Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरती, घडा भाजी इथे लिहिली
आरती, घडा भाजी इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/13702
मंजु, पालक-पनीर रोलची कृती
मंजु, पालक-पनीर रोलची कृती आरती टाकेलच. पाटवड्याच्या आमटीतल्या वड्यांची कृती मिनोतीने टाकली आहे नव्या मायबोलीत. आमटीची कृती आरती देइल
भोपळ्याचे मुटकुळे म्हणजेच मुटके. त्याची कृती इथे कुणीतरी दुधी भोपळ्यावर एक स्वतंत्र धागा काढला होता तिथे आहे.
आरती फोटो काढुन इथे टाकायला
आरती फोटो काढुन इथे टाकायला विसरु नको.
आमचे ते पाहुनच पोट भरेल. 
सिंडे, जल्लां मग तू काय
सिंडे, जल्लां मग तू काय लिहीणार
माझं रेसिप्यांचं दुकान बंद
माझं रेसिप्यांचं दुकान बंद आहे सध्या
दु,भोपळा फुंदके इथे आहेत.
दु,भोपळा फुंदके इथे आहेत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94017.html?1175248821
आमचे एक गटग पॉट्लक
आमचे एक गटग पॉट्लक ठरलय्,व्हालेन्टईन डे चा मुहुर्त साधून. वेज पफ बरीटो पिझा असा मेनु आहे,माझ्या कडे स्वीट आलय. याच्या जोडीन काय स्वीट चान्गल वाटेल? सुचवाल प्लिज....
माझ्या मनात ब्राउनी आहे.पण एक कुटुम्ब अन्डी न खाणारे आहे.एगलेस ब्राउनी ची रेसिपी असल्यास ती ही चालेल .....
ह्या ब्राऊनीज मस्त होतात -
ह्या ब्राऊनीज मस्त होतात - http://earthvegan.blogspot.com/2009/09/fat-free-brownies.html
किंवा - http://evolvingtastes.blogspot.com/2008/07/were-brownies-outrageous-enou... हे ब्राऊनी कपकेक्स मस्त होतात.
व्हॅलेन्टाइन्स डे चा मुहूर्त
व्हॅलेन्टाइन्स डे चा मुहूर्त आहे तर हार्ट शेपच्या कुकीज, केक, कपकेक किंवा गोल कुकीजवर लाल्-गुलाबी हार्टच्या आकारचे स्प्रिन्कल लावून डेकोरेशन करता येईल.
इथे स्ट्रॉबेरी शॉर्टकेकची छान
इथे स्ट्रॉबेरी शॉर्टकेकची छान रेसिपी आहे. व्हॅलेंटाइनडेला साजेसं डेकोरेशन पण आहे.
मला मदत हवी आहे. आमच्याकडे
मला मदत हवी आहे.
आमच्याकडे अमेरीकन कपल रविवारी दुपारी जेवायला येणार आहे. ( पहिल्यांदाच). त्यांच्यासाठी काय मेन्यु करावा सुचत नाहीये. भारतीय जेवण चालेल असे ते म्हणाले ( तसेही मला दुसरे अजुन काही येत नाही). तर शक्यतो कमी ति़खट असा मेन्यु मला सुचवाल का प्लीज. ( मांसाहारी पण चालेल)
स्टार्टर्स
मेन मेनु
गोड पदार्थ
पुढचे चार दिवस स्नो आहे त्यामुळे ग्रोसरीला आजच जावे लागेल तर लवकर सुचवाल का?
धन्यवाद
मी सुचवू का? आलेच जरा..
मी सुचवू का? आलेच जरा..
स्टार्टर ढोकळे, दीपची मिनी
स्टार्टर ढोकळे, दीपची मिनी कचोरी. मेन कोर्स पालक पनीर, तिखट न घालताही मस्त लागतं, एक कोशिंबीर, पोळी, जीरा राईस, दाल तडका आणि श्रीखंड. ह्या कशातच तिखटाची आणि मसाल्याची गरज नाही. पनीर एवजी हेल्दी म्हणुन तोफु वापरु शकतेस. सोबत सुकी बटाट्याची, भेंडीची किंवा बीन्सची भाजी पण करु शकतेस.
मनःस्विनी, हो सुचवना
मनःस्विनी,
हो सुचवना चालेल.
प्रीती
धन्यवाद
छान वाटतोय मेन्यु.
स्टार्टर मध्ये मी पण ढोकळे ठेवायचा विचार करत होते.
तिखट कमी अशा साठी लिहीले की मला माहीत नाही ते कितपत तिखट खातात म्हणुन. आणि अभारतीयांना जेवायला बोलवण्याचा पहीलाच प्रसंग.
वरती लिहायचे राहीले की मांसाहारी पदार्थ पण चालतील. बदल केलाय वरती.
