..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐसा लागता है....
जो न हुआ...होनेको है...

वर्ना दिल क्यू धडकता...
सांस क्यू रुकती...
निन्देन मेरी क्यू ...उड जाती...

पद्मजा_जो, नाही हो....हे गाणं गोल्डन एरातलं आहे. एक क्लू देते. पिक्चरमध्ये २ ठोकळे. हे गाणं एका ठोकळ्याने म्हटलंय.

अजून एक क्लू देऊ का? Sad

निलिमा, तुमच्या कोड्यावर विचार करतेय. पण माझी ट्यूब पेटेपर्यंत इथे कोणीतरी उत्तर देईल Happy

नाही अक्षरी.

क्लू १: .हे गाणं गोल्डन एरातलं आहे. पिक्चरमध्ये २ ठोकळे. हे गाणं एका ठोकळ्याने म्हटलंय.
क्लू २: चीनी कम है, चीनी कम है
क्लू ३: नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणतो ते बरोबर आहे. Wink

ह्म्म्म! म्हणजे ती तुमपे ची पाटी वाट चुकवण्यासाठी होती तर Happy
चिनी कमचा राजकुमारशी काय संबंध आर्या ?
दोन राकुंचा 'दिल एक मंदिर' असा शिणूमा व्हता पन त्यो कालापांडरा व्हता. म्हन्जे तो स्वप्नाला ठावं नसनार.
स्वप्ना माणसाने जेंडर-बायस्ड असू नये पण जेंडरचा सपश्ट उल्लेख करावा. दोन ठोकळे का एक ठोकळा एक ठोकळी?

>>दोन राकुंचा 'दिल एक मंदिर' असा शिणूमा व्हता पन त्यो कालापांडरा व्हता. म्हन्जे तो स्वप्नाला ठावं नसनार.

मी ह्या शिनुमावर एक पोस्ट टाकली आहे - चित्रपटांच्या कुठल्याश्या बीबीवर. कालापांडरा शिणूमा माहित नसायला मी काही टिनएजर नाहिये. Proud

आणि मी जेन्डर-न्यूट्रल आहे. Happy

स्वप्ना,
जरा सी आहट होती है तो दिल सोचता है
कही ये वो तो नही...

स्वप्नाचा क्लू:
हसते जख्ममधले गाणे-नवीन निश्चल, प्रिया राजवंश हे ठोकळे-राजवंश बाईंचा सिनेमा हकीकत (चिनी आक्रमणावरचा)
हुश्श्श...

हाईला <<<< मी ह्या शिनुमावर एक पोस्ट टाकली आहे - चित्रपटांच्या कुठल्याश्या बीबीवर.>>> हे दिल एक मंदिर बद्दल होते हे लक्षातच आले नाही. मला एकदम पोस्ट म्हटल्यावर तुझं हसते जख्मवरचंच पोस्ट आठवलं. असो, पोस्ट कुठलंही असलं तरी ठोकळा ओळखणं महत्त्वाचं. Proud

श्रध्दा येस्स!
कोडं नं. २०२

'काय रे नाव तुझं?' एका सिनियरने दरडावून विचारलं.
"अं, तुषार मधुकर पेठे" फर्स्ट इयरचा तो विद्यार्थी चाचरत म्हणाला.
"भूतांवर विश्वास आहे?" परत प्रश्न आला.
"अं?"
"अरे अं काय? भूतांवर विश्वास आहे?"
"आहे"
"हे झकास. वस्तीबाहेर एक पडका वाडा आहे. एक मुंडकं नसलेलं धड तिथे फिरतं असं म्हणतात. तुझा विश्वास आहे म्हणजे तुला दिसेलच ते. त्याचा इंटरव्ह्यू घेऊन यायचा आज रात्री. काय?"
"हो" आता मुंडकं नसलेलं धड कसं बोलणार हा प्रश्न मनात असूनही विचारायची त्याची टाप नव्हती.

रात्री १२ ला ठरल्याप्रमाणे तुषार त्या वाड्यात गेला तेव्हा त्याच्या प्रथम दर्शनानेच त्याची दातखीळ बसली. थेट रामसेच्या पिक्चरमधून उचलून ठेवल्यासारखा वाटत होता. धीर करून तो आत गेला. एका कोपर्‍यात अंग चोरून बसला. प्रथम तिथे नीरव शांतता वाटत होती. मग घुबडाचा आवाज येऊ लागला. कुठे पानांची सळसळ. कुठे एखादं जुनं लाकूड करकरायचं. जरा कुठे खुट्ट झालं की भीतीने प्राण कंठाशी यायचे. एखाद्याला अश्यावेळी रामरक्षा नाहीतर हनुमान चालिसा आठवायचं पण तुषारला एक हिंदी गाणं आठवलं आणि तशाही स्थितीत हसू फुटलं. सांगा ते गाणं.

उत्तरः

जरा सी आहट होती है तो दिल सोचता है
कही ये वो तो नही...

क्लू १: .हे गाणं गोल्डन एरातलं आहे. पिक्चरमध्ये २ ठोकळे. हे गाणं एका ठोकळ्याने म्हटलंय.

