..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या लेखातलं "अभिनय म्हणजे मीनाकुमारी आणि सौंदर्य म्हणजे मधुबाला असं एक समीकरण वर्षांनुवर्षें रसिकांच्या मनात घर करून बसलंय. हा मीनाकुमारीच्या सौंदर्याचा व मधुबालाच्या अभिनयाचा अवमान आहे." हे अगदी माझ्या मनातलं आहे.

बरोबर भरत Happy तुम्हाला हायवे ऑन माय प्लेटमध्ये काल दाखवलेल्या झारखंडच्या हॉटेलातला ३०० ग्रॅमचा सत्तूचा पराठा (४० ग्रॅम घी मारके) विथ भोपळा, बटाटा रसभाजी. आणि ५० खुसखुशीत खाजे!

कोडं १५१:
सिंडरेला राजपुत्रासोबत नाचत असली तरी तिचं घड्याळाकडे लक्ष असतं. तिच्या दुर्देवाने ते घड्याळ ५ मिनिटं मागे असतं. त्यामुळे त्यात १२ चे ठोके पडायच्या आतच तिच्या आलिशान रथाचा परत भोपळा होतो आणि तिच्या भरजरी कपड्यांची चिरगुटं होतात. आता राजपुत्राला काय तोंड दाखवायचं? तरी तिथून निघून जाण्यापूर्वी त्याची माफी मागावी म्हणून ती त्याच्याकडे वळते तो काय? राजपुत्राचा चक्क बेडूक झालेला असतो. दोघे जण हसायला लागतात. अश्या वेळी ती राजपुत्राला उद्देशून काय गाणं म्हणेल?

उत्तरःवक्तने किया क्या हंसी सितम
तुम रहें न तुम हम रहें न हम

स्वप्ना धन्यवाद, तेवढं सगळं माझ्या एकट्याच्याने नाही संपायचं, तेव्हा सगळ्या हजर मंडळींनी या ताव मारायला.तो एपिसोड माझ्या दृष्टीस पडला होता काल.
खाजा म्हटल्यावर मी मालवणी खाजा की सुरती ते बघायला सरसावून बसलो. तर बिहारी. त्या दुकानदारानी सांगितलं एवढ्या वजनात किमान एवढे खाजे असले की तो सर्वोतम..

तुमने पुकारा और हम चले आए Happy मी पण हजर Happy
आज सक्काळी सक्काळी किशोर कुमारचे "इक रूतु आए इक रूतु जाए" हे मस्त गाणं ऐकलं. Happy (चित्रपट: गौतम गोविंदा)

कोणी आहे का आज? काही कोडी योजून ठेवली आहेत. कोणी असेल तर घालेन म्हणते >>>>>"छुप गया कोई रे दूर से पुकार के...... Sad Happy

स्वप्ना, दे ना कोडी.

सॉरी लोक्स, मध्ये एक इंटरव्ह्यू होता. त्यामुळे जावं लागलं. तर आता कोडी.....सगळी सोप्पी आहेत...:-)

कोडं १५२:
हॉस्टेलवर आल्या आल्या अमोलने सगळी खोली नीट लावून टाकली. एकदा कॉलेज सुरु झालं की श्वास घ्यायलापण फ़ुरसत मिळणार नव्हती. मेसमध्ये जेवून येऊन तो परत खोलीवर आला. पुस्तक वाचता वाचताच त्याचे डोळे मिटायला लागले. सकाळी लवकर उठायचं म्हणून तो दिवा बंद करून झोपला. अर्धाएक तास झाला असेल नसेल कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. बघतो तर खिडकी बंद. झोपायच्या आधी ती उघडल्याचं त्याला आठवत होतं. वार्‍याने बंद झाली असेल असं म्हणत ती उघडून तो परत झोपी गेला. थोड्या वेळाने त्याला जाग आली ती कोणाच्या तरी बोलण्याने. कानोसा घेतला तर सगळीकडे सामसूम. शेजारच्या खोलीतल्या मुलांशी सकाळी ह्याबद्दल बोलायंचच असं त्याने ठरवलं. उगाच वर्षभर कटकट नको. मग मात्र त्याला शांत झोप लागली ती पहाटेपर्यंत. पहाटे पहाटे एकदम खुर्ची सरकवण्याचा आवाज आला. खडबडून जागं होत अमोल उठला तेव्हा टेबलाजवळची खुर्ची सरकली होती, टेबललॅम्प लागला होता आणि टेबलावर त्याचं पुस्तक पालथं होतं. अमोल हबकलाच.

