बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनु, अगं जेवायला येणारे लोक मराठीच आहेत. तूरडाळीच्या पुपोला आमच्या घरातले अजिबात तोंड लावणार नाही. मला मोहनथाळ आणि मगसच्या कृतीची लिंक दे ना...

अच्छा! मला वाटले की कोणी गुज्जु येणार आहे. (मलाही गुज्जु पुपो आवडत नाही).:)
मोहनथाळ वेळखाउ आहे. तरी दोन्हीची कृती लिहिते. कधी हवी आहे?

अग ते मगस्(गुज्जु उच्चार) नी मोहनथाल कजिन्स आहेत रेसीपीत. ते कसे पुपो आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी जराशी पद्ध्त वेगळी आहे व नावे वेगळी( मांडे व पूपो कजिन्स तसेच) तसे काही गुज्जु मगज म्हणतात तर काही मोहनथाळ. लिहिते १० च्या आत. पतिसा(सोनपापडी) एक आठवले गुज्जु पदार्थ. लिहिलीय त्याची रेसीपी इथेच आधी.
तु घाटकोपरच्या कंदोईकडे गेलीस ना १० ऑक्टच्या आत किंवा दिवाळीला तर मस्त शुद्ध तूपातले मोहनथाळ मिळेल. अहाहा... फेव आहे माझा.

.

दिप्या तुला एकदा दिलिये मी शोधुन हराभरा कबाबची रेसेपी.. बहितेक तुझ्या विपुमध्ये असेल... अन न शोधताच विचारलस परत. शोधलं की लगेच सापडते जुन्या माबोवरची रेसेपी.

भोंडल्यासाठी ओळखता येणार नाही अशी खिरापत सुचवा ना. कमी वेळात होणारी हवी. >>>
तळलेला पापड तांदुळाचा, तुकडे करून किंवा बटाट्याचे छोटे पापड - तळलेले.
गुळपापडी?
आप्पे? (रंगीबेरंगी करावेत अन पिठातच फोडणी घालावी म्हंजे चटणी नको)
कणकेचा केक - अंडेविरहीत तुकडे करून ??

अन न शोधताच विचारलस परत. शोधलं की लगेच सापडते जुन्या माबोवरची रेसेपी.
>> हो ते सर्च नव्हतं माहीत आत्ताच कळलं, ह्यापुढे ही गलती नाय करणार.

कणकेचा केक ... छान वाटेल....रेसिपी देणार ?
गुळपापडी पण मस्त आयडिया

तराना, मला वाटते १०-१२ जणासाठी ४-५ वाट्या छोले लागतील.

तुमचा मेनू पण छान वाट्तो आहे पण पार्टीच्या दिवशी कमी काम पडेल ह्या द्रुष्टीने जरा वेगळा मेनु सुचवते आहे, पहा कसा वाटतो -

समोसा चाट, दही- वडे, वेज पुलाव, मलई कुल्फी.

पजाबी समोसा देसी दुकानातून , दीप चे फ्रोझन दही- वडे मिळतात ते आधी गरम पाण्यातुन काढुन त्यातले पाणी हाताने दाबुन काढायचे. पार्टीच्या दिवशी गोड दही बनवुन त्यात mix करायचे.
छोले, मलई कुल्फी, वडे आदल्या दिवशी करुन ठेवता येतात.

धन्यवाद पिंकू,

कमी पड्तील छोले? Sad पार्टी आजच आहे. मी काल वाढ्वून ३ वाट्या छोले भिजवले. आता बहुतेक टोमाटो आणि बटाटे वाचवतील. समोसे पंजाबी दुकानातुनच आणणार आहे. दहिवडे आणि समोसे दोन्ही तेलकटच वाट्तील. तुझी पुलाव ची आयडिया छान आहे. बघू आता काय काय होतय !

मी जी गूळपापडीची कृति लिहिली होती त्यात पाक करायचा नव्हता तर गूळ बारिक चिरुन गरम मिश्रणात मिसळायचा होता. असा गूळ वितळण्यासाठी जे तपमान लागते ते मिश्रण आणि पिठे भाजलेले भांडे यातून मिळते. मायक्रोवेव्ह मधे पिठे भाजल्यास, ते तपमान भांड्यातून मिळणार नाही. म्हणून परत मिश्रण गरम करावे लागेल, यावेळी जरा लो सेटींग ठेवावे लागेल. पाणी न घातलेला गूळ मायक्रोवेव्ह मधे लवकर जळू लागतो.

कोजागिरिला कोणी फंडू असा मेनु सुचवेल का? सध्या डोके चालत नाहीये.:). ते रोजचेच भेळ, पाव भाजी, मिसळ, रगडा,कचोरी वगैरे खायला,बघायला बोरींग वाटतेय.... हलका फुलका मस्त मसाला दूधाबरोबर.. घरीच बनवायचेय अशी कल्पना आहे सगळ्या मैत्रीणींची.

कोजागिरिला, सगळं पांढरच ठेवायचं (पौर्णिमा म्हणुन). इडली चटणी, दही भात आणि रसगुल्ला किंवा रसमलाई Happy

एकदा मी कोजागीरीला ढोकळा (हळद न घालता)- चटणी सेन्डविचेस, तान्दळाच्या भाकर्या, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी (हळद नाही..), नेहमीचे लेट्युस सलाड फेटा चीझ घालुन,खोबर्याच्या वड्या, मसाला दुध केले होते.भाकरी सोडुन सगळे आधी जमेल तसे करुन ठेवले. ५-६ जणाकरताच असल्याने भाकरी करणे अवघड नाही वाटले पण खुप लोक असतील तर एकटीला त्रासाचे आहे.

मेजरिंग कप मधला कप (राईस कुकर बरोबर आलेला नव्हे) असेल तर २.५ ते ३ कप रवा, साधारण १ ते दीड कप चिरलेला कांदा, ३/४ वाट्या मटार दाणे असा केला तर पुरेसा होइल.

मनु, ब्रेड रोल्स आणि व्हेज पुलाव बघ कसं वाटतंय.. एखादं सॅलड आणि चटणी, सॉस वगैरे होईलच आणि नंतर मसाला दूध. हलका पण पोटभरीचा मेनू.....

ऑफिसच्या दिवाळी पॉटलकला काय घेउन जाता येइल? अ‍ॅपेटायझर म्हणुन न्यायचे आहे..
स्वाती, थीम काय आहे?>>बहुधा दिवाळी हिच थीम असावी Lol
१)सुरळीच्या वड्या..इथे जुन्या मायबोलीवर फुलप्रुफ रेसीपीज आहेत.
२)व्हेज कटलेट..मधे बरीच चर्चा झाली होती या वर सुद्धा
३)मूग डाळ पकोडे आणि चिंचेची आणि हिरवी चटणी. हे गार झाल्यावर पण छान लागतात.
४)साबुदाणा वडे
५)मटार करंजी
६)कोथिंबीर वडी

कोथिंबीरीच्या वड्या, कॉकटेल समोसा (यात सारण वेगवेगळं बनवता येतं)
थालिपीठ (अगदी पुरीच्य आकाराची करायची लवकर होतात आणि मस्त लागतात)

Pages