मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पन मला तरी बराक हा, शेरॉन अन पॉवेल पेक्षा खुप छोटा नेता वाटला <<
Sometimes you are lucky to be in the right place at the right time... agree.gif

अवांतराबद्धल क्षमस्व.

२ states वाचायलं घेतलं..चेतन भगत केवळ हिंदि सिनेमे बनवावेत या आणि याच उद्देश्याने लिहितो असं वाटलं...मनातल्या मनात मी तर त्यातल्या पात्रांचे casting पण करून टाकले..
क्रिश्--चष्मा घातलेला ह्रितिक
अनन्या-असिन
क्रिशची आई-किरण जुनेजा
क्रिशचे वडिल्-कुलभुषण खरबंदा
अनन्याचे आई वडिल--सीमा विश्वास, नाव नाही माहित पण हम है राहि मध्ये जुहिचे वडिल झाले आहेत ते..
पुढे जसे जसे सुचेल तसे लिहिनच्..सध्या एवढेच

Happy खुषखबर! खुषखबर!!खुषखबर!!! Happy
मुंबईतील प्रसिद्ध पुस्तक दुकान स्ट्रँड यांचा पूण्यात ७-१७ जानेवारी दरम्यान सेल! Happy
फक्त इंग्रजी पुस्तके, Happy स्थळ इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड.

मायबोलीच्या फारच आहारी गेल्यामुळे आजकाल पुस्तक वाचन एकदम कमी झालय हे लक्षात आल्याने परवा जाऊन थोडी पुस्तके विकत घ्यायचे ठरवले. चांगली आणि हवी असलेली पुस्तके लगेच मिळण्याचा काहीतरी जबरदस्त योग त्या दिवशी माझ्या भाग्यात असावा त्यामुळे २-४ घेऊ असं ठरवून डझनभर पुस्तके घेतली आणि मग जड हाताने - तरंगत्या मनाने पुस्तकांचे दुकान सोडले. Happy

त्यातली काही पूर्ण वाचून झालीत तर काही वरवर चाळली आहेत. तर काही पुस्तकांची ईथे माहिती देत आहे.

अवघड अफगाणीस्तान - निळू दामले.
९/११ नंतर अफगाणिस्तानावर उदंड पुस्तकं आलीत. त्यामुळे रशियन घुसखोरी, अफगाण्यांचे अंतर्गत युद्ध, तालिबान, अमेरिकेने केलेले युद्ध आणि या सगळ्यात तेथील लोकांचे झालेले-होत असलेले हाल या विषयी खूप वाचलय. पण ते बरचसं पाश्चिमात्य किंवा खुद्द अफगाणी लेखकांचे लिखाण, अनुभव ई. मराठी (किंवा भारतीय) व्यक्तिंनी लिहीलेले त्या मानाने क्वचितच दिसते. या पुस्तकात आधीचा ईतिहास तर त्यांनी लिहिला आहेच. पण त्या बरोबरच आताच्या (२००१ युद्धा नंतरच्या) अफगाणिस्थानाची एकूण परिस्थिती बद्दल पण बर्‍यापैकी आढावा घेतलाय. ईतिहास वाचायची आवड असल्याने मला आवडले वाचायला.

कुंपणापलीकडला देश, पाकिस्तान - मनिषा टिकेकर : शोनूने सुचवलेले. ५ महिन्याच्या पाकिस्तान अनुभवावर लिहीलय. पण मला थोडे हात राखून, जपून लिहील्या सारखे वाटले.

निवडक काफ्का - (हे टण्या आणि रैना मुळे :))
त्यातली जी लहानशी (पण अत्यंत भारी) गोष्ट वाचून मी हे पुस्तक विकत घेतलं ती अशी -

'अरे', उंदीर म्हणाला, 'जग तर दिवसागणिक अधिकाधिक संकुचित होतय, आधी ते ईतकं प्रशस्त होतं की मला भिती वाटायची. मी आपला पुढे पुढे पळत होतो. शेवटी मला उजवीकडे आणि डावीकडे भिंती दिसल्या, ह्याचा मला आनंद झाला. पण ह्या लांबच लांब भिंती इतक्या वेगाने एकमेकींना येऊन भिडतायत, की मी आता टोकाच्या जागी पोचलोसुद्धा, आणि तिथे कोपर्‍यात पिंजरा लावलाय, मी पळत थेट त्याच्यात चाललोय,'
-'तुला फक्त पळण्याची दिशा बदलली पाहिजे,' मांजर म्हणाली, आणि तिने त्याला मटकावलं.

एक एक घोट घेत (लेखनाचे!) वाचण्याचा प्रकार दिसतोय एकूण.


