधिल एकच असने हा प्रवास हे सगळंच फार सुंदर आहे.

प्रत्येक पात्र वेगळी मनोभुमिका, विचार घेऊन येते व जगते. हा प्रवास एलकुंचवारांनी फारच सुंदर मांडला आहे.
नाटक झाले तेंव्हा मी पाहिले नाही, आता कोणी करत नाही पण झाले तर नक्कीच जाईल. किशोर कदम ने पराग अन सचिन खेडेकरांनी अभय साकारला होता.

लहानपणी एक "देनिसच्या गोष्टी" नावाचं पुस्तक वाचलं होतं. मुळचं रशियन होतं बहुतेक, मराठीत अनुवाद केलेलं वाचलं होतं. पण आता त्याच्या लेखकाचे नाव वगैरे काहीच आठवत नाहिये.
कुणाला माहित आहे का हे पुस्तक, त्याचे लेखक आणि असेल तर ते अप्पा बळवंत चौकात मिळेल का?

तिथे कशाला, इथे बॉस्टनमधे असामीकडे आहे की देनिसच्या गोष्टी :- ) शिवाय त्याचे इन्ग्रजि अनुवाद ऑनलाइन पण आहेत .

http://home.freeuk.net/russica2/books.html इथे आहे देनिस -वासिलिसा पण आहे .

अरे वा, इंग्रजी अनुवाद असेल तर अजुनच छान. माझ्या मुलीसाठीच हवं आहे, मराठी वाचायचा वेग कमी आहे अजून तिचा. धन्यवाद मेधा!

अर्रे राखी ,मेधा........माझी अत्यंत आवडती दोन पुस्तकं आहेत ती. डेनीस आणि सुंदर वासिलिसा! माझ्याकडे आहेत ती...सध्या पुतणीकडे! तसंच टॉमसॉयर आणि हकलबरी फिन!

ज्युडीथ मॅकनॉटच्या " डबल स्टँण्डर्डस " चा अनुवाद..... हे खरच खूप सुंदर पुस्तक आहे... आणि " पॅरेडाईज" हेही अतिशय सुंदर... दोन्ही पुस्तकांमध्ये अतिशय तरल पण सुंदर प्रेमकथा आहेत... जरुर वाचावीत अशी....

'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' मला पण आवडलं.
संपूर्ण लिखाणाला थोडा भाबडेपणा आहे पण तरी पकड घेतं ते. परत जुन्या तंत्रज्ञानाबद्दल काही महत्वाची माहिती मिळतेच.
डाव्या हाताला पुस्तक फुटल्यासारखं वाचून पूर्ण केलं.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अ‍ॅण्ड मिडीया या संस्थेने.
एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत.
रवी परांजपे, डॉ. द भि कुलकर्णी, प्रभा अत्रे, शांता गोखले, सुरेश तळवलकर, मीना कर्णिक, श्यामला वनारसे, शमा भाटे, सुधीर गाडगीळ, विठ्ठल उमप, माधव वझे, वामन केंद्रे, प्रवीण भोळे, कमलेश वालावलकर, दासू वैद्य, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, राजन खान, चंद्रकांत कुलकर्णी, रंगनाथ पाठारे, नागराज मंजुळे, मंगेश हाडवळे, समीर विद्वांस, वैभव आरेकर, चैतन्य कुंटे, हिमांशू स्मार्त अश्या अनेक विविध कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या लेख/ मुलाखतींबरोबरच कलाकारण या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अश्या काही राजकारणी लोकांशी केलेली कलाविषयक बातचीत हे ही आहे.
संग्रही ठेवावेत असे अंक आहेत.
हे दोन अंक आणि संजय आवटे यांचं कला कल्पतरूंचे आरव - आनंदाचे झरे जपायचे कसे? हे पुस्तक असा संच सध्या सवलतीच्या दरात (रू. ३००) उपलब्धही आहे. त्यासाठी 08975969338 - ऋतुजा मुळे या क्रमांकावर संपर्क करा.

जाता जाता माझाही एक लेख यात आहे. पण माझ्या लेखापेक्षा काही खरंच खूप महत्वाचे लेख आहेत म्हणून हे इथे सांगतेय. Happy

अंजली रस्कीन बाँडचं मी वाचलेलं ब्लू अम्ब्रेला हे पहीलंच पुस्तक. शर्मिलाचा लेख वाचल्यापासून रस्कीन बाँड डोक्यात होता. ब्लू अम्ब्रेला वाचून संपलं. एक छोटसं आणि छान पुस्तक. असं एकदम साधं - सरळ बर्‍याच दिवसांनी वाचलं असं वाटलं. आता "Best of Ruskin Bond" वाचायला घेतलंय. शर्मिलानेच सजेस्ट केलं होतं. Happy

भैरप्पांचं 'सार्थ' वाचलं..
त्यांचं 'पर्व' वाचून कृष्णाच्या प्रेमात (पुन्हा एकदा) पडलेले.. आणि भैरप्पांच्या शैलीच्याही..

त्यामुळे सार्थ वाचायचच होतं.. फायनली योग आला..
त्यावर ऑलरेडी विस्तृत रिव्ह्यू असल्यानं जास्त लिहित नाही..
आवडलं एवढच सध्या..

