..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगु, आम्हाला साळकाया म्हाळकाया म्हटल्यानंतर वर माझ्याकडून पार्टीची अपेक्षा करणं म्हणजे हाईट ऑफ ऑप्टिमिझम ठरेल. Proud
रच्याकने, आजारी पड की वविच्या दिवशी!

>>अशी अनेक कॅरेक्टर्स प्रत्यक्षात पहायची उत्सुकता आहे
आम्हा सर्वांना कॅरॅक्टर्स म्हटल्याबद्दल गुगुला १० फटक्यांची शिक्षा फर्मावण्यात येत आहे Happy ती भोगून झाली की त्याने आपल्या पापाचं परिमार्जन करायला (निदान) एक कोडं घातलं पाहिजे.

माधव, बरोब्बर! अचूक उत्तराबद्दल आपणास माहिमी किंवा बदामी हलवा ह्या दोन्हीपैकी एक(च) मिठाई देण्यात येत आहे Proud

कोडं १६३:

एक तरूणी बॅन्क फोडणार्‍या टोळीत सामिल असते. तिचं एका तरुणावर प्रेम बसतं. त्यालाही ती आवडू लागते. आणि हिंदी पिक्चर स्टाईलमध्ये तो नेमका ह्याच गुन्ह्यांचा तपास करणारा पोलिस इन्स्पेक्टर निघतो. पण अर्थात त्याला ह्या दरोड्यांबद्द्ल काही माहित नसतं. तरूणीची टोळी एका शनिवारी ३ बॅन्का लुटते. रविवारी सकाळी तिला त्या इन्स्पेक्टरचा फोन येतो की लंच एकत्र घेऊ या. हिच्या छातीत डबल धडधडायला लागतं - एक तर त्याच्याबरोबर लंच घ्यायचा ह्या हुरहुरीमुळे आणि दुसरं त्याला काही कळलं नसेल ना ह्या भीतीमुळे. तरी 'दिलके हाथो मजबूर' होऊन ती जाते. त्याला काहीच माहित नसतं त्यामुळे लंच यथासांग पार पडतो. पण त्यानंतर दर वेळी त्याने भेटायला बोलावलं की हिची हीच अवस्था होते. तिला कुठलं गाणं आठवेल?

उत्तरः मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आंख चुराये, हमे क्या हो गया है

ह्या दोन्हीपैकी एक(च) मिठाई देण्यात येत आहे >> माझ्या तब्ब्येतीची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. किती pieces अथवा slices मिळणार मला? Happy

कोडं १६४:

श्री. व सौ. नेने अष्टविनायकाच्या यात्रेला गेले. सौ. नेन्यांना गुडघ्याचा त्रास तर श्री. नेन्यांना पाठीचा त्यामुळे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन होतंय की नाही ह्याची दोघांना काळजी. तिथे गेल्यावर त्यांनी चढायला सुरुवात केली खरी पण ५० पायर्‍यानंतर सौ. नेने गुडघे धरून बसल्या. वेदनेने आणि देवाचं दर्शन होणार नाही म्हणून दु:खाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. श्री. नेन्यांनी त्यांची समजूत काढली. 'अग, अश्या कितीश्या पायर्‍या बाकी राहिल्यात? करू की पूर्ण. उठत-बसत झालं तरी करू. आता इथवर आलोय तर तसंच परत जायचं नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. चल बघू.' सौ. नेन्यांना ध्रीर आला. त्या दोघांना वर पोचायला खूप वेळ लागला हे खरंय पण ते पोचलेच. देवाचं डोळे भरून दर्शन घेतल्यावर सौ. नेन्यांनी एक हिंदी गाणं म्हणून श्री. नेन्यांपर्यंत आपल्या भावना पोचवल्या. ओळखा बघू गाणं

क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही. पण नवीनही नाही. गाण्यात पिक्चरचं नाव आहे.

>>किती pieces अथवा slices मिळणार मला?
हव्यात तेव्हढ्या. Happy तब्बेत गेली उडत!

आम्हाला साळकाया म्हाळकाया म्हटल्यानंतर वर माझ्याकडून पार्टीची अपेक्षा करणं म्हणजे हाईट ऑफ ऑप्टिमिझम ठरेल
I am extremely optimistic. मला माणसांची पारख आहे.

आम्हा सर्वांना कॅरॅक्टर्स म्हटल्याबद्दल गुगुला १० फटक्यांची शिक्षा फर्मावण्यात येत आहे
स्वप्ना मागचे १०० आताचे १० एकत्र ११० फटके खाईन पण मामीच्या पार्टीत.

एरवी मी टांग् दिलीही असती पण इथे बिर्ला कॉलेजने बोलावलाय आणि त्यात युनीव्हर्सीटीतल्या फ्रेंच डीपार्टमेंट हेड त्याना म्हणाल्या तुम्ही योग्य माणूस निवडलाय. आता इज्जत का सवाल आहे.
एखाद्या नवीन स्टुडंटला समजावाव तस त्या इंग्लिश डीपार्टमेंट हेडने मला सांगितल वेळेवर याव लागेल, दांडी मारून चालणार नाही... कस ओळखल मला त्यानी

त्यामुळे मामी स्ट्रेचरवरून जाव लागल तरी जावच लागाणार ग!!

