Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह, असं असतं का? मग वेगळे
ओह, असं असतं का? मग वेगळे पदार्थ मस्ट.
मक्याच्या कणसाची डाळ, चीझ
मक्याच्या कणसाची डाळ, चीझ कॉर्न बॉल्स. कैरी भोपळ्याचे सूप
२०१२ च्या गणेशोत्सवात आलेल्या
२०१२ च्या गणेशोत्सवात आलेल्या सफरचंदाच्या पाककृती बघा.
कोजागिरीसाठी इडली, चटणी,
कोजागिरीसाठी इडली, चटणी, सांबार यासोबत अजुन काय करता येइल? शाकाहरी पदार्थ सुचवा.
पुलाव + बुंदी रायते / दहीबुत्ती कसे वाटेल? स्टार्टर काय ठेवावेत?
(सहा मोठी + ४ मुले एव्हढे लोक आहेत)
दहीबुत्ती बेश्ट!! स्टार्टर -
दहीबुत्ती बेश्ट!!
स्टार्टर - मूगभजी किंवा कुठलेही आप्पे.
इडली आहे मग पुन्हा आप्पे नको.
इडली आहे मग पुन्हा आप्पे नको. त्यापेक्षा मुगभजी कर.
पीठ न आंबवताही आप्पे करता
पीठ न आंबवताही आप्पे करता येतील की
त्यानिमित्त्त्ताने तिने नवं आप्पेपात्र घेतलंय हेही पाहुण्यांना समजेल
वत्सला, आम्ही कोजागिरी ला
वत्सला, आम्ही कोजागिरी ला हाच मेन्यु ठेऊन सोबत ब. वडा आणि भेळ करणार आहोत ..
बघ आवडतो का ....
माझ्यामते कोजागिरी ला, कच्चा
माझ्यामते कोजागिरी ला, कच्चा कुरकुरीत चिवडा, भुईमुगाच्या ताज्या शेंगा असतात त्या उकडून, किंवा थोड्या भाजून, सोबत भाजलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ, कधी कांदा भजी असं चाखत चाखत लंब्याचवड्या बाता/ गप्पा करायच्या... हे करता करता दूध आटवायचं. अन मग चन्द्र वर येईपर्यंत ते दूध गार होऊ द्यायंच. मग चन्द्राचं प्रतिबिंब त्या दुधात पाहिलं की मग ते कोमट गरम दूध चाखत माखत प्यायचं. अगदी ३ ते ४ ग्लासेस अगदी सहज प्यायल्या जातं.
यात पार ती कढई आणण्यापासून सगळी तयारी असायची. ती चूल माडंं, ते लाकडं. त्यात ते ओले असणं. मग धूर. तो तस्साच धुमसत ठेवून त्याढईच्या बुडाला मातीचा लेप देणं, मग ते सगळं तापवणं. त्यात साखर घालतांनाची बोंबाबोंब... सगळं आठवलं...
मी विदर्भात तरी ही पद्धत पाहिली आहे.
मंजुडी, हुश्शारे! आणि मनकवडी
मंजुडी, हुश्शारे! आणि मनकवडी पण!
फक्त ते 'नवं आप्पेपात्र' पेक्षा 'बीडाचं नवं आप्पेपात्र' असं आहे!
मुगभजी, आप्पे (मायबोली जिंदाबाद), ब वडे, भेळ असे बरेच ऑप्शन्स आहेत. घरातल्यांना (ही) त्यांचे मत विचारते.
योकु, अगदी अगदी!
तू विदर्भातला आहेस का? आमचे सगळे सख्खे शेजारी विदर्भातले होते. त्यामूळे लहानपणीच्या कैक कोजागिर्या त्यांच्यासोबत साजर्या केल्या आहेत त्याची आठवण झाली! जोडीला भुलाबाई (भोंडला) असायची. त्यानिमित्त १७६० खाऊ असायचे आणि नंतर तू वर्णन केलेल्या पद्धतीने केलेले दुध! सगळं आठवलं.
कडक पुरीवर चाट आयटेम्स
कडक पुरीवर चाट आयटेम्स (उकडलेला बटाटा, मोड आलेले मूग, मटार, डाळिंबाचे दाणे, कांदा, टोमॅटो, चटण्या, शेव, चाट मसाला इ.इ.) घालूनही मस्त स्टार्टर होते. कडक पुर्या आणि चाट मिश्रण वेगवेगळे ठेवायचे. करायला सोपे आणि झटपट.
जास्त लोकांसाठी वरणाचा अंदाज
जास्त लोकांसाठी वरणाचा अंदाज घ्यावा? पुरी,भाजी (२ - ३), स्टार्टर वरण भात , गोडाचा एक पदार्थ असा सर्व स्वयंपाक असेल
वरणाच्या consistency वर
वरणाच्या consistency वर अवलंबून आहे. मी असं प्रमाण घेते. १)साधं वरण्,भात्,तूप, लिंबू असेल तर (तांदूळ १ : डाळ १) २) आमटी-भात असेल तर (तांदूळ १ : डाळ १/२) ३) जीरा-राईस, दाल फ्राय असेल तर (तांदूळ १ : डाळ ३/४). एक्स्ट्रा दह्याचा ड्बा ठेवावा म्ह्णजे आवडल्यामुळे जास्त खपलं तर दही/ताक भात विचारता येईल.
