मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश नारायण संतांचे 'पंखा' वाचले. लंपन चं भावविश्व खूपच छान रंगवलंय. बेळगाव व सीमाभागात बोलली जाणारी मराठी ,लंपन व सुमी ची मैत्री , लंपन चे आजी आजोबा सगळंच छान आहे.

'समुद्र' वाचलं. निराशा झाली परत केलं! झेन गार्डन घेतलं आणि तेही परत करून शाळा घेतलं Happy परत पुस्तक बदलणार नाही ह्या अटीवर Proud

झेन गार्डन मला आवडलं. वेगळ्या बॅकग्राउंडच्या कथा आहेत. त्यातली आणि एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे देवनागरीत लिहिलेले कुठलेही इंग्रजी शब्द चुकलेले नाहीत. जे फार अभावाने आढळतं. प्रूफ रिडिंग पण चांगलय. नाहीतर दाताखाली खडा आल्यासारखं होतं वाचताना. पानिपत वाचलं, त्यात इतक्या चुका आहेत Sad फॉर हिअरमधे पण असंख्य चुका आहेत इंग्रजी, मराठी दोन्हीत.

सिंडरेला, बस्के,
झेन गार्डन खरंच चांगले आहे. मला त्यांची बाकीची म्हणजे 'उदकाचिया आर्ती', 'जनाचे अनुभव पुसता' आणि 'कातकरी' पण आवडली. त्यांची दिवाळी अंकातली 'रण' कादंबरी आवडली.
शाळा पुस्तक म्हणून चांगले आहे. पण त्यांच्या इतर पुस्तकांच्या मानाने सो सो वाटले. अर्थात विषय पूर्ण वेगळाच आहे त्याचा.

खालिद हुसैनी चं काईट रनर आवडले असेल तर त्याचे "A Thousand Splendid Suns" सुद्धा वाचा....तेवढ्याच ताकदीचे आहे आणि तेवढेच ह्रूदय्-द्रावक आहे....आपल्याला "तालीबान" फक्त टी.वी. वरून, बातम्यामधुन माहीत आहे पण तिथे स्वत: तालीबानान्ची जुलुमगीरी सहन करणार्या लोंकाची दैना आहे...नक्की वाचा

शाळा एकदम मस्त आहे !! (५. समवन) गुणिले १०० = शाळा असे वाटले वाचल्यावर !! मिलिंद बोकिल ची बाकी कोणती पुस्तके आहेत? कोणती "must read" आहेत ? मा.बो. वर एक पाहीले "एकम" नावाचे..कोणी वाचले आहे का?

बोकिलांचे 'जनांचे अनुभव पुसतां' जरुर वाचा.ज्यांना सामाजिक घडामोडी समजून घ्यायची आवड आहे त्यांना नक्कीच आवडेल.बोकिलांनी वेळोवेळी केलेल्या समाजशास्त्रिय अभ्यासांवरचे लेख आहेत. भाषा अगदी सहज कुठेही किचकट वा अकॅडमिक होत नाही.क्रांती ही कायम बंदूकीच्या गोळीतूनच होत नाही तर ती इतर अनेक प्रकारे होऊ शकते हे समजण्यासाठी,'किनार्‍यावरील कल्पवृक्ष' आणि भूमिकन्यांचे भालप्रदेश' हे लेख जरूर वाचावेत

आगाऊ हे पुस्तक 'दभिंना' मराठीतून मराठीत भाषान्तरासाठी दिले पाहिजे. ते ते प्रचन्ड अनाकलनीय करून दाखवतील. (त्याना वेळ नसेल तर एक दोन मायबोलींकरांकडे दिले तरी चालेल तूर्त . त्यांचाही बर्‍यापैकी 'हात बसलाय' )

"लेखकाचे घर'- मॅजेस्टिक प्रकाशन
या नावाचे ललितमधील सदर होते. त्यातील लेखांचे संकलन आहे. मराठीतील ख्यातनाम साहित्यिकांच्या घराबद्दल त्यांच्याच "कंपु"तील व्यक्तिने लिहीले आहे, आणि त्यांच्या साहित्यात उतरणारे त्यांचे घर. एकदा वाचायला छानै. सर्वांनी किती गरीबीत ते म.व परिस्थितीत दिवस काढले सुरवातीच्या काळात, कोणाला फारसे लेखनाची जागा, शांतता वगैरे चोचले मिळाले नाहीत महत्वाच्या दिवसात.