सोळा वर्षानी पुन्हा कॉलेजात जातोय अस वाटतय!!!!

>>त्यामुळे मामी स्ट्रेचरवरून जाव लागल तरी जावच लागाणार ग!!
गुगु, आज आणखी भोचकपणा केलास तर खरंच स्ट्रेचरवरून जायची वेळ येईल हं Proud

स्वप्ना, 'यूंही कट जाएगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से' यात 'हम है राही प्यार के चलना अपना काम..' अशी ओळ आहे. Happy

चाललं असतं ग पण वर सांगितल्याप्रमाणे 'कैच्या कै कॅटेगरीतलं कोडं आहे. एका शब्दावर बेतलंय'

भरत, यू आर राईट Happy

कोडं १६४:

श्री. व सौ. नेने अष्टविनायकाच्या यात्रेला गेले. सौ. नेन्यांना गुडघ्याचा त्रास तर श्री. नेन्यांना पाठीचा त्यामुळे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन होतंय की नाही ह्याची दोघांना काळजी. तिथे गेल्यावर त्यांनी चढायला सुरुवात केली खरी पण ५० पायर्‍यानंतर सौ. नेने गुडघे धरून बसल्या. वेदनेने आणि देवाचं दर्शन होणार नाही म्हणून दु:खाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. श्री. नेन्यांनी त्यांची समजूत काढली. 'अग, अश्या कितीश्या पायर्‍या बाकी राहिल्यात? करू की पूर्ण. उठत-बसत झालं तरी करू. आता इथवर आलोय तर तसंच परत जायचं नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. चल बघू.' सौ. नेन्यांना ध्रीर आला. त्या दोघांना वर पोचायला खूप वेळ लागला हे खरंय पण ते पोचलेच. देवाचं डोळे भरून दर्शन घेतल्यावर सौ. नेन्यांनी एक हिंदी गाणं म्हणून श्री. नेन्यांपर्यंत आपल्या भावना पोचवल्या. ओळखा बघू गाणं

क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही. पण नवीनही नाही. गाण्यात पिक्चरचं नाव आहे.

उत्तरःहमें और जीने की चाहत ना होती
अगर तुम न होते अगर तुम न होते

१६५ : स्वप्नाच्या कोड्यावरून सुचलेल कोड
इंदीरा गांधीची भुमिका करायला मिळाणार म्हणून माधुरी भलतीच खुष होती पण इतक्यात तिला कळल की जर ती याच महीन्यात पोचली नाही तर भुमिका परत मनिषा कोईराला कडे जाईल. झाल तिच्या जीवाची घालमेल सुरू झाली. श्रीरामला हिंदी येत नाही म्हणून मराठीतूनच गाऊ लागली की आताच्या आता भारतात घेऊन चल.

वाह आज भरत भलताच फॉर्मात आहे

उत्तर : ने मजसी ने परत मातृभूमीला

येत त्याला मराठी, निदान घरी आम्ही मराठीतूनच बोलतो अस सांगत तरी फिरते ती.

शिवाय त्याच मराठी बालमोहन/ पार्ले टीळक मधुन बाहेर पडून सोफायाज मधे गेलेल्या पोरींसारख असाव, अचानक इंग्रजाळलेल

१६६: य ने सहज म्हणून टाकलेली एक कॉमेंट क्ष ला चांगलीच जाऊन लागली. तो इथे तिथे सांगत फिरू लागला की य कस्ला फाल्तु माणूस आहे.
य मात्र खट्याळपणे एक हिंदी पॅरडी गाणे गाऊ लागला.

खरतर साळकाया म्हाळकाया उर्फ दिनेशदाच्या मैत्रीणी, Happy अशी अनेक कॅरेक्टर्स प्रत्यक्षात पहायची उत्सुकता आहे.>>>>>मलापण पहायची उत्सुकता आहे. Proud

का रे!!! आज ऑफिस मधे काम करायला लागतय का?>>>>गुणेश तुच माझा खरा मित्र. Happy
दोन दिवस चिक्कार काम आहे. Sad

अजिबात नाही. सिच्युएशन महत्वाची. नुकतीच मायबोलीवर घडलेली सत्यघटना आहे म्हणून क्ष आणि य नाव इतकच
क्लु जरूरी आहे, हे गाण माधुरी दिक्षीतच आहे.

गुणेश, मला बघायचय का ? ये इथे आफ्रिकेत !
खरं तर मला इथल्या प्रत्येक सभासदाला (आणि असल्यास त्याच्या डु आय ला ) भेटायचे आहे !!!

मी आलोय रे!!!!!
मीच सांगतो उत्तर
१६६: य ने सहज म्हणून टाकलेली एक कॉमेंट क्ष ला चांगलीच जाऊन लागली. तो इथे तिथे सांगत फिरू लागला की य कस्ला फाल्तु माणूस आहे.
य मात्र खट्याळपणे एक हिंदी पॅरडी गाणे गाऊ लागला.

उत्तर : आग लग रही है धुआं सा उठता है
कोई नही जाने दिल किसका जलता है
माधुरी अनिलच जमाईराजा मधल गाण आहे

Pages