सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, मस्तच can't wait... Proud
महागुरु, अगदी बरोबर आहे अंदाज. देबो जाणं कठीण आहे.

हो, इंटरनॅशनल कॉटेस्टंट पाहिजेच ३ मधे , जाहिर किंवा सारा पैकी एक हवाच टॉप मधे आणि हिमेश तर पाहिजेच .

जहीर चौथ्या नंबर वर असेल असे वाटते. आला तर जहिरच येईल. सारा फक्त 'अल्ला' वाली गाणे तेवढी चांगली म्हणते. जहिर आला तर याशिता चा पत्ता कट. (देबो आहे ना प्रितम च्या गटातुन). तरीही वाटते कि यावेळी हिमेश आणि सगळा इंटरनॅशनल ड्रामा फायनल ला नसेल. मागच्या वर्षी पेक्षा ह्यावेळी हेमेशची नौटंकी तसेच त्याचे ह्या शो मधले प्रस्थ फार कमी झाले आहे.

चाफा म्हंटला तसं
जय माता दि लेट्स रॉक !!
पण जाहिर आल्याने याशिता चा नाही, वैशाली चा पत्ता कट होईल Sad
म्हणून मला सारा आलेली चालेल त्या पेक्षा, आणि देबो नक्की नाही येणार, याशिता नक्की, देबो इन फॅक्ट लवकरच आउट होणार आहे!!:)

माझे प्रेडिक्टेड फायनलिस्ट्स
याशिता सारा वैशाली
नंबर ४: शौमेन !

तरीही देबो आलाच तर याशिताचा पत्ता कट कारण मुंबई च्या मुली पेक्षा बंगाल चा पोरगा व्होट्स जास्त आणणार आणि वैशाली मुंबई कडून आहेच ऑलरेडी , सो २ मुम्बईच्या मुलीं ऐवजी जर देबो ला प्रेफर केलं तर काही सांगता येत नाही, येइल सुध्दा देबो!
खरं सांगायच तर याशिता पेक्षा देबोजीत ऍज अ सिंगर मला तरी चांगला वाटतो, कपॅसिटी आहे त्याची चांगलं गायची , याशिता नुसतीच आयटम नम्बर वाली आहे !

हिमेशची नौटंकी वाटतेय जरा खालवल्यासारखी. शोमध्ये पण एकदम शांत चेहरा करुन बसलेला असतो, जसं काही आपण त्या गावचेच नाही.

>>हिमेशची नौटंकी वाटतेय जरा खालवल्यासारखी.
(आदळाअपट करून थंड पडलेल्या रेड्यासारखी.) Proud

..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II Proud

आजचा इपिसोड म्हणजे एकदम फुल्ल टु इमोशनल ड्रामा आहे, सगळ्यांनी डोळे पुसायला टॉवेल घेवुन बसावे.

महागुरू, तुम्ही आधीच पाहिला का आजचा भाग?
आज रात्री असेल ना आपल्या ईथे.

महागुरु नी ऑनलाइन पाहिला असेल आजचा भाग !
एकंदरीत प्रतिभा ची गाणी फार लक्षात नाही राहिली अत्ता पर्यंत्त पण तसं पाहिलं तर ती सर्वात स्ट्राँग दिसतेय!
पब्लिक वोटिंग सुरु झाल्या पासून २ दा संगीत चक्र , एकदाही बॉटम ३ मधे नाही !!
बाकी सगळे स्ट्राँग गायक वैशाली, देबो, जाहिर, शौमेन, सारा अगदी याशिता पण येउन गेली बॉटम मधे पण प्रतिभा नाही !!

तिची गाण्याची बॅकग्राऊंड स्ट्राँग आहे ह्यात काही वादच नाही. फक्त तिलाही वैशाली सारखं पुढे पुढे नाचायला जमत नाही हाच तिचा प्रॉब आहे. ती काही काही गाणी म्हणते छान. पण प्रतिभाचं आत्तापर्यंतचं छान गाणं कोणतं म्हटलं तर माझ्या एकही डोळ्यासमोर येत नाही हा भाग वेगळा.

