मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मी अल्बर्ट एलिस " - डॊ.अंजली जोशी - शब्द प्रकाशन
अल्बर्ट एलिस नी ’रॆशनल बिहेव्हीअरल इमोटिव्ह थेरपी’ चा शोध लावला.
या पुस्तकात , त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, ज्यामुळे त्यांना ’आर ई बी टी’ च्या तत्वांचा शोध लागला, त्या अतिशय ओघवत्या शॆलीत लिहिल्या आहेत.

दया पवार यांनी लिहीलेले 'बलुतं' हे अस्वस्थ करणारे पुस्तक आहे. जाती-पाती वर आधारित भेदभाव समाजात किती घट्ट रुतून बसलेले आहेत व कळत नकळत समाजात तो पाळला जातो यावर प्रकाशझोत टाकलाय. यात वर्णन केलेला काळ हा ३०-४० वर्षांपूर्वीचा असला तरी पण त्यात मांडलेले अनुभव आजही अप्रत्यक्षपणे अस्तित्वात असावेत्/आहेत हे जाणवत राहात.

बलुत आणि बेरड ही ह्या प्रकारच्या लेखनामधली master pieces वाटतात मला. गैरसमज नको कि इतरांच्या लिखाणामधे सच्चाई नाही असे मला म्हणयचे नाही फक्त ह्या दोन पुस्तकांची शैली अशी जमली आहे कि एकदम मूळापासून हादरवून सोडते Sad

'शिकार' वाचले, लेखक - यशवंत चित्ताल, मुळ कन्नड कादंबरीचा अनुवाद केला आहे - केशव महागावकर यांनी.
जबरदस्त आहे. अनुवादीत वाटत नाही वाचताना. समाजातल्या विक्रुती अगदी नेमक्या टिपल्या आहेत. स्वार्थाने बरबटलेल्या जगाची अगदी भिती वाटली वाचता-वाचता.

मलाही बलुत फार आवडलं. उचल्या, उपरा ऐवढे काही खास वाटले नाही. बेरडबद्दल काहीचं माहिती नाही. काढेन आता.

.

हल्लीच अजेय झणकरांचे "द्रोहपर्व" वाचले.

मला आवड्ल. छान ओघवती सहज भाषा

संमेलनाच्या पुस्तक-प्रदर्शनात कोणती खरेदी केलीत, याबद्दल इथे लिहिता येईल का? (की वेगळा धागा सुरु केलेला चालेल?)

डॉ आनंदीबाई जोशी- काळ आणि कर्तृत्व लेखिका- अंजली कीर्तने. मॅजेस्टिक प्रकाशन
आनंदीबाईंचे चरित्र- very painstakingly researched. जागतीक स्त्रीलढ्याच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिलेला त्यांचा लढा (!!), त्यांचा पत्रव्यवहार, इतकंच काय थिसीस, हस्ताक्षराचा नमुना, अफाट परिश्रमांनी हुडकलेले त्यांचे थडगे (होय !!!), त्यांचा पत्रव्यवहार, काशीबाई कानेटकरांने लिहीलेले त्यांचे चरित्र (दोन आवृत्त्यातील फरक) आणि इंग्रजीतील कॅरोलाईन डॉल लिखीत चारित्र, या चरित्रांतून गवसलेल्या आणि निसटलेल्या आनंदीबाई, तिरसट गोपाळराव जोशी. भलावण कुठेही नाही, आणि आनंदीगोपाळ कादंबरीसारखे अतिरंजक नाही, तरी रुक्ष कोरडे आणि वाचकाला विद्वत्तेखाली गाडुन टाकणारे टिपीकल अभ्यासु चरित्रही नाही. असं वाटलं की असंच चरित्र कोणीतरी सावित्रीबाईंचं लिहायला हवं.
हे पुस्तक मागवल्याबद्दल शोनुचे आभार. त्यानिमीत्ताने मला वाचायला मिळाले.

