..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, हे गाणे तू आधी पण टाकले होतेस !>>>>>दिनेशदा, ते ह्या गाणा खयंचा बाफवर, थोडा चेंज करून इथेही टाकले. Happy

जिप्सी...भरत....कांदाभजी खाता खाता त्या बिचार्‍या मर्लिन मन्रोकडेही लक्ष द्या ना !!

"दिल के टुकडे..." हे ऊषा खन्ना यांचे गीत....फार गाजले होते...अमजद खानची मध्यवर्ती भूमिकाही !

१५ : इतरांच्या विबासंच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकून मामीना एकदम न्यूनगंड आला. मेल्याहून मेल्यासारखे वाटू लागले. मन तळमळू लागले. छातीत धडधड व असह्य वेदना जाणवू लागली. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, असं आपल्या यजमानांना त्या गाण्यातून कसं सांगतील?

काही शब्द इटालिक केलेत.
विबासं म्हणजे जोडीदाराशी प्रतारणा.
कोड्यातल्या व्यक्तींमध्ये जे नातं आहे, तेच चित्रपटाच्या नावात आहे, इतकंच काय संगीत दिग्दर्शक आणि गायिकेत आहे.
चित्रपट काही चाललेला नसावा, पण अशाच नावाचा विबासं वरला धमाल विनोदी चित्रपट खूप चालला.

प्रतीक, अजुन काही क्लु Happy

दिल के टुकडे..." हे ऊषा खन्ना यांचे गीत....फार गाजले होते...अमजद खानची मध्यवर्ती भूमिकाही !>>>>येस्स्स. त्यातलंच सुमन कल्याणपूर यांचे "हम सबको नेक राह पे लाना मेरे अल्ला, बंदो को बुराई से बचाना मेरे अल्ला, अल्लाह करम करना" हे गाणे हि गाजलं.

अच्छा, म्हणजे दिनेश म्हणताहेत तसे दिल आधीच कोणीतरी गायब केले आहे आणि आता फक्त यकृतच उरले आहे का तुझ्याकडे? त्याला 'बेरकी' नाही तर 'बेहाल' असा शब्द आहे. Proud

१७. बबन बनेला त्याचे आईवडिल वधुवर मेळाव्यात पाठवतात. तिथे त्याला नेहा नेने आणि मिरा माने या तोन मुली अतिशय आवडतात. पण जास्त कोण आवडली हे काही त्याला ठरवता येत नसते. दोघीही इतक्या आवडल्या असतात की त्यांच्याकरता जीव द्यायला पण तो तयार झाला असता. घरी आल्यावर आईवडिल विचारतात की कोणी मुलगी पसंत पडली का? बबन काय उत्तर देइल?

क्लू: अर्रर्र, ती नंदा माने होती. मिष्टेक झाली लोक.

कोडं १६: केनेडी
आक्रमक म्हटल्यावर मला 'डॉन'मधलं झीनतचं गाणं आठवलं.
जिसका मुझे था इंतजार, जिसके लिये दिल था बेकरार
वो घडी आ गई, आ गई...
आज प्यार मे हद से गुजर जाना है
मार देना है तुझको या मर जाना है..

प्रतीक कोडं स्पेसिफिक कर अजून. नाहीतर बरीच गाणी मॅच होतात.

होय, श्रद्धा....मी हे जाणतो की 'तशा' सिच्युएशनला मॅच होणारी डझनावारी गाणी आहेत आपल्या हिंदी चित्रपटातून, त्यामुळे तुम्ही लोक्सनी दिलेली उत्तरे नाकारताना मलाही त्रासाचे वाटत असल्याने आता कोड्याचे उत्तर टंकतोच :

जॉन केनेडीनी जरी जॅकेलिनबरोबर लग्न केले असले तरी मेरिलिन मॅन्रो त्याना विसरू शकत नसे. एकदा जॅकेलिन नसताना पार्टीच्यावेळी केनेडी आल्याचे मेरिलीनने पाहिले. त्यावेळी ती त्याना उद्देश्यून कोणते हिंदी गाणे म्हणेल ?