प्रतिभाचं अब के सावन ऐसे बरसे, जय जय शिव शंकर, मार डाला छान झाली होती गाणी, आज बागबान मधल गाणं पण Happy

माझ्याकडे देशी चॅनेल्स नाहीत. सारेगम मी ऑनलाईन पहातो.
प्रतिभाला हिमेसभाय ने ब्रेक पण दिला म्हणे. त्याच्या पुढच्या चित्रपटात की अल्बम मधे सोलो साँग दिले म्हणे.

आज हिमेश नी ' तेरी याद आती है" च्या २ लाइन्स गायल्या त्या आवडल्या मला, कधी कधी हिमेश खरोखरच रॉक्स :))
शंकर च्या 'मा' बद्दल तर वाद च नाही.. हर हर महादेवन Happy
आजचे माझे रँकिंग
१. प्रतिभा
२.देबोजीत ( मला पण मासुम आणि सुरेल वाटला)
३. जहिर( याला तिघांनी सुपर हिट च दिले तरीही, दिल को छु लिया टाईप गायला:))
४.वैशाली (चॉइस नाही आवडला..पण तरीही वैशाली रॉक्सः))
५.याशिता
६. सारा
७. तरुण
८. शौमेन
९.आस्मा
आजची २ वाक्यः
१.याशिताची आई काय म्हंटली: "अकेली खूबसूरत औरत को लोग जीने नही देते:..:)
२.आणि वैशाली काय म्हणे तर आई वडिल शिवाय भाउ(!) बहिण पण नवराच Happy
इमोशन्स , त्यांची परिस्थीती समजु शकते, पण ही दोन्ही वाक्य रचना फनी वाटली मला !

वर २ अन ४ ची अदला बदल करून माझंही सेम रँकिन्ग!:)
याशिताची आई ड्रामा करायच्या तयारीनेच आल्यासारखी वाटली मला! Proud एरवी चांगले सलवार कमीझ, जीन्स पण घालते की, अन आज मात्र पांढरी साडी वगैरे!! Happy

शंकरचे गाणे ऐकून व पाहून कोणी रडले नसेल असे वाटत नाही. Sad
DJ च्या यादीत ३ आणि ४ ची अदलाबदली करून माझंही तेच रँकींग.

हाहाहा, याशिताच्या आईच्या 'अकेली खुबसुरत औरत'चा डायलॉग मजेशीरच होता.
वैशालीच्या वाक्याचा अर्थ समजून घे गं. बायदवे, तिने तिच्या बाबांचं काय सांगितलं? मी पाहिलं नाही.

खरंच टचिंग आहे ते शंकरचं ते गाणं. आणि त्या गाण्यात ईशान परफेक्ट फिट झालाय. जितक्या वेळेला तो ईशान डोळ्यासमोर येतो तितक्या वेळेला मला माझा भाचा आठवतो. तसाच आहे दिसायला.

येस्स! वैशालीची कव्वाली आजची सगळ्यात सुंदर! डोळे मिटून ऐकले की कळते की कसे प्लेबॅक क्वालिटीचे गायले तिने. आज तिच्या जवळपासही इतर कोणी पोचले नाही - प्रतिभाही नाही!

चाफा,
आगदी अगदी..
ती एकटीच ३ हिस्टरीज डिझर्व करत होती.. !!
आज वैशालीनी मराठी सारेगमप च्या लेव्हल चा पर्फॉर्मन्स दिला.. वैशाली इज बॅक !!
खरच, तिच्या आस पास ही कोणी नाही या एपिसोड मधे !!

पण जजेस नी तर (शंकर सकट) आस्मालाही दिल्या ३ हिस्टरीजः(.. नॉन सेन्स !!

बाय द वे,
डॉ. रेशमियांनी काल वैशालीच्या नवर्‍याच्या ठिक होण्याची तारीख ही सांगितली अता:)
ग्रँड फिनाले च्या आधी ठिक होणार म्हणे Happy
असो... सध्या तरी..एनि पब्लिसिटी इज गुड फॉर वैशाली...
सो .......जय माता दि लेट्स रॉक !!

