..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि किती भयंकर आहेत दोन्ही नाच. गोमु संगतीनं मध्ये राकुला लाजवणारा डॉ घाणेकरांचा डान्स.
अरे मनमोहना बघताना स्टेज तुटून पडेल का अशी भीती वाटत राहते.

>>भरतनाट्यम डान्सर असूनही संपुर्ण कारकिर्दीत आशा काळे फक्त दोनच चित्रपटात नाचली

ही नवीच माहिती.

>>गोमु संगतीनं मध्ये राकुला लाजवणारा डॉ घाणेकरांचा डान्स
Proud मग तर बघायलाच हवा.

<<आणि किती भयंकर आहेत दोन्ही नाच. गोमु संगतीनं मध्ये राकुला लाजवणारा डॉ घाणेकरांचा डान्स.
अरे मनमोहना बघताना स्टेज तुटून पडेल का अशी भीती वाटत राहते.<<
अगदी अगदी... Lol

ए तूम्ही लोकं चक्क जून्या गाण्यांकडे वळलाय !! गाणी जूनी अर्थ नवा !!!
मजा येतेय.
या स्वप्नाला कुमार गौरव पण द्या रे. चॉकलेटं हवीत ना ?

पडछाया, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, हर्‍या नार्‍या जिंदाबाद हे पण मराठीतले चांगले सस्पेन्स थ्रिलर्स होते.

अक्षरी, मी_आर्या - तुमची गल्ली बरोबर होती पण घर चुकलं. Sad

कोडं १५४:

तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरची ती काजोलची Alpenliebeची जाहिरात पाहिली असणारच. त्याचं शूटींग चालू असताना काजोलला त्या सुसरीचा खूप लळा लागला. शूटींग संपताच आपल्या ’ह्यां’ना सांगून तिने त्या सुसरीची आपल्या बंगल्यात रहायची तजवीज करून घेतली. सकाळी उठल्या उठल्या ती आधी त्या सुसरीला बघायला जायची. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केल्यावरच स्वत: ब्रेकफ़ास्ट घ्याय्ची. तीच गोष्ट लंच आणि डिनरची. ती सुसर त्यांच्या घरातली एक सदस्य झाली होती.

पण कसा कोणास ठाऊक ’पेटा’ला ह्या प्रकाराचा सुगावा लागला. त्याचे सदस्य सुसरीचा ताबा घेऊन तिला प्राणीसंग्रहालयात घेऊन जायला आले. पण सुसर जाता जाईना. इथे काजोल रडतेय आणि तिथे सुसर नक्राश्रू ढाळतेय असा हिंदी पिक्चरलाही लाजवेल असा इमोशनल सीन सुरु झाला. काजोलने तर सुसरीला उद्देशून गाणंच म्हणायला सुरुवात केली. काय असेल ते गाणं?

उत्तर: हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना

का गरिबाच्या जीवावर उठलाय? स्वप्ना अगदी हेच लिहायल आलेलो.

दिनेशदा
पाठलाग विसरलास
मराठी हॉरर/ सस्पेन्स थ्रिलर चित्रपट फारसे झालेच नाहीत.
अशीच एक रात्र होती नावाचा जयश्री गडकरचा चित्रपट होता त्यात ती भुत होती का नाही ते मला कळल नाही. थोडासाच पाहीलेला.

असच एकदा काल रात्री बारा वाजता नावाच्या चित्रपटाची क्लिपिंग्ज पहाण्यात आली दुरदर्शनवर आणि फार उत्सुकता होती तो पहाण्याची. आणि पाहीला झीवर ...... संतापलेला बाहुला

कोडं १५५:

सकाळी सकाळी लॅपटॉपने राम म्हटल्याने सुमीत वैतागला. त्यातून आज एक महत्त्वाचं डॉक्युमेन्ट बनवायचं होतं. त्याने त्वरित सिस्टीम अ‍ॅडमिन डिपार्टमेन्टकडे धाव घेतली. बघतो तर काय? त्याच्यासारखेच अनेक लोक तिथे आले होते. नुस्ता गोंधळ उडाला होता.