हॉस्टेलच्या अ‍ॅडमिनचं ऑफ़िस उघडताच तो आत गेला. रात्रीची सगळी घटना सांगून तो म्हणाला "सर, आहे काय ही भानगड?". हॉस्टेलचा इन-चार्ज त्याला काय म्हणाला असेल?

तू दे तू दे चालू दे तुमच
मीच देतो

१५३ किर्र अंधारी रात्र पाऊस आणि तिचा आलाप चालू आहे.

या मराठी चित्रपटातल्या नयिकेन फक्त रडून थिएटर भिजवलय अश्यात-हेने शिवीगाळ करणारी भुमिका तिला एकच मिळालेली असावी

जिप्सी नाही. गुगु, नायिका बहुधा अलका कुबल असावी. पण मराठी गाणी म्हणजे आपली बिनशर्त माघार. Sad

अक्षरी रॉक्स Happy आत्ता इथे पाऊस पडतोय. त्यामुळे तुला २ प्लेट कांद्याची खमंग कुरकुरीत भजी आणि आलं घातलेला चहा थर्मासभरून!


कोडं १५२:

हॉस्टेलवर आल्या आल्या अमोलने सगळी खोली नीट लावून टाकली. एकदा कॉलेज सुरु झालं की श्वास घ्यायलापण फ़ुरसत मिळणार नव्हती. मेसमध्ये जेवून येऊन तो परत खोलीवर आला. पुस्तक वाचता वाचताच त्याचे डोळे मिटायला लागले. सकाळी लवकर उठायचं म्हणून तो दिवा बंद करून झोपला. अर्धाएक तास झाला असेल नसेल कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. बघतो तर खिडकी बंद. झोपायच्या आधी ती उघडल्याचं त्याला आठवत होतं. वार्‍याने बंद झाली असेल असं म्हणत ती उघडून तो परत झोपी गेला. थोड्या वेळाने त्याला जाग आली ती कोणाच्या तरी बोलण्याने. कानोसा घेतला तर सगळीकडे सामसूम. शेजारच्या खोलीतल्या मुलांशी सकाळी ह्याबद्दल बोलायंचच असं त्याने ठरवलं. उगाच वर्षभर कटकट नको. मग मात्र त्याला शांत झोप लागली ती पहाटेपर्यंत. पहाटे पहाटे एकदम खुर्ची सरकवण्याचा आवाज आला. खडबडून जागं होत अमोल उठला तेव्हा टेबलाजवळची खुर्ची सरकली होती, टेबललॅम्प लागला होता आणि टेबलावर त्याचं पुस्तक पालथं होतं. अमोल हबकलाच.

हॉस्टेलच्या अ‍ॅडमिनचं ऑफ़िस उघडताच तो आत गेला. रात्रीची सगळी घटना सांगून तो म्हणाला "सर, आहे काय ही भानगड?". हॉस्टेलचा इन-चार्ज त्याला काय म्हणाला असेल?

उत्तरः
आपके कमरे में कोई रहता है,
मैं नहीं कहता जमाना कहता हैं..

आरडीला बिलेटेड हॅपी बर्थडे Happy

कोडं १५४:

तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरची ती काजोलची Alpenliebeची जाहिरात पाहिली असणारच. त्याचं शूटींग चालू असताना काजोलला त्या सुसरीचा खूप लळा लागला. शूटींग संपताच आपल्या ’ह्यां’ना सांगून तिने त्या सुसरीची आपल्या बंगल्यात रहायची तजवीज करून घेतली. सकाळी उठल्या उठल्या ती आधी त्या सुसरीला बघायला जायची. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केल्यावरच स्वत: ब्रेकफ़ास्ट घ्याय्ची. तीच गोष्ट लंच आणि डिनरची. ती सुसर त्यांच्या घरातली एक सदस्य झाली होती.