अगं पूर्ण जेवण आहे नं. फक्त
अगं पूर्ण जेवण आहे नं. फक्त माणशी वरण किती वाट्या शिजवायला हवं हा प्रश्न आहे. त्यात एक पातळ भाजी/ ग्रेव्ही हे पण धरू शकतो. बघुया थोडं जास्त शिजवून फ्रीजमध्ये ठेवेन. तुझा १:१ अंदाज पण चालावा.
आभार्स
तुम्ही किती दाट्/पातळ वरण
तुम्ही किती दाट्/पातळ वरण करता त्यावरच अवलंबून आहे. पण माणशी एक मूठ डाळ घ्यावी साधारणतः.
शुक्रवारी माझ्याकडे १० मोठे,
शुक्रवारी माझ्याकडे १० मोठे, दोन जरा लहान आणि तीन अगदी लहान मुलं येणार आहेत कॉकटेल पार्टीला.
मी ठरवलेला बेत -
छोले भटुरे
पुलाव
बुंदी रायता
कॉकटेल असल्याने स्नॅक्सवर जास्त भर असणार आहे.
स्नॅक्समध्ये कॉर्न चाट,
पालक/गाजर घातलेल्या रंगीत इडल्या + पुदिना चटणी
बटाट्याचे छोटे पापड तळून वर काटोको + चाट मसाला पेरून.
बिंगोज् मॅड अँगल्स + दही डिप
डाळवडा/आलू बोंडा
सोबत दिवाळीचा चिवडा, शेव असेलच.
एवढे पुरेसे आहे का?
मला किचनमध्ये जास्त वेळ न घालवता सगळ्यांबरोबर गप्पा मारायच्या आहेत. एक हेल्पर असेल, जो भटुरे, वडे तळू शकेल. पण मला भटुरेपण असल्याने शक्यतो स्नॅक्समध्ये तळण टाळायचे आहे. तेव्हा वड्यांऐवजी इतर काही बनवता येईल का? असे काही, जे मला आधीच बनवून ठेवता येईल आणि फक्त मावेत गरम करून खाता येईल
दुसरे म्हणजे,
पुलावाबरोबर बुंदी रायते पुरेसे होईल ना? की सार वगैरे करावे?
मला वाटते बुंदी रायताऐवजी सार
मला वाटते बुंदी रायताऐवजी सार छान असेल. वर ' दही डिप' आहेच ना?
शिवाय वड्यांऐवजी 'हरभरा कबाब'टाईप काही केले तरी चालेल. कोथींबीरीचे मुटकुळे फक्त फॅन्सी शेपमध्ये... त्यामानाने कमी तेलाचे, शिवाय आधीच बनवून ठेवले तरी चालेल. अगदी लहान मुलांसाठी केळी/उकडलेले गाजर/बटाटे आणून/करून ठेवता येतील.
बाकी बेत अगदी मस्त.
बेत मस्त आहे प्राची! टिक्की
बेत मस्त आहे प्राची!
टिक्की प्रकार केला तर शॅलो फ्राय करून काम भागू शकेल. किंवा कटलेट.
कोथिंबीर वडी प्रकारही करता येईल. चाट प्रकारांसोबत पाणीपुरीही ठेवता येऊ शकेल.
बारके चौकोनी सँड्विचेस, व्हेज
बारके चौकोनी सँड्विचेस, व्हेज /चिकन/ एग. एग ऑन टोस्ट. उकडलेल्या चन्या चे सालाड. मोनॅको वर चीज तुकडे
बुंदी रायत्याऐवजी काटोकां
बुंदी रायत्याऐवजी काटोकां रायता ठेव. दही गार असावे. स्टार्टर्स भरपूर आहेत. त्यातले बटाटा पापड वगळू शकतेस का? आणि डेझर्टास काय?
धारा, दही डिप फक्त
धारा, दही डिप फक्त स्नॅक्स्बरोबर असेल.
छोले मसालेदार असल्याने बरोबर दही ठेवावेच लागेल. पूनम म्हणते तसे काटोकां रायता करता येईल.
कोथिंबीर इकडे दुर्मिळ असल्याने मुटके किंवा वडी अवघड आहे.
पूर्णपणे व्हेज मेनू ठेवायचा असल्याने अंडी नकोत.
टिक्कीचाही ऑप्शन मस्त आहे.
धन्यवाद.
डेझर्ट म्हणून शेवयांची खीर करणार आहे. अजून काही ऑप्शन्स सुचल्यास नक्की सांगा.
डेझर्टला अजून एक ऑप्शन-
डेझर्टला अजून एक ऑप्शन- फिरनी/ कस्टर्ड विथ फ्रूट्स. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात ना? त्याचं काहीतरी भारी बनू शकतं का?
