..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरी नाही ग.....:-( गुगु, ट्राय करते. प्रियांका म्हणजे गांधींची एव्हढं रॉबर्टवरून ध्यानी आलंय.

अरे आता तर एकदम बरोबर चाललेलीस परत चुकीच्या रस्त्यावर का????
दुसर वाक्य नीट वाच

गुगु, दो लफ्झोकी है दिलकी कहानी तर नाही ना? त्यात आधी काही वेगळ्या भाषेतले शब्द आहेत. ते व्हेनिस आहे म्हणून इटालियन असावेत कदाचित.

हुश्य!!!!!!!!!!!!

डॅनीश डीलाईट घे

160 "तुला कवा धरन शोदतुया, तु फकस्त माझी हाsssय!!! पन तु कुट हाय????" रॉबर्ट
"मुडद्या अजुन जमेना माजी मातुरभासा, जाऊं दे तुज्यासाटन हिंदी गाना बोलते" प्रियांका

तर मुलांनो सांगा पाहू हे गाण कोणत?
उत्तर : दो लफ्जों की है दिल की कहानी

सुरवातीचे शब्द इटालियन आहेत. आमोरे मियो (o my love), दोव्हे साय तु (where are you), स्तो चेरकान्दो (looking for you), साय सोलो मियो (you are only mine)

गुगु, सॉरी रे......आधी ट्यूब नाही पेटली. पण डॅनीश डीलाईट तुलाच देते. कारण मी ते शब्द आणि त्यांचा अर्थ अनेक दिवसांपासून शोधत होते तो मला तुझ्यामुळे मिळाला. Happy फक्त ते 'साय सोलो मियो' ऐवजी मला 'दाय सोरो मियो' असं ऐकायला येतं.

माझं हे अत्य्ंत आवडतं गाणं आहे. फक्त त्यात झिनीबेबीबरोबर अमिताभला व्हेनिस्मध्ये पहाताना थोडा त्रास होतो Happy

झिनीबेबीबरोबर अमिताभला व्हेनिस्मध्ये पहाताना थोडा त्रास होतो>> मलातर तिच्या बरोबर इतर कुणालाही पाहताना त्रास होतोच.. Wink
नमस्कार लोक्स... मस्त टीपी चालु आहे.. मी वाचतो आहे नुसता.. Happy

>>मलातर तिच्या बरोबर इतर कुणालाही पाहताना त्रास होतोच

Proud माझ्या कोड्याचं उत्तर सांगू का?

झिनीबेबी ने सचिन पिळगावकर कडे डान्स शिकला असावा. त्याच्या प्रमाणेच ती एकदोन स्टेप्स मधे दिसते.
ते माना वेळावण
आप के कमरे मे कोई असो
मौसम बदलने लगा
आप जैसा कोई

तेच तेच

पण दिसते मात्र @#$@##$%$%&^&^

मौसम बदलने लगा वरून आठवल आपण पुर्वीच्या धाग्यात चर्चा करत होतो
झुठा कहीं का मुझे ऐसा मिला
जिना क्या अजि प्यार बिना
तिन्ही गाणी एकदम सारखी वाटतात. तरी खालची दोन जास्त आणि दोन्हीच चित्रिकरणही नीतुसिंग ह्रषी कपूर

प्रोजेक्ट ऑडिट, मिटिंग्स, ट्रेनिंग आणि मंथली रीपोर्ट अशा शत्रुंनी चारही बाजुंनी घेरलंय Sad . त्यामुळे आज फारच कमी वेळा इथे यायला मिळणार. Sad
घरी गेल्यावर सगळ सावकाश वाचेन.