पण कसा कोणास ठाऊक ’पेटा’ला ह्या प्रकाराचा सुगावा लागला. त्याचे सदस्य सुसरीचा ताबा घेऊन तिला प्राणीसंग्रहालयात घेऊन जायला आले. पण सुसर जाता जाईना. इथे काजोल रडतेय आणि तिथे सुसर नक्राश्रू ढाळतेय असा हिंदी पिक्चरलाही लाजवेल असा इमोशनल सीन सुरु झाला. काजोलने तर सुसरीला उद्देशून गाणंच म्हणायला सुरुवात केली. काय असेल ते गाणं?

नाही अक्षरी Sad

१५३: काजळ रातीनं ओढून नेला? मी हा पिक्चर पाहिला नसल्याने हे गाणं आशा काळेवर चित्रित आहे की नाही किंव ह्या चित्रपटात ती शिवीगाळ करते का वगैरे माहित नाहिये Sad

स्वप्ना : १५३ काजल रातीनं - पिक्चर आशा काळेचं(ह खेळ सावल्यांचा) पण गाणं संजीवनी बिडकरवर चित्रित झालेलं

भरत, धन्स Happy हा पिक्चर अजूनही कधी टीव्हीवर दाखवला तर पहायला आवडेल मला. पण सगळ्या मराठी चॅनेल्स्वर एक तर अतिगंभीर पिक्चर तरी दाखवतात नाहीतर अतिपाचकळ Sad

अक्षरी Happy

स्वप्ना
तुला भरपूर स्विस चॉकलेटस देणार होतो पण तुझ्या मित्राच्या सांगण्यानुसार तुला एक आमिर खान

१५३ किर्र अंधारी रात्र पाऊस आणि तिचा आलाप चालू आहे.
उत्तर : काजळ रात्रीन ओढुन नेला

भरत म्हणतो ते बरोबर आहे हे गाण संजीवनी बिडकरवर् चित्रीत झालय.
आशा काळेला अशात-हेची भुमिका करायला किंबहुना मराठीत नायिकेसाठी अशी भुमिका अजुन नाही झाली.
जोडीला तांबारलेल्या डोळ्यांचा आणि झिंगलेल्या आवाजाचा काशिनाथ घाणेकर. पण अभिनय मात्र अप्रतिम. प्रत्येक कॅरेक्टर मस्त रंगलाय.

.

गुगु, मला वाटलंच नाही ते उत्तर बरोबर असेल म्हणून. पण आमिर खानपेक्षा मला स्विस चॉकलेटस जास्त आवडतील. तीच दे Happy तसेही हिंदी पिक्चरमध्ये चिकने हिरो जास्त नाहीत. तुम्हा लोकांना ठीक आहे, ढीगाने छान दिसणार्‍या हिरविनी आहेत. पण उद्या मला कोणीतरी भाभु, राकु (राजकुमार, राजेन्द्रकुमार, राज कपूर) नाहीतर दिकु देतील ह्या भीतीने मी कोडयाचं उत्तर द्यायचा प्रयत्नही करणार नाही. Proud

रच्याकने, ते 'आलाप' च्या ऐवजी 'विलाप' असं हवंय का? 'विलाप' म्हणजे शोक.

>>तिनदा एकच पोस्ट गेली तर काय करायच
मला तरी . देणं हा एकच पर्याय माहित आहे. Sad

स्वप्ना
विलाप ओळखायला सोपा पण तू आलाप शब्दावरही ओळखस.

पाहीला नसलास तर आ चित्रपट नक्की पहा.

भरतनाट्यम डान्सर असूनही संपुर्ण कारकिर्दीत आशा काळे फक्त दोनच चित्रपटात नाचली एकदा या चित्रपटात गोमु संगतीन... आणि साधी भोळी मीरा..

Pages