मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गोष्टी गावाकडच्या" हे व्यंकटेश माडगूळकरांचे पुस्तक सध्या वाचत आहे. छान पुस्तक आहे, गावाकडच्या आठवणी अतिशय सुंदर शब्दात लिहील्यात, शैली संयत आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला जुन्या काळात नेतात.

मी महाश्वेतादेवींच वर्षा काळेनी अनुवाद केलेल कुरुक्षेत्रानंतर वाचले..अतिशय सुरेख पुस्तक!!
केवळ अद्वितीय..मला आश्चर्य वाटले या पैलूंचा कधी विचारच महाभारत वाचताना केला गेला नव्हता किंवा मनानेही नोंद घेतली नव्हती..वाचुन मात्र सुन्न झाले काही काळ्.

मृदुल, वनवास, शारदा संगीत, झुंबर आणि चौथं पुस्तकः पंखा
सगळीच जाम आवडतात - पण 'शारदा संगीत' सगळ्यात जास्त. त्यातला शेवटचा धडा(काय म्हणता येईल धड्या ऐवजी?) वाचताना मी दर वेळेस रडते.. किती तरल आहे जाणवून. आतून शांत आणि प्रसन्न वाटतं - सांगता येणार नाही असं काहितरी होतं. Just love it!

कैवल्य, तू दिलेल्या पानावर जायची मुभा नाही म्हणतय. कुठल्या गृपचा मेंबर व्हावं लागेल?

फाळणीवर फिक्षन प्रकारात: a bend in the ganges (इथे थबकली गंगामाई - मराठी अनुवाद) हे मनोहर माळगावकरांचे पुस्तक आहे.
खुशवंत सिंगचे अ ट्रेन टू पाकिस्तान

वर कोणी उल्लेख केला आहे का ते माहित नाही... गॉन विथ द विंड चा मराठी अनुवाद आला आहे.. वर्षा गजेंद्रगडकर ह्यांनी केला आहे... कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली...

सरसेनापती, फाळणीवरची अजून काही पुस्तके म्हणजे:
पु भा भाव्यांनी अनेक कथा लिहिल्या आहेत
फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट
आंबेडकरांनी फाळणी व्हायच्या आधी (मला वाटते ४२ साली) फाळणीवरच्या एका कमिटीचा अहवाल पुढे पुस्तक रुपाने प्रकाशित केलेला आहे. मला नाव आठवत नाही.
५५ कोटींचे बळी - गोपाळ गोडसे

आणि मिडनाईटस चिलरन ( रश्दी) ? टेक्निकली फक्त फाळणीवर नाही तरीही फिक्षन मधलं मानाचं पान म्हणावं लागेल.

फाळणीवरचं अजून एक जबरदस्त फिक्शन म्हणजे भीष्म सहानी लिखीत 'तमस' आणि अमृता प्रीतम - पिंजर.

डॉ. आनंद यादवांचं 'नटरंग' वाचलं (सिनेमा आधी पाहिला, मग पुस्तक वाचलं) एका वेगळ्याच जगाचं दर्शन होतं पुस्तक वाचून.. मांग वस्ती, मांगांची भाषा, प्रचंड हालाखी, त्यात नायकाला पडलेलं 'तम्माशा'चं वेड आणि त्याच्या 'नाचेपणाचा' प्रवास.. सगळंच विस्तृतपणे लिहिलं आहे.. तम्माशाचं वेड लागलेला गुणा नेहेमीच सगळ्यांपासून कसा वेगळा पडतो.. नाचेपण हे आधी अभिनयापुरतं आणि मग कला म्हणून कसं त्याच्या अंगात भिनतं आणि त्यापायी त्याला कायकाय सहन करायला लागतं.. हे उलगडून दाखवणारी कादंबरी.. शेवट चटका लावणारा..

चित्रपट आधी पाहिल्यामुळे पात्रांमध्ये सर्व कलाकार दिसत होते. कादंबरीची उत्तम पटकथा केली आहे- यासाठी चित्रपटाचे पटकथाकार यांचं अभिनंदन.. सर्व महत्त्वाचे प्रसंग घेतले आहेत, काही पात्र गाळली आहेत, शेवट वेगळा केला आहे.. पुस्तकामध्ये गुणाची गरीबी अंगावर येते.. आई-वडील, बायको, तीन पोरं आणि एक येऊ घातलेलं असं कुटुंब, एकटा मिळवता तो.. पिळून काढणारा मालक- हे चित्रपटात जास्त प्रभावीपणे आलं असतं, पण येत नाही, त्यामुळे गुणाचं तमाशाकडे वळणं इतकं प्रभावीपणे येत नाही.. पुस्तकात अर्थातच विस्ताराने हा भाग आहे..

एकूण असा प्रवाद आहे, की पुस्तकाचा चित्रपट इतका चांगला होत नाही (हॅरी पॉटरचा अनुभवही आहे).. पण हे पुस्तक आणि चित्रपट दोन्ही चांगले आहेत. त्यातलं काहीतरी एक नक्की वाचा/पहा..

रॉबर्ट ल्युड्लम
- पॅरिस ऑप्शन
- जेसन बोर्न सिरीज (१ - ३)

डॅन ब्राउन
- द लॉस्ट सिंबल
- दा विंची कोड
- डिसेप्शन पॉइंट
- एंजल्स एण्ड डीमन्स
- डिजिटल फोर्ट्रेस

जे के रोलिंग
- हैरी पॉटर (१-८)

क्रमशः

आजच अनिता पाध्येंच दादा कोंडकेंच्या जीवनावरचं 'एकटा जीव' वाचलं.आत्मचरित्राच्या अंगाने जाणारं आहे. प्रत्येक लेख दादा कोंडकेंच्या नजरेतुन बघितल्यामुळे त्या त्या घटनेची एकच बाजु वाचल्यसारखी वाटते.

