Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद
धन्यवाद प्राची... पण राजमा ऐवजी दुसरं काही? काय आहे नं आमच्याकडे कोणीही येणार असेल तर राजमा / छोले, पनीर व गोबी असतोच. मलाच कंटाळा आलाय या पदार्थांचा..
लिंबुदा... पावसॅम्पल जरा जास्तच सोप्प होईल हो.. मला सुगरणपणा पण दाखवायचाय नं.. अहो कायय ना, सारखे गावातल्या लो़कांचे टोमणे ऐकलेत मी अन माझ्या घरच्यांनी (स्पे. सासुबाईंना तर जास्त ऐकावं लागतं) की परप्रांतातली सुन आणलीये, ते पण कंपनीत काम करणारी... पुढच्या सुना शिक्षिका वैगरेच आणा टाइपच्या. पहिल्यांदा चांस मिळतोय सुगरणपणा दाखवायचा... म्हणुन जरा तयारी..
अल्पना, अग
अल्पना, अग पावसॅम्पल नन्दिनी करता सुचवल होत
एकदम घट्ट "झुणका" टाईप नको
तयार गुलाबजाम मिळाले तर उत्तमच!
जेवढ बेसन तेवढच तिखट नि तेवढच तेल हे प्रमाण जेवता जेवता सान्गुन तर बघ!
हो, ताकच, लस्सी नाही!
तुझ तर भारीच अवघड हे!
मग सरळ महाराष्ट्रिअन जेवण का नाही करत?
आमटीभात, पिठल भाकरी! एखादी कोशिम्बीर, थोड तळण
आमटी शेवग्याच्या शेन्गा नि टोमॅटो (जमल्यास चिन्चगुळ) घालुन करायची
त्याच्या ऑपोझिट, पिठल्यात कान्दा, लसुण, बारीक चिरलेली मिरची घालून सणसणीत पण थोड दाट करायच!
जोडीला कच्चा कान्दा द्यायचा मीठ लावून
मुळा मिळाला तर दही घालून त्याची कोशिम्बीर कर
नारळ असेल तर खवुन वा सुक्का किसुन आमटीत घाल!
भाकर्या कसल्या जमतात? ज्वारीच्या की तान्दुळाच्या? त्या कर! भाकरी जमतच नसेल तर मात्र सरळ पोळ्यान्वर भागव
गोडास एकादी खीर कर! (म्हणजे शेवया किन्वा गव्हाची भरड/तान्दुळ इत्यादी)
मला वाटते की जर तयारी आधीपासून असेल अन पिठल चान्गल जाळ काढणार झाल तर पुन्हा बिशाद नाही होणार नाव ठेवायची कुणाची!
वर सान्गायच की आमच्यात की नाही, तिकडे आलात जर तर पाहुण्यान्ना "रावण पिठलच" करुन घातल जात! आणि वर रावण पिठल्याची कृती रन्गवुन रन्गवुन सान्गायची!
ठसका लागलाच कुणाला तर ताक मात्र तयार ठेव!
कायम एक सुत्र लक्षात ठेवतो मी, पहिल्या घासास जे काय तिखटमीठ अन मसाल्यान्ची झणकेदार चव लागली ना, की मग पान किती सजवलय याला फारस महत्व रहात नाही
आमची लिम्बी तर कित्येकदा "चटणी" वर सगळा बेत तारुन नेते!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
<<वर
<<वर सान्गायच की आमच्यात की नाही, तिकडे आलात जर तर पाहुण्यान्ना "रावण पिठलच" करुन घातल जात! आणि वर रावण पिठल्याची कृती रन्गवुन रन्गवुन सान्गायची! जेवढ बेसन तेवढच तिखट नि तेवढच तेल हे प्रमाण जेवता जेवता सान्गुन तर बघ!>>
भाकर्या जमतात तश्या, पण पीठ नाही ये सध्या. त्यामुळे पोळ्याच करणार. तो नवरदेव पिठलं खात नाही नं... त्याला सांबार / चिंच्-गुळाची आमटी आवडते, त्यामुळे आमटी करु शकते.
टॉमेटोची चटणी, ठेचा, मट्ठा, मसालेभात, गोड.. शेवया संपल्यात, अन होळीला त्यंच्या घरी भाताची खीर खाल्लीये, सो गुलाबजाम (बहुतेक स्वतः बन्वेन आदल्यदिवशी, किंवा श्रिखंड.) अरे हो एक अजुन सांगितलं नाही, त्या मुलाच्या वडलांचे रांचीला हलवायाचे दुकान आहे.. :(.. काही नसेल तर मी बासुंदी छान बनवते..