वैशालीचे गाणे आज दी बेष्ट!! त्यानन्तर झहीर , प्रतिभाचे आवडले मला. पण देबो ला एवढे डोक्यावर घेण्याइतकं मुळीच चांगलं झालं नाही त्याचं गाणं!! Uhoh
याशिता पण अतिसामान्य एकदम! आस्मा बद्दल न बोलणे बरे Uhoh

पुढच्या आठवड्यात देबो ला टॉप ला आणयचय त्यांना:(, म्हणून वेड्या सारखी स्तुति !
कालही बंगाल टायग्र्स ना अवाहन केलं प्रीतम ने !!:(
पब्लिक व्होटिंग सुरु झाल्या पासून डेबो महाराज टॉप वर आले नाहीत ना, आणायचय अता आणि इस्ट झोन जागा करायचाय!!
खरं तर वैशाली ड्डिझर्व्ह करते नेक्स्ट वीक !

वैशाली ची इमोशनल स्टोरी काय आहे...?
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !

वैशालीचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला होता, नो डाऊट. याशिता सोसो. आणि आस्माला हिस्टरी द्यायला आदेशने भाग पाडलं सगळ्यांना. मला वाटतंय की पुढच्या वेळी बॉटम ३ मध्ये असायला हरकत नाही तिला.सारापण सोसोच होती काल. देबो,शौमेन नी प्रतिभाची गाणी आठवत नाहीयेत मला.
वैशालीच्या गाण्यानंतरची जजेसची शायरी आवडली मला.

हो, वैशाली मस्त.. इतके बरे वाटले ना..
देबो ची सुरुवात छान पण नंतर गाणे फिके. ३ हिस्टरी देण्याचे काहीही गरज नाही पण त्याला टॉपवर आणायचे म्हणुनच बडबड होती ती सर्व..
आसमा कडे लक्ष देऊ नका, ती प्रॅक्टिस करायला आली आहे इथे Happy
सारा मला तशीही आवडतच नाही. नाटकी गाणे आणि गात नसताना नाटकी बोलणे.
प्रतिभा पण चांगली होती पण वैशाली पहिली हाँ ..
झहीर चा आवाज चांगलाय.

२ पोनी टेल आणि शाळेच्या ड्रेस मध्ये झहीर सोडुन सगळे यडपट दिसत होते. मागच्या कोणत्या तरी एपिसोडमध्ये शौमेन ने काळी टोपी घालून गाणं गायलं होतं तेव्हा तो चक्क द मास्क मधल्या जिम कॅरी सारखा दिसत होता... (म्हणजे मास्क लावल्यानंतरचा :P) वैशालीची कव्वाली छान झाली पण दोन्ही दिवस तिची ड्रेपरी फार विनोदी दिसत होती. यावेळी आस्माँ रडताना खूप वाईट वाटलं. नौटंकी रडत नव्हती ती. शंकरने माँ गाणे खूप छान गायले. हिमेशची 'मै जहाँ रहू' ची झलक ही जबरा होती.
देबो चं गाणं चांगलं झालं. फक्त 'र' आणि 'ड' मध्ये त्याची फार गफलत होते. त्याच्यात 'ऑटेस्टीक' फिचर्स खूप दिसतात. 'ऑटीझम' हा एक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. त्यात बाकीची कोणतीही सोशल स्किल्स अगदी कमी असतात पण एक कोणते तरी सुपर स्ट्राँग असते. देबोत म्युझिक दिसते. बोलताना तो खूप अडखळतो, पण गाणं व्यवस्थित गातो. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

वैशालीच्या नवर्‍याला काय झालंय? तिची मुलगी मात्र गोड आहे. मस्त टोपडं वगैरे घालून आणते तिला Happy
मला शंकरचं माँ आवडलं. कधीही ते गाणं ऐकलं की मला रडायला येतं! Sad
असो, वैशालीने सुंदर कव्वाली म्हणली. आणि बेंगाली सारेगमप मधला पहिला गायलेला कोण? त्यानेही माहौल चांगला बांधला एपिसोडचा..
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..

वैशालीचा नवरा ही चांगला गायचा म्हणे, पण एका ऍक्सिडेंट मध्ये त्याच्या स्वरयंत्राला धक्का लागून त्याचा आवाज गेला. तो काय बोलतो हे आपल्याला कळणं कठिण आहे.
वैशालीला सारेगमप मध्ये भाग घेण्यासाठी त्याने खूप प्रोत्साहन दिलं, त्यांचं दुकान वगैरे विकून ते दोघं मुंबईला आले होते. चिज केलं वैशालीनं.

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

Pages