त्याने फायनॅन्समधल्या अमितला विचारलं "काय झालं रे?".

"अरे यार, विचारू नकोस. कुठलातरी नवा व्हायरस आलाय नेटवर्कमधून. सगळी विन्डोजवाली मशिन्स बंद पडली आहेत. साले लायनक्सवाले कधी नव्हे ते हसताहेत बघून. अर्ध्या तासापासून थांबलोय मीच. आधी सगळ्या CXO लेव्हलवाल्यांची मशिन्स ठीक होतील म्हणे. त्यांना काय डोंबलाचं काम असतंय? पण अमिरोंका खून खून, गरिबोंका खून पानी". अमितने वाफ काढली.

सुमीत थांबला नाही. गर्दीतून वाट काढत मिहिरच्या केबिनकडे गेला. मिहिर त्याचा मित्र होता. निदान त्याच्याकडे वशिला लावून आपला लॅपटॉप आधी ठीक होतो का बघावं. मिहिरच्या केबिनचा दरवाजा वाजवूनही काही प्रतिसाद येईना तेव्हा त्याने ढकलला. आत मिहिर २-३ लॅपटॉप्स समोर घेऊन खाटखूट करत बसला होता आणि एक गाणं गुणगुणत होता. सांगा पाहू ते गाणं.

हा खेळ सावल्यांचा आणि बाळा गाउ कशी अंगाई दोन्ही दिसले तर सह्याद्रीवर दिसतील.
गेले दोन्ही रविवार स्टारच्या कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर खिचडी द मुव्ही होता. मामी आणि मंडळी हा पिक्चर बघाच. कोड्यांसाठी आयडियाज मिळतील.

स्वप्ना 'हमे तुमसे प्यार कितना' चं हे दुसरं व्हर्जन. पहिल्या भागाच्या सुरवातीला मी एक व्हर्जन विचारलं होतं. Happy

मामी, मला वाटलं खरं ते गाणं कुठेतरी वाचल्यासारखं पण सगळ्या पोस्टी परत पाहणं अशक्य.
दिनेशदा Happy

अक्षरी, तुला पाहिजे ती मिठाई Happy

कोडं १५५:

सकाळी सकाळी लॅपटॉपने राम म्हटल्याने सुमीत वैतागला. त्यातून आज एक महत्त्वाचं डॉक्युमेन्ट बनवायचं होतं. त्याने त्वरित सिस्टीम अ‍ॅडमिन डिपार्टमेन्टकडे धाव घेतली. बघतो तर काय? त्याच्यासारखेच अनेक लोक तिथे आले होते. नुस्ता गोंधळ उडाला होता.

त्याने फायनॅन्समधल्या अमितला विचारलं "काय झालं रे?".

"अरे यार, विचारू नकोस. कुठलातरी नवा व्हायरस आलाय नेटवर्कमधून. सगळी विन्डोजवाली मशिन्स बंद पडली आहेत. साले लायनक्सवाले कधी नव्हे ते हसताहेत बघून. अर्ध्या तासापासून थांबलोय मीच. आधी सगळ्या CXO लेव्हलवाल्यांची मशिन्स ठीक होतील म्हणे. त्यांना काय डोंबलाचं काम असतंय? पण अमिरोंका खून खून, गरिबोंका खून पानी". अमितने वाफ काढली.

सुमीत थांबला नाही. गर्दीतून वाट काढत मिहिरच्या केबिनकडे गेला. मिहिर त्याचा मित्र होता. निदान त्याच्याकडे वशिला लावून आपला लॅपटॉप आधी ठीक होतो का बघावं. मिहिरच्या केबिनचा दरवाजा वाजवूनही काही प्रतिसाद येईना तेव्हा त्याने ढकलला. आत मिहिर २-३ लॅपटॉप्स समोर घेऊन खाटखूट करत बसला होता आणि एक गाणं गुणगुणत होता. सांगा पाहू ते गाणं.