१)समोसा
१)समोसा चाट, दालमखनि,पनिर माखनवाला, जिरा-राईस, गुलाबजाम
२)पनिरपकोडा, मेथि-मलई मटर, जिरा-आलु,दालफ्राय, राईस,जिलेबि
अजुन काहि पदार्थ- आलु मटर, बैगन भरता, पनिर्-सिमलामिरचि, पालक्-छोले..
तु आधि सांगितलेले दोन्हि मेनु सोडुन सुचवायचा प्रयत्न केलाय्...
>>>>> त्या
>>>>> त्या मुलाच्या वडलांचे रांचीला हलवायाचे दुकान आहे
अरे बापरे, म्हणजे तर अजुनच अवघड प्रकरण!
आता हलवायाच्या पोराला आपण काय नी कस कस गोड खाऊ घालून समाधानी करणार?
ओक्के, कुळथाच पीठ आहे का? सणसणीत पण आमसुल किन्वा चिन्च व लसुण घालून पातळ पिठल कर! (बघ मी पिठल काही सोडायला तयार नाही), नवर्याला माहित नसेल तर कळणार पण नाही
अन गोडाला, पाकातल्या पुर्या?? (असा काही पदार्थ शोध जो हलवाई करत नाही तिकडचा)
तुला बेस्ट लक
नन्तर सविस्तर वृत्तान्त कळव!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अल्पना,
अल्पना, नॉन मराठी जनता जेवायला असेल तर मी मुद्दाम महाराष्ट्रीयन मेनु करते...मज्जा येते खुप. या लोकांना पदार्थ नवीन असतात. आवडतातही. वर तु दिलेले डिटेल्स वाचुन पुरणपोळी सुचवावी वाटतेय. पुरण आदल्यादिवशी करुन ठेव. बरोबर एखादी आपल्याच स्टाईलची भाजी (कोरडी वांगी) कटाची आमटी ही नसेल कराय्ची तर टॉमेटोच ताक घालून सार. मसालेभात. आणि तळण चटणी कोशींबिर आपल्याच पद्धतिने कर.
मसालेभात तर जबरी आवडतो या मंडळींना त्यांचा पुलाव खाउन कंटाळलेले असतात
श्यामलीला
श्यामलीला अनुमोदन!

अन बासुन्दी वगैरे केलेसच तर दाबून जायफळ्/वेलची वापर! जेवल्यानन्तर मस्त पेन्गलेच पाहिजेत!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
DJ छान वाटते
DJ छान वाटते आहे तुझी कोशिंबीर. तशीच करीन. धन्यवाद!
प्राजक्ता
पालकभात,
पालकभात, पुर्या, फ्लॉवर बटाटा वाटाणे रस्सा भाजी, फुग्या मिरचीचं रायतं, मटकीची / मसुराची उसळ असे प्रकार करून पहाणार का?
राजमा, छोले,पनीर असले प्रकार ते लोक घरी करतच अन खातच असतील. आपल्या पद्धतीचे प्रकार करून खाऊ घाल एक दिवस
अल्पना,
अल्पना, पनीर मखनी... एकदम सोप्पी आणि दिसायला रिच. मागे रेसिपी टाकली होती इथे. बघते मिळतेय का..
छोले सोप्पे आहेत पण बर्यापैकी कॉमन. मेथी निवडणं वगैरे कटकटीचं आहे म्हणून नाहीतर मेथी मटर मलई वगैरे...
बायांनो,
बायांनो, तिला राजमा, छोले, पनीर व गोबी असलेले पदार्थ नको आहेत
अल्पना, शोनुने एक मोड आलेल्या मुगाची रेसिपी दिली होती. ते बघ आवडते का तुला. त्यात काजु वगैरे असल्याने आणि मसाला वेगळ्याच स्वादाचा असल्याने छान वाटते.
अल्पना,
अल्पना, थोडा मराठी मेनु कर.
भरली वांगी, मटारची उसळ, गाजराची किंवा कोबीची किंवा काकडिची दाण्याचा कूट घालून आणि फोडणी देऊन कोशिंबीर, सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी. टोमॅटोच नारळाच दूध घालून सार, आणि पुलाव किंवा चक्क टोमॅटो भात. भरली वांगी आदल्या दिवशी करून ठेवायची म्हणजे चांगली मुरतात. बाकी सगळा पटकन होणारा मेनु आहे. गोडाचं म्हणुन भरपूर साजूक तूप, केशर आणि बदाम घालून शीरा. तोही आदल्या दिवशी करता येईल. त्यात केळ जरूर घाल. हा मेनू सगळ्या नॉर्थ इंडियन्सना आवडतो, त्यांना करता येत नाही. पनीर, छोले वगैरे आपले पदार्थ नाहीत. त्यांना आपल्या पदार्थांची ओळख करून दे. माझा नवरापण नॉर्थ इंडियाचा आहे. हे पदार्थ त्याला आणि त्याच्या फॅमिलीला खूप आवडतात.
