बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायलीमी गोड कशाला हव अजुन? तिळकुटाचे लाडु करणार आहेस ना?
थंडि आहे म्हणुन मसाला दुध दे. स्विट भि - हेल्दी भि.

केतकी, मसाला दूध चांगला ऑप्शन आहे ग पण येणारी मुलं तशी लहान आहेत १ ते ७ वयोगटातली. म्हणून काहीतरी असा पदार्थ बघत होते कि जो सांडला तरि फारसा मेस होनार नाही.
बघू सध्या आंबा-नारळ वडी/ मुगाचा शिरा यातलं काहीतरी ठरवते आहे.

मला पार्टीसाठी अ‍ॅपेटायझर म्हणुन समोसे विकत आणायचे आहेत. दीपचे समोसे कोणी ट्राय केले आहेत का? लहान मोठे दोन्ही पैकी कोणते चांगले आहेत? दुसरे काही पटकन होणारे आहे का?

दीपचे स्पिनॅचचे समोसे सगळ्यात छान आहेत. मी बेक करते, जाऊबाई तळून स्वतःचे म्हणून खपवतात :-).
मटारचे आणि आणखी एक फ्लेवर ट्राय केले, तेही ठीक आहेत, पण पालकाचे खरेच छान!

चटणी येते त्यात ती चांगली आहे. कमी वाटली तर दीपचीच फ्रोझन मिंट किंवा कोथिंबीर चटणी आणा Happy

जाऊबाईंनी तळले म्हणजे ते त्यांनी केले, बरोबरच आहे ना. सगळेजण ताव मारतातच, मीही मारते. त्यांच्याकडून याबाबतीत शिकण्यासारखे बरेच आहे. ते माझे लौकिकार्थाने सासर असले तरी "इन्स्टंट" माहेर आहे.

मला गरवी गुजरतचे प्रॉडक्त्स आवडायल अलागलेत. सहसा मी फ्रोजन टाळतेच, उलट नाही खात पण एकदा एका मैत्रीणीकडे केले ट्राय नी आवडले. एक दोनदा आणले व छान वाटले.

गरवीचे हे प्रकार ट्राय केले,

लिलवा कचोरी,( हि खरेच चांगली वाटली)
अळोववडी(खूप खास नाही पण 'बरी आहे'),
मेथी ठेपला(हे अगदी ओके आहेत पण एकदमच हात पाय गळले आहेत, थंडीत बाहेर जायचे नाही गाडी हाकत तरच हे ठिक)

धन्यवाद सगळ्याजणींना! मला थोडे टेंन्शनच आले होते की कसे काय असतील म्हणुन ! आता निर्धास्त झाले. दीप चे मोठे लहान कोणतेही आणले तरी चालेल !!

दीपच्या कुठल्या बरं समोश्यात खूप पुदिना असतो? इतक्यातच खाल्ले. तेवढा एक दीपच्या समोश्यांचा प्रकार खास आवडला नाही जनतेला.

मनु, लिलवा कचोरी बेक करायची आहे की तळायची आहे?
म्रृण्मयी, दिपच्या कोणत्या समोसा प्रकारात पुदीना आहे? आठ्वल तर सांगतेस का? नेमका तोच प्रकार आणला जायचा!

लिलवा कचोरी वरून जरासं तेल फासून बेक करून पण छान लागते. तळल्यावर तर उत्तमच! Happy

डबा टाकून दिलाय, आता आठवत नाही. पण शोधते.

गरवी गुजरातची चकली (चकरी असतं पाकिटावर) पण मस्त आहे...
बाकी चकल्या म्हणजे मुरुक्कु असतात..ही अगदी छान लागते...पण इथे ह्युस्टनमधे सगळ्या इंडियन स्टोअर्स मधे नाही मिळत...

झी, काहीही करायचे नाही. काढ फ्रीजरच्या बाहेर अर्धा तास आधी पाहुण्यांनी, अर्धा तासात पोहचतोच जवळच आलोत असा फोन केला की. मग पाहुने पार्किंग लॉटात आले की अवन चालू कर ३२५ वर २२ मिनीटे सेट कर. मग जरासा तापला की ७ व्या मिनीटाला आत टाक(कचोर्‍या गं).
मग काढ बाहेर १५ व्या मिनीटाला तोवर पाहुणे पाणी पितील, जरा फ्रेश होतीलच. मग दे काढून कचोरी आताच केल्या घरी बेक करून असे म्हणत.. Wink वरून दिपची हिरवी चटणी... Happy

अमेरिकेत सगळीकडे दीप चे products मिळतात. पाहुण्यांना माहित असेल कि हे samose दीप चे आहेत आणि तुम्ही "मी केले" असं सांगितलात तर उगाच पोपट होईल Happy
सरळ खरं सांगावं कि दीप चे आहेत ! (असं माझं मत )

एका मित्राला केळवण करायचे आहे. [पण जेवायला तो एकटा नसुन ७-८ लोक असणार आहेत]महाराष्ट्रियन मेनु असणार आहे. मी ठरवला आहे तो मला अगदिच तोच्-तो वाटतो आहे. मुलिंनो काही बदल सुचवा न मला प्लिज ...

मी साधारण असा ठरवला आहे :
स्टार्टर : पनिर-पालक रोल, भोपळ्याचे मुटकुळे, सफरचंद वडी.

मेन मेनु :
मसाले भात (तोंडली), मठ्ठा, गाजराची कोशिंबीर, स्टफ सिमला मिर्ची, दहीवडा, पोळी किंवा पुरी, बाकी डावे-उजवे असेलच.

'लाजो' चे पुडींग करणार आहे डेझर्ट म्हणुन Happy

एक रस्सा भाजी काय करावी कळत नाही.

उंधियु करणार का ? त्या भाज्या अजून मिळत असतील. घडा भाजी म्हणून पण एक प्रकार करता येईल. संक्रांतीच्या आदल्या दिवशी (भोगीला) एक मिश्र भाजी करतात, ती पण करता येईल.

साताठ लोकांसाठी उंधियु ? ए नको दुसरं काही तरी कर. मला तरी भारी आवडेल हा मेनु जेवायला. हाच ठेव. मठ्ठा आणि दहीवडे दोन्ही एकत्र नको. त्यापेक्षा दही वडे रद्द करुन भरली वांगी नाहीतर पाटवड्याची आमटी कर आणि मग पोळ्या ठेव पुर्‍या नको.

मग मठ्ठा न करता दहिवडे करते Happy ...
भरली वांगी , पाटवड्याची आमटी, घडा भाजी ... चालु शकेल.
किंवा एखादी कोफ्ता करी ? ... एखादा नविन प्रकार सुचवा ना.

घडा भाजी कशी करायची पण ?

महाराष्ट्रियन मेनु असेल तर कोफ्ता करी कशाला? भरल्या वांग्यालाच थोडा रस केलास तर अगदी कोरडी करण्याऐवजी?

यो.जा.टा. चा अर्थ, इथे द्या असा आहे असे समजुन .. Happy
केले की फोटु वगैरे काढेन आणि मग टाकते इथे क्रुती.

पाटवड्यांची आमटी मिनोती लिहीली आहे कुठेतरी. पण पनीर पालक रोल बाबतीत उत्सुकता आहे. आरती वेळ झाला की कृती योग्य जागी टाक. (यो.जा.टा.) Happy
बेत छानच आहे.

Pages