..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सुकु सुकु म्हणजे जॅपनीज मध्ये शांत शांत

हायला, मी आपला 'सुकुन' वरून 'शांत' असा अर्थ काढला होता Happy

कोडं २०३:

घाबरीघुबरी झालेली ती बाई पोलिस स्टेशनमध्ये घुसली. "इन्स्पेक्टर, प्लीज माझ्या मुलाला शोधा हो"
इन्स्पेक्टर सामंतांनी फाईलमधून डोकं वर काढून पाहिलं.
"मॅडम, शांत व्हा. आधी बसा इथे. हां, आता सांगा"
"इन्स्पेक्टर, मी मिसेस करुणा बाजीराव बनकर. माझा मुलगा दुपारपासून आमच्या घरातून गायब आहे. मी बाजारात गेले होते तेव्हा घरीच होता. परत येऊन बघते तो घराचा दरवाजा सताड उघडा आणि हा कुठेच नाही."
"काय नाव तुमच्या मुलाचं? किती वर्षांचा आहे?" इन्स्पेक्टर सामंतांनी विचारलं.
"शशीकांत बाजीराव बनकर. १० वर्षांचा आहे".
"अहो, बाहेर खेळायला गेला असेल. कोणा मित्राकडे गेला असेल."
"नाही हो, सगळीकडे विचारून झालं. अगदी नातलगांकडे सुध्दा. कुठेच नाहिये. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि शेवटी आले"
"काही भांडण वगैरे?"
"नाही हो, तसं काहीही नाही."
"हं, मॅडम असं बघा. नियमाप्रमाणे ४८ तासात व्यक्ती परत आली नाही तरच आम्हाला हरवल्याची तक्रार दाखल करून घेता येते. पण मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. तुम्ही त्याचा एखादा फोटो आणला असेल तर आमच्याकडे द्या. मी गस्तीवर असलेल्या अधिकार्‍यांकडे देऊन ठेवतो. ते लक्ष ठेवतील. तुम्ही काळजी करू नका. सापडेल तो. तुम्ही रहाता कुठे?"
"अंबर व्हिला, डी.एन. बेझन्ट रोड"
"बरं, तुमचा नंबर देऊन ठेवा. तुमचा मुलगा सापडला तर आम्ही तुम्हाला कळवू. तोवर तो घरी परत आला तर तुम्ही कळवा. ठीक आहे ना?"

बाईने कशीबशी मान हलवली. पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच तिचा फोन वाजला. तिच्या नवर्‍याचा होता.
"काय हे, कधीची फोन करतेय तुम्हाला. उचलत का नव्हतात?" ती खेकसली.
"काय झालंय काय? एव्हढी टेन्स का आहेस?"
गाता येण्यासारखी मनःस्थिती असती तर त्या बाईने कुठलं हिंदी गाणं म्हणून नवर्‍याला परिस्थिती सांगितली असती?

ते मामी कुटं गेलं वो ? तिसरंच उघडून सोडा, म्हणजे बीबी वो, म्हण्तो मी. >>> ख्यँ..ख्यँ..ख्यँ .... Lol
मामी गणेशोत्सवात गळ्यापर्यंत बुडल्यात. >>> एकदम बरोबर वळाखलं. Happy

**********************************

अरे बापरे, मंडळी कुठल्या कुठे पोहोचलीत. चांगलीच 'पोहोचलेले' झालेत सगळे. आता तर मला एकही गाणं ओळखता येणार नाही. Sad

बरं तिसरा भाग काढावा का आता?

स्वप्ना, कबाब आणि शबाब... आता हे क्ल्यु म्हणून घातलय की दिशाभूल करायला?

