Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला जिप्सी, हे अपेक्षीत
हायला जिप्सी, हे अपेक्षीत नव्हत. >> +१
हायला जिप्सी, हे अपेक्षीत
हायला जिप्सी, हे अपेक्षीत नव्हत. >> +१+१
इथे बघ जिप्सी.
ही शुभा खोटे आहे . या चित्रपटात अशोककुमार, किशोरकुमार यांचा भाऊ अनुपकुमार याची आणि अनीता गुहाची (संतोषी माता)भूमिका आहे. (आठवा मन्नु तेरा हुआ अब मेरा क्या होगा)
कौन आया मेरे मन के द्वारे पायल की झंकार लिये हे याच चित्रपटातलं गाणं.
मी शाळकरी असताना दूरदर्शनवर पाहिला होता.
या गझलचे शब्द पण किती सुंदर आहेत...राजेंद्र कृष्ण (सं: मदन मोहन)
तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवानों में
चाहे तू हमें अपना न बना लेकिन न समझ बेगानों में
मरने से हमें इन्कार नहीं जीतें हैं मगर इस हसरत में
भूले से हमारा नाम कभी आ जाए तेरे अफसानों में
मिटतें हैं मगर हौल हौले जलतें हैं मगर इक बार नहीं
हम शम्मा का सीना रखतें हैं रहतें हैं मगर परवानों में
धन्यवाद माधव या गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल.:)
खरंच नव्हत माहिती कौन आया
खरंच नव्हत माहिती
कौन आया मेरे मन के द्वारे पायल की झंकार लिये >>>>या चित्रपटातील हे एकच गाण माहित होतं.
स्वप्ना,
उद्या संध्याकाळी ५ वाजता न
उद्या संध्याकाळी ५ वाजता न सुटलेल्या कोड्यांची उत्तरे टाकेन.
ओक्के माधव, उद्या सकाळी अजुन
ओक्के माधव, उद्या सकाळी अजुन ४ भिजवलेले बदाम खाऊन येतो.
न गिला... तर मी बर्याच वेळा
न गिला... तर मी बर्याच वेळा अंताक्षरीत लिहिलय. छानच कोडे.
देख कबीरा रोया मधे आणखी पण चांगली गाणी आहेत.
२०० जो बात तुझमे है तेरे
२००
जो बात तुझमे है तेरे तसबीरमे नही
३५ वर्षापुर्वीचा सिनेमा ताज महाल
१९९ ऐ मालिक तेरे बन्दे (सुटे
१९९
ऐ मालिक तेरे बन्दे (सुटे पैसे) हम
दो आखे बारा हात
-लता
१९९ :निलिमा ग्रेट. पण
१९९ :निलिमा ग्रेट.
पण ताजमहाल १९६३ साली आला होता. आणि गायक अनवट आहे , इति माधव.
निलिमा १९९ क्रेक्ट है! १९९.
निलिमा १९९ क्रेक्ट है!
१९९. एका गुंडाच्या खिशातली रुपयांची नाणी कोणते गाणे म्हणतील?
उत्तरः ए मालिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले और बधी से टले
ताकी हसते हुए निकले दम
रुपयाला 'बंदा' हे विशेषण वापरले जते. गुंडाच्या खिशातले पैसे असल्याने पुढच्या ओळी पण लागी होतात
माधव २०० साठी आणखी क्लु द्याल
माधव २०० साठी आणखी क्लु द्याल का?
भरत त्याची पहिली कविता होती
भरत त्याची पहिली कविता होती ती. म्हणजे त्या आधी त्याने कविता केल्या नव्हत्या
आता आलेच पाहिजे. स्वप्ना गाणे रंगीत आहे तुला येइल
२०० मैं शायर तो नहीं मगर ऐ
२०० मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी
जबसे देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गयी
बॉबी शैलेंद्र सिंघ...
ट्युब पेटायला बराच वेळ लागला की.
भरत पाच केसांच्या बदल्यात दोन
भरत पाच केसांच्या बदल्यात दोन उत्तरे. सौदा काही वाईट नाही
२००. सुप्रसिध्द जपानी कवि क्वान तो यांचा आज साठावा वाढदिवस असतो. "तुम्ही पहिली कविता कशी लिहिलीत?" मुलाखतकारा त्यांना विचारते. त्यांच्या डोळ्यासमोरून ते ३५ वर्षांपूर्वीचे दिवस तरळून जातात. ते तेंव्हा मुंबईला आलेले असतात आणि ताजमध्ये उतरले असतात. तिथेच त्यांना त्यांची परमप्रिय पत्नी भेटते. तेंव्हा ती ताजम्ध्ये रिसेप्शनिस्ट असते - तनुजा उल्हास झामरे. तिची भेट होते आणि त्यांची दुनियाच बदलून जाते. हे सगळे कसे सांगतील ते गाण्यातून?