निवडक सदानंद रेगे -
पुस्तक चाळायला म्हणून उघडलं आणि पहिलीच ओळ - "किरमिजी रंगाची गोजिरवाणी संध्याकाळ सुलुला फसवून निघून गेली... " मला एकदम कुणा विनोदी लेखकाने या किरमिजी वगैरे रंगांची उडवलेली खिल्ली आठवली. तरी पण आणखी बघू म्हणून चाळले तर अनेक कविता दिसल्या. ईतके वेगवेगळे विषय, वेगवेगळे फॉर्म आणि मोजक्या शब्दात मोठा आशय. झपाटल्या सारख्या एका मागोमाग एक वाचून काढल्या... त्यातल्या झाड नावाच्या एका कवितेतल्या या तीन ओळी -

खरं झाड
मरतांना
उभंच असतं!

जनमन - डॉ. अरूण टिकेकर
एकदम संग्राह्य पुस्तक आहे. साधारण पणे १८५० ते १९५० या काळातली मराठी लोकांची राहणी, एकूण संस्कृती याबद्दलची विषयवार माहिती दिली आहे. तेव्हा ब्रिटिश राज असल्याने फिरंग्याच्या राहणीमाना बद्दल पण माहिती अनुषगाने येते. पुस्तकात अनेक जुने फोटो, रेखाटने आहेत ज्यामुळे ते आणखी रंजक झालय.

डॉ. समिरण वाळवेकर ह्यांनी लिहिलेलं "आजच्या ठळक बातम्या" हे पुस्तक ह्यावेळी पुण्यात रसिक साहित्य मधे मिळालं. नुकतच ते वाचून संपवलं. समिरण वाळवेकर ह्यांना आपण पूर्वी दूरदर्शन वर मराठी बातम्यांमधे वृतनिवेदक म्हणून, नंतर काही कार्यक्रमांमधे संचालक म्हणून आणि नंतर एन्.डी.टी,व्ही. वर पाहिलेलं आहे. नुकतीच त्यांनी भारतीय प्रसारमाध्यमासंबंधीत विषयांवर पि.एचडी पूर्ण केली आणि नंतर हे पुस्तक लिहिलं.
भारतीय प्रसारमाध्यमांचा इतिहास, तांत्रिक माहिती, कुठल्याही वाहिनीच्या दैनंदीन कामकाजासंबंधीत माहिती, चॅनेल विश्वाबद्दल बरच काही, ह्या क्षेत्रात काम करताना / करण्यासाठी लागणार्‍या गोष्टी आणि पाळायची पथ्ये आणि मुळात त्यांच्या इतके वर्षांच्या कामात आलेले रंजक अनुभव हे सगळं वाचायला छान वाटतं. सध्या मी केबल डोमेन मधे काम करत असल्याने बर्‍याच तांत्रिक गोष्टी रिलेट करू शकलो. पण कदाचित काही ठिकाणी तांत्रिक माहिती कंटाळवाणी वाटू शकते. शिवाय मांडणीमधेही थोडासा विस्कळीतपणा जाणवतो. त्यांनी लिहिलेले अनुभव फक्त "चांगले" ह्या वर्गातलेच आहेत. म्हणजे स्वत:च्या हातून झालेल्या टाळता येण्याजोग्या चूका, कधी झालेली फजिती, शिकताना आलेले अनूभव हे ही थोडफार आलं असतं तर वाचताना मजा आली असती.
पण एका वेगळ्या विषयावरचं पुस्तक म्हणून आवडलं.. !

Read "Too big to fail".

पुनर्जन्म या विषयावरील एका सत्यघटनेवर आधारीत "Many Lives Many Masters" (Author - Brian Weiss) हे पुस्तक जरूर वाचा. याचे मराठी भाषांतर याच नावाने सुवर्णा बेडेकर यांनी केलेले आहे (Indra Publishing House).

"ययाती"
लेखन सम्रात वि. स. खान्देकर.
जीवन सत्य शोधन्यासाथी सामजीक जीवनतून विरक्ती घेवून घर सोदुन गेलेला यती !
एका साम्राज्याचा सम्रात असून ही आयूश्यात सुखी न झालेला ययाती.
सत्यासाथी आपल सर्वस्व पनाला लावनारा कच.
अविवेकी आनि गर्विश्थ रुशी कन्या शर्मिश्था.
आनि विचारी, त्यागी राजकन्या!

खरच! सुरेख कादम्बरी.

नक्की वाचा...

हवाहवाई -- छान माहिती दिलीस. धन्यवाद! मला तेवढं ते निवडक काफ्का नक्की कुठे मिळेल सांगतेस का कृपया?

मी नुकतंच 'गुलजार' लिहित 'धागे' वाचलं. पहिल्या एक दोन अध्यायात पुस्तक थोडं हळू (म्हणजे एक्च्यूली बोर)वाटतं. पण नंतर नंतर हळू हळू पकड घेतं. आहे तसं छोटंच, आणि कोणत्याही धड्याचा एकमेकांशी संबंध नाही. म्हणूनंच पुस्तकाला धागे असं नाव दिलं असेल. गुलजार यांच्या मनातले विचार त्यांनी या पुस्तकात फुलवले आहेत. एक कविता पाण्यात पडली हे प्रकरण विशेष आवडलं. मनाची संवेदनशीलता म्हणजे काय हे उलगडून दाखवणारं अप्रतिम पुस्तक. संग्रही असावंच. (असं माझं मत)
एकदा नक्की वाचा...