नांगरल्यावीण भुई लेखकःनंदा खरे. ग्रंथाली प्रकाशन (फॉंट साईझसाठी ग्रंथालीचा निषेध. अरे काय फाँट आहे का काय. :-))
अ‍ॅलन ट्युरिंग नावाच्या गणितज्ञाबद्दलची भारतात घडवून (!!! यासाठीच कांदबरी वाचलीच पाहिजे) आणलेली काल्पनिक भन्नाट कादंबरी. अतिशय आवडली. गणितातलं ओ की ठो कळत नसताना माझ्यासारखीला वाचता आली आणि समजली यावरून योग्य तो बोध घ्यावा, घाबरू नये ! (आधी कोणी गणितज्ञाबद्दल आहे हे सांगीतलं असतं तर ढुंकुन वाचली नसती :फिदी:)
http://en.wikipedia.org/wiki/Alan_Turing
समलैंगिकता, आज्ञावली आणि विचार करण्याचे यंत्र तयार करण्यामागचे अफाट परिश्रम आणि बुद्धीमत्ता,
पराकोटीचा एकटेपणा/ तुटलेपणा त्यातुन जगाच्या अंतापर्यंत धावणारा चक्रम गणिती पानापानातून असा काही जिवंत होतो की त्यातल्या equations कडे लक्षही जात नाही (गणितमित्रांचे जायलाच हवे.)
गणित आणि फिलॉसॉफी बद्दलचचे विचार सोप्या भाषेत वाचण्यासारखे.
कादंबरी म्हणुन साहित्यीक मुल्याचे मरुदे (मुळात अशा लेखनाच्याच काही मर्यादा असतात) पण if you are looking for joy of discovery in mathematics and pure sciences/in any thought process, in typewritten words, this is it !! भारल्याशिवाय खाली ठेवणार नाही हे नक्की. ट्युरिंग, केंब्रिज, रामानुजम, जहांगीर टाटा, शंकरराव भिसे, दामोदर कोसंबी, धोंडो केशव आणि बाया कर्वे आणि एक औषधाला का असेना स्त्रीपात्रही आहे. सर्व खरी पात्र परंतु एकमेकांशी खर्‍या आयुष्यात फारशी संबंधीत नसताना कादंबरीत मुद्दाम एकत्रित आणलेली- त्यातली गंमत अनुभवली पाहीजे. संवेदनशील वयाच्या मुलांना पालकांनी वाचावयास उद्युक्त करणे आणि त्याआधी स्वतः वाचणे आणि आपण आपल्या नोक-या चाक-या का करतो आहोत / आपले शिक्षण हे पुन्हा एकदा ताडुन पहायला नक्की वाचणेचे करावे.
त्यातली काही वाक्य प्रताधिकार कायद्याच्या nCT म्हणुन मुद्दाम quote करायचा मोह आवरणे मला जड जाते आहे तरी कित्येक वर्षांनी ओळी अधोरेखित करुन पुस्तक वाचले इतकी ती वाक्य महत्वाची आहेत. ज्यांना कादंबरी म्हणुन वाचायची त्यांनी तशी वाचा, आणि गणितविज्ञान साक्षर लोकांनी तर काहीही कारणं न देता वाचा (त्यांच्यासाठी खास तिरप्या अक्षरातील जड मजकुर आहे). Happy इतकी वाचनिय प्रस्तावनाही ब-याच वर्षानंतर वाचली. " महत्वाकांक्षा, महत्वाची आकांक्षा, एकमेकांवर कुरघोडी करायची फालतू आकांक्षा नव्हे. नवे विश्व उभारण्याची आकांक्षा. तुझ्यापेक्षा मी मोठा, असे म्हणणारी थिल्लर, अहंकारी आकांक्षा नव्हे. मी ही एक गंमत करुन आपले आयुष्य भल्यासाठी बदलतो ही आकांक्षा"..... (५० शब्द भरले नाहियेत. आशा आहे कायदेभंग नाही)
नंदा खरेंचे नाव सुचवल्याबद्दल स्लार्टीचे आभार.

sarivina | हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं.
त्याचाच पुढील 'उत्तरकांड' देखील सुंदर आहे. जरुर वाचा.
------------------------------------
Resham_dor | कुणी sedany sheldon नही का वाचत?
वाचतो ना. पण फक्त मराठी अनुवाद. जवळ जवळ सगळेच.
------------------------------------
अखी | सध्या अनील अवचट यांच "कार्यरत" वाचतेय... खुप छान पुस्तक आहे.
अनिल अवचट हा माणूस नसावाच असा माझा पक्का संशय आहे. एकच माणूस एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर कसा लिहू शकतो. कालच त्यांचं "धार्मिक' वाचलं.
------------------------------------
Adm | खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं..
अनुवाद वाचलायं. सुंदर आहे.
------------------------------------

नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेले "जागर" वाचले. स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना व त्यांचा स्वतंत्र भारतावर झालेला परिणाम, मार्क्सवाद, इस्लाम व सेक्युलरवाद, शांतिदूत नेहरु, महात्मा गांधी , उद्योग (अर्थव्यवस्थेचे विकेंद्रिकरण) अशा मुख्य घटनांचा/ पात्रांचा त्यांनी या पुस्तकात वेध घेतलाय.

अत्यंत अभ्यासपूर्ण असे लेखन, त्याला सादर केले गेलेली उदाहरणे, संदर्भ तसेच इतिहासातील अनेक अज्ञात (मला तरी) घटनांची माहिती यामुळे पुस्तक रंजक तर ठरतेच पण लेखकाचा व्यासंग जाणवून येतो.

त्यांच्या नेहरुंवरील लेख वाचल्यावर नेहरुंची एक मुत्सद्दी राजकारणी बाजू जाणवून येते, तर मार्क्सवादावरील त्यांचे लिखाण अर्थशास्त्राबद्दल उपयुक्त माहिती देते. इस्लाम संबंधित लेख तर जबरदस्त वाटतोय. त्यांनी "प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही" या मुद्द्यावर बराच उहापोह केलाय.

कुरुंदकरांचे "श्रीमान योगी"ला असलेले प्रस्तावनेपर पत्र वाचूनच त्यांचे इतर लिखाण वाचण्याआची इच्छा झाली होती. यंदाच्या साहित्यसंमेलनात हे पुस्तक मिळाले.

नंदा खरेंची पुस्तकं वाचलीच नाहीयेत. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद रैना.

मिलिंद बोकिलांचं 'समुद्र' वाचलं. निराशा झाली. त्यांच्या दोन नुकत्याच वाचलेल्या एकम आणि रण च्या मानाने तर खूपच काहीतरी वाटली समुद्र. मिलिंद बोकिल मनोव्यापारी लिखाण चांगलं करतात यात वादच नाही पण समुद्र मधे त्यांच्या इतर अशा तर्‍हेच्या लिखाणात नेहमीच दिसून येणारा सानिया प्रभाव जरा जास्तच वाटतो.

कविता महाजन चं भिन्न वाचलं .. खुप सुन्न झाले.. आपल्या सामाजिक जाणिवा जिवंत ठेवायच्या असतिल तर नक्किच वाचायला हवं

कुरुंदकरांनी लिहिलेली एक पुस्तिका आहे. जेमतेम चाळीसेक पानी असेल. 'श्रीशिवछत्रपती: जीवन आणि रहस्य' असं नाव (बहुधा) आहे. फार सुरेख. त्यांच्या प्रस्तावनेत न आलेल्या अनेक गोष्टी यात येतात. उदा. शिवाजीच्या कामाचा मोठेपणा नेमका कशात वगैरे.

कुरुन्दकर मागील पिढीतील अत्यन्त अभ्यासू विचारवन्त होते. त्यांचे 'भजन' नावाचे पुस्तक आहे. वैचारिक चर्चेला त्यानी 'विचारांचे भजन' असा सुरेख शब्द वापरला आहे.....

हो काय? मिळवायला पाहिजे. मला फक्त 'जागर', 'शिवरात्र', 'धार आणि काठ' इतकीच माहीत होती.

बापरे केव्हडे वाचन आहे तुम्हा लोकांचे.. कुरुंदकर, आनंदीबाईंवरची पुस्तके वगैरे वगैरे..

बोकीलांचे मी फकस्त उदकाचिये आर्ती, झेन गार्डन आणि शाळा वाचलय.. त्यातलं शाळा लै आवडतं Happy

नुकतंच 'काफ्का ऑन द शोअर' वाचलं मुराकामीचं. वेगळी लेखनशैली आणि जबरी ट्विस्ट. बाकी ओडिपल थीम वगैरे आकर्षणं आहेतच.

Pages