उत्तर: मै शायर तो नही
मगर ए हसी (मुलाखतकारा)
जबसे देखा मैने तुझ(T U Z) को
मुझको शायरी आ गयी
खरंच नव्हत माहिती कौन आया
खरंच नव्हत माहिती
कौन आया मेरे मन के द्वारे पायल की झंकार लिये >>>>या चित्रपटातील हे एकच गाण माहित होतं. >>>>>> थोडक्यात या चित्रपटातील सगळीच गाणी छान आहेत, अवश्य ऐकावीत.
भरतने दिलेली लिंक काल पाहिली.
भरतने दिलेली लिंक काल पाहिली. पण याआधी कधी ऐकलं/बघितलं नव्हतं हे गाणं
(घोर अज्ञान दुसरे काय
)
माधव, १९८चं मराठी गाणं 'गोड
माधव,
१९८चं मराठी गाणं 'गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी' हे किंवा 'नेसली माहेरची साडी' यापैकी एक आहे का?
नाही श्रध्दा.
नाही श्रध्दा.
१९६: एक मांत्रिक असतो.
१९६: एक मांत्रिक असतो. कोणतेही भूत हमखास उतरवणारा. सगळी भूतं ही देवनागरी अक्षरांप्रमाणे असतात अशी त्याची धारणा होती. आणि प्रत्येक भूतावर काबू करण्यासाठी काय लागेल याचे ठोकताळे ठरलेले असायचे त्याचे. जसे ठ आकारातला प्रेतात्मा असेल तर तो झपाटलेल्याचे मन मागायचा भूतावर काबू करायला. ड आकारातला असेल तर फक्त अर्ध केळं मागायचा. कसं सांगायचा तो हे गाण्यातून?
उत्तरः रु ठा है तो मना लेंगे
बिग डा है तो बना लेंगे
१९८. एकदाच्या साडीच्या मिर्या काढून झाल्यावर अनघाने बागेश्रीला उद्देशून कोणते गाणे म्हटले असेल?
उत्तरः जीवनात ही घडी अशीच राहू दे
माधव... १९६ साठी तुम्हाला
माधव... १९६ साठी तुम्हाला __/\__
माधव, __/\__ त्या
माधव, __/\__
त्या मांत्रिकाने/चेटकिणीने दोन दिवसांपासुन झपाटलेलं होतं.
जिप्सीला अनुमोदन! खरं तर हे
जिप्सीला अनुमोदन! खरं तर हे कोडच कळलं नव्हतं मला!
२०१ भारतीय माणसाशी लग्न
२०१
भारतीय माणसाशी लग्न केलेली जॅपनीज आई आपल्या द्वाड मुलाला म्हणते अरे तु एवढी मस्ती करतोस दमत कसा नाहीस.
मुलगा म्हणतो मला तर असच एकदम बर आणि शांत वाटतय. तर तो ते आईला कस सांगेल.
कोणीच नाही विकान्तला वाटते
कोणीच नाही विकान्तला वाटते
भरत, निलिमा, माधव __/\__
भरत, निलिमा, माधव __/\__
कोडं नं. २०२ 'काय रे नाव
कोडं नं. २०२
'काय रे नाव तुझं?' एका सिनियरने दरडावून विचारलं.
"अं, तुषार मधुकर पेठे" फर्स्ट इयरचा तो विद्यार्थी चाचरत म्हणाला.
"भूतांवर विश्वास आहे?" परत प्रश्न आला.
"अं?"
"अरे अं काय? भूतांवर विश्वास आहे?"
"आहे"
"हे झकास. वस्तीबाहेर एक पडका वाडा आहे. एक मुंडकं नसलेलं धड तिथे फिरतं असं म्हणतात. तुझा विश्वास आहे म्हणजे तुला दिसेलच ते. त्याचा इंटरव्ह्यू घेऊन यायचा आज रात्री. काय?"
"हो" आता मुंडकं नसलेलं धड कसं बोलणार हा प्रश्न मनात असूनही विचारायची त्याची टाप नव्हती.
रात्री १२ ला ठरल्याप्रमाणे तुषार त्या वाड्यात गेला तेव्हा त्याच्या प्रथम दर्शनानेच त्याची दातखीळ बसली. थेट रामसेच्या पिक्चरमधून उचलून ठेवल्यासारखा वाटत होता. धीर करून तो आत गेला. एका कोपर्यात अंग चोरून बसला. प्रथम तिथे नीरव शांतता वाटत होती. मग घुबडाचा आवाज येऊ लागला. कुठे पानांची सळसळ. कुठे एखादं जुनं लाकूड करकरायचं. जरा कुठे खुट्ट झालं की भीतीने प्राण कंठाशी यायचे. एखाद्याला अश्यावेळी रामरक्षा नाहीतर हनुमान चालिसा आठवायचं पण तुषारला एक हिंदी गाणं आठवलं आणि तशाही स्थितीत हसू फुटलं. सांगा ते गाणं.
२०२: एक हो गये हम और तुम तो
२०२: एक हो गये हम और तुम तो उड गयी निंदे रे ......
ये पेहली बार मिले तु म पे ये दम निकले?
नाही माधव
नाही माधव
हाय...मी नविन आहे इकडे ....मी
हाय...मी नविन आहे इकडे ....मी सांगू??
सांगा की
सांगा की
Pages