मला वाटतं ह्या पिक्चरमध्ये धर्मेन्द्रही आहे. तो ठोकळा नं१ आणि गाणारी प्रिरा ठोकळी नं२. मला जेन्डर न्यूट्रल राहणं भाग पडलं कारण ठोकळी म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी लगेच ओळखलं असतं.

क्लू २: चीनी कम है, चीनी कम है

पिक्चरचं नाव हकीकत. भारत-चीन युध्दावर होता.

क्लू ३:
नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणतो ते बरोबर आहे.

कॉलेजकुमारचं नाव उगाच घातलं होतं. 'तुमपे' वगैरे विचार करून तुम्ही भरकटावं म्हणून Happy

स्वप्ना, राजेंद्र कुमार पण आहे या सिनेम्यात. असे ठोकळे असून सिनेमा चांगला आहे म्हणजे दिग्दर्शक किती ताकदीचा होता, हे कळतं. Happy (धर्मेंद्रास ठोकळा म्हटले तर माझी माँ मला घरात घेणार नाही. तो लै हँडसम म्हणून मातेचा आवडता. त्याचा सिन्मा आला की माँ कॉलेज टाकून फस्स डे, फस्स शो मैत्रिणींबरोबर जात असे.)

स्वप्ना, राजेंद्र कुमार पण आहे या सिनेम्यात. असे ठोकळे असून सिनेमा चांगला आहे म्हणजे दिग्दर्शक किती ताकदीचा होता, हे कळतं.>>>>>+१ Happy

स्वप्ना, श्रध्दा __/\__

२०१ चा क्लु
गाणे गोल्डन एरा मधले आहे

क्लु २ हिरो गणपतीला प्रिय आहे

आता आलेच पाहिजे

>>स्वप्ना, राजेंद्र कुमार पण आहे या सिनेम्यात.

अग, तू सिनेमा पाहिला आहेस का? मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला माहित नाही. विकीवर ह्या सिनेमाच्या माहितीत राजेन्दरकुमार असं लिहिलेलं पाहून मला तसंच वाटलं होतं.पण त्या लिंकवर क्लिक केल्यावर तो कोणी wrestler आहे असं दिसतं. IMDB वर ह्या सिनेमाच्या श्रेयनामावलीत राजेंद्र कुमारचं नाव नाहिये. तो होता का ह्यात?

ह्यातल्या 'होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा' ह्या गाण्यात गायक भूपिंदर सैनिकाच्या वेषात दिसतो. बाकी एव्हढं सैन्य न पाठवता नुसतं प्रिरा ला पाठवलं असतं तर चिनी 'दुम दबाके' सैरावैरा पळाले असते Proud

>>क्लु २ हिरो गणपतीला प्रिय आहे

हायला, गणपतीला प्रिय म्हटल्यावर आधी 'देवा हो देवा गणपती देवा' आठवलं पण गोल्डन एरा म्हणजे हे गाणं नाही. बाकी गणपतीला प्रिय दुर्वा आणि मोदक. Sad जपान असलेला माझ्या माहितीतला एकमेव पिक्चर म्हणजे 'लव्ह इन टोकियो'. जॉय मुखर्जीला हिरो म्हणणं जीवावर येतंय पण आशा पारेख हिरॉईन म्हणजे तो हिरोच. तो प्रेक्षकांना प्रिय नव्हता तर बिचार्‍या गणपतीला प्रिय असणं शक्यच नाही. गणपतीचं काय बरं कनेक्शन असावं? ** मोठयाने विचार करणारी बाहुली **

धर्मेंद्र माला सिन्हाच्या आंखे मध्ये पण जपान होता बहुतेक.
मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी या गाण्यात पण.
पण धर्मेंद्र ठोकळा कॅटेगरीत येत नाही. गरजूंनी सत्यकाम आणि चुपके चुपके पहावा.

माधव, उत्तर बरोबर आहे असं वाटतंय. बघू यात निलिमा काय म्हणतात.

>>गरजूंनी सत्यकाम आणि चुपके चुपके पहावा.
हे मात्र बरोबर. मी 'चुपके चुपके' पाहिलाय. वन ऑफ माय ऑलटाईम फेव्हरेट मुव्हिज.

भरत. धर्मेंद्रने जॉनी गद्दार मधे पण मस्त अ‍ॅक्टींग केलीय.
बर्‍याच दिवसांनी आल्यामूळे डोके चालत नाही कि माझे.

ते मामी कुटं गेलं वो ? तिसरंच उघडून सोडा, म्हणजे बीबी वो, म्हण्तो मी.

२०१
भारतीय माणसाशी लग्न केलेली जॅपनीज आई आपल्या द्वाड मुलाला म्हणते अरे तु एवढी मस्ती करतोस दमत कसा नाहीस.
मुलगा म्हणतो मला तर असच एकदम बर आणि शांत वाटतय. तर तो ते आईला कस सांगेल.

उत्तर
आय आय्या करु मै क्या सुकु सुकु

Pages