चिकन तंदुरी बेश्ट मग. माझ्या
चिकन तंदुरी बेश्ट मग. माझ्या पहाण्यातले अमेरीकन तरी कमीच तिखट आणि मसाले खातात. एका अमेरीकन कलीगल मी मुगाची उसळ दिली तिला ती इतकी आवडली की मुगाचं पॅकेट घेऊन ये म्हणुन सांगितलं तिने :). ह्या मेनुत तिखट खात असतील, नसतील तरी फरक नाही पडणार आणि ह्या वेळी विचारुन घे आणि पुढच्यावेळी तसे कर :). थंडी आहे तर सुरुवातीला मिक्स वेज सुप पण मस्त वाटेल.
व्हेजमधे छोले/ आलू
व्हेजमधे छोले/ आलू गोबी
मांसाहारी चालत असेल तर चिकन माखनी गोर्यां ना नक्की आवडतं
गोडामधे गुलाबजाम( अमूल चे गुलाबजाम छान आहेत.) किंवा मँगो लस्सी.
माझ्याकडे मागे एकदा अभारतीय आले तेव्हा मी असा मेन्यू केला होता.
जे ईथे भारतीय रेस्टॉरंट मधे,
जे ईथे भारतीय रेस्टॉरंट मधे, बुफेत असतात ते पदार्थ नाही केलेस तरी चालतील. त्यांनाही काहीतरी वेगळे ट्राय करायला मिळेल. वर दिल्याप्रमाणे, पोळ्या, श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि मसाले भात, काकडीची कोशींबीर्,तळलेले पापड, पंचामृत, असा अस्सल मराठी आणी सोपा मेनु करता येईल.
चिकन तंदुरी ची कल्पना पण
चिकन तंदुरी ची कल्पना पण चांगली वाटतेय.
दुसर मला विचारायच होत की सॅलेड ठेवावेच का यांच्या पद्ध्तीच? ही लोक बर्यापेकी सुप किंवा सॅलेडनेच सुरवात करतात ना? माझ्या कडे रांच ड्रेसींग आहे व जुन्या मायबोलीत वाचलेल ते मीरपुड, ऑलीव ऑइल, व्हीनेगर वापरुन करतात ते मला करता येत.
मी आतापर्यन्त माझ्या अमेरीकन
मी आतापर्यन्त माझ्या अमेरीकन मित्रांमध्ये फेमस झालेला मेनू लिहितेय. तू तुझ्या आवडी व वेळेप्रमाणे करु शकतेस. प्रितीने सुचवलेले आहेच. दुसरे म्हणजे मसालेदार पेक्षा फ्लवरफुल्ल ठेव जेअण ते ज्यास्त छान वाटते. एकदा असेच त्याना विचारून अंदाज घे पण की काय टाईपचे मसाले आवडतात. लसूण चालते का? हे बरे असते ,उगाच नावडीचे पदार्थ करून , आपली मेहनत वाया घालवणं.
स्टार्टर्स:
१) समोसे + पुदीना चटणी, समोसे ज्यास्त आवडतात. आतील मसाला ज्या ब्रँडचा तिखट नसेल व वेळ नसेल तर फ्रोजन आणून शकतेस.
2) गरवीची कचोरी + हिरवी चटणी. (मी गरवीचे खल्लीय्,खिलवलीय व छान आहे)
३) चिकन रेशमी कबाब. बरोबर मस्त पुदीना चटणी, टोमॅटो लिंबू सॅलड
४) मसाला पापड्(छोटे पापड मिळतात देसी दुकानात).
५) स्पिनच चीज डिप + खारी बिस्कीटे
६) अवाकडो डिप व बिस्किटे
६) eggplant डिप व बिस्किटे(इथे रेसीपी लिहिलीय).
७) वेजी कटलेट्स (दिपचे चांगले असतात एकलेय. मी खाल्ले नाहीत).
मेन मेनू: (लिहिते जरा.. मध्येच कोण कोण येतात ऑफीसमध्ये)...
सूपः
म्ल्लगीवाटणे सूप
डाळीचे सूप्(अग हो आवडते त्यांना. थंडीत खरेच आवडेल त्याना हे प्यायला. डाळीच कढणं टाईप करायचे भरपूर टोंमेटो रस घालून व जरा सेलेरी, बारली, गाजर टाकून, त्यात आपले भारतेये जिरा, कालमिरी पूड) वगैरे.
स्वाती, सॅलड ऐवजी छानशी कांदा
स्वाती, सॅलड ऐवजी छानशी कांदा टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर (शेंगदाणा चालत असेल तर दाण्याचा कूट घालून), टोमॅटोचं सार/कढी, आलू-पालक फ्राय्भाजी, एखाद्या कडधान्याची खोबर्याचं वाट्ण लावून अगदी कमी तिखट अशी उसळ किंवा आमटी, कांदाभजी, पापड, पराठे, पुलाव असं काही चालेल? किंवा मग फोडणीच्या इडल्या, शेवयीचा उपमा, चटणी, मूगडाळीची धिरडी, मेदूवडा अश्या प्रकारचा मेनू? (फ्रूट क्रीम, फ्रूट सॅलड आवडतं असं बघितलय).