रेणू गावस्करचं 'आमचा काय गुन्हा' वाचलं.. तिच्या प्रयत्नांना दाद द्यावीशी वाटली.. आपल्या सारख्या वातावरणातून जाऊन असं काही करणारी माणसं पहात राहिले की कधीतरी आपलेही विचार योग्य मार्गावरून धावायला लागतील, असं वाटतं..

तुमच्या सगळ्यांचा सल्ला धुडकावून चेतन भगतचं 'अ नाईट @ कॉल सेंटर' वाचलं.. आणि स्वतःलाच खूप शिव्या घातल्या... Sad

सध्या जे कृष्णमूर्तींचं 'freedom from the known’ आणि जॉर्ज रॉसचं 'TRUMP strategies for real estate' वाचतेय.. पूर्ण वाचून झाल्यावर सांगेन कशी वाटली दोन्ही पुस्तकं..

रच्याकने, ब्लू अंब्रेला ची गोष्ट खूपच गोड आहे.. किती साध सरळ छान लिहितो तो!

देनिसच्या गोष्टी, शहाणी वासिलिसा, रशियन परिकथा, रशियन लोककथा, खिशातला कुत्रा (न्यासू), आलूबुखारची गोष्ट... आणि नावही आठवत नाहियेत (पण कथानक आठवतय) आता - अश्या कितीतरी पुस्तकांची पारायणं केलेली लहानपणी!
आपल्या लहानपणी (किंवा माझ्या ;)) - सोव्हिएट युनियन आणि भारत यांचे संबंध अत्यंत प्रेमाचे असल्यानं ही सगळी पुस्तकं आणि अनेक प्रकारची मासिकंही - अगदी छोट्या छोट्या गावातही आरामात उपलब्ध असायची .. आता अर्थातच नाही दिसत.. कुठे मिळू शकतात ह्याची कल्पना आहे का कुणाला?

समहाऊ आपल्या गोष्टीतल्या नायकांपेक्षा/राक्षसांपेक्षा त्यांच्या गोष्टीतल्या नायक/नायिकेबद्दल / बाबायागा बद्दलच जास्त आत्मियता वाटली नेहमी..(बाबायागा ही चेटकीण म्हणजे चेतकीणीच्या डिसगाईज मधे 'वाईज,ओल्ड लेडी'चं प्रतिक कसं आहे ह्यावर एक लेख वाचनात आलेला मध्यंतरी)

कदाचित आपल्या गोष्टीतले राम, कृष्ण वगैरे लोकं खोटी नाहित, रियल लाईफ लोकं (देव!) आहेत ह्याची लहानपणी खात्री पटल्यानं असेल.. (एकदा देव म्हटलं की फारसे प्रश्न पडायचे नाहीत पूर्वी!) - रशियन परिकथेतली फँटसी- फँटसी म्हणून जास्त भावली..

आपल्या लहानपणी (किंवा माझ्या ) - सोव्हिएट युनियन आणि भारत यांचे संबंध अत्यंत प्रेमाचे असल्यानं ही सगळी पुस्तकं आणि अनेक प्रकारची मासिकंही - अगदी छोट्या छोट्या गावातही आरामात उपलब्ध असायची .. आता अर्थातच नाही दिसत.. कुठे मिळू शकतात ह्याची कल्पना आहे का कुणाला? >>> अगदी. अगदी. लै गोड होती ती रशियन पुस्तकं.

कुठे मिळू शकतात ह्याची कल्पना आहे का कुणाला? >>> माझ्या लहानपणीच्या सर्वात सुंदर आठवणीपैकी ही पुस्तके आहेत.यातली बरिचशी माझ्याकडे अजून आहेत कुणाला फोटोकॉपी करायची असेल तर सांगा

हिंदू वाचतेय. अडगळ समृद्ध वगैरे सगळं ठीक पण पसारा प्रचंडच घालून ठेवलाय. वाचताना वेळ लागतो आणि पुढे पुढे दमछाक होत जातेय. आपलं नशीब पस्तीस वर्षच घेतली लिहायला अजून दहा पाच घेतली असती तर काही खरं नव्हतं असं वाटत रहातं. पण आत्तापर्यंत वाचलेलं आवडतय मात्र. मोहेन्जोदडोच्या उत्खननाची पार्श्वभूमी आणि पाकिस्तानच्या त्या भागाचं वर्णन खूपच सुरेख. व्यक्तिरेखा, वर्णनं वगैरे खास नेमाडे शैली.

हायला शर्मिला- म्हणजे नेमाडेंची युलिसीस की काय? तुम्ही प्लीज, प्लीज अपडेटस टाकत रहा. (मी न राहवून वाचणारच आहे शेवटी ) Proud

गेल्या बर्याच दिवसांपासुन इतर काही पुस्तकांबरोबर कळ वाचते आहे. शाम मनोहरांच्या बाकीच्या पुस्तकांपेक्षा जास्ती मजा आली वाचायला. डोक्याला मुंग्या येणारे लिखाण.

तेंडुलकरांच्या कथा पण वाचते आहे. त्यातली पहिली तर खासच !

अजेय झणकरांचं "द्रोहपर्व" वाचलं... आवडलं...

त्या कांदबरीवर एक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीच्या मार्गावर आहे..

Pages