मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा
तू म्हणतेस तसं माझी मुलं लहान असताना जवळच एके ठिकाणी रशियन पुस्तकांचं प्रदर्शन भरायचं . तिथून मी दर वर्षी खूप पुस्तकं घेत असे. अजूनही ती पुस्तकं माझ्याजवळ आहेत. मुलाला बाबायागा या नावाची खूप गंमत वाटायची.

मला प्रेरणा देणारे (आत्मविश्वास निर्माण करणार्या) पुस्तक व लेखकाची नावे हवी आहेत.

त्या कांदबरीवर एक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीच्या मार्गावर आहे..<<
हो खूप वर्ष चालू आहे ते.

how to stop worrying & started living is a good motivational book by dale carnige

THE MAGIC OF THINKING BIG by DAVID J SCHWARTZ

seven habits of highly effective people by Stephen R. Covey

seven habits of highly effective people by Stephen R. Covey
हे क्विक फिक्स पुस्तक नाहिए, पण प्रचंड उपयोगी आहे.

होय हसरी ला प्रेरणा देणारे (आत्मविश्वास निर्माण करणार्या) पुस्तक व लेखकाची नावे हवी होती मला वाटत तिला ते उपयोगी पडेल

चुकीच्या ठिकाणी हे पोस्ट टाकलं असेल कदाचित पण हेतू हाच आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी. मुंबईत चर्चगेटला सुंदरबाई हॉलमध्ये आजपासून आशिष बुक सेंटरचं पुस्तक प्रदर्शन लागतंय - सकाळी ९:३० ते रात्रौ ८:३०. २२ ऑगस्टपर्यंत आहे. पण फक्त इंग्लिश पुस्तकं असतात. मुलांसाठीही पुस्तकं असतात ह्या प्रदर्शनात.

भारतीय विद्या भवनच्या ग्रंथालयाचे सदस्यत्व घेण्यासाठी सवलत योजना : ६० वर्षांवरील लोकांना २० टक्के , इतरांना १० टक्के सवलत : वार्षिक वर्गणी एकाच वेळी भरल्यास. वेद वाङ्मय, इतिहास , धर्म, कला, संस्कृती, तत्त्वज्ञान, ज्योतिष , योग, आयुर्वेद या विषयांवरील हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी, संस्कृत, पाली, प्राकृत इत्यादी भाषांतील लाखाहून जास्त पुस्तके.
संपर्क ०२२-२३६३१२६१,२३५३४४६२ विस्तार : २२६ किंवा २५०.
(लोकसत्ता मधील बातमी)

THE MAGIC OF THINKING BIG by DAVID J SCHWARTZ ह्याचा मराठी अनुवाद आहे शिव खेरा u can win चा पण मराठी अनुवाद आहे.
मराठी मध्ये अजून काही available असेल तर मी सांगते
हसरी माझं नाव आश्लेषा आहे

सेवन हॅबिट्सचा पण मराठी अनुवाद आहे.
'वालचंद हिराचंद-जिंकले भूमी,जल, आकाश' हे चरित्र वाचले. अत्यंत जबरदस्त. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचंड जिद्द आणि धडाडीने एकापाठोपाठ एक नवी क्षेत्रे पादाक्रांत करणारे वालचंदशेट माझ्यासाठी तरी एकदम अनोळखी होते. हाही एका वेगळ्या प्रकारचा स्वातंत्र्यलढाच होता आणि तो तितकाच रोमहर्षक आहे.

Philip Pullman ची His Dark Materials ची trilogy.

विशेषतः त्यातले तिसरे पुस्तक : 'The Amber Spyglass'.

यात मृत्यु ची एक वेगळीच concept मांडली आहे. लेखकाच्या अचाट आणि समर्थ कल्पनाशक्तीमुळे हे पुस्तक एका गूढ वातावरणाचा अनुभव देते.

मला हे पुस्तक वाचून दोन वर्षे झाली. परत वाचावेसे वाटले तरी मन होत नाही. पहिला अनुभव dilute तर होणार नाही ना अशी भिती वाटते.

उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्र देशा हे पुस्तक खूप सुंदर आहे. हेलिकॉप्टरमधुन काढलेले महाराष्ट्राचे फोटो संग्रही ठेवण्यासारखेच. भेट देण्यासही उत्तम.

>>उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्र देशा हे पुस्तक खूप सुंदर आहे. हेलिकॉप्टरमधुन काढलेले महाराष्ट्राचे फोटो संग्रही ठेवण्यासारखेच. भेट देण्यासही उत्तम.<< होय, माझ्या वडिलांच्या ऑफिसतर्फे, ज्या कर्मचार्‍यांच्या मुलांची या वर्षी १०वी, १२वी व ग्रॅज्युएशन पूर्ण झालीय त्या मुलांना हेच पुस्तक भेट दिलय.

नुकतेच मी रारंगढंग हे पेंढारकरांचे पुस्तक वाचले.खूप खूप छान आहे.जगात फक्त भारतात हिमालयात इतक्या
ऊचीवर रस्ते बांधले जातात.ऐक सिव्हिलियन आणि आर्मि ह्या मधिल शिस्तिमुळे होणारे धग धगते युधद खूपच छान रंगवले आहे.नक्की वाचा.
दुसरे पुस्तक सोन्याच्या धुराचे ठसके.लेखिका उज्वला दळ्वी.आपण थेट सौदि अरेबियातच जातो.तिथले जीवन रसाळ भाषेत लिहिले आहे

डॉ. बाळ फोंडके यांचे नवीन आणि वेगळ्या विषयावरचे पुस्तक येत आहे वाचकांसाठी.. पुस्तकाचे नाव आहे 'सुगरणीचे विज्ञान'. इथे एक भाग दिला आहे:

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=91702:2...