अरे मी
अरे मी केलेला बेत सांगते इथे.. छोले समोसा (समोसे विकतचे
) आणी फालुदा. सोबत अगदी पिटुकले उकडीचे मोदक. (प्रत्येकाला एक किंवा दोन येतील असे ताटात मा.म्डलेले. ) छान बेत झाला.
अल्पना, तुला पुरणपोळी नको असेल तर कर्नाटकाकडे हयग्रीव म्हणून एक प्रकर करतात. तो जातोय का बघ. जाणकार रेसीपी देतीलच. :)]
आणि ओले काजू मिळाले तर त्याची पण उसळ करता येइल.
--------------
नंदिनी
--------------
श्यामली,
श्यामली, अग पुपो येत नाही मला नीट...
नंदिनी हयग्रीव काय प्रकार आहे? कधी ऐकले नाही नाव. ओल्या काजुची उसळ पण बाद.. (इथे मिळतिल की नाही शंका आहे)
शोनु तु अन आर्च नी सांगितलेला बेत छान वाटतोय..
ठेचा (सगळ्यांना खुप आवडतो घरी), फुग्या मिरचीचं रायतं, टोमॅटोच नारळाच दूध घालून सार, मसुर / मोड आलेले मुग उसळ (शोनु मी ती रेसेपी शोधायचा प्रयत्न केला, नाही सापडली. जुन्या माबोवर पण बघितलं. प्लिज परत लिंक द्याल?), मेथीची लसुण, कुट घातलेली सुकी भाजी, मसालेभात / टॉमेटोभात, फुलके.
ह्याच्याबरोबर गोड काय करु? मला खीर करायची नाहीये. शिरा एक पर्याय आहे. अजुन काही? मी गुलाबजाम / बासुंदी करु शकते. (म्हणजे मला करता येतं. मी दुसरं काही गोड कधी करुन बघितलं नाहीये) अजुनकाही करु का? तळण वैगरे नाहीये घरी काही सध्या, विकतचे पापड सोडले तर.
गोडात आमरस
गोडात आमरस शिरा कसा वाटेल अल्पना? (आंबे महाग आहेत यंदा)
हयग्रिव म्हणजे पुपोची लांबची कझीन. .. म्हणजेच पुपोच्या सारणात खोबरे घातले कि झाले. पुपो करताना जे सारण करतो ना ते न आळवता त्यात तूप,काजू,केसर्,ओले खोबरे वगैरे टाकायचे. हेच कन्नड मंदीरात वाटतात सिरसीला. पण हे असे नुस्ते पुरण कोणाला किती खायला आवडेल माहीत नाही.(मला ते बरेच गोड लागते). त्यापेक्षा पुपो बरे असे मला वाटते.
अशीच हवी तर खीर करु शकतेस. आणखी स्टेप वाढवून त्यात दूध घालून ह्या मिश्रणाची.
आंबे अजुन
आंबे अजुन नाही आले इथे. नाहीतर आम्रखंड / आमरसच केला असता... पुपोच जमत नाहीत मग हय्ग्रिव काय जमणार मला? मिट्ट गोड नाही आवडत ग जास्त.
ही खीर वेगळी वाटतेय थोडी.
या
या हयग्रीवची कृति, साप्ताहिक सकाळच्या साइटवर आहे.
अल्पना इथे
अल्पना
इथे आहे पहा मुगाची रेसिपी
http://www.maayboli.com/node/4126
सायो ने लिहिलेली बर्फीची कृती पाहिलीस का? सोपी अन आधी करून ठेवता येण्यासारखी आहे.
पुपोच जमत
पुपोच जमत नाहीत मग हय्ग्रिव काय जमणार मला?
>> पुपोपेक्षा सोप्पय. आणि जास्त गोड करायचेच नाही. गूळ थोडा कमी घालायचा. थोडे दूध घातले की खीरीसारखे होते.
ओले काजू मिळत नसतील तर सुक्या काजूची पण उसळ करतात. त्याची कृती कोणी देइल का>? मला पण करायचे आहे!!
--------------
नंदिनी
--------------
मी परवा
मी परवा कोबी + काकडी + टोमॅटो + साल काढलेलं सफरचंद + द्राक्षं अशी कोशिंबीर केली. वरून हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची फोडणी घातली. छान झाली होती.
