..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं १५७:

मंजीतने ठरवलं होतं की कविताला आज सगळं सांगायचंच. पण प्रत्यक्ष सांगायची त्याची हिंमत नव्हती. शेवटी त्याने एक लांबलचक प्रेमपत्र लिहिलं. तिला प्रत्यक्षच ते द्यावं म्हणून तो घरातून बाहेर पडला तर समोर बिल्डिंगचा वॉचमन मिश्रा घामाघूम होऊन उभा. "जल्दी निकलो साब,१५ माले पर आग लगी है. फ़ायर ब्रिगेडवाले आतेही होंगे. उन्होने सारी बिल्डींग खाली करनेको बोला है. लिफ़्ट बंद है साब, सिडियोंसे निकलके जाना". मंजीत काही विचारेपर्यंत तो पुढच्या फ़्लॅटकडे धावला. मेलो! आता बारा मजले उतरून जाईतो जीव अर्धा जाणार असं म्हणत मंजीतने स्टेअरवेलकडे जाणारा दरवाजा उघडला. तिथे एकच गर्दी उसळली होती. पत्र घाईघाईने खिश्यात कोंबून तोही घुसला.

धक्के खात तळमजल्याला जाईतो त्याचा जीव खरोखर अर्धमेला झाला होता. मग आग पसरत पसरत आपल्या घरापर्यंत येणार नाही ना ह्या काळजीने त्याला ग्रासलं. दीड-दोन तासांनी जेव्हा फ़ायर ब्रिगेडवाल्यांनी ऑलक्लिअर दिला तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला आणि कविताच्या प्रेमपत्राची आठवण झाली. पण खिश्यात हात घालतो तर काय? पत्र गायब. मंजीत हवालदिल झाला. एक तर एव्हढ्या मुश्किलीने लिहिलेलं पत्र, परत लिहिता येईल की नाही ही शंका. दुसरी काळजीची बाब म्हणजे ते कोणा तिसर्‍याच्या हाती लागलं तर?

एव्हाना लिफ़्ट चालू झाली होती आणि लोक आपआपल्या घरांकडे परतत होते. पण मंजीतला परत स्टेअरवेलने वर जाण्याखेरीज पर्याय नव्हता. तिथेच कुठेतरी पत्र पडलं असणार ह्याची त्याला खात्री होती. कविताचा विचार करत स्टेअरवेल चढताना तो स्वत:शी कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर: लेकर हम दिवाना दिल, फिरते है मंझील मंझील

कोडे क्रमांक १५८

प्रिया पहिलटकरीण. उसगावात होती. जवळ कोणी मोठे माणूस नाही. बाळाचे करता करता तिचा जीव मेटाकुटीस यायचा. (सल्लुमिया आवडता म्हणून बाळाचे नाव प्रेम ठेवले होते.) शिवाय रात्री तिचे बाळ दचकून उठायचे. किंचाळत रडायचे. काय करावे ते तिला सूचन नसे. तर ती कुठले गाणे म्हणेल ?

क्लू-- गाण्याच्या पहिल्या चार ओळी फिट्ट आहेत.

|| सुप्रभात लोक्स ||

कोडं १५६:

रीमा एकदा समुद्रकिनारी फिरत असताना तिला एक जुनापुराणा दिवा दिसतो. तो दिवा ती घरी घेऊन येते. त्याला साफ करताना अचानक धूर येऊन त्यातुन एक दैत्य प्रगटतो आणि विचारतो "क्या हुक्म है मेरे आका?". अल्लाउद्दीन सारखा जादुई दिवा मिळाल्याने ती खुप खुष होते. ती आपली नेहमीची कामे त्याच्याकडुन करून घेऊ लागते. तीची सगळी कामे त्याच्यावरच अवलंबुन असतात. काहि महिन्यानंतर ती त्याच्या प्रेमातच पडते आणि त्याला लग्नाची मागणी घालते. पण तो मात्र हे शक्य नाही असं सांगुन कायमचा तिला सोडुन निघुन जातो. तेंव्हा ती दु:खाने कोणते गाणे म्हणेल?

उत्तर :
हम थे जिनके सहारे, वो हुए ना हमारे Proud

१५९ एके दिवशी माधवनी काहीतरी मोठ्ठाच घोळ घातला. अर्थातच त्यांच्या पत्नीला खूप राग आला. अगदी नवर्‍याची अक्कल बिक्कल काढावी इतका. पण माधवची हिंदी चित्रपटगीतांची आवड तिच्यातही मुरलेली. तिने गाणे म्हणूनच त्यांची खरडपट्टी काढली. कशी?

फार फार सोप्प आहे.

१५८ चा क्लू, कोड्यातला एक शब्द, फसवा आहे. पण तरीही गाण्यात तो आहेच. चार ओळी फीट्ट.
जिप्स्या मेल केलीय.