विंदांच्या घराबाबतचा त्यांच्या (तत्कालीन) सुनबाई नीलम गो-हेंचा लेख सर्वात वाचनीय आहे इथपावेतो. घरातील गैरसोयींचा, छोट्या गोष्टींना दुरुस्त करत बसण्याचा, सतत काहीतरी वस्तु बिघडण्याची वगैरे मला फार किटकिट होते. त्यावरील विंदांचे भाष्य वाचले आणि फाडकन मुस्काटात बसली. अगदी हेच "झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स" मध्ये वेगळ्या शब्दात सांगीतले आहे त्याची आठवण झाली.

बाकी इंदिराबाई संतांच्या घराबद्दलचा वासंती मुझुमदारांचा लेख, अवचटांवरचा नाडकर्णींचा लेख, अरुणा ढे-यांचा लेख वाचनिय.

टोणगा Rofl

कोण ते मायबोलीकर?

>> माझ्या डोळ्यासमोर तर प्रथम तूच आला . नन्तर बाकी एक दोन आठवले. अनाकलनीय्ता हा काही दुर्गुण नाही . ती एक शैली आहे. कोणत्याही जीवनसत्याच्या आत्ममग्न गाभ्यापर्यन्त पोचण्याचा तो एक खग्रास मार्ग आहे.

टोणगा - मी आणि अनाकलनीय!!!!!!!

'कोणत्याही जीवनसत्याच्या आत्ममग्न गाभ्यापर्यन्त पोचण्याचा तो एक खग्रास मार्ग आहे'' हे वाक्य काय ते सांगून जात तुमच्याबद्दल. बाकीच्या दोघांमधे आधी तुमचे नाव Happy

कोणत्याही जीवनसत्याच्या आत्ममग्न गाभ्यापर्यन्त पोचण्याचा तो एक खग्रास मार्ग आहे.>>>>>>>>
Lol

व्याजसाहित्य ? हे काय अस्ते रे बाप्पा? दलित साहित्य,गिरामीण साहित्य असं काही का? की डी एस के विश्व मध्येनिर्माण होणारे 'डभ' घाई साहित्य?

व्याजसाहित्य = व्याजावर घेतलेले साहित्य.
व्याजसाहित्य हे इएमआय ला भूलून घरात आणलेल्या गोष्टींचे एकत्रित नाव व त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा प्रकारचे साहित्य भारतात नविन आर्थिक धोरणानंतर मोठ्या प्रमाणात विद्यमान झाले. [संदर्भः मराठी साहित्याचे अर्थविश्व, सध्या प्रकाशनोत्सुक महान ग्रंथ]

ईंग्रजी:
इट्स ऑल फॉर सेल्---ड्युक पब्लिकेशन.
द काईट रनर..

****
मराठी:
आर्य....
बदलता भारत...
चकाट्या

झेन गार्डन आणले तेंव्हा कंटाळ्वाणे वाटले. पण नंतर कधितरी काढुन वाचले तर मला ही आवडले. 'शाळा' मात्र नाही आवडले.

'पानीपत' बाबत एक किस्सा लेखकांकडुन ऐकलेला, पुस्तकात कुटे एअ वाक्य होते, "त्यांच्या कुरळ्या केसांमधुन बोटे फिरवत त्या म्हणाल्या" ... मग वाचकांचे पत्र आले. पेशव्यांच्या डोक्यावर केस नव्हते, तर बटा अशक्य.

'पंखा' मी पण या आठवड्यात परत वाचायला घेतले. राजाची दाढी खोडताना राजा एकदम 'हां' करुन हासला. मग समजले की तो मागच्या पानावरच्या ज'हां'गिर मधला हा होता.