आता कमाल अमरोही वरचं 'ईश्काचा जहरी प्याला' वाचतोय.

मी दोन्ही वाचलीत. एकटा जीव एकदम ढोंगी. कमाल अमरोहीचं चांगलं आहे. अमरोही सुसंस्कृत माणूस होता तर मीनाकुमारी.....

तर मीनाकुमारी.. पुढे काय प्रकाश? मीनाकुमारी एक उत्तम व्यक्ती होती यात काही संदेह तुला?

आत्मचरित्रावरून आठवलं - विश्वास बेडेकरांचं 'दोन पक्षी' वाचलंय का?
मला नाही आवडलं.. म्हणजे स्वत:च्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन केलंय असं वाटलं

. आनंद यादवांचं 'नटरंग' वाचलं (सिनेमा आधी पाहिला, मग पुस्तक वाचलं) एका वेगळ्याच जगाचं दर्शन होतं पुस्तक वाचून..
>> ह्यावरून आठवलं 'कोल्हाट्याचा पोर' हे किशोर शांताबाई काळ्यांची पुस्तक
जगायचय प्रत्येक सेकंद, उचल्या - ही सगळी पुस्तकं - तुटतं आत वाचून!

'गौतमची गोष्ट' वाचलं. हे पुस्तक 'बाकी शुन्य' (बद्दलची चर्चा वाचल्यावर)चं धाकटं भावंड असावं असं वाटतय.
मला ते ('गौतमची गोष्ट' ) भंपक वाटलं. मुळ कल्पना छान आहे पण कथा नाही आवडली.

सर्वांना धन्यवाद, खुप नविन पुस्तकांची नावे कळली. कारंथ, भैरप्पांची पुस्तके पण अतिशय वाचनिय आहेत. जरुर वाचा

गिरिष कुबेरांची एका तेलियाने आणि हा तेल नावाचा इतिहास आहे वाचले आहे का? नसल्यास जरुर वाचा. अप्रतीम याशिवाय दुसरा शब्द नाही

शुभंकरोति हॅरी पॉटर एक ते सातच भाग आहेत. Happy

कमाल अमरोही वरचं 'ईश्काचा जहरी प्याला' >>> पुन्हा एकदा वाचायचय हे पुस्तक..

एका तेलियाने आणि तेल नावाचा इतिहास ह्या दोन पुस्तकांच्याच मालिकेत अधर्मयुद्ध हे देखील गिरिश कुबेरांचे पुस्तक वाचण्यासारखे आहे.. तेलाच्या इतिहासाने पुढे घेतलेले घातक वळण आणि आजचा जिहाद ह्याबद्दल फारसे एकांगी न होता लिहिलेले पुस्तक आहे (अर्थात लेखकाचा पश्चिमी व विशेषतः अमेरिकी राजवटीवर व त्यांच्या परराष्ट्रधोरणावर विशेष राग आहे. तो बर्‍यापैकी बाहेर पडतो या पुस्तकातदेखील).

मि सौभाग्य नावाच पुस्तक वाचले आहे त्याला खुप दिवस झाले मला त्याचे लेखकाचे नाव आठवत नाहि कुणी वाचले असल्यास सांगा (बहुतेक ग्रामिण लेखक आहे / मि हे गावाला वाचले होते)

विश्वास पाटील यांनी लिहीलेले "नॉट गॉन विथ विंड" वाचले. मस्त वाटल वाचून, चित्रपट पाहायची आवड आहेच. त्यात आत्ता काही जबरदस्त चित्रपट कळाले आहेत. त्यांनी वेध घेतलेल्या चित्रपटांपैकी काही पाहिलेत, पण उर्वरित चित्रपट आत्ता पाहायचे ठरवलय.

मुळात जगप्रसिध्द कादंबरी अथवा पुस्तक यावर जे चित्रपट निघाले त्यातील काहि चित्रपटांचा परामर्श यात समाविष्ट आहे. मूळ कादंबरीशी चित्रपट किती इमान राखून आहे , कादंबरीतील सौंदर्यस्थळे चित्रपटात कशी आली आहेत, पात्रांना पुरेपूर न्याय दिला गेला काय इ. इ.

यात 'गॉन विथ द विंड', 'ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट' , 'पिंजरा' , 'गॉडफादर' Happy , 'शिंडलर्स लिस्ट', 'ब्रिज ऑन रिव्हर क्यॉय', 'टेसा', 'देवदास' 'अ गुड अर्थ', मदर इंडिया अशा चित्रपटांचा समावेश आहे.

अवांतरः
यात फक्त 'शॉशँक रिडेंप्शन' या चित्रपटाचा पण उल्लेख असता तर आणखी मजा आली असती. पण असे भरपूर चित्रपट आहेत आणि त्यांची वर्णने अथवा त्यांच्याशी निगडीत आठवणी पण भरपूर वाचायला मिळतात. लोकसत्त अथवा साप्ताहिक सकाळ यात सदरे होती या विषयाशी संबंधीत.

सौभाग्य हे रामचन्द्र सडेकरांचे पुस्तक आहे.त्यावर माझे सौभाग्य नावाचा चित्रपट निघाला होता.म्रुणाल कुलकर्णी ,विक्रम गोखले त्यात होते.पुस्तक चांगले आहे.

Pages