कोडे क्रमांक १५८

प्रिया पहिलटकरीण. उसगावात होती. जवळ कोणी मोठे माणूस नाही. बाळाचे करता करता तिचा जीव मेटाकुटीस यायचा. (सल्लुमिया आवडता म्हणून बाळाचे नाव प्रेम ठेवले होते.) शिवाय रात्री तिचे बाळ दचकून उठायचे. किंचाळत रडायचे. काय करावे ते तिला सूचन नसे. तर ती कुठले गाणे म्हणेल ?

उत्तर :-

नींद ना मुझको आये,
दिल मेरा घबराये
चुपके चुपके कोई आके
सोया प्यार जगाये ..

.

.

१५९
१)कोड्यातले २ शब्द गाण्यात आहेत.
२)गायिका आशा संगीत आर डी
३) नायिकेवर इथे चर्चा झालीय. नायक दुसर्‍या एका चित्रपटात तिच्या भोवती फिरणारा तिचा भोवरा.
४) चित्रपटात नायकाचा डबल रोल असल्याचं नाटक आहे.

>>नायिकेवर इथे चर्चा झालीय. नायक दुसर्‍या एका चित्रपटात तिच्या भोवती फिरणारा तिचा भोवरा.

नायिका लीना चंदावरकर असू शकते. भोवरा मनचलीमधला 'संजीवकुमार' असू शकतो. पण दोघांचा त्याव्यतिरिक्त पिक्चर 'अनहोनी'. त्यातली मला माहित असलेली गाणी ह्या सिच्युएशनला बसत नाहीत Sad आणि त्यात त्याचा डबल रोल आहे की नाही मला माहित नाही.आणखी एखादा पिक्चर असेल तर माहित नाही बुवा Sad

अर्थात ह्या क्लूजची उत्तरं वेगळीच असू शकतील. Proud

भरत, माझी लोकल रूळांवर पाणी भरल्याने अडकलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकलसारखी ट्रॅकवरच अडकली आहे Happy माझ्या तुटपुंज्या ज्ञानावर ह्यापेक्षा पुढे जाता येणार नाहिये.

१५९ एके दिवशी माधवनी काहीतरी मोठ्ठाच घोळ घातला. अर्थातच त्यांच्या पत्नीला खूप राग आला. अगदी नवर्‍याची अक्कल बिक्कल काढावी इतका. पण माधवची हिंदी चित्रपटगीतांची आवड तिच्यातही मुरलेली. तिने गाणे म्हणूनच त्यांची खरडपट्टी काढली. कशी?

उत्तर : अरे कैसे मिट्टी के माधो से पाला पडा
सोचे न समझे ऐसा अकल पे ताला पडा

चित्रपट :ईमान
संजीवकुमार लीना चंदावरकर

160 "तुला कवा धरन शोदतुया, तु फकस्त माझी हाsssय!!! पन तु कुट हाय????" रॉबर्ट
"मुडद्या अजुन जमेना माजी मातुरभासा, जाऊं दे तुज्यासाटन हिंदी गाना बोलते" प्रियांका

तर मुलांनो सांगा पाहू हे गाण कोणत?

भरत, अरेरे, हा पिक्चर माहित नव्हता मला. Sad

>>"तुला कवा धरन शोदतुया, तु फकस्त माझी हाsssय!!! पन तु कुट हाय????" रॉबर्ट

ह्याला 'जानेजा ढूंढता फिर रहा" हे बर्यापैकी बसतंय. पण प्रियांकाच्या ओळी जुळत नाहीत. बघते विचार करून.

कोडं १६१:
मनिषच्या आवडत्या गायकाचा शास्त्रीय संगीताच्या गाण्याचा प्रोग्रॅम कित्येक वर्षांनी त्याच्या शहरात होत होता. पण त्याच्या बायकोला अजिबात आवड नाही 'काय ते आआ ऊउ ऐकायचं' असं तिचं शास्त्रीय संगीताबद्दलचं मत. मनिषचे २-३ मित्र प्रोग्रॅमला जाणार होते त्यामुळे कंपनी होती पण नेमका दुसर्‍या दिवशी त्याच्या बायकोचा वाढदिवस आणि प्रोग्रॅम पहाटेपर्यंत चालणार होता. पण बायकोने उदार मनाने परवानगी दिली म्हणून मनिष मित्रांबरोबर प्रोग्रॅमला गेला. मैफिल चांगलीच रंगली होती. मनिष गाणं ऐकण्यात एव्हढा दंग झाला होता की त्याला १२ वाजता बायकोला विश करायची आठवणच झाली नाही. लक्षात आलं तेव्हा १ वाजला होता. थिएटरच्या थंडीतसुध्दा त्याला घाम फुटला. धावत धावत बाहेर येऊन त्याने तिला फोन लावला. अहो आश्चर्यम! ती अजिबात रागवली नव्हती. उलट तिनेच गमतीने त्याला एक गाणं ऐकवलं. ओळखा गाणं.

क्लू - गाण्याची पहिली ओळ परफेक्ट बसते.

Pages