सध्या दास्तान्-ए-नौशाद (शशिकांत किणीकर संकलित नौशाद यांची आत्मकथा)
वाचतेय. सध्या पुस्तक निम्म्यापेक्षा जास्ती संपलंय त्यात त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमी आणि संगित दिग्दर्शक म्हणून जास्ती आढावा घेतला गेला आहे. मला तरी हे पुस्तक नौशाद यांच्या आत्मकथे पेक्षा त्यांचे सांगितिक जीवन जास्त वाटले. पुढे पाहू काय काय लिहिलंय ते.

मी सध्या गांधीहत्या आणि मी वाचतेय. काल पंचावन्न कोटीचे बळी वाचलं.
उद्या बहुतेक कोसला. Happy

रोम राज्य - १, मीना प्रभु.

अतिशय मस्त प्रवासवर्णन आहे. रोमन राज्यात खरच जाउन आल्यासारख वाटत. मीना प्रभुन्ची लेखन शैली मस्त आहे.

ऑल टाईम फेवरेट पुस्तकं:
- च्युसडेज विथ मॉरी - loved it. प्रत्येक वेळी एक नवा अर्थ गवसला मला ह्या पुस्तकातून!
- entire foundation series by ISAC ASSIMOVE
- आयन रँन्डची अ‍ॅटलास श्रग्ड, फाउंटनहेड
- रिचर्ड बाखंची इल्युजन्स, जोनाथन लिविंगस्टन सिगल, वन
- शांताबाईंची कितीतरी पुस्तकं
- अवचट (कित्ती साधं सरळ लिहितो हा माणूस)
- अर्थातच पुलं, मिरासदार - जवळपास कुठलीही
- पीजी वूडहाऊस - जवळपास सगळी..

च्युसडेज विथ मॉरी -अप्रतिम
अ‍ॅटलास श्रग्ड, फाउंटनहेड-हृदय विदारक
जोनाथन लिविंगस्टन सिगल-अविस्मरणिय
शन्ताबाई-जिव्हाळ्याच्या

नानबा-शेम टू शेमः : )

रणजीत देसाईंच 'गंधाली' वाचल. बरेच दिवसांनी ऐतीहासिक गोष्टी वाचल्यामुळे छान मजा आली. शेवटची 'नक्षत्र कथा' अस्वस्थ करते.

राणई दुर्वे लिखीत 'अवघाची शेजार' वाचले, पुस्तक आवडले. खुप वेग वेगळ्या घटना आणि वेग-वेगळे संदर्भ छान लिहिले आहेत. एकदा वाचावे असे नक्की आहे.

सु.शि. च दुनियादारी मी आत्ता वाचल, आवडल. Happy

आजच बातमी वाचली, पुलंच्या नाटकावरचे सगळे अधिकार सोडून देण्यात आले असून कोणीही त्याचे प्रयोग विना परवानगी करू शकतो....

कुठे हे आणि कुठे ते !

च्युसडेज विथ मॉरी>> त्याची The Five People You Meet in Heaven, For One More Day पण छान आहेत. मी सध्या nudge वाचतोय Happy

दुनियादारी अन् रारंग ढांग कधीही कुठल्याही पानापास्न वाचता येतात.

सध्या मी why men don't listen and women can't read maps by Pease वाचतेय धम्माल पुस्तक आहे.
ब-याचदा नवरा का असं वागतो..? असं वाटायचं..सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील असं वाटतयं जरूर वाचा.

भावे, मस्त आहे परिक्षण - भैरप्पांचं पर्व इतकंच आवडलय की तुमचं हे परिक्षण वाचल्यावर कधी एकदा सार्थ आणि आवरण वाचतेय असं झालंय!
तुम्ही नवीन लिखाणाचा धागा तयार करुन तिथे का नाही हलवत हे परिक्षण?

रेव्यु, म्हणजे आपण पुस्तकं शेअर केली पाहिजेत - आपली आवड सारखी दिसतेय!:)

लोकहो, भैरप्पांचं 'पर्व' आणि शिवराम कारंथांच 'डोंगराएवढा' नक्की वाचा.
नितांत सुंदर पुस्तकं आहेत - पुन्हा पुन्हा वाचावीत अशी..
पर्वः महाभारतावरचं मला सगळ्यात जास्त भावलेलं पुस्तक. इतकं छान आहे की कृष्णाच्या नव्यानंच प्रेमात पडले मी हे वाचल्यावर!
डोंगराएवढा: अत्यंत साधं - सुंदर - भिडणारं पुस्तक!

प्रकाश नारायन सन्त यान्चे पन पुस्तक च्च्न आहे
वन्वास
झुम्बर
शारदा सन्गीत

आनखी एक आहे पन आत्ता नाव आथवत नाहि आहे मला
एका teen age मुलाचा भाव विश्व दाकहवला आहे त्यानि .
जरुर वाचावा असा आहे .. भेतला कि नक्कि वाचा.

अजुन थिक type करता येत नाहि Sad

Pages