मला एक गाणं आठवतय पण ते नसेल(च) बहुधा

निकलो ना बेनकाब, जमाना खराब है
और उसपे ये शबाब, जमाना खराब है

निलिमा नाही. Sad

कोडं २०३:

घाबरीघुबरी झालेली ती बाई पोलिस स्टेशनमध्ये घुसली. "इन्स्पेक्टर, प्लीज माझ्या मुलाला शोधा हो"
इन्स्पेक्टर सामंतांनी फाईलमधून डोकं वर काढून पाहिलं.
"मॅडम, शांत व्हा. आधी बसा इथे. हां, आता सांगा"
"इन्स्पेक्टर, मी मिसेस करुणा बाजीराव बनकर. माझा मुलगा दुपारपासून आमच्या घरातून गायब आहे. मी बाजारात गेले होते तेव्हा घरीच होता. परत येऊन बघते तो घराचा दरवाजा सताड उघडा आणि हा कुठेच नाही."
"काय नाव तुमच्या मुलाचं? किती वर्षांचा आहे?" इन्स्पेक्टर सामंतांनी विचारलं.
"शशीकांत बाजीराव बनकर. १० वर्षांचा आहे".
"अहो, बाहेर खेळायला गेला असेल. कोणा मित्राकडे गेला असेल."
"नाही हो, सगळीकडे विचारून झालं. अगदी नातलगांकडे सुध्दा. कुठेच नाहिये. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि शेवटी आले"
"काही भांडण वगैरे?"
"नाही हो, तसं काहीही नाही."
"हं, मॅडम असं बघा. नियमाप्रमाणे ४८ तासात व्यक्ती परत आली नाही तरच आम्हाला हरवल्याची तक्रार दाखल करून घेता येते. पण मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. तुम्ही त्याचा एखादा फोटो आणला असेल तर आमच्याकडे द्या. मी गस्तीवर असलेल्या अधिकार्‍यांकडे देऊन ठेवतो. ते लक्ष ठेवतील. तुम्ही काळजी करू नका. सापडेल तो. तुम्ही रहाता कुठे?"
"अंबर व्हिला, डी.एन. बेझन्ट रोड"
"बरं, तुमचा नंबर देऊन ठेवा. तुमचा मुलगा सापडला तर आम्ही तुम्हाला कळवू. तोवर तो घरी परत आला तर तुम्ही कळवा. ठीक आहे ना?"

बाईने कशीबशी मान हलवली. पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच तिचा फोन वाजला. तिच्या नवर्‍याचा होता.
"काय हे, कधीची फोन करतेय तुम्हाला. उचलत का नव्हतात?" ती खेकसली.
"काय झालंय काय? एव्हढी टेन्स का आहेस?"
गाता येण्यासारखी मनःस्थिती असती तर त्या बाईने कुठलं हिंदी गाणं म्हणून नवर्‍याला परिस्थिती सांगितली असती?

क्लू १: गोल्डन इरातलं गाणं
क्लू २: जाने ये दिन है या रात है

उत्तरः

खोया खोया चांद खुला आसमान
आंखोमे सारी रात जायेगी
तुमको भी कैसे नींद आयेगी

क्लू २: गाण्यात रात्रीचं वर्णन असलं तरी बरंचसं शूटींग दिवसा केल्याचं जाणवतं.

रच्याकने, ही पोस्ट १९६० वी आहे Happy

कोडं क्र. २०४:

मुंडेची प्रेयसी एकदा रागारागाने मुंडेंच्या घरी गेली आणि त्यांच्या बायकोबरोबर तावातावाने भांडू लागली. त्यांना कळेचना कि नक्की झालंय, खुप समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मुंडेची बायको तिला सांगु लागली, "बये, हे आता बाहेर गेलेत ते आल्यावर ये आणि मग काय भांडायचं ते भांड. आता मात्र शांत हो".
पण हे सगळं गाण्यात. ओळखा हे गाणं. Happy

राम, जनमदिनकी बहोत बहोत बधाईया.....सगळे मराठीत शुभेच्छा देताहेत म्हणून ही शुभेच्छा हिंदीतली. Proud लॉन्ग टाईम नो सी. वनवासाला गेलात की काय? ** दिवा घेणे **

कोडे : राम जन्मल्यावर त्या हासपिटलातल्या नर्सबायांनी त्यांचा आनंद कोणत्या गाणे गाऊन व्यक्त केला असेल?
उत्तर : राम जन्मला ग सखी .... राम जन्मलाSSSSSSSSSSS Proud

वाढदिवसाच्या शुभेच्छा, राम!