अॅपेटायझर्समधे ढोकळा नक्की आवडेल. बरोबर पफ पेस्ट्रीत बटाट्याची भाजी भरून चटणीशी??
रांच ड्रेसींग त्यांचाच प्रकार
रांच ड्रेसींग त्यांचाच प्रकार झाला की आणि कोशिंबीर म्हणजेच सॅलडचा प्रकार नाही का?, दही हे ड्रेसिंग. पचडी पण करु शकतेस. लेट्युस किंवा कोबी चिरुन शेंगदाण्याचं कुट, मीठ आणि लिंबु, वाटल्यास थोडं ऑलिव्ह ऑईल. हे भरपुर खाल्लं जातं.
भारतीय पध्दतीचं फिश फ्राय,
भारतीय पध्दतीचं फिश फ्राय, श्रिंपफ्राय, बेक्ड मासे हे पण फार आवडतं असं दिसलं.
<<मसालेदार पेक्षा फ्लेवरफुल्ल
<<मसालेदार पेक्षा फ्लेवरफुल्ल ठेव>> हो मला पण तेच वाटते.
मेन मेनु मध्ये मी तु लिहीलेली चमचमीत मटणाची रेसेपी वापरुन चिकन बनवण्याचा विचार करत होते.
तु कंप्लीट कर तुझा मेन्यु. इंटरेस्टींग वाटतोय
भारतीय पध्दतीचं फिश फ्राय,
भारतीय पध्दतीचं फिश फ्राय, श्रिंपफ्राय, बेक्ड मासे हे पण फार आवडतं असं दिसलं. >> हो हो त्यांना आवडतं हे.
मृण्मयी, छान वेगळा वाटतोय
मृण्मयी,
छान वेगळा वाटतोय मेन्यु.
मी आत्ता विचार करतेय की
अॅपेटायजर मध्ये ढोकळा, चिकन रेशमी कबाब.व चिकन तंदुरी करेन. पुदीना चटनी वगेरे.
मग मेन कोर्स मध्ये मृण्मयी म्हणतेय तसे कांदा टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर किंवा प्रीति ने सुचवल्या प्रमाणे लेट्युस किंवा कोबी ची कोशींबीर . म:नस्विनेने लिहीलेल्या रेसेपीने चिकन.
कडधान्याची खोबर्याचं वाट्ण लावून अगदी कमी तिखट अशी उसळ, मालवणी मसाला वापरुन फिश फ्राय (तलापिया) पोळ्या. जिरा राइस.
गोड साठी फ्रूट क्रीम किंवा फ्रूट सॅलड
तर हे कस वाटतय?
प्यायला काय?
प्यायला काय?
सिमलामिरची आणि बटाट्याची
सिमलामिरची आणि बटाट्याची नुस्त्या तेल-जिर्याच्या फोडणीची आणि हळद, मीठ आणि धणेपावडर घातलेली भाजी पण इकडल्या जनतेत पॉप्युलर आहे.
हो मी विचारच नाही केला. पाणी
हो मी विचारच नाही केला.
पाणी व कोक.
हे अगदीच काही नाही अस वाटतय का?
मी अल्कोहोल पीत नाही व कधी आणल ही नाहीए अजुन.
अरे मला सायलीमी व अमयाचे
अरे मला सायलीमी व अमयाचे प्रतीसाद दिसलेच नाहीत.
धन्यवाद दोघींनाही.
मी उसळ हरभरयाची करायचा विचार करतेय किंवा मग छोले. तर आता फायनल मेन्यु
अॅपेटायजर - ढोकळा, चिकन रेशमी कबाब.व चिकन तंदुरी ( चटनी धरुन)
मेन कोर्स - कोशींबीर, चिकन करी, उसळ / छोले, फिश फ्राय
पोळ्या, जिरा राइस.
गोड - फ्रूट क्रीम किंवा फ्रूट सॅलड
पिण्यासाठी - सोडा व पाणी.
तर हे ठीक आहे का? काही कमी जास्त केले पाहीजे का?
तुम्ही सर्वांनी एवढ्या लगेच मदत केल्याबद्द्ल धन्यवाद. मला काही सुचतच न्हवते. मदतीसाठी धन्यवाद परत एकदा
चिकन आणि उसळ दोन्ही वाटणाचे
चिकन आणि उसळ दोन्ही वाटणाचे पदार्थ होतील. छोले देसी रेस्टॉरंटमधे असतातच. सॉरी तुमचा मेनु फायनल झालाय पण मला असे वाटते.
फक्त सोडा ठेवण्यापेक्षा ज्यूस, अॅपल सायडर ठेऊ शकता.
Pages