..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हे द्विशतकी कोडे ह्या धाग्यावरचे -
२००. सुप्रसिध्द जपानी कवि क्वान तो यांचा आज साठावा वाढदिवस असतो. "तुम्ही पहिली कविता कशी लिहिलीत?" मुलाखतकारा त्यांना विचारते. त्यांच्या डोळ्यासमोरून ते ३५ वर्षांपूर्वीचे दिवस तरळून जातात. ते तेंव्हा मुंबईला आलेले असतात आणि ताजमध्ये उतरले असतात. तिथेच त्यांना त्यांची परमप्रिय पत्नी भेटते. तेंव्हा ती ताजम्ध्ये रिसेप्शनिस्ट असते - तनुजा उल्हास झामरे. तिची भेट होते आणि त्यांची दुनियाच बदलून जाते. हे सगळे कसे सांगतील ते गाण्यातून?

धन्स माधव, द्विशतक कोड्यांसाठी Happy

१९९. एका गुंडाच्या खिशातली रुपयांची नाणी कोणते गाणे म्हणतील?>>>>>>

नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था काले चोर ले गए ????

क्लू:

१९७: गाण्यातले बरेच शब्द कोड्यातच आहेत. नुसता लताचा आवाज आहे. ह्या ओळी संपल्यावर गाण्याचे संगित सुरू होते.

१९८: माबोचा अभ्यास करा जरा. मराठी गाणं आहे हे.

१९९: त्याच्या खिशात १२ नाणी होति रुपयांची

२००: जिप्स्या तुझीच क्लृप्ती वापरली आहे रे. अनवट गायक आहे.

सगळी कोडी खूप कठीण आहेत. >> इथले खेळाडू पण कसलेलेच आहेत ना. त्यांना साजेशीच कोडी आहेत Happy

तउझा वरून पण काही कळत नाही. >> रस्ता बरोबर आहे भरत फक्त गाडी रोमवरून घ्या.

१९९ : आंख लडाके तूने मारा घायल हो गया दिल बेचारा
सुना है तेरे चाहनेवाले आगे दस है पीछे बारा

नापास ना मी?

माधव, जबरीच एकदम! कोडी कॉपी-पेस्ट करून घेतली आहेत. ऑफलाईन विचार करेन आता.

२००:
तउझा वरून पण काही कळत नाही. >> रस्ता बरोबर आहे भरत फक्त गाडी रोमवरून घ्या.

म्हणजे TUZ. 'तुझको मिला' वगैरे आहे काय?

जिप्सी नापास Sad
ऋष्या पास Happy

किल्ल्याला खिंडार पडलेले आहे. आता बाकीच्या मावळ्यांनी आत घुसा.

डेडलाईन कधीची ठेऊ?

१९६: एक मांत्रिक असतो. कोणतेही भूत हमखास उतरवणारा. सगळी भूतं ही देवनागरी अक्षरांप्रमाणे असतात अशी त्याची धारणा होती. आणि प्रत्येक भूतावर काबू करण्यासाठी काय लागेल याचे ठोकताळे ठरलेले असायचे त्याचे. जसे ठ आकारातला प्रेतात्मा असेल तर तो झपाटलेल्याचे मन मागायचा भूतावर काबू करायला. ड आकारातला असेल तर फक्त अर्ध केळं मागायचा. कसं सांगायचा तो हे गाण्यातून?

>> चढ गयो पापी बिछुआ? त्याची सुरुवात का?

माधव, १९७ - आयत, डोक्यावरून जाणं म्हणजे 'अरबी', चंदा म्हणजे चांदचा रेफरन्स आणि ह्या ओळी संपल्यावर गाण्याचे संगित सुरू होते. म्हणजे 'आंधी' तलं 'तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा' तर नाही?

१९७ : न गिला होगा न शिकवा न शिकायत होगी
अरज है इक छोटीसी सुन लो तो इनायत (इन+आयत) होगी
तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवानों में
चाहे तू हमें अपना न बना लेकिन न समझ बेगानों में

माझं अत्यंत आवडतं गाणं

ते रात(रजनी), चंदा , सूरज वाट चुकवायला का?

भरत बरोबर. Happy तुम्हाला २१ काजू मोदक.

१९७: रजनीताई कॉलेजात प्राध्यापिका असतात. त्यांच्या वर्गात चंदा नावाची खूप सुंदर मुलगी असते. त्यांच्या मुलाचे (सूरजचे) तिच्यावर प्रेम असते आणि रजनीताईंना त्याची कुणकुण लागली असते. त्यांनाही चंदा पसंत असते सून म्हणून. त्या मुलाकडून लग्नाकरताचा अर्ज भरून घेतात - दुसर्‍या दिवशी रजीस्ट्रारच्या कार्यालयात नेऊन देण्यासाठी.
चंदा गणितात अगदी ढ असते. दुसर्‍या दिवशी बाई शिकवत असताना आयत या भूमितीय आकृतीचा संदर्भ येतो. चंदाच्या पार डोक्यावरून जाते ते. तेंव्हा बाई म्हणतात, "बाई गं आयत शिक अथवा नको शिकूस. हा अर्ज घे म्हणजे तुला आयताचे सर्वच अंतरंग समजेल"

न गिला होगा न शिकवा न शिकायत (शिक वा न शिक आयत) होगी
अरज (अर्ज) है इक छोटीसी सुन लो तो इनायत (इन आयत) होगी

माधव, भरत __/\__

मी पहिल्यांदाच ऐकतोय/वाचतोय हे गाणं Sad

जिप्स्या देख कबीरा रोया मधे आहे हे गाणे. गाणे सुंदरच आहे पण त्या पहिल्या दोन ओळी अप्रतिमच आहेत - नुसता लताचा आवाज, मागे कसलेही वाद्य नाही. मग कळते 'कंबख्त कभी बेसुरी होती ही नही" असे तिला बडे गुलाम अली खाँ का म्हणाले असतील ते.

>>माधव, भरत __/\__
>>मी पहिल्यांदाच ऐकतोय/वाचतोय हे गाणं

अनुमोदन

>>मग कळते 'कंबख्त कभी बेसुरी होती ही नही" असे तिला बडे गुलाम अली खाँ का म्हणाले असतील ते.

ह्या बड्या गुलाम अलीखांनी मला गाताना ऐकलं नाही तेच बरं आहे नाहीतर 'कंबख्त कभी सुरमे गातीही नही' असं म्हणाले असते Proud

माधव, भरत __/\__
मी पहिल्यांदाच ऐकतोय/वाचतोय हे गाणं >>>>> हायला जिप्सी, हे अपेक्षीत नव्हत.

Pages