वनवासाला गेलात की काय? >>>>> स्वप्ना, Lol

सह्ही भरत Happy तुम्हाला जंगी पार्टी...................................... रामकडुन Happy Happy

कोडं क्र. २०४:

मुंडेची प्रेयसी एकदा रागारागाने मुंडेंच्या घरी गेली आणि त्यांच्या बायकोबरोबर तावातावाने भांडू लागली. त्यांना कळेचना कि नक्की झालंय, खुप समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मुंडेची बायको तिला सांगु लागली, "बये, हे आता बाहेर गेलेत ते आल्यावर ये आणि मग काय भांडायचं ते भांड. आता मात्र शांत हो".
पण हे सगळं गाण्यात. ओळखा हे गाणं.

उत्तर: बरखा बैरन जरा थमके बरसो, पी मेरे आ जाए तो चाहे जमके फिर बरसो. Happy

थोडेसे विषयांतर Happy
"बरखा बैरन......" हे गाणं मी आतापर्यंत "लता मंगेशकर" यांनीच गायलंय असं समजत होतो. पण काहि आठवड्यापूर्वी "लोकसत्ता"च्या रविवार पुरवणीत (छूकर मेरे मन को) संगीतकार "उषा खन्ना" यांच्यावरील एका लेखात या गाण्याचा उल्लेख होता. हे गाणं गायलंय गायिका "सुमन कल्याणपूर" यांनी (चित्रपट: सबक) . नेटवर सर्च केल्यावर हे गाण मिळालंच पण "रहे ना रहे हम महका करेंगे..." हे ड्युएट (चित्रपट: ममता, रफी-सुमन कल्याणपूर), आणि "दिल कि किताब कोरी है (चित्रपट: प्यार मेरा, रफी-सुमन कल्याणपूर) हि अजुन काही गाणी (जी लता मंगेशकर यांनी गायली आहे असं माझा समज होता) सापडली Happy

नमस्कार मंडळी !!
रामला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जिप्सी
रहे ना रहे हम
लताच आहे कारण् तिच्या कॅसेट मधे हे आहे आणि महत्वाच म्हणजे तिच्या नावाने निघालेल्या परफ़्युमला ही कॅप्शन् होती.

लताच आहे कारण् तिच्या कॅसेट मधे हे आहे आणि महत्वाच म्हणजे तिच्या नावाने निघालेल्या परफ़्युमला ही कॅप्शन् होती.>>>>गुगु, बरोबर आहे तुमचं, पण या चित्रपटात दोन गाणी होती, एक लताने गायलेलं सोलो आणि सुमन कल्याणपूर/रफी यांच ड्युएट साँग.
युट्युबवर दोन्ही गाणी आहे.

कोडं २०५:

बिग बॉसच्या घरात 'ब्रिन्ग युअर (ओन) स्पाऊस डे' होता. गुलाबो सपेरा आपल्या नवर्‍याची सगळ्यांशी ओळख करून देत होती. सगळेच त्याच्याशी हसून बोलले पण शोनाली नागरानीसमोर तो येताच ती एकदम बिथरली आणि स्वयंपाकघरातला चाकू घेऊन त्याच्या अंगावर धावून गेली. क्षणभर कोणालाच काही कळेना. पण सगळ्यांची मध्यस्थी आणि बिग बॉसने केलेलं आवाहन ह्यामुळे शोनालीने चाकू बाजूला ठेवला. बिग बॉसने तिला असं करण्याचं कारण विचारताच शोनालीने एक हिंदी गाणं म्हणून त्याला उत्तर दिलं. ओळखा ते गाणं.