आणि काल स्वातीच्या रेसिपीने उंधियो केला. अफलातुन झाला होता. पण खूप वेळ लागला.
प्राजक्ता
धन्यवाद
धन्यवाद शोनु.
मला
मला शाळेच्या मल्टीकल्चरल नाईटसाठी सोप्पा मेन्यू/फिंगर फूड सुचवा. खूप वेळ घालवून आटापिटा करुन काही करायचं नाहीये. समोसे, खमण, पावभाजी असा मेन्यू ठरलाय. मला पकोडे, कटलेटस अशा प्रकारात मोडणारं काहीतरी हवंय, तर काही आयडिया द्या प्लीज.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6359?page=1
इथे पनीर स्नॅक्स ची ( कॉर्न फ्लेक्समध्ये घोळवून ) रेसिपी दिली आहे , ते बघ कसे वाटतात .
सायो,
सायो, पालक्-चीज बाँब्स बनव. पाहिजे असल्यास मी रेसिपी देईन.
................................
माझे जगणे होते गाणे...
प्राची,
प्राची, रेसिपी योजाटा.
शनीवारी
शनीवारी यजमानांच्या कार्यालयातील ४ डोकी मधल्या वेळच्या फराळासाठी येणार आहेत, दुपारी ३.३०-४.०० वाजता? काय करावे बरे? फालुदा किंवा ट्रायफल पुडींग करीन असा विचार आहे पण त्याबरोबर तिखटा-मीठाचे काय करता येइल? माझ्या २ वर्षाच्या लेकीला सांभाळून मला एकटीलाच करायच आहे सगळं... जरा सुचवा ना प्लीज...
प्राची ते पालक - चीज बाँब्स काय प्रकार आहे???
इतके
इतके आधीपासुन मेन्यु ठरवुनसुध्दा व्हायचा तो गोंधळ झालाच. येणारे पाहुणे आज येणार होते, व त्यानुसार मी निवांत होते. अचानक काल संध्याकाळी ६ वाजता फोन आला, आम्ही आज रात्री तुमच्याकडे येत आहोत मुनिषभैयाला भेटायला. (माझे मोठे दीर जे सद्ध्या इथे आले आहेत.). एक तासात पोचु व रात्री मुक्कामाला तिथेच राहु. (नशिब दोघेच येणार होते, त्यांच्या आई-बाबांचे येणे कँसल झाले) घर अस्ताव्यस्त पसरलेले.. माझा चक्क अवतार म्हणावा अशी परिस्थिती..कामवाली मुलगी निघाली होती, तिच्याकडुन पोळ्या करुन घेतल्या. घर आवरल्यावर घरात अस्लेल्या भाज्याबघुन मेन्यु बदलला. मेथीची कोरडी लसुण घालुन भाजी (मेथी निवडुन ठेवली होती), काकडी-कांदा-गाजर कोशिंबीर, टोमॅटोचे सार (नारळ नव्हता म्हणुन नुसते सुके खोबरे घालुन), मसालेभात हे ठरले. घरात दुसरी भाजी फक्त मटार व दुधी ह्या होत्या. कोफ्ते करावे असा विचार करत होते. मेथीची भाजी व टोमॅटो उकडेपर्यंत पाहुणे पोचले व नवर्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे आलु मटर करायचे ठरले (ही भाजी नवर्याने केली), पापड भाजुन व ठेचा हे पदार्थ वाढवले. गोड काय करावे हे ठरत नव्हते (खीर हा एकमेव पर्याय दिसत होता).
चक्क एक तासात घर आवरणे व एक तासात सहा जणांचा स्वैंपाक ( पोळ्या सोडुन हं) असा विक्रम केला न मी..
पण पाहुण्यांनी येताना राजभोग नावाची मिठाई आणल्यामुळे गोड करावं लागलं नाही. शेवटी विकतच्या कुल्फ्या आणल्या.
पण नवरोबा खुश..
लाजो
लाजो दाबेलि कर तयारि पहेलेच करता येते. ट्रायफल पुडींग कसे करायेचे.
भल्ले
भल्ले शाब्बास अल्पना... मान गये उस्ताद.
वेल१२३, दाबेली ची आयडीया चांगली आहे, पण दुपारी चहाच्या वेळेला जरा जास्त हेवी नाही का होणार?
बाय द वे, आता ४ ची ६ डोकी झालीयेत...
लाजो ढोकळा
लाजो ढोकळा चालेल का? सोप्पा आहे करायला. आधी करुन ठेवलास तरी चालेल.
Pages