"बाहों में चले आओ, हो, हमसे सनम क्या परदा...
चले ही जाना है, नज़र चुराके यूँ
फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों
किसी को अपना बना के छोड दे ऐसा कोई नहीं करता..."

मी कडव्याचा मुद्दाम उल्लेख केला होता....कारण तेच मर्लिनसाठी जास्त अप्लिकेबल होते.

"अनामिका..." जया टु संजीवकुमार.

(जया भादुरीवर अशा धर्तीची गाणी सहसा चित्रीत झालेली नाहीत)

कोडं क्र. २० :

एका स्त्रीचं शेपूचं शेत असतं. एकदा तिच्या गावात एक जादुचे खेळ दाखवणारा माणूस येतो आणि तिच्या शेताजवळच तात्पुरती राहुटी बांधून राहतो. जेवणाकरता म्हणून तो तिच्या शेतातला शेपू चोरायला सुरवात करतो. स्त्रीच्या लक्षात आल्यावर त्याच्यावर पाळत ठेऊन ती त्याला पकडते. त्यावेळी ती कोणतं गाणं म्हणेल?

१५ : इतरांच्या विबासंच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकून मामीना एकदम न्यूनगंड आला. मेल्याहून मेल्यासारखे वाटू लागले. मन तळमळू लागले. छातीत धडधड व असह्य वेदना जाणवू लागली. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, असं आपल्या यजमानांना त्या गाण्यातून कसं सांगतील?

आता हे कुणालाच येत नाही तर उत्तर सांगून टाकतो

मार डालेगा दर्द्-ए-जिगर कोई इसकी दवा कीजिए
ये वफाएं बहुत हो चुकी आज कोई जफा कीजिए

चित्रपट पती पत्नी
संगीतकार - आर डी बर्मन
गायिका : आशा

मै चोर हू काम है चोरी दुनियामे हू बदनाम
दिलको चुराता आया हू मै यहि मेरा काम ?

श्रध्दा, बरोबर हे काय सांगायला हवं? Happy

दिनेशदा कुठे आहेत. एक डिलेमा आहे. पुपुवर कांदेपोहे वेगळंच म्हणतोय. दिनेशदांनी पहिल्या भागात वेगळा अर्थ सांगितला होता.

२१:
प्रश्णः पोर्तुगिजांनी आपल्या वखारी सुरत येथे का वसवल्या?
उत्तरः सुरत येथे तेंव्हा काळ्या चिरेबंदी इमारती होत्या. त्या पोर्तुगिज सेनापतीच्या बायकोला खूप आवडल्या. मग तिने हे गाणे म्हटले.

क्लू: गाणे लताने गायले आहे. बरेच जूने आहे पण अस्सल हिरा आहे.

२१:
प्रश्णः पोर्तुगिजांनी आपल्या वखारी सुरत येथे का वसवल्या?
उत्तरः सुरत येथे तेंव्हा काळ्या चिरेबंदी इमारती होत्या. त्या पोर्तुगिज सेनापतीच्या बायकोला खूप आवडल्या. मग तिने हे गाणे म्हटले.

तेरे घर के सामने एक घर बसाउंगा? :प

मामी, कशाबद्दल ? आता कोण कुठे काय चर्चा करताहेत, त्यावर कुठे लक्ष ठेवायचे बाई. सगळ्या अखिल भारतीयच नाहीत तर जागतिक संस्था, त्या विशिष्ठ शहरातच असतात आणि तिथे असे वैचारिक संवाद घडतच असतात. त्यातले सार मग आपल्याला कळते. तेव्हा वाट पाहू. काय ?

आता तू सांगितल्यावर डोकावलो तिथे. तोच आहे ना अर्थ ?

इंद्रधनु --^-- ! मला हे इतक्या लवकर ओळखणं अपेक्षित नव्हतं. तुम्ही ऐकले आहे का ते गाणे?

फक्त ते 'सावरी सुरत मन भाइ रे पिया' असं आहे.

त्रास कसला गं ?

माधव, सुंदर आहे ते गाणे. खरे तर आता सूचले तरी उत्तर लिहायला धाडस होत नाही. काय काय गाणी शोधून काढतात हि तरुण माणसं !

Pages