एकमेव क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही.

२०५:

मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा
मै नागिन तू सपेरा
जनम जनम से तेरा मेरा बैर
ओ रब्बा खैर Proud

नगीना हमार फेवरिट मूवी हय.

माधव, श्रध्दा बरोबर Happy

कोडं २०५:

बिग बॉसच्या घरात 'ब्रिन्ग युअर (ओन) स्पाऊस डे' होता. गुलाबो सपेरा आपल्या नवर्‍याची सगळ्यांशी ओळख करून देत होती. सगळेच त्याच्याशी हसून बोलले पण शोनाली नागरानीसमोर तो येताच ती एकदम बिथरली आणि स्वयंपाकघरातला चाकू घेऊन त्याच्या अंगावर धावून गेली. क्षणभर कोणालाच काही कळेना. पण सगळ्यांची मध्यस्थी आणि बिग बॉसने केलेलं आवाहन ह्यामुळे शोनालीने चाकू बाजूला ठेवला. बिग बॉसने तिला असं करण्याचं कारण विचारताच शोनालीने एक हिंदी गाणं म्हणून त्याला उत्तर दिलं. ओळखा ते गाणं.

एकमेव क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही.

उत्तरः

मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा
मै नागिन तू सपेरा
जनम जनम से तेरा मेरा बैर
ओ रब्बा खैर

>>नगीना हमार फेवरिट मूवी हय

पण त्त्याच्यात ऋषी कपूर हिरो म्हणून कैच्या कै च वाटतो हे आपलं माझं मत Happy आजकल कुछ याद रहता नही हे गाणं पण मला आवडतं.

रच्याकने, न्यूज वाचली ना? जगजित सिंग गेले Sad

२०६ अमीर खान एकदा जुना हिंदी चित्रपट पहात होता. त्यात चंदावरकरांची लीना होती. तिच्यावर चित्रित झालेलं एक गाणं अमीरला भारीच आवडलं. दिवसभर तो तेच गुणगुणत राहिला. पण त्याच्याही नकळत गाण्याचे शब्द आणि चाल बदलले.
कोणती ही दोन गाणी?

कोडं २०७.

हे कदाचित कोणीतरी (किंवा मीच!) पोस्ट केलं असेल आधी. तसं असल्यास क्षमस्व. Happy

'कुणाल, बंद कर बघू हा अगोचरपणा. तुझ्या आईला नाव सांगेन हं ती आल्यावर." सुनिलाबाई नातवावर ओरडल्या.
"काय ग आई, काय केलंय तुझ्या लाडक्या नातवाने?' सुलभाने, कुणालच्या आईने, आत येत आपल्या आईला विचारलं.
'आई, मी सांगतो, मी सांगतो" कुणाल खिदळत म्हणाला.
'काही नको, गप्प बैस. चहाटळ कुठला.' सुनिलाबाईनी दटावलं.
'अग पण तू सांगितलं नाहीस तर कळणार कसं मला?' सुनिलाबाईंचा गोरामोरा चेहेरा पाहून सुलभाला आता जास्तच उत्सुकता वाटत होती.
'मी सांगतो, सक्काळी सक्काळी तुझ्या चिरंजीवांनी गोल्डन इरामधलं एक गाणं ऐकलं आणि तेव्हापासून तुझ्या आईला माझ्यावरून ते गाणं म्हणून चिडवतोय." सुलभाच्या वडिलांनी हसत म्हटलं.
'कुठलं गाणं बाबा?'
सुलभाच्या वडिलांनी ते गाणं म्हटलं तेव्हा 'काहीतरीच तुमचं' म्हणत सुनिलाबाई आत गेल्या आणि सगळे हसायला लागले. ओळखा गाणं

Pages