कोडं १६१:
मनिषच्या आवडत्या गायकाचा शास्त्रीय संगीताच्या गाण्याचा प्रोग्रॅम कित्येक वर्षांनी त्याच्या शहरात होत होता. पण त्याच्या बायकोला अजिबात आवड नाही 'काय ते आआ ऊउ ऐकायचं' असं तिचं शास्त्रीय संगीताबद्दलचं मत. मनिषचे २-३ मित्र प्रोग्रॅमला जाणार होते त्यामुळे कंपनी होती पण नेमका दुसर्‍या दिवशी त्याच्या बायकोचा वाढदिवस आणि प्रोग्रॅम पहाटेपर्यंत चालणार होता. पण बायकोने उदार मनाने परवानगी दिली म्हणून मनिष मित्रांबरोबर प्रोग्रॅमला गेला. मैफिल चांगलीच रंगली होती. मनिष गाणं ऐकण्यात एव्हढा "दंग" झाला होता की त्याला १२ वाजता बायकोला विश करायची आठवणच झाली नाही. लक्षात आलं तेव्हा १ वाजला होता. थिएटरच्या थंडीतसुध्दा त्याला घाम फुटला. धावत धावत बाहेर येऊन त्याने तिला फोन लावला. अहो आश्चर्यम! ती अजिबात रागवली नव्हती. उलट तिनेच गमतीने त्याला एक गाणं ऐकवलं. ओळखा गाणं.

क्लू - गाण्याची पहिली ओळ परफेक्ट बसते.

उत्तरः मेरे पिया गये "रंगून" किया है वहासे टेलिफून तुम्हारी याद सताती है

एक कैच्याकै :

कोडं नं. : १६२
एका माणसाला नीट ऐकू यायचं नाही. म्हणजे फार नाही पण मध्येच एखाद अक्षर त्याला वेगळंच ऐकू यायचं. त्याच्या प्रेमात एक तरुणी पडते. या मठ्ठोबाला काही ते कळत नाही. मग ती त्याला घेऊन एकदा लंचला एका रेस्टॉरंट मध्ये जाते आणि जेवण झाल्यावर एक छानसं गाणं ऐकवून त्याला आपल्या मनीचं गूज सांगते. पण हाय रे दैवा! नेमका महत्त्वाचा शब्द तो दुसराच काही ऐकतो आणि (पुढचं गाणं न ऐकता) ही आपल्याला उठण्याची खुण आहे असं समजून रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो. तर मुलांनो, ते गाणं कोणतं बरं?

जिप्सी धन्स....कालचं गुगुचं कोडं पण झकास होतं. मला रॉबर्ट आणि प्रियांकाचा संदर्भ आधी लागला नाही.

मामी, 'हम दिल दे चुके सनम' नाही ना? त्याला हम 'बिल' दे चुके सनम ऐकू येऊ शकतं. Proud

कोडं १६३:

एक तरूणी बॅन्क फोडणार्‍या टोळीत सामिल असते. तिचं एका तरुणावर प्रेम बसतं. त्यालाही ती आवडू लागते. आणि हिंदी पिक्चर स्टाईलमध्ये तो नेमका ह्याच गुन्ह्यांचा तपास करणारा पोलिस इन्स्पेक्टर निघतो. पण अर्थात त्याला ह्या दरोड्यांबद्द्ल काही माहित नसतं. तरूणीची टोळी एका शनिवारी ३ बॅन्का लुटते. रविवारी सकाळी तिला त्या इन्स्पेक्टरचा फोन येतो की लंच एकत्र घेऊ या. हिच्या छातीत डबल धडधडायला लागतं - एक तर त्याच्याबरोबर लंच घ्यायचा ह्या हुरहुरीमुळे आणि दुसरं त्याला काही कळलं नसेल ना ह्या भीतीमुळे. तरी 'दिलके हाथो मजबूर' होऊन ती जाते. त्याला काहीच माहित नसतं त्यामुळे लंच यथासांग पार पडतो. पण त्यानंतर दर वेळी त्याने भेटायला बोलावलं की हिची हीच अवस्था होते. तिला कुठलं गाणं आठवेल? एक्दम सोप्पं आहे....

मित्रमैत्रीणीनो... ज्यानी टी शर्ट ची ऑर्डर दिली आहे त्याना धन्यवाद.. बाकी लोकानी आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच नोंदवा.. तसेच ववीचे बुकींग ही करा.. Happy या बाफ वरील सर्व लोकाना ववी ला येणे कंपल्सरी आहे याची नोंद घ्यावी.. हुकुमावरुन.. Proud

जिप्सी धन्स....कालचं गुगुचं कोडं पण झकास होतं. मला रॉबर्ट आणि प्रियांकाचा संदर्भ आधी लागला नाही.

मामी, 'हम दिल दे चुके सनम' नाही ना? त्याला हम 'बिल' दे चुके सनम ऐकू येऊ शकतं.

स्वप्ना तुला काकडीची खमंग कोशिंबीर! (क्या डोकं पाया है ये लडकीने!)

कोडं नं. : १६२
एका माणसाला नीट ऐकू यायचं नाही. म्हणजे फार नाही पण मध्येच एखाद अक्षर त्याला वेगळंच ऐकू यायचं. त्याच्या प्रेमात एक तरुणी पडते. या मठ्ठोबाला काही ते कळत नाही. मग ती त्याला घेऊन एकदा लंचला एका रेस्टॉरंट मध्ये जाते आणि जेवण झाल्यावर एक छानसं गाणं ऐकवून त्याला आपल्या मनीचं गूज सांगते. पण हाय रे दैवा! नेमका महत्त्वाचा शब्द तो दुसराच काही ऐकतो आणि (पुढचं गाणं न ऐकता) ही आपल्याला उठण्याची खुण आहे असं समजून रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो. तर मुलांनो, ते गाणं कोणतं बरं?

उत्तर :
हम दिल (बिल) दे चुके सनम.......

स्वप्ना
तू ने लुट लिया लुट लिया लुट लिया
मैने क्या किया क्या किया क्या किया

आयेशा टाकिया अर्शद वारसी आणि तो इरफान चित्रपटाच नाव बहुदा संडे

कोडं १६३:

एक तरूणी बॅन्क फोडणार्‍या टोळीत सामिल असते. तिचं एका तरुणावर प्रेम बसतं. त्यालाही ती आवडू लागते. आणि हिंदी पिक्चर स्टाईलमध्ये तो नेमका ह्याच गुन्ह्यांचा तपास करणारा पोलिस इन्स्पेक्टर निघतो. पण अर्थात त्याला ह्या दरोड्यांबद्द्ल काही माहित नसतं. तरूणीची टोळी एका शनिवारी ३ बॅन्का लुटते. रविवारी सकाळी तिला त्या इन्स्पेक्टरचा फोन येतो की लंच एकत्र घेऊ या. हिच्या छातीत डबल धडधडायला लागतं - एक तर त्याच्याबरोबर लंच घ्यायचा ह्या हुरहुरीमुळे आणि दुसरं त्याला काही कळलं नसेल ना ह्या भीतीमुळे. तरी 'दिलके हाथो मजबूर' होऊन ती जाते. त्याला काहीच माहित नसतं त्यामुळे लंच यथासांग पार पडतो. पण त्यानंतर दर वेळी त्याने भेटायला बोलावलं की हिची हीच अवस्था होते. तिला कुठलं गाणं आठवेल? एक्दम सोप्पं आहे....

संभाव्य (पण फारशी आशा नसलेली) उत्तरे:
१. धडकने लगता है मेरा दिल तेरे नाम से
२. धकधक करने लगा, ओ मोरा जियरा जलने लगा

या बाफ वरील सर्व लोकाना ववी ला येणे कंपल्सरी आहे याची नोंद घ्यावी.. हुकुमावरुन.. >>>>>जोरदार अनुमोदन. Happy

माझे आता ४ तासानंतर येथे येणे होईल Sad

मामी, ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्यावर हेच शब्द मनात आले होते म्हणून लगेच आठवलं Proud

गुगु, स्निग्धा, मामी - नाही. हे गाणं गोल्डन इरामधलं आहे आणि ह्यात एक ठोकळा आहे.

या बाफ वरील सर्व लोकाना ववी ला येणे कंपल्सरी आहे याची नोंद घ्यावी.. हुकुमावरुन..
राम भाऊ आम्हास माफी द्यावी.
खरतर साळकाया म्हाळकाया उर्फ दिनेशदाच्या मैत्रीणी, जिप्सी, अशी अनेक कॅरेक्टर्स प्रत्यक्षात पहायची उत्सुकता आहे.
पण .... रवीवारी क्लास आहे.
एरवी मी टांग दिलीही असती पण यावेळी मी शिक्षकाच्या भुमिकेत आहे आणि तेही बिर्ला कॉलेज मधे.

त्यामुळे मामी पार्टीला कधी बोलवतायत त्याची वाट पहाणच माझ्या हातात उरत.

माझे आता ४ तासानंतर येथे येणे होईल
का रे!!! आज ऑफिस मधे काम करायला लागतय का?
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!

Pages