उत्तरः मेरी दुष्मन है ये, मेरी उलझन है ये
बडा तरसाती है, दिल तडपाती है
ये खिडकी जो बंद रहती है.

ये खिडकी जो बंद रहती है>>>>>हे रफीचं गाणं आहे ना? "मै तुलसी तेरे आंगन कि" मधलं. मस्त गाण. Happy

कोडं १५६:

रीमा एकदा समुद्रकिनारी फिरत असताना तिला एक जुनापुराणा दिवा दिसतो. तो दिवा ती घरी घेऊन येते. त्याला साफ करताना अचानक धूर येऊन त्यातुन एक दैत्य प्रगटतो आणि विचारतो "क्या हुक्म है मेरे आका?". अल्लाउद्दीन सारखा जादुई दिवा मिळाल्याने ती खुप खुष होते. ती आपली नेहमीची कामे त्याच्याकडुन करून घेऊ लागते. तीची सगळी कामे त्याच्यावरच अवलंबुन असतात. काहि महिन्यानंतर ती त्याच्या प्रेमातच पडते आणि त्याला लग्नाची मागणी घालते. पण तो मात्र हे शक्य नाही असं सांगुन कायमचा तिला सोडुन निघुन जातो. तेंव्हा ती दु:खाने कोणते गाणे म्हणेल?

कोडं १५७:

मंजीतने ठरवलं होतं की कविताला आज सगळं सांगायचंच. पण प्रत्यक्ष सांगायची त्याची हिंमत नव्हती. शेवटी त्याने एक लांबलचक प्रेमपत्र लिहिलं. तिला प्रत्यक्षच ते द्यावं म्हणून तो घरातून बाहेर पडला तर समोर बिल्डिंगचा वॉचमन मिश्रा घामाघूम होऊन उभा. "जल्दी निकलो साब,१५ माले पर आग लगी है. फ़ायर ब्रिगेडवाले आतेही होंगे. उन्होने सारी बिल्डींग खाली करनेको बोला है. लिफ़्ट बंद है साब, सिडियोंसे निकलके जाना". मंजीत काही विचारेपर्यंत तो पुढच्या फ़्लॅटकडे धावला. मेलो! आता बारा मजले उतरून जाईतो जीव अर्धा जाणार असं म्हणत मंजीतने स्टेअरवेलकडे जाणारा दरवाजा उघडला. तिथे एकच गर्दी उसळली होती. पत्र घाईघाईने खिश्यात कोंबून तोही घुसला.

धक्के खात तळमजल्याला जाईतो त्याचा जीव खरोखर अर्धमेला झाला होता. मग आग पसरत पसरत आपल्या घरापर्यंत येणार नाही ना ह्या काळजीने त्याला ग्रासलं. दीड-दोन तासांनी जेव्हा फ़ायर ब्रिगेडवाल्यांनी ऑलक्लिअर दिला तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला आणि कविताच्या प्रेमपत्राची आठवण झाली. पण खिश्यात हात घालतो तर काय? पत्र गायब. मंजीत हवालदिल झाला. एक तर एव्हढ्या मुश्किलीने लिहिलेलं पत्र, परत लिहिता येईल की नाही ही शंका. दुसरी काळजीची बाब म्हणजे ते कोणा तिसर्‍याच्या हाती लागलं तर?

एव्हाना लिफ़्ट चालू झाली होती आणि लोक आपआपल्या घरांकडे परतत होते. पण मंजीतला परत स्टेअरवेलने वर जाण्याखेरीज पर्याय नव्हता. तिथेच कुठेतरी पत्र पडलं असणार ह्याची त्याला खात्री होती. कविताचा विचार करत स्टेअरवेल चढताना तो स्वत:शी कोणतं गाणं म्हणेल?

मै कही कवी ना बन जाऊ ते रे प्यार मे ए कविता

हे आपल उगाचच देतोय बंद लिफ्टचा संदर्भ आहे म्हणून

ए गुगु, नाही रे. मंजीत त्या बंद पडलेल्या लिफ्टच्या बाहेर आहे, आत नाही. सिच्युएशन वाच बघू परत.

Pages