खरच अगदी 'मॅड' सारख च काहीतरी वाटत लंपन ची पुस्तकं वाचताना Happy

किशोर शांताबाई काळे यांचे कोल्हाट्याचे पोर वाचले. आणून बरेच दिवस झाले होते परवा सवड झाली. एका बैठकीत वाचले आणि सुन्न्न झाले. आपल्यासारख्या पांढरपेशा लोकाना त्या जिवनाची कल्पनाच येउ शकत नाही. त्या माणसाची शिकण्याची जिद्द, त्यासाठी केलेले अतोनात कष्ट यामुळे आपले डोळे कधी पाणवतात ते कळतच नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी ज्या आपण गृहीत धरतो त्याच गोष्टींसाठी लेखकाला सहन करावा लागलेला त्रास काही ठिकाणी वाचवेनासा होतो. खरोखर वाचण्याजोगे पुस्तक.

सध्या प्रिय जी. ए. वाचतेय. अप्रतीम आहे. खुप खिळवुन ठेवते.

सोबत माधव आचवलांचे किमया देखील वाचतेय. एकदम मस्त आहे. एकदा वाचून झाले तरी परत परत वाचावेसे वाटणारे. एका मायबोलीकरणीकडुन घेउन पुस्तक वाचले आणि प्रचंड आवडले की देशातून मागवले एका मायबोलीकरणीबरोबर दुसरीकडून. त्या दोघींचे विशेष आभार!

जी. ए. आणि सुनिताबाईंच्या पत्रव्यवहारात माधव आचवलांबद्दल थोडेफार वाचायला मिळते तसेच सोयरे सकळ मधे देखील त्यांच्यावर एक लेख आहे. बहुदा आपुलकीमधे देखील? त्यांच्याबद्दल अजुन वाचायला नक्की आवडेल.

एकम मी वाचायचा प्रयत्न केला होता... मला नाही आवडले Sad
गौरी देशपांडेचं पुस्तक वाचतोय असाच भास झाला.. Sad

जी. ए. आणि सुनिताबाईंच्या पत्रव्यवहारात माधव आचवलांबद्दल थोडेफार वाचायला मिळते तसेच सोयरे सकळ मधे देखील त्यांच्यावर एक लेख आहे. बहुदा आपुलकीमधे देखील? त्यांच्याबद्दल अजुन वाचायला नक्की आवडेल.
>>>>
जीए आणि माधव आचवलांचा पत्रव्यवहार जीएंच्या संपादित पत्रसंग्रहात आहे (नक्की कुठल्या खंडात ते लक्षात नाही, पहिल्या खंडात नक्की नाही)..

व्याजसाहित्य म्हणजे अप्रामाणिक/निकस/खोटे अश्या प्रकारचे साहित्य, इति मातोश्री.. व्याजोक्ती असा एक शब्द आहे.. निर्व्याज हा व्याज ह्याच्या विरोद्धार्थी शब्द असावा

नांगरल्याविण भुई वाचून संपवलं.

अगदी शांतपणे घुटके घेत घेत वाचायच्या लायकीचं पुस्तक आहे!! पुन्हा दोन तीनदा सलग वाचायलाच हवं.

हे पुस्तक वाचून झालं की थोडंसं लंपन वाचेन म्हणतेय Happy

>> जीए आणि माधव आचवलांचा पत्रव्यवहार जीएंच्या संपादित पत्रसंग्रहात आहे (नक्की कुठल्या खंडात ते लक्षात नाही

तिसर्‍या खंडात आहे.

रैना, विंदा काय म्हणाले ते (हवं तर तुझ्या शब्दांत) सांग की.

वा..छानै साईट
मी नुकती वाचलेली काही चांगली पुस्तके रेकमेंड करावीशी वाटली
Three cups of Tea - Greg Mortenson and David Oliver Relin
Shantaram - Gregory David Roberts
Thousand Splendid suns - Khaled Hosseini
The joy luck club - Amy Tan
Mayada-daughter of Iraqu - Jean Sasson

sorry!! IRAQ

Pages