प्लीज मला दर्जेदार लघुकथेला मदत करा ना.. मला वाटलं होतं इथे मायबोलिवर खूप खूप वाचन करणारे सभासद आहेत पण माझा अगदी प्रचंड भ्रमनिरास झाला आहे तो बा.फ. उघडल्यानंतर. जी लोक मी हे वाचले मी ते वाचले असे सांगत फिरतात त्यांच्याकडून एकही नाव आले नाही.

सध्या ekhart tolle च stillness speaks वाचतेय शब्दातीत आहे मिळालं तर जरूर वाचा

सध्या ekhart tolle च stillness speaks वाचतेय शब्दातीत आहे मिळालं तर जरूर वाचा

स्टेफनी मेअरचे Twilight सिरीजमधील ' Breaking Dawn' कालच रात्री २ वाजेपर्यंत जागून पूर्ण केले, व्हाम्पायर लव्हर्स साठी बेस्ट पुस्तक. बेला आणि जेकबच्या नजरेतुन हे पुस्तक वाचताना त्यातील प्रसंग नजरे समोर live उभे राहतात. Twilight पासून सुरू झालेली बेलाची कथा Breaking Dawn पर्यंत येऊन थांबते. New Moon आणि Eclipse प्रमाणे या पुस्तकाचा शेवट वाचकानां प्रेडीक्ट करता येत नाही, must say हॅरी पॉटर नंतर ची वन ऑफ द बेस्ट सिरीज..
images_3.jpg

'मास्तरांची सावली' - कृष्णाबाई नारायण सुर्वे
या पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल चिनूक्सला अनेक धन्यवाद.

काल हे पुस्तक वाचले. आधी कृष्णाबाईं बद्द्ल जास्त माहिती नव्हती. मात्र पुस्तक वाचल्यानंतर कृष्णाबाईं बद्द्ल खुपच आदर वाटतो.
त्यांच्या आयुष्यातील काहि प्रसंग वाचुन , अंगावर काटा आला.
कष्टांतुन तावुन सलखुन निघालेले व्यक्तिमत्व.
प्रामाणिक आणि खुप साध्या भाषेतील पुस्तक.

( आता सुर्वे मास्तरांची कविता वाचताना, कृष्णाबाईंची आठवण येणारच. )

मध्यंतरी विश्वास पाटिल यांच "नॉट गॉन विथ द विन्ड" वाचल.
त्याना आवडणार्‍या आणि अभिजात कलाकृती असलेल्या कादंबर्‍या आणि (बनलेच असतील तर) त्यावरुन बनलेले चित्रपट ह्याविषयी लिहिलय त्यानी. भरपुर फोटो आहेत शिवाय लिहिलयही चांगल.
बर्‍याच जुन्या चांगल्या आणि माहीत नसलेल्या चित्रपटांविषयी, कादंबर्‍याविषयी चांगली माहिती मिळाली.
आता ते चित्रपट शोधुन पाहिल्याशिवाय चैन नाही पडणार. Happy
बाय द वे, तेव्हा मी गॉडफादर पाहिलेला त्यामुळे पहीला मी तोच लेख वाचायला घेतला होता.
आणि हो बर्‍याच दिवसापुर्वी नीरजाने तिच्या प्रोफाइलमध्ये व्हिवियन लीचा फोटु लावला होता. ती कोण हेही चांगल कळाल. Happy

मी काही दिवसांपुर्वी इश्काचा जहरी प्याला वाचलं. पुस्तक मला आवडलं.. पण हे पुस्तक मुद्दाम दुसरी बाजू मांडण्यासाठी छापण्यात आलं आहे असं उगिचच वाटलं. मीनाकुमारीला कमाल अमरोहींनी खूप त्रास दिला असं बोललं जायचं (खरंखोटं देव जाणे) पण ते कसं खोटं आहे ते खूपसं अगदी प्रसंग/घटना सांगून एक्सप्लेन केलं आहे. आणि या पुस्तकात मीनाकुमारीला एकदम व्हिलन दाखवल्यासारखं वाटलं.

केतकरवहिनी
लेखिका: उमा कुलकर्णी मेहता प्रकाशन
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/112509.html?1151655514
माहिती इथे आहे,
आणि मायबोली खरेदी विभागातही ब्लर्ब आहे, आणि पुस्तकही उपलब्ध आहे विक्रीसाठी.

इतकी वर्षं वाचायचे कसे राहिले कोण जाणे.
कसलाही अभिनिवेश नसलेली शैली. One does'nt get astounded by the craft (the prowess of the writer), but by the content.
आणि सत्य सांगायची सरळसोट पद्धत, इतकी सरळ की शब्दांनी आपल्या वर्मी बाण लागला हे समजायलाही दोन मिनीटं लागतात. कसल्याही शाब्दिक कसरती नाहीत. डोकं आउट होतं.
स्त्रीजन्माची कहाणी, कौटुंबिक राजकारण आणि तत्कालीन समाज, पदरी पडलं म्हणून पवित्र केलेले खटले - कमाल आहे खरोखर !

Pages