पार्टी हिट करायची असेल तर
पार्टी हिट करायची असेल तर तळणाला पर्याय नाही
(बाजारात मिळतात ते फ्रोझन आयटम्स आवडतात पब्लिकला)
पालक/गाजर घातलेल्या रंगीत इडल्या + पुदिना चटणी, छोले भटुरे+ पुलाव बरोबर मॅच होईल का? हल्दीराम किंवा तत्सम भेळ केली तर? त्यांनी दिलेल्या चटणीत; दिलेल्या चुरमुरे+फरसाण च्या दुप्पट चुरमुरे+फरसाण बसू शकते. रॉ मटेरिअल हेल्पर चिरून देऊ शकेल. भेळ छोट्या द्रोणात भरून सर्व करू शकता. वेस्टेज टळू शकेल.
फराळासाठी एका फॅमिलीला
फराळासाठी एका फॅमिलीला बोलावले आहे उद्या. नवरा बायको आणि दोन मुले आहेत. फराळ म्हणुन मी फक्त चकली, दोन चिवडे, लाडु एवढेच बनवले होते. चकल्या फक्त चारच उरल्या आहेत. आता परत करायला एवढा वेळ नाही. तर फराळाबरोबर काय देता येइल? झटपट बनणारं सुचवा.कारण मी दिवसभर कामावर असेन आणि त्यांना पाच वाजता बोलावलय.
पेरू, देशी दुकानातुन 'गरवी
पेरू, देशी दुकानातुन 'गरवी गुजराथ' च्या चकल्या घेऊन ये. चांगल्या आहेत.
दीप चे आणि गरवी गुजराथ चे फ्रोझन प्रॉडक्ट्स पण बरेच आहेत... जे पटकन बेक करता येतिल.
आम्हा लहान असताना आई नरकचतुर्दशीला फराळाबरोबर उपमा आणि गोड शिरा करायची. तुला आज करुन ठेवता येतिल... आयत्यावेळेस दोन्ही मावे मधे गरम करुन उपम्याच्या मुदीवर शेव्/फरसाण/ कोथिंबीर खोबरं घालुन द्यायचं आणि शिर्यावरती नट्स चुरा+केशर. किंवा आंब्याचा / अननसाचा शिरा करु शकतेस.
इथे आपल्याकडे गरम आहे आणि अंब्याचा सिझनही सुरु झालाय... मुग्धाच्या रेसिपीने नॅचररल्स आयस्क्रिम आज करुन ठेवता येइल किंवा माझी कुल्फीची रेसिपी आहे ती ट्राय करता येइल.
अजुन आठवले तर लिहिते
पालक/गाजर घातलेल्या रंगीत
पालक/गाजर घातलेल्या रंगीत इडल्या + पुदिना चटणी, छोले भटुरे+ पुलाव बरोबर मॅच होईल का>>>
कॉकटेल इडल्या असणार आहेत. त्यामुळे, स्नॅक्समध्ये चालतील.
काल चक्कचक्क एका दुकानात कॅनोपीज् मिळाल्या. त्यामुळे, बटाटा पापड कॅन्सल.
फरसाण मिळत नाही. झालमुडीची पॅकेट्स मिळतात फक्त. त्याची भेळ बनवून किंवा आलू चाट बनवून कॅनोपीज््मधून देता येईल.
खोटे वाटेल पण आमच्या इथे हल्दीरामची किंवा कोणाचीही इन्स्टंट भेळ मिळत नाही.
स्नॅक्स सगळेच कमी मसालेदार वाटत असल्याने डाळवडा ठेवावा असे ठरले आहे.
धन्यवाद.
थॅन्क्स लाजो. त्या गरवि
थॅन्क्स लाजो. त्या गरवि गुजराथच्या चकल्या अजुन तरी इथे मिळत नाही (पर्थमधले इंग्रो अजुन थोडेसे मागासलेलेच आहे :))
उपम्याची आयडिया छान आहे. करते उद्या.
रविवारी घरी एक केनियन फॅमिली
रविवारी घरी एक केनियन फॅमिली आणि एक साउथ इंडियन फॅमिली येणार आहे. एक लहान मुलगी पण आहे त्यात. त्यांना भारतीय स्पेशली महाराष्ट्रीयन जेवण हवे आहे. काय मेन्यु ठेवावा?
महाराष्ट्रीयन जेवण ... चपाती/
महाराष्ट्रीयन जेवण ... चपाती/ भाकरी, एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी/उसळ, भात-वरण/आमटी/कढी, कोशिंबीर, कोवडी/आवडी/सुवडी, लोणचे, पापड
मसाले भात (माबोवरच एक रेसीपी
मसाले भात (माबोवरच एक रेसीपी आहे,त्याने खुप छान होतो), मट्ठा, पिवळा बटाटा, एक उसळ, सु वडी(मावे स्पेशल), पुरी आणि श्रीखंड, तळण. करायला ही सोप्पं आणि पाहुणे यायच्या आधी आपण जास्त थकत ही नाही.
Pages