Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 19, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through November 19, 2007 « Previous Next »

Radek
Friday, November 16, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील receipe मध्ये, गाजर हलवा गुलाबजाम तळण्या आधी भरावा. खव्याचे गोळे करुन मग त्यात सारण भरावे.

Daad
Friday, November 16, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काही सोप्पे आणि चटकन (हे महत्वाचं) स्टार्टर्स किंवा ऑन्ट्रे प्रकार करण्याच्या रेसिपीज कुठे मिळतिल?


Akhi
Friday, November 16, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीर वडी:
कोथिंबीर बारीक चिरलेली
बेसन
थलीपीठ भाजणी
धने पावडर ( किन्वा अर्धवट कुटलेले धने)
हिन्ग
मीठ
तिखट
लिंबु

वरील सर्व पदार्थ एकत्र करुन थोड तेल (मोहन) टाकय्चे. अगदी थोड पाणी घालुन भिजवुन घेणे.
मग ढोकळा जसा वाफ़वतो तसे पीठ तेल लावलेल्या ताटलीत थापुन मग वाफ़वणे.
नंतर वडी पाडुन shallow fry करणे.


Prajaktad
Friday, November 16, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद इथे बघ!
/hitguj/messages/103383/2650.html?1195076995

Suparna
Friday, November 16, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, "मायपत्री, रामपत्री, कबाबचीनी हे मसाल्याचे कुठले प्रकार आहेत?
ज्या मसाल्यात मायपत्री घालायची आहे त्यात पुन्हा जायपत्री पण वेगळी घ्यायला सांगीतली आहे म्हणजे जायपत्री व मायपत्री हे दोन्ही वेगळे मसाले असावेत. जायपत्री मला माहीत आहे पण मायपत्री काय व कसे असते?


Ami79
Sunday, November 18, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/64889.html?1195189763

इथे मी एक शंका विचारली आहे. कुणी सांगेल का?

आणखी एक, मखाणा नावाचे पांढर्‍या रंगाचे गोळे मिळतात. त्याचे काय बनवतात? दुकानदाराने मला सांगितले की ते तुपात तळून त्यात साखर घालून खातात.


Ami79
Sunday, November 18, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

roasted shevai बाजारात मिळतात. त्या कशा पद्धतीने रोस्ट केलेल्या असतात? साध्या शेवया घरी आणून तशा पद्धतीने रोस्ट करता येतील का?

Amruta
Sunday, November 18, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साध्या शेवया कढईत टाकुन भाजल्या तरी चालतात.

Prady
Monday, November 19, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मखाण्याची खीर करतात. आधी ते थोडे भाजून घ्यायचे आणी मग दूध साखर वेलची पूड घालून खीर करायची.

Shraddhak
Monday, November 19, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मखाणे थोडे भाजून, तूप जिर्‍याची फोडणी देऊन, मीठ टाकून खायलाही छान लागतात. आजारी माणसाला देतात सहसा कारण पचायला हलके असते म्हणे!

Manuswini
Monday, November 19, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मखणा भैय्ये लोक ज्यास्त खातात असे मला वाटते कारण माझा एक भैया मित्र(मुंबईत कोणाही MP, UP ला भैया'च' म्हणतात.:-)) तो नेहमी ह्याचे प्रकार आणायचा, त्याने आणलेली रस्स भाजी छान लागायची.

आपल्याला गव्हले कसे प्रिय तसेच UP,MP ला मखणाची खीर करतात नैवेद्य म्हणून.

चांगली लागते. :-). मला US मध्ये कुठे मिळाले नाही अजुन तरी, कोणाला मिळाले तर मला ही सांगा मी खीर करेन त्याची. बरेच वर्षे खाल्ली नाही :-(


Manjud
Monday, November 19, 2007 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

USA हून भावाने काय आणू म्हणून विचारले आहे. मी त्याला Coffee Grinder सांगण्याच्या विचारात आहे. तरी कोणितरी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या
१. ड्राय / वेट कहिही त्यात grind होते का?
२. त्यात कमीत कमी Quantity (म्हणजे ३ - ४ मिरच्या लसणीची पेस्ट वगैरे) सुद्धा छान बारीक होते का?
३. त्यात इडली किंवा मेदूवड्याची डाळ - तांदूळ वगैरे बारीक केलेले चालतील का? (भले १० घाणे लावायला लागले तरी चालतील.)
४. तिकडे सध्या कुठला चांगला ब्रॅंड आहे? आणि किंमत साधारण काय आहे?

मी मुद्दाम ह्या BB वर पोस्ट टाकलीये कारण हा BB जास्त वेळा पाहीला जातो. मॉड्स, मला उत्तर मिळाल्यावर तुम्ही ही पोस्ट इतरत्र हलवू शकता........


Manjud
Monday, November 19, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मेरे प्यार रस जरा चखणा, ओय मखणा' पैकी हे मखणे का?

मनु, बहुतेक माझ्या वरच्या प्रश्नाचे उत्तर तू देऊ शकशील. pls. help....


Dineshvs
Monday, November 19, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मखाणे म्हणजे कमळाच्या बियाच्या लाह्या. कमळाला शंकुच्या आकाराचे फळ लागते. त्याच्या सपाट भागात खोबणीत काळ्या बिया असतात. ( मुंबईत हि फळे मिळतात ) त्याच्या भाजुन लाह्या करतात.
या लाह्या सुक्या मेव्याच्या दुकानात मिळतात. भाव जास्त असला तरी वजनाने त्या हलक्या असल्याने भरपुर येतात.
या तुपात सोनेरी रंगावर तळुन त्याची पूड करतात. व त्याची खीर, हलवा वगैरे करतात.


Psg
Monday, November 19, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्जू, खालील ठिकाणी लिंक ओपन कर.
त्या आधी तिथून कोणतेही ईलेक्ट्रॉनिक उपकरण आणले तर इथे चालेल का याची खातरजमा करून घे. electric volts चा काहीतरी घोळ असतो.


/hitguj/messages/103383/103070.html?1193739944

Manjud
Monday, November 19, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, अगं तिकडे वाचूनच मी विचार केला की मागवायला हरकत नाही. पण तिथे कॉफी ग्राईंडर हा प्रॉडक्ट कोणीच डिस्कस केला नाहीये. म्हणून मी इथे टाकलं. मी गूगलून बघणार आहे. बघूया काय माहिती मिळते.

Suparna
Monday, November 19, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, मी वरती मायपत्रीबद्दल विचारले होते. तुम्ही सांगु शकाल का?

Dineshvs
Monday, November 19, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्णा, कबाबचिनी म्हणजे ऑल स्पाईस. याची छोटी फळे असतात व त्याला लवंग, दालचिनी, जायफळ आणि वेलची यांचा एकत्र वास येतो.
माझ्या मते रामपत्री म्हणजेच जायपत्री. जायफळाप्रमाणेच मायफळ नावाचे एक फळ असते. मायपत्री त्याच्याशी संबंधित असावी.
हे मसाले तसे रोजच्या वापरात नसल्याने, माझ्याही वाचनात आले नाहीत.


Prady
Monday, November 19, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु माझ्या पहाण्यातले कॉफी ग्राईंडर्स हे अगदीच छोटे असतात. आपल्या चटणी वाटायच्या भांड्यापेक्षा छोटं भांडं असतं. तुला ईडलीचे डाळ तांदूळ वाटायला नाही त्याचा उपयोग.

Prady
Monday, November 19, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू तू सॅन होसेच्या जवळपास असशील तर कुमूद मधे मिळतील मखाणे. आई होती इतके दिवस तर तिला मिळाले होते तिथे मखाणे. श्रावणी सोमवारच्या उपासाला करायची ती मखाण्याची खीर.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators