..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र.५३ : उत्तर
न जाओ सैंया छुड़ा के बैंया ----- (साहिब, बीबी और गुलाम)

किंवा
सुमारे १०/१२ वर्षांपूर्वीच्या अजय देवगणच्या चित्रपटातले हे गाणे :

"रुक रुक रुक अरे बाबा रुक
ओ माय डार्लिंग गिव्ह मी अ लुक
गुस्सा तेरा वल्लाह वल्ला
नखरे तेर उख उख उक"

@ माधव....गाणे "फीमेल" म्हणत्येय....त्यामुळे देवबाबा कट !!

@ उल्हास भिडे ~ हे होऊ शकते....पण गाणे महाबळेश्वरमध्ये 'ती' म्हणत आहे अशी कल्पना असल्याने वातावरणाचाही संबंध आहे.

एक क्ल्यू ~ नायिका कथानकातून कायम सिमला, कुलू, मनाली, मसुरी, डेहराडून, श्रीनगर अशा ठिकाणीच फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे (किंवा होती म्हणू या).

कोडं क्र. ५२ :
"गम उठाने के लिए मैं तो जिए जाउंगा" ... भरत ... अगदी बरोबर.
----------------------------------------------------------------------------
प्रतीक,
कोडं क्र. ५३ च्या उत्तराबद्दल सांगा

कोक्र. ५२ : नेमके 'गम...' हे गाणे टंकायला बोटे फुरफुरत होती, पण चित्रपटात नायिका त्याची पत्नी दाखविली आहे, अन् कोड्यात तर 'प्रेयसी' चा उल्लेख असल्याने थोडासा साशंक होतो. पण असो.

कोक्र. ५३ :

भरत : खरं तर तुमचे गाणे एकदमच फिट आहे, पण माझ्या मनी होते ते हे :

नायिका आशा पारेख

"ना जा ओ मेरे हमदम, ना जा ओ मेरे हमदम
सुनो वफ़ा की पुकार, छोडके मेरा प्यार, ना जा ओ मेरे हमदम..."

'वातावरण' हा एक क्ल्यू होता, कारण चित्रपटाचे नाव "प्यार का मौसम"

प्रतीक,
"दु:खं भोगून पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी मोठं आयुष्य दे" या आशयाचं
(माझ्या अल्पमतीनुसार) ते एकमेव गीत असल्याने,
'पत्नी' असा उल्लेख न करता 'प्रेयसी' शब्द लिहून संदिग्धता आणण्याचा प्रयत्न केला होता.

असो ..... पुढचं कोडं ?????

कोडं क्र. ५४-- गणपतरावांच्या वखारीला ऐन पावसाळ्यात आग लागली . त्यांच्या मनाची तडफड झाली. खूप शोधूनही त्यांना आगीचे कारण सापडेना. आपली उद्विग्नता ते कशी व्यक्त करतील ?

५४ चे उत्तर :
तितकसं पटत नाही .... पण खडा मारून बघतो Lol

दिल अपना और प्रीत पराई
किसने है यह रीत बनाई
आँधीमें इक दीप जलाया
और पानीमें आग लगाई

५५ गेल्या एशियाडची गोष्ट. भारतीय महिला तीरंदाजी संघाचा उपांत्य फेरीचा सामना होता. सामन्यापूर्वी भारतीय संघातल्या एका खेळाडूला काही तांत्रिक अडचण येत होती. तर चक्क प्रतिस्पर्धी संघाच्या मार्गदर्शकाने तिला मदत केली. मग काय तिचा खेळ चांगला झालाच, पण ते त्या कोचच्या प्रेमातही पडली आणि गाणं गाऊ लागली. कोणतं?

५६. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला पायउतार व्हावं लागलं. काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडीचा डाव मांडला. शपथविधीनंतर मु. विलासराव देशमुख आणि उपमु. छगन भुजबळ यांनी कोणतं गाणं म्हटलं?

हे पावसाळी सेलमधील कोडे असल्याने याला २ बरोबर उत्तरे आहेत.

कोडं ५६: १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला पायउतार व्हावं लागलं. काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडीचा डाव मांडला. शपथविधीनंतर मु. विलासराव देशमुख आणि उपमु. छगन भुजबळ यांनी कोणतं गाणं म्हटलं?

तु मुझे कबुल मै तुझे कबुल
इस बात का.. ????

कोक्र...५४

आगीच्या संदर्भात हे गाणे असणे काहीसे अशक्य वाटते, पण या निमित्ताने तलत आठवले म्हणून....त्यांच्या आठवणीसाठी ~

"जली जो शाख-ए-चमन, साथ बाग़बाँ भी जला
जला के मेरे नशेमन को आस्मां भी जला

एक मैं हूँ एक मेरी बेकसी की शाम है"...."

"तराना".....दिलीपकुमार...मधुबालासाठी !

कोक्र. ५५ :

"एक परदेसी मेरा दिल ले गया,
जाते जाते मिठा मिठ दर्द दे गया..."

(अरेच्या...परत 'मधुबाला'....आद्य ठोक्र.१ सोबत)

कोक्र.५६ :

"बरसात मे हमसे मिले तुम, सजन (छगन) तुमसे मिले हम, बरसातमे"

क्रमांक ५५ : नाही ?

मग हे ?

"परदेसिया... ये सच है पिया सब कहते हैं मैंने
तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने, मेरा दिल ले लिया"

~ अ‍ॅण्ड व्हाट इज धिस 'मंगल' प्रकरण ? हा क्ल्यू वगैरे आहे का, भरत ?

मंगल प्रकरण = कोडे ४८. माधवने दिलेले . अजून सुटलेले नाही.

माझ्या दोन्ही कोड्यांसाठी क्लु : गाण्यातला एकेक महत्त्वाचा शब्द कोड्यात आहे.

५६. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला पायउतार व्हावं लागलं. काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडीचा डाव मांडला. शपथविधीनंतर मु. विलासराव देशमुख आणि उपमु. छगन भुजबळ यांनी कोणतं गाणं म्हटलं?
<<<<
कबके बिछडे हुए हम आज कहां आके मिले...
किंवा
>>>शपथविधीनंतर >>>>
या शब्दावरून
हां मैने कसम ली, हां तूने कसम ली...
नही होंगे जुदा..

श्रद्धा बरोबर.
५६. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला पायउतार व्हावं लागलं. काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडीचा डाव मांडला. शपथविधीनंतर मु. विलासराव देशमुख आणि उपमु. छगन भुजबळ यांनी कोणतं गाणं म्हटलं?

उत्तर : हे मैंने कसम ली हे तूने कसम ली
नही होंगे जुदा हम

याच कोड्याचे आणखी एक उत्तर द्या. हे मराठी.

५५ : "खेळ' हा एक क्लू मनी आला आहे, त्या वरून

"खेल खेल में सनम, आ गये जहाँ पे हम
रोक ले वहीं कदम, बोलो बोलो बोलो बोलो
एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह
और जो तन मन में हो रहा है..."

भरत, त्याच कोड्याचे मराठी उत्तर कदाचित,
'डाव मांडून, भांडून मोडू नको..' हे असेल. त्या 'आघाडीचा डाव' वाक्यरचनेवरून. Happy

५७. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या महिलेला आपल्या मुलीचं प्रेमप्रकरण अजिबात मंजूर नव्हतं. त्या मुलाला तंबी देऊन त्या स्त्री ने ते प्रकरण संपवलं. पण त्या मुलाने तिच्यावाचून काय जगायचं म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी वेळीच पाहील आणि त्याला दवाखान्यात आणलं.. तर अपरिहार्यरित्या तीच एक डॉक्टर शहरात ख्यातनाम होती..

तिला समोर पाहून मुलाच्या वडिलांनी कुठलं गाणं